Wednesday 27 May 2020

अंतराळवीर Douglas Hurley आणी Robert Behnken उड्डाणासाठी सज्ज जाण्याआधी पत्रकारांशी साधला संवाद


 NASA astronauts Douglas Hurley, left, and Robert Behnken, wearing SpaceX spacesuits
        अंतराळवीर Douglas आणि Robert Space Suite ची ट्रायल घेताना -फोटो -नासा संस्था  

नासा संस्था -26 मे
अमेरिकन भूमीवरून अमेरिकन बनावटीच्या Space X Dragon मधून अंतराळवीर उद्या अंतराळात झेपावणार आहेत  त्यांच्या उड्डाणांसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे नेहमी प्रमाणे ह्या अंतराळवीरांनी जाण्याआधी २३ मे ला  पत्रकारांशी संवाद साधला परंतु कोरोना मुळे अमेरिकेत लॉक डाऊन सुरु असल्याने हा संवाद ट्विटर आणि फोनवरून साधण्यात आला त्याचाच हा वृत्तांत
Douglas Hurley आणि Robert Behnken ह्यांनी Kennedy Space Station च्या Crew Quarters मधून ह्या संवादाला सुरवात केली
Marina Corn -(Atlantic) - उड्डाणापूर्वी कुटुंबियांशी शेवटची भेट कधी होईल आणि लॉक डाऊन मुळे त्यांना social distance चे नियम पाळावे लागतील का ?
Douglas -हो ! आम्हाला कुटुंबीयांची भेट घेता येईल पण अर्थातच दुरूनच कारण लॉक डाऊन सुरु आहे आणि नियम पाळण आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे आम्ही Crew Quarters मधून Tesla मध्ये बसून launch pad कडे जाताना आम्ही उतरल्यानंतर त्यांना भेटू व बोलू शकू ते launch पॅड च्या windows मधून आम्हाला पाहू शकतील आणि ती आमची शेवटची भेट असेल
Joey Roulette (Reuters )- अंतराळवीर Chris Cassidy ने तुम्हाला पाठवलेल्या email बद्दल सांगा त्यांनी ह्या मिशन बद्दल तुम्हाला काय सांगितले आणि फ्लाईटने केनेडी स्पेस स्टेशन मध्ये येताना Robert आणि तुमच्यात काय बातचीत झाली ?
Douglas - Chris Cassidy ला आम्ही दोघेही चांगले ओळखतो त्याच्या email बद्दल सांगण योग्य होणार नाही पण Chris एकांतप्रिय आहे आम्ही दोघे स्थानकात गेल्यावर तिथल्या अंतराळवीरांची संख्या वाढेल पण तरीही आमच्या येण्याने त्याला आनंद होईल आणि तो आमच्या येण्याची आतुरतेने वाट पाहतोय
 Robert - आम्ही लगेच Land झालो नाही Timing Issues मुळे आजूबाजूचा परिसर न्याहळता आला ह्या आधीही आम्ही दोघे इथे बरेचदा आलो होतो कामानिमित्य तेव्हाच्या आठवणी जाग्या झाल्या केनेडी स्पेस सेंटरचा परिसर पुन्हा पाहतानाचा क्षण आनंददायी होता
Marsha Dunn -Associated Press - कोरोना मुळे तुमची  नियमित Covid -19 टेस्ट घेतल्या जात होती का ? ह्या आधी कधी तुम्ही इतक्या टेस्टला सामोरे गेला होतात का ?
Douglas - गेल्या वीस वर्षांपासून आम्ही नासा संस्थेत  कार्यरत आहोत त्या मुळे वैद्यकीय टेस्टची आम्हाला सवय झालीय पण ह्या वेळेस कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून आपण सारेच लॉक डाऊनचा सामना करत आहोत आम्ही 15मार्च पासून Quarantine मध्ये होतो आमची दोनदा Covid-19 टेस्ट घेण्यात आलीय आणि जाण्याआधी कदाचित पुन्हा एकदा टेस्ट घेतली जाईल आमच्यासाठी हि ऐतिहासिक घटना ह्या साठीही आहे कारण आजवर इतका काळ कोणी Space Mission साठी Quarantine झाल नसेल
Robert - आम्ही नेहमीच अशा टेस्टना सामोरे जातो पण सध्याचा काळ सर्व जगासाठीच काळजीचा आहे कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अशा टेस्ट आवश्यक आहेत आणि ह्या वेळेस आमच्यासाठी एक चांगली गोष्ठ घडली आम्हाला घरीच Quarantine राहण्याची मुभा देण्यात आली होती आणि सगळीकडेच लॉक डाऊन असल्यामुळे आमचे कुटुंबीयही घरीच होते त्या मुळे त्यांच्या सोबत राहता आल हे चंदेरी सुखाचे क्षण अनुभवता आले एरव्ही ते आमच्या Quarantine Facility मध्ये येऊ शकले नसते त्यांची कामे आणि शाळा सुरु असती त्या मूळे हे शक्य झाल नसत पण लॉक डाऊन मुळे launching आधीचा आमचा वेळ छान गेला
Jackie Goddard -(Times Of London )- मी तुम्हाला विचारल की तुम्ही कसे Bad Ass (Excellent )आहात ? तर तुम्ही नम्रतेने उत्तरलात आम्ही आमच काम करतो आहोत तुम्ही स्वत:बद्दल सांगू शकत नाही तर एकमेकांबद्दल सांगा
Robert  - चांगला प्रश्न आहे तसही स्वत:बद्दल सांगण्यापेक्षा दुसऱ्याबद्दल सांगण्याची कल्पना चांगली आहे खरतर मी ह्या सारख्या मिशनसाठी Douglas पेक्षा उत्तम सोबती मागू शकलो नसतो तो सदैव सतर्क आणि कोणत्याही आव्हानासाठी सदैव तत्पर असतो त्या मुळे त्याच्या सोबत जाताना काहीही अडचण आली तर तो त्यावर मात करून त्यातून सुखरूप मार्ग काढेल ह्याची मला खात्री आहे
Douglas - Robert (Bob ) शांत आणि बुद्धिमान आहे ह्या मिशन संबंधित कुठलाही प्रश्न विचारा त्याच्याकडे उत्तर तयार असतच त्याने ह्या मिशनची पूर्ण तयारी केलीय येणाऱ्या आव्हानाचा सामना कसा करायचा अडचणींवर मात करून मिशन यशस्वी कस करायच ह्याचा त्याने पूर्ण विचार केलाय त्या मुळेच Robert माझा सहकारी आहे हे माझ्यासाठी आनंददायी आहे
Robert - नासा संस्थेने ह्या मिशन साठी आमची निवड केली त्यांना आम्ही दोघे हे मिशन यशस्वीपणे पार पाडू अशी खात्री वाटली असेल आमच्यासाठी हि अभिनंदनीय बाब आहे आणि आम्ही निश्चितच हि जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू
Rober(twitter वरून ) - अमेरिकेच्या Crew असलेल्या Space Craft ला नावे देण्यात आली होती जस 3-3 चे Freedom 7 Gemini-3ला Molly Brown तस तुम्ही तुमच्या Crew Dragon ला कुठल नाव दयायच ठरवलय ?
Douglas - हो!नक्कीच!हि एक चांगली परंपरा आहे आणि Crew1,Crew2 ऑफिस मधले आमचे सहकारी बोईंगचे सहकारी अंतराळवीर हि परंपरा पुढे चालू ठेवणार आहोत पण त्या नावाच सस्पेन्स मात्र launching पर्यंत आम्ही न सांगण्याच ठरवलय ते तसच राहू द्या
Owen Plum (13 years-Twitter)- तुम्ही तुमच्या सोबत Payload नेणार आहात का? आणखी काय,काय नेणार?
Robert- आमचा मूळ उद्देश Flight Test आणि स्थानकात पोहोचणे हा आहे त्या मुळे Payload कमी आहे आम्ही स्थानकात येणाऱ्या आगामी Space Dragon साठी आवश्यक असणारे Hardware नेणार आहोत बाकी अंतराळ स्थानकातील सुरु असलेल्या सायंटिफिक प्रयोगासाठी आणी Space Walk ला लागणारे साहित्य आम्ही स्थानकात पोहोचल्यावर कार्गोशिप मधून पाठवण्यात येईल
Miriam Kramer(Axios)- सध्या अमेरिकेत कोरोनाच्या थैमानामुळे आणि लॉक डाऊन मुळे वातावरण गंभीर आहे अशा विपरीत परिस्थितीतील ह्या मिशनचा परिणाम Launch पाहणाऱ्या लोकांवर कसा होईल अस तुम्हाला वाटत ?
Robert - इच्छाशक्ती आणि ठाम निर्णयक्षमता असली कि आपल ध्येय साध्य करता येत सध्याच्या विपरीत गंभीर काळातही अमेरिकेने हे दाखवून दिलय सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळातही हि मोहीम न थांबवता सुरु ठेवली गेली लॉक डाऊन मूळे आलेल्या निर्बंधाची कडक अंमलबजावणी करून नासा संस्थेतील सर्वच विभागातील कार्यालयातील टीमने खूप बदल केले पाच वर्षांपासून आम्ही एकत्रित ह्या मिशनमध्ये काम केले पण लॉक डाउनच्या काळात मात्र आम्ही सुरक्षित अंतर ठेवून काम केले खरतर निर्बंध पाळत हे मिशन पूर्ण करण कठीण होत पण अखेर सर्वांनी ते यशस्वी केल त्या मुळे अमेरीका कोरोनाच्या संसर्गातही हि मोहीम सुरक्षित आणि यशस्वीपणे पार पाडू शकतो हे लोकांना कळेल त्या मुळे लोकांवर ह्या मिशनचा चांगलाच परिणाम होईल
ह्या ऐतिहासिक उड्डाणाची लोक उत्सुकतेने वाट पाहात आहेत ह्या वर्षी प्रत्यक्षात जरी त्यांना हा launching सोहळा पाहायला मिळणार नसला तरीही सोशल मीडियावरून लोकांना त्याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळणार आहे
Lucas (Space X )- आताचा तुमचा Space Suite आधीच्या तुम्ही घातलेल्या मिलिटरी टेस्ट पायलट सूट आणि Astronaut Suite पेक्षा वेगळा आहे का ?
Douglas -हो ! Dragon crew Space Suite चे डिझाईन  वैशिष्ठपूर्ण आहे जर अंतराळ प्रवासादरम्यान यानातील
pressure कमी जास्त झाले तर ह्या सूटमधील यंत्रणेमुळे तो नियंत्रित केल्या जाईल आणि अंतराळवीर सुरक्षित राहतील पूर्वी Shuttle मध्ये घातल्या जाणारा अंतराळवीरांचा सूट मोठा बोजड सर्वांसाठी एकाच मापाचा केशरी रंगाचा होता पण आता आमच्या मापाचे सूट बनविल्या गेले आहेत आम्ही त्याची ट्रायल घेतली आणि योग्य आहेत कि नाही हे पाहिले ते योग्य आणि सुरक्षित आहेत सहसा दुसऱ्या कंपनीला सूट तयार करण्यासाठी देण्यात येतात पण Space X ने यंदा हे सूट तयार केले आहेत आणि हे सूट घातल्यावर  छान दिसतात अस सर्वांच मत आहे
Rachael Joy(Florida Today)- हा Week End तुमच्यासाठी आणि सर्वांसाठीही Memorial Day आहे ह्या वेळेस launching आधी तुम्ही Quarantine आहात तरीही तुमचे काही plans आहेत का ? एरव्ही तुमच्या आवडीची
शहरातील प्रेक्षणीय स्थळ,रेस्टारंट किंवा बीच कुठे जायला तुम्हाला आवडल असत ?
Douglas - हो ! हा मेमोरियल Week end आहेच आम्ही Quarantine मध्ये आहोत आणि आवश्यक शेड्युल पाळत आहोत उद्या Launch ची Dry Dress Rehearsal आहे सोमवारी,मंगळवारी आम्ही व्यस्त आहोत कारण बुधवारी आमच launching आहे भरपूर तयारी असते उद्या आमचे कुटुंबीय येतील तेव्हा आमची भेट होईल आणि एरव्ही जसा बीचवर किंवा रेस्टारंट मध्ये वेळ घालवतो तसा आम्हाला आमच्या कुटुंबियांसोबत घालवता येईल
आवडते ठिकाण सांगायच तर कुठेही बीचवर किंवा वेगवेगळ्या रेस्टारंट मध्ये जायला आवडत पण ह्या वेळेस आमचे डॉक्टर तिथे जाण्याची परवानगी आम्हाला देऊ शकत नाहीत
Rachael -अरे ! आम्हाला तुम्ही ह्या वेळेस Sandbar मध्ये दिसणार नाही !
Douglas -नाही ना ! पण लॉक डाऊन मध्ये ते सुरु आहे कि नाही मला माहिती नाही कदाचित निर्बंध पाळून मर्यादित काळासाठी सुरूही असेल मला माहिती नाही !
Steven Clark (Space Flight )-तुम्ही Manual Flying बद्दल सांगितलत तुमच्या पैकी अंतराळ यानाचा ताबा कोणाकडे असेल ?तुम्ही नासा संस्थेत Join झालात तेव्हा Space Shuttle वापरल्या जायच तेव्हा तुम्हाला Shuttle ची जागा दुसर कोणी घेईल असं वाटल होत का ?
Douglas -अंतराळयानाचा ताबा Dragon कमांडर म्हणून माझ्याकडे असेल त्या मूळे Manual Flying मीच करणार आहे आधी free flight मध्ये आम्ही demo घेणार आहोत आणि नंतर स्थानकाजवळ पोहोचल्यानंतर ह्या Manual Flying चा वापर करू ह्या साठी आम्हा दोघात समन्वय असण आवश्यक असल्यामुळे आम्ही दोघांनी ट्रेनिंग दरम्यान खूप practice केली आहे
Robert -आम्ही नासा संस्थेत 2000 साली Join झालो होतो तेव्हा Space Station उभारणीच काम सुरु होत ते पूर्णत्वाला जाताना आम्ही पाहिलय Space Flight मध्ये सहभागी होण्याची तेव्हाची इच्छा प्रत्यक्षात साकारेल अस तेव्हा वाटल नव्हत आम्ही ह्या मिशनमध्ये सहभागी आहोत हि आमच्यासाठी सन्माननीय बाब आहे तेव्हा Space Station आकाराला येत होत आणि नवीन वेगळ अंतराळ यान चालवायला आम्हाला नक्कीच आवडल असत आणी आता वीस वर्षांनी आमच स्वप्न प्रत्यक्षात उतरलय Michael Fossum म्हणाले तस स्वप्नात जगल्यासारख स्वप्नवत आहे हे !
Dove Moser -(Business  Inside )- तुम्ही दोघांनी सांगितल्या प्रमाणे तुम्हाला Test Flight ची संधी मिळण अभिमानास्पद आहे पण हि प्रायोगिक Flight असल्याने  हे काम जोखमीच आणि धोकादायक आहे ह्या आव्हानात्मक कामासाठी तुम्ही Confident आहात का ? तुम्हाला LOC,LM no. ची माहिती देण्यात आलीय   का?
Robert - Commercial Crew Program,Space X टीमने आम्हाला ह्या बाबतीतली पूर्ण माहिती दिली आहे पाच वर्षांपासून आम्ही ह्या मिशन साठी कार्यरत आहोत त्या मुळे ह्याची सखोल माहिती आम्ही जाणून घेतली ह्या no. मुळे धोक्याची सूचना मिळते आणि अशा वेळेस Hardware आणि Procedures मध्ये काय बदल करावेत ह्याची माहिती मिळाली दोन दिवसांपासून Agency च्या Flight Readiness Review मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली शिवाय व्यवस्थापन टीममध्ये risk बद्दल होण्याऱ्या चर्चांमध्येही आमचा सहभाग होता माझ्या माहिती प्रमाणे आजवरच्या अंतराळ मोहिमांमध्ये जीतकी सखोल माहिती दिली गेली नसेल तितकी आम्हाला दिली गेली त्या मुळे ह्या मोहिमेची जोखीम आणि महत्व आम्ही जाणतो आम्ही confident आणि आतुर आहोत Launching साठी
 Douglas - Space X ला Falcon आणि Cargo चा खूप अनुभव आहे आम्ही Join केलं तेव्हा Space X  co. नव्हती पण अल्पावधीतील त्यांच अंतराळ मिशन मधल यश कौतुकास्पद आहे
शेवटी दोघांचे आभार मानून आणि त्यांना Launching साठी शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली

Thursday 21 May 2020

अंतराळवीर Robert Behnken आणी Douglas Hurley उड्डाणा आधी Quarantine मध्ये


 
अंतराळवीर Douglas Hurley आणी Robert Behnken Space X Dragon ची पहाणी करताना- फोटो-नासा संस्था

नासा संस्था -20 मे
सध्या अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग वाढतच चाललाय खबरदारीचा उपाय म्हणून तिथे काही अत्यावश्यक सेवा वगळता अजूनही lock down सुरु आहे कोरोनावर औषध शोधण्यासाठी शास्त्रज्ञ शर्थीचे प्रयत्न करत आहेत परंतु अजूनही यश आले नाही अमेरिकेने अत्यावश्यक सेवेअंतर्गत आपली अंतराळ मोहीम मात्र सुरूच ठेवली आहे  नासाच्या अंतराळ मोहीम 63अंतर्गत 27 मेला अंतराळवीर Robert Behnken आणी Douglas Hurley अंतराळ स्थानकात राहायला जाणार आहेत हि अंतराळ मोहीम नेहमीप्रमाणे नाही तर अमेरिकेसाठी अत्यंत महत्वाची आहे पहिल्यांदाच अनेक वर्षानंतर अमेरिकन अंतराळवीर अमेरिकन मेड अंतराळयान Space X  Dragonआणी Falcon 9 रॉकेट मधून अमेरिकन भूमीवरून अंतराळात झेपावणार आहेत अमेरिकेसाठी हि ऐतिहासिक घटना आहे आणी म्हणूनच ह्या मोहिमेची जय्यत तयारी सुरु आहे
सध्याच्या कोरोनाच्या संसर्गजन्य परिस्थितीत ह्या दोन अंतराळ वीरांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून उड्डाणाआधी quarantine मध्ये ठेवण्यात आले होते जाण्याआधी त्यांना आणि त्यांच्या मुळे स्थानकातील अंतराळ वीरांना  कोरोनाचा संसर्ग होऊ नये पृथ्वीवरून  कोरोनाचा व्हायरस अंतराळ स्थानकात जाऊ नये म्हणून हि खबरदारी घेण्यात आली अंतराळवीरांचे आरोग्य निरोगी राहावे ते आजारी पडू नये म्हणून प्रत्येक अंतराळ मोहिमे आधी अंतराळवीरांची विशेष काळजी घेतली जाते आणि आता तर कोरोनाचा अत्यंत जीवघेणा धोका असल्याने सतर्क राहणे आणि काळजी घेणे अत्यावश्यक आहे
अंतराळवीरांना घरीच quarantine राहण्याची मुभा देण्यात आली होती पर्यंतू quarantine च्या नियमांची कडक अंमलबजावणी करणे बंधनकारक होते पण अंतराळवीरांना घरी राहून काही अत्यावश्यक कामामुळे quarantine चे नियम पाळणे शक्य होणार नाही असे वाटल्यास नासाच्या Jonson Space Center मध्ये त्यांना quarantine मध्ये राहण्याची सोय उपलब्ध होती quarantine च्या काळात त्यांना भेटायला येणाऱ्या VIPs आणि अत्यावश्यक व्यक्तींची कोरोना तपासणी करूनच त्यांना भेटण्याची मुभा देण्यात आली होती आणि अंतराळवीरांचीही नियमित तपासणी करण्यात आली
अंतराळ स्थानकात गेल्यानंतर ह्या अंतराळवीरांना एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे शक्य होणार नसल्यामुळे ह्या अंतराळवीरांच्या उड्डाणाआधीच त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यात आली आता त्यांचा quarantine चा काळ संपल्यानंतर हे दोन्ही अंतराळवीर पुढच्या तयारीसाठी Kennedy Space Center मध्ये रवाना होतील

Thursday 14 May 2020

दक्षिण कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर उसळल्या जैविक प्रकाश लाटा


अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियातील बीचवर सध्या निळ्या रंगाच्या प्रकाशित लाटा उसळत आहेत हे नैसर्गिक नेत्रसुखद दृश्य पाहण्यासाठी दरवर्षी अमेरिकन नागरिक समुद्रकिनाऱ्यावर गर्दी करतात यंदा मात्र अमेरिकेतील कोरोनाच्या थैमानामुळे तिथे लॉकडाउन सुरु आहे Stay At Home मुळे लोक घरातच बंदिस्त आहेत पण लॉक डाउन मध्ये शिथिलता मिळताच नागरिकांनी ह्या नैसर्गिक रंगीत लाटा पाहण्याचा आनंद घेतला अर्थात दुरूनच
एप्रिलमध्ये सुरु झालेल्या ह्या रंगीत लाटा अजूनही समुद्रकिनारी उसळत आहेत
नुकताच आम्हा मैत्रिणींच्या Whats app ग्रुप वर ह्या नैसर्गिक जैविक रंगीत प्रकाश लाटांचा व्हिडिओ पाहायला मिळाला आणि आपसूकच खूपच सुंदर !अप्रतिम !अशा प्रतिक्रिया आमच्या तोंडून बाहेर पडल्या
ह्या व्हिडिओत एक माणूस वाळूतून समुद्राकडे पळत जातोय आणि त्याच्या मोगोमाग वाळूतून निळ्या रंगाचा प्रकाशझोत बाहेर पडतोय आणि हे तो समुद्रातील पाण्यात गेल्यावरही चालूच आहे शिवाय पाण्यात अनेक लोक पोहोण्याचा आनंद घेत आहेत आणि त्याच्या मागोमाग निळ्या रंगाच्या प्रकाशित लाटा उसळत आहेत सारच सुंदर अचंबित करणार! हे पाहून हि कसली जादू ? असं मनात आल तर आश्चर्य वाटणार नाही

अर्थात हि जादू नाही तर हा दक्षिण कॅलिफोर्नियाच्या बीचवरच्या आणि पाण्यातील Algae ह्या सुक्षम पाणवनस्पती निर्मित  प्रकाश आहे ह्या व्हिडीओ बद्दल आम्ही आमच्या अमेरिकास्थित मैत्रिणीकडून जाणून घेतल तेव्हा तिनेही ह्या रंगीत प्रकाशमान लाटा पाहिल्याच सांगितल
                               Laguna beach वरील Bioluminesce निळ्या रंगांच्या लाटा 

 ती म्हणते ,"It Was Magical &Amazing! We Saw Bio-luminescent Waves at Laguna beach What a Wonderful experience ! आमच्या घरापासून जवळ असल्याने आम्ही लॉकडाऊन शिथिल झाल्यावर चार मेला दुरूनच  ह्या रंगीत प्रकाशमान लाटा पाहण्याचा आनंद घेतला सध्या अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग वाढतोय अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र बंद आहे नागरिक फक्त आवश्यक सामान आणण्यासाठी बाहेर पडतात त्या मुळे आम्ही दुरूनच त्या लाटा पाहिल्या आणि फोटोत कॅमेराबद्ध केल्या तसही Red Algae toxic असतात !" ह्या लाटांबद्दल प्रकाशित माहितीही तिने सांगितली तेव्हा कॉलेज मध्ये  शिकताना सरांनी आम्हाला सांगितलेली ह्या algae च्या वैशिष्ठ्याची माहिती आठवली

                               Laguna beach वरील निळ्या रंगाच्या प्रकाशित उसळणाऱ्या लाटा 

अमेरिकेत ह्या लाटांना Glowing  Blue Waves Red Tide किंवा Algal Bloom म्हणतात खासकरून उन्हाळ्यात हे micro organisms खूप मोठया संख्येने एकत्र येतात तेव्हा असा नैसर्गिक जैविक रंगीत प्रकाश बाहेर पडतो ह्या  सूक्ष्म एकपेशीय पाणवनस्पती (Micro Organisms )म्हणजेच algae सुमुद्राच्या किनाऱ्यावर किंवा पाण्यात वाढतात त्यांच्या पेशीत काही केमिकल्स असे असतात कि थोड्याशा घर्षणाने किंवा इतर मनुष्य प्राणि,पक्षी,मासे  आणी समुद्रीजीव ह्यांच्या स्पर्शाने त्यांच्यात ऊर्जा निर्माण होते आणि त्यांच्या पेशीतून रंगीत प्रकाश बाहेर पडतो  दिवसा ह्या algae मधून लाल रंगाचा प्रकाश बाहेर पडतो तर रात्री निळा नियान रंगाचा प्रकाश बाहेर पडतो ह्या शिवाय काही Algae केशरी आणि हिरवा रंगाचा प्रकाशही तयार करतात निसर्गाने शत्रूपासून स्वसंरक्षणासाठी त्यांच्यात हि क्षमता निर्माण केली आहे शत्रू पासून स्वत:चा बचाव करण्यासाठी लाल प्रकाश निर्माण केल्या जातो ह्या Algae toxic असतात एखाद्या सुमुद्रीजीव किंवा मानवापासून धोका वाटल्यास,त्यांचा स्पर्श झाल्यास इतरांना धोक्याची सूचना देण्यासाठी थोडक्यात रेड अलर्ट देण्यासाठी algae लाल प्रकाश निर्माण करतात
एकाच वेळी असंख्य algae जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच concentration झाल्याने Red Tide Waves निर्माण होतात लाटांवर algae निर्मित रंगीत प्रकाश विरानमान होतो आणि नागरिकांना  ह्या जादुई उसळत्या रंगीत निळ्या लाल रंगांच्या लाटाच अप्रतिम सौन्दर्य पाहण्याचा आनंद मिळतो

Friday 8 May 2020

अंतराळवीर Chris Cassidy ह्यांनी स्थानकातून मानले कोरोना वॉरिअर्सचे आभार

NASA - Crew Ramps Up Science After New Treadmill Installed
                  अंतराळवीर Chris Cassidy अंतराळ स्थानकातून संवाद साधताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 6 मे
नासाच्या अंतराळ मोहीम 63चे सध्याचे कमांडर Chris Cassidy (U.S. Navy SEAL आणि अंतराळवीर ) ह्यांनी सहा तारखेला नासा संस्थेशी संपर्क साधत अमेरिकेतील कोरोना वॉरिअर्सचे आभार मानले आहेत
Chris Cassidy म्हणाले," सध्या अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग चिंताजनक आहे मी ह्या देशाचा नागरिक आहे आणि नासा संस्थेत येण्याआधी आर्मीत कार्यरत होतो त्या मुळे शत्रूशी लढताना काय अडचणी येतात हे मी जाणतो पण सैनिक लढतात तेव्हा त्यांना शत्रू डोळ्यासमोर दिसतो त्या मुळे त्यांना नष्ट करता येत पण कोरोनाचा व्हायरस हा अदृश्य आहे हा लाखो लोकांना सतावतोय हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत पण तो दिसत नसल्याने त्याला नष्ट करण कठीण जात आहे
ह्या COVID-19 च्या अदृश्य शत्रूशी मुकाबला करताना अमेरिकेतील Hospital मधील सर्व डॉक्टर्स,नर्सेस पोलीस अग्निशमन दलातील कर्मचारी आपल्याला मदत करणारे Ware house person ,किराणा दुकानदार आणि तेथील कर्मचारी,फळ,भाजी विक्रेते हे सारे आपल्याला मालाचा पुरवठा करतात ते स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ह्या बिकट संसर्गजन्य परिस्थितीतही सर्वांना मदत करत आहेत
त्या सर्वांचे मोहीम 63 मधील माझे सहकारी आणि मी विशेष आभार मानतो आम्ही तुमचे आभारी आहोत ! तुमच्या कडे पाहून साऱ्यांना प्रेरणा मिळते आणि सुरक्षितताही ! Thanks ! तुमच्या मुळे अमेरिकेतील लोक healthy आणि सुरक्षित आहेत त्या मुळे तुमच्या प्रत्येकाचे स्पेशल आभार !आम्ही पृथ्वीवर नसलो तरीही आम्ही तुमच्या सोबत आहोत धन्यवाद !"

Thursday 7 May 2020

अमेरिकन बनावटीचे पहिले Space X Crew Dragon 27मेला स्थानकाकडे झेपावणार

NASA astronauts Behnken and Hurley participated in Commerical Crew Program first flight test.

अंतराळवीर Robert Behnken आणि अंतराळवीर Doug Hurley अंतराळ प्रवासाच्या ट्रेनिंग दरम्यान -फोटो नासा संस्था

नासा संस्था -2 मे
सध्या अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग वाढतच चाललाय त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहे नुकतेच नासा संस्थेतील शास्त्रज्ञांनी व्हेन्टिलेटरची निर्मिती केली आहे शिवाय ह्या बिकट परिस्थितीतही नासा संस्थेने आपली पूर्वनियोजित अंतराळमोहीम सुरूच ठेवली आहे मागच्या महिन्यात तीन अंतराळवीर अंतराळ स्थानकात राहायला गेले आणि तीन अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप पोहोचले आहेत
आता 27 मेला नासाच्या पूर्वनियोजित अंतराळ मोहिमे अंतर्गत अमेरिकेने निर्मित केलेल्या Space X Crew Dragon अंतराळात झेपावणार आहे ह्या यानाची चाचणी पूर्ण झाली असून ह्या अंतराळ यानातून नासाचे दोन अंतराळवीर अंतराळ स्थानकात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत
ह्या नव्या Space x Crew Dragon ह्या यानाची निर्मिती अमेरिकेने केली असून 2011नंतर प्रथमच अमेरिकेच्या भूमीवरून नऊ वर्षांनी पुन्हा एकदा अंतराळ यान अंतराळात उड्डाण करणार आहे आणि अंतराळवीरांना स्थानकात पोहोचवणार आणि स्थानकातून पृथ्वीवर परत आणणार आहे 2011साली हि मोहीम बंद करण्यात आली होती त्या मुळे अंतराळवीर रशियन बनावटीच्या सोयूझ अंतराळ यानातून आणि रॉकेट मधून अंतराळ प्रवास करत होते अंतराळ यान देखील रशियाच्या कझाकस्थानातून अंतराळात उड्डाण करत होते
आता अमेरिका ह्या बाबतीत स्वयंपूर्ण देश झाला असून ह्या पुढची अंतराळ मोहीम अमेरिकेच्या भूमीवरूनच राबविली जाणार आहे आणि अमेरिकन यानातून आणि रॉकेट मधून अंतराळवीर अंतराळ प्रवास करणार आहेत अमेरिकन बनावटीच्या Space X Crew Dragon व Falcon Rocketच्या ऐतिहासिक उड्डाणाचा शुभारंभ 27 मेला करण्यात येणार आहे  नासाच्या फ्लोरिडा येथील Kennedy Space Center मधल्या Complex 39 A इथून Space X अंतराळ यान नासाच्या दोन अंतराळवीरांना घेऊन अंतराळात झेपावणार आहे नासाच्या Robert Behnken आणि Doug Hurley ह्या दोन अंतराळवीरांना घेऊन Space X  Crew Dragon बुधवारी 27 मेला पृथ्वीवरून 4.32p.m.ला अंतराळ प्रवासाला निघेल आणि 28 मेला 11.29a.m.ला स्थानकात पोहोचेल मागच्या वर्षी ह्या यानाची पहिली यशस्वी चाचणी झाली होती आता हि दुसरी आणि अंतिम चाचणी असेल
ह्या अंतराळयाना मार्फत पृथ्वीवरून यानाचे उड्डाण,अंतराळ प्रवास,स्थानकातील docking आणि landing ह्या सर्वाचा डाटा गोळा करण्यात येणार आहे शिवाय ह्या यानाचा उपयोग कमर्शियल crew launching साठी आणि त्यांना स्थानकातून परत पृथ्वीवर आणण्यासाठीही करण्यात येणार आहे
ह्या Space X Crew Dragon मधून अंतराळवीर Robert Behnken आणि Doug Hurley हे दोघे अंतराळ स्थानकात जाणार असून सध्या तिथे राहात असलेल्या अंतराळवीरांसोबत राहून संशोधन करणार आहेत ह्या दोघांनीही ह्या आधी दोन वेळा अंतराळवारी केली आहे ह्या अमेरिकन बनावटीच्या अंतराळ यानातून आणि रॉकेट मधून अंतराळ प्रवास करण्यासाठी हे दोघे सज्ज झाले असून दोघेही म्हणतात आम्ही ह्या ऐतिहासिक अंतराळप्रवासाची आतुरतेने वाट पाहात आहोत आम्ही excited आहोत,दोघेही 2000 साली नासा संस्थेत सिलेक्ट झालो त्या मुळे आम्हा दोघा मित्रांना एकत्र प्रवास करायला मिळणार म्हणून आनंदित आहोत दोघांनीही pilot म्हणून काम केलय Pilot School मध्ये शिकताना सर्वांचीच नव्या कोऱ्या Spaceship मधून उड्डाण करायची ईच्छा असते आणि आता आम्हाला ह्या अमेरिकन बनावटीच्या अंतराळ यानातून प्रथम उड्डाण करण्याची ऐतिहासिक सुवर्ण संधी मिळालीय त्या मुळे आमची ईच्छा पूर्ण होणार म्हणून आम्ही उत्साहित आहोत
Hurley म्हणतात आम्ही ह्या ऐतिहासिक मिशन मध्ये सहभागी आहोत हि आमच्या साठी सन्मानिय बाब आहे
सध्या अमेरिकेत कोरोनाचा प्रकोप वाढल्यामुळे lock down सुरू आहे त्यामुळे ह्या launching च्या वेळी आमचे कुटुंबीय आणी मित्र ऊपस्थीत राहु शकणार नाहीत पण सद्यस्थितीत तो निर्णय योग्यच आहे शेवटी आपली सुरक्षितता महत्वाची आहे आपण निरोगी आणी आनंदी असण महत्त्वाचे आहे
अंतराळ वीर Robert Behnken हे Mechanical engineer आहेत आणि नासा संस्थेत येण्याआधी ते U.S.Air Force मध्ये Flight test Engineer म्हणून कार्यरत होते तर  Doug Hurley हे Civil Engineer आहेत आणि नासा संस्थेत येण्याआधी त्यांनी U.S. Marine Crop मध्ये Fighter Pilotआणि Test Pilot म्हणून काम केले आहे
नासाचे Jim Bridenstine म्हणतात तब्बल नऊ वर्षांनी पुन्हा एकदा अमेरिकन भूमीवरून स्वनिर्मित अंतराळ यान आणि रॉकेट मधून अंतराळवीर अंतराळ प्रवास करणार आहेत हि आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे पण सध्या अमेरिका कोरोना संसर्गाने त्रस्त आहे त्या मुळे देशापुढे अनेक गंभीर प्रश्न आहेत ह्या बिकट परिस्थितीतही ह्या उड्डाणाची सर्व तयारी आणि आवश्यक चाचणी पूर्ण झाली असून यंत्रणा ह्या उड्डाणासाठी सज्ज झाली आहे आमच्या साठी lock down च्या काळात ह्या launching ची तयारी करण आव्हानात्मक होत पण नासा संस्थेतील कर्मचारी, शास्त्रज्ञ आणी ह्या मिशनच्या टिमने lock down च्या नियमांची कडक अंमलबजावणी करुन हे मिशन पुर्णत्वास नेलय
ह्या अंतराळ यानाची यंत्रणा व्यवस्थित काम करतेय ना? त्यात काही त्रुटी राहिली नाही ना? ह्याची चाचणी घेण्यात आली शिवाय अंतराळ वीरांना पृथ्वीवर ऊतरण्यासाठी लागणारे parachute व्यवस्थित काम करतेय ना?हेही तपासण्यात आलय कारण शेवटी अंतराळविरांची सुरक्षितता महत्वाची आहे