Monday 27 April 2020

अंतराळवीर Chris Cassidy ह्यांनी दिल्या पन्नासाव्या Earth Day निमित्य शुभेच्छा

 NASA astronaut Chris Cassidy
    अंतराळवीर Chris Cassidy सोयूझ यानातून अंतराळस्थानकाकडे झेपावताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -23 एप्रिल
नुकताच 22 एप्रिलला अमेरिकेत पन्नासावा Earth day साजरा करण्यात आला पण ह्या वर्षी कोरोनाच्या संसर्गा मुळे तो नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करता आला नाही तर साऱ्यांनी तो घरातच साजरा केला आपली पृथ्वी अनमोल आहे आणि सध्या तरी आपल्या पृथ्वीसारखी सजीव सृष्टी असणारी दुसरी पृथ्वी किंवा ग्रह ब्रह्मांडात अस्तित्वात नाही त्या मुळेच पृथ्वीवरील पर्यावरण रक्षण करण्याच आवाहन सतत शास्त्रज्ञ आणी जाणकार लोकांना करत असतात
पृथ्वीच सजीवांसाठी आवश्यक असलेल मोल जाणून अमेरिकेचे सिनेटर जेरॉल्ड नेल्सन ह्यांनी पहिल्यांदा 22 एप्रिल 1970 हा दिवस पृथ्वी दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले होते त्या वर्षी हवेतील आणि पाण्यातील प्रदूषण ह्या मुळे वातावरण दूषित होऊन पर्यावरणास बाधा निर्माण झाली होती पृथ्वी संरक्षणासाठी प्रदूषण रोखणे आवश्यक होते मणून त्यांनी हा निर्णय घेतला ह्या वर्षी पन्नासावा पृथ्वी दिन होता
आपण राहतो त्या पृथ्वीवरील वातावरण आपल्या अस्तित्वासाठी पोषक आहे पण आपल्याला तिचे मोल कळत नाही पृथ्वीपासून दूर अंतराळातील अंतराळस्थानकात वास्तव्य करणाऱ्या अंतराळवीरांना मात्र तिचे मोल कळते अंतराळवीर जेव्हा पृथ्वीवरून  स्थानकात जाण्यासाठी यानातून अंतराळात झेपावतात तेव्हा पृथ्वीकडे पाहताना तिचे विलोभनीय अलौकिक सौन्दर्य पाहून अचंबित होतात ह्या पहिल्या वहिल्या पृथ्वीदर्शनाने ते आनंदित होतात आणि त्यांना पृथ्वीदर्शनाचे  हे भाग्य लाभले म्हणून देवाचे नासा संस्थेचे आभार मानतात अर्थात हे भाग्य त्यांना त्यांच्या असामान्य कर्तृत्व आणि धैर्यामुळे मिळत
जेव्हा ते अंतराळस्थानकात प्रवेश करतात तेव्हा तिथल्या झिरो ग्रॅव्हीटीत पृथ्वीच मोल आणखीनच वाढत तिथे गुरुत्वाकर्षणच नसल्याने इथल्यासारखे उभे राहता येत नाही खाण,पिण,झोपण सारच तरंगत राहून कराव लागत तिथे प्रत्येक वस्तू तरंगत असल्यामुळे सुरवातीला त्यांची तारांबळ उडते तरीही नंतर ते तिथल्या विपरीत कठीण वातावरणाशी जुळवून घेतात आणि संशोधन करतात त्यांच्या कामातून मिळालेल्या मोकळ्या वेळात पृथ्वीचे वेगवेगळ्या वातावरणातील फोटो काढतात पर्यावरणातील बदलांची माहिती गोळा करतात आणि त्यावरही संशोधन करतात
सध्या अंतराळ स्थानकात राहात असलेल्या अंतराळवीरांनी पृथ्वीवासियांना यंदाच्या पन्नासाव्या Earth Day निमित्य शुभेच्छा दिल्या आहेत
अंतराळवीर Chris Cassidy ह्यांनी पृथ्वीवासीयांना शुभेच्छा देतानाच पृथ्वीविषयीच त्यांच मत व्यक्त करून पृथ्वीची काळजी घ्या अस सांगितल "पृथ्वी सुंदर आहे अनमोल आहे आणि माझ्यासाठी स्पेशल आहे
पृथ्वी माझ घर आहे सध्या मी माझ्या सहकारी अंतराळवीरांसोबत माझ्या ह्या दुसऱ्या अंतराळातील घरी राहतोय इथे सर्व सुरळीत सुरु आहे सर्व यंत्रणा व्यवस्थित कार्यरत आहेत जस आम्ही स्थानकात टेक्निकल,मेकॅनिकल प्रॉब्लेम येऊन स्थानकातील यंत्रणा बिघडू नये म्हणून काळजी घेतो तशी तुम्हीही पृथ्वी संरक्षणाची काळजी घ्या
पृथ्वीच पर्यावरण बिघडू नये म्हणून कार्यरत राहा पर्यावरणाच संतुलन राखा कारण पृथ्वी सारख पोषक वातावरण कुठेच नाही म्हणून ती अनमोल आहे !"

Saturday 18 April 2020

नासाचे अंतराळवीर Andrew Morgan Jessica Meir आणि Oleg Skripochka पृथ्वीवर सुखरूप पोहोचले

रशियन अंतराळवीर Skripochaka ,Jessica Meir आणि Andrew Morgan पृथ्यवीवर पोहोचल्यानंतर -फोटो नासा संस्था

नासा संस्था - 17 एप्रिल
नासाच्या अंतराळ मोहीम 62 चे तीन अंतराळवीर Andrew Morgan ,Jessica Meir आणि रशियन अंतराळवीर Oleg Skripochka शुक्रवारी पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत त्यांचे सोयूझ MS -15 हे अंतराळ यान  कझाकस्थानातील Dzhezkazgan येथे 1.16a.m.ला पृथ्वीवर पोहोचले निघण्याआधी अंतराळ स्थानकातील सहाही अंतराळवीरांनी एकमेकांचा निरोप घेतला त्यानंतर सोयूझ यानाची hatching प्रक्रिया पूर्ण झाली यानाची व्यवस्थित चाचणी झाल्यानंतर यान स्थानकापासून वेगळे झाले आणि पृथ्वीच्या दिशेने झेपावले
पृथ्वीवर पोहोचल्यानंतर तीनही अंतराळवीर parachute च्या साहाय्याने पृथ्वीवर उतरले त्या नंतर नासाच्या search & recovery force च्या टीमने त्यांना कॅप्सूल मधून बाहेर काढून उचलून आणले आणि खुर्चीवर बसविले  सुरवातीला  रशियन अंतराळवीर आणी कमांडर Skripochka ,flight engineer Jessica Meir आणि शेवटी flight engineer Andrew Morgan पृथ्वीवर उतरले नासाच्या डॉक्टर्सनी त्यांचे प्राथमिक चेक अप करून त्यांची तब्येत ठीक असल्याचे सांगितले आणि त्यांचे सुखरूप पोहोचल्याबद्दल अभिनंदन केले
नासाची महिला अंतराळवीर Jessica Meir पृथ्वीवर पोहोचल्यानंतर चेकअप दरम्यान -फोटो नासा संस्था

ह्या तीनही अंतराळवीरांनी पृथ्वीवर पोहोचताच इथल्या मोकळ्या हवेत अनेक महिन्यांनी मोकळा पहिला श्वास  घेतला अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप पोचल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता नासाच्या टीमने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सुरु असलेल्या Lock Down मुळे मेडिकल टीम व्यतिरिक्त इतरांना अंतराळवीरांपासून सुरक्षित अंतर ठेवण्याच्या सूचना दिल्या नासाच्या टीमने अंतराळवीरांच्या आवश्यक तपासणी नंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून तुम्ही ठीक आहात ना ! अशी विचारणा केली तेव्हा अंतराळवीरांनी त्यांना हो ! आम्ही ठीक आहोत असे सांगितले
प्राथमिक तपासणी नंतर ह्या तीनही अंतराळवीरांना पुढील चेकअप साठी रशियन हेलिकॉफ्टरने बैकोनूर येथील recovery staging city मध्ये नेण्यात आले तिथे जाण्याआधी  नॉर्मल झाल्यानंतर अंतराळवीरांनी फोन वरून त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत सुखरूप  पृथ्वीवर पोहोचल्याचे सांगितले सर्व तपासण्या पूर्ण झाल्यानंतर अंतराळवीर Andrew Morgan आणि Jessica Meir ह्यांना नासाच्या विमानाने अमेरिकेतील Houston येथे पाठविण्यात येईल तर अंतराळवीर Skripochka ह्यांना रशियन विमानाने त्यांच्या Star City ह्या गावी पाठविण्यात येईल
  नासाचे अंतराळवीर Andrew Morgan पृथ्वीवर परतल्यानंतर - फोटो -नासा संस्था

 Jessica Meir आणि Oleg Skripochka हे दोघेही 2019 sep मध्ये अंतराळ स्थानकात राहायला गेले यांनी स्थानकात 205 दिवस वास्तव्य केले Jessica हिची हि पहिलीच अंतराळवारी होती तिने ह्या दरम्यान Christina Koch सोबत पहिला फक्त महिला अंतराळवीरांचा समावेश असलेला ऐतिहासिक स्पेसवॉक केला ह्या दोघीनी तीनवेळा अंतराळ स्थानकाच्या दुरुस्तीसाठी स्पेसवॉक केला Jessica ने ह्या स्थानकातील वास्तव्यात झिरो ग्रॅविटीत मानवी आरोग्यावर विशेषतः Heart tissue कसे कार्य करतात ह्या वर सखोल संशोधन केले ह्या तिघांनीही अंतराळस्थानकात वेगवेगळे सायंटिफिक संशोधन केले त्यांनी अंतराळस्थानकातील वातावरणात पाण्याच्या थेंबाचा आकार कसा तयार होतो,पाण्याचा flow आणि pressure ह्या विषयी संशोधन केले
अंतराळवीर Oleg Skripochka ह्यांची हि तिसरी अंतराळ वारी होती त्यांनी आजवर स्थानकात 536दिवस वास्तव्य केले
Andrew Morgan ह्यांनी अंतराळस्थानकात दीर्घकाळ झिरो ग्रॅविटीत राहिल्यानंतर मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो ह्यावरील संशोधनात सहभागी होण्यासाठी स्थानकातील मुक्काम वाढवला Andrew जुलै 2019मध्ये स्थानकात राहायला गेले त्यांनी नऊ महिने स्थानकात राहून संशोधन केले ह्या तिघांनीही स्थानकातील वास्तव्या दरम्यान त्यांच्या शरीरात होणाऱ्या बदलांची नोंद ठेवली आणि त्यावर संशोधन केले शिवाय वेळोवेळी त्यांचे Biological सॅम्पल्स घेऊन ते पृथ्वीवर आणले त्यांनी अंतराळवीरांच्या भविष्यकालीन दूरवरच्या अंतराळ मोहिमां मधील वास्तव्यात अंतराळ वीरांना ताजे अन्न मिळावे म्हणून स्थानकात सुरु असलेल्या veggie प्रोजेक्ट  मध्ये सहभागी होत भाजी आणि धान्य लागवड यशस्वी केली   

Friday 10 April 2020

अंतराळवीर Chris Cassidy, Anatoly Ivanishin आणि Ivan Vagner अंतराळस्थानकात सुखरूप पोहोचले


 The new Expedition 63 crew joined the Expedition 62 crew today        अंतराळ स्थानकात पोहोचल्यानंतर अंतराळवीर नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधताना -फोटो नासा संस्था

नासा संस्था-9 एप्रिल
नासाच्या अंतराळ मोहीम 63चे अंतराळवीर Chris Cassidy रशियन अंतराळवीर Anatoly Ivanishin आणि Ivan Vagner काल अंतराळस्थानकात सुखरूप पोहोचले आहेत अमेरिकेत सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने परिस्थिती गंभीर आहे तरीही अमेरिकेने ह्या अंतराळवीरांची नियोजित अंतराळ मोहीम रद्द केली नव्हती सोयूझ MS-16 हे यान कझाकस्थानातील बैकोनूर कॉस्मोड्रोम वरून सकाळी 4.05 वाजता अंतराळवीरांना घेऊन अंतराळस्थानकाकडे झेपावले आणि सहा तासांच्या अंतराळ प्रवासानंतर अंतराळ स्थानकाजवळ पोहोचले त्यानंतर यानाने अंतराळस्थानकाभोवती चार फेऱ्या मारल्या सोयूझ यान 10.13a.m ला   अंतराळस्थानकाच्या Poisk Service Module जवळ पोहोचताच सर्व ठीकठाक असल्याची खात्री करून सोयूझ यानाची hatching प्रक्रिया पार पडली आणी सोयूझ स्थानकाशी जोडले गेले त्यानंतर स्थानकाचे दार उघडल्या गेले
आधी रशियन अंतराळ वीर Ivan Vagner ह्यांनी स्थानकात प्रवेश केला नंतर Chris Cassidy आणि शेवटी Anatoly ह्यांनी स्थानकात प्रवेश केला तेव्हा स्थानकात सध्या राहत असलेल्या Jessica Meir ,Andrew Morgan आणी Skripochka ह्या तिघांनी त्यांचे हसतमुखांनी स्वागत केले अंतराळस्थानकात  पोहोचल्यानंतर ह्या सहाही अंतराळवीराशी पृथ्वीवरील अमेरिका आणि रशियाच्या नासा संस्थेतील अधिकाऱ्यांनी लाईव्ह संपर्क साधला रशियातील अधिकाऱ्यांनी त्यांचे स्थानकात सुखरूप पोहोचल्याबद्दल अभिनानंदन केले आणि Congratulations ! Have a Good day ! अशा शुभेच्छा दिल्या Chris Cassidy आणि Anatoly ह्यांना तुमचे तिसऱ्यांदा स्थानकातील नव्या घरी स्वागत तर Ivan Vagner ह्यांचे पहिल्यांदाच स्थानकातील आगमनासाठी विशेष स्वागत आणि अभिनंदन करून स्थानक आणि तेथील सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करत असल्याचे सांगितले तेथील सहा साडेसहा महिन्यांचा वास्तव्याचा तुमचा काळ सुखात जावो अशी सदिच्छाही व्यक्त केली त्या नंतर अमेरिकेतील नासा संस्थेतील अधिकाऱ्यांनीही तिघांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले Chris Cassidy ह्यांनी आमचा ट्रेनिंग आणि launching पर्यंतचा काळ खूप छान गेल्याचे सांगितले आणि त्यांचे आभार मानले
ह्या वेळेसची हि मोहीम यशस्वीपणे पार पडेल का अशी शंका होती त्यातून अंतराळवीरांना Quarantine केले होते अमेरिकेत सध्या कोरोना मुळे बिकट परिस्थिती उद्भवली आहे अशा विपरीत परिस्थितीवर मात करून तुम्ही तुमची हि मोहीम निर्विघ्न पणे पार पाडलीत त्या मूळे तुमचे विशेष अभिनंदन ! तुम्हाला सोडायला कॉस्मोड्रोम वर तुमचे कुटुंबीय कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे येऊ शकले नसले तरीही ते ह्या तुमच्या स्थानकातील प्रवेशाचा प्रसंग पाहात आहेत आणि तुम्ही सुरक्षित पोहोचल्याचे पाहून आनंदित झाले आहेत लवकरच आम्ही तुमचा त्यांच्याशी संवाद घडवू असेही ह्या अधिकाऱ्यांनी अंतराळवीरांना सांगितले
कोरोनाच्या संसर्गामुळे अमेरिका आणि रशियात लोकडाऊन सुरु आहे त्यामुळे दोन्ही देशांच्या सीमा लॉक केल्या आहेत त्यामुळे ह्या तीनही अंतराळवीरांचे कुटुंबीय त्यांना सोडायला येऊ शकले नाहीत एरव्ही अंतराळ वीरांचे नातेवाईक,कुटुंबीय आणि मित्र त्यांना सोडायला कॉस्मोड्रोम वर येऊ शकतात 

Tuesday 7 April 2020

आज दिसणार सुपरमुन

             यवतमाळ येथून दिसलेला सुपरमून                   
यवतमाळ -7 एप्रिल
जेव्हा चंद्र प्रुथ्वीच्या जवळच्या कक्षेतून भ्रमण करतो तेव्हा त्याचे पृथ्वीपासुनचे अंतर कमी होते त्यामुळे तो नेहमी पेक्षा मोठा आणी जास्त प्रकाशमान दिसतो म्हणून त्याला सुपरमुन म्हणतात सद्या चंद्र पृथ्वीपासुन 221,772 मैल (356,907 k.m.)  इतक्या अंतरावरून भ्रमण करत आहे चंद्र आणी प्रुथ्वीमधील अंतर ईतके कमी झाल्यामुळे चंद्राचा आकार  नेहमीपेक्षा चौदापटीने मोठा दिसेल आणी तो तीसपट जास्त प्रकाशमान होईल ह्या वर्षीचा सुपरमुन आपल्याला आज सात एप्रिलला दिसणार आहे तर काही देशात तो आठ एप्रिलला दिसेल
  यवतमाळातुन दिसलेला सुपरमून 
सुपरमुनला अमेरिकेत आणी Canada मधे पींकमुन असही म्हणतात पण तो गुलाबी रंगाचा दिसतो म्हणून हे नाव पडले नसून अमेजरिकेत आणी Canada मध्ये एप्रिल महिन्यात गुलाबी फुलांचा मौसम असतो त्या फुलांच्या रंगा वरून ह्या महिन्यात दिसणाऱ्या सुपरमुनला पींकमुनची ऊपमा दिली गेली 
आज आकाशात पुर्वेला चंद्र ऊगवेल त्यामुळे तो पूर्वेला दिसेल भारतात सुपरमून आज दिसेल तर काही देशात ऊद्या दिसेल भारतात ऊद्या सकाळी 8.05 वाजता सुपरमुन पुर्ण स्वरूपात दिसेल पण आपल्याला सूर्याच्या प्रकाशात  तो दिसु शकणार नाही
         फोटो -पूजा दुद्दलवार -BE(Soft) B.MC  

अंतराळवीर Chris Cassidy ,Anatoly Ivanishin आणी Ivan Vagner नऊ एप्रिलला अंतरास्थानकात वास्तव्यास जाणार

 Expedition 63 crew members Ivan Vagner (left) and Anatoly Ivanishin (center) of Roscosmos and NASA astronaut Chris Cassidy
अंतराळवीर Ivan Vagner , Anatoly Ivanishin आणी Chris Cassidy Launching आधी Soyuz यानासमोर फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 6 एप्रिल
नासाच्या अंतराळ मोहीम 63चे अंतराळवीर Chris Cassidy,रशियाचे अंतराळवीर Anatoly Ivanishin आणि  Ivan Vagner गुरुवारी नऊ एप्रिलला अंतराळ स्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत सध्या अमेरिकेत विशेषतः न्यूयार्क मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चाललाय कोरोनाग्रस्थांची संख्याही वाढतेय ह्या आधीच अमेरिकेत संपूर्ण लॉक डाऊन घोषित करण्यात आलाय फक्त अत्यावश्यक सेवा सुरु आहेत अमेरिकेतील गजबजलेले मॉल्स,रस्ते ओस पडले आहेत अमेरिकेतील मोठमोठ्या कंपन्यांनी work at home च्या सूचना दिल्या आहेत अमेरिकेच्या नासा संस्थेनेही त्यांच्या कर्मचाऱ्यांना Work At Home च्या सूचना दिल्या आहेत तरीही अमेरिकेतील महत्वाच्या पूर्वनियोजित अंतराळ मोहिमा मात्र सुरूच ठेवण्याचा निर्णय नासाने आणि अमेरिकेचे अध्यक्ष Donald Tramp ह्यांनी ह्या आधीच घेतला होता ह्याच पूर्व नियोजित अंतराळ मोहीमेअंतर्गत नासाच्या अंतराळ मोहीम 63चे तीन अंतराळवीर येत्या नऊ एप्रिलला गुरुवारी अंतराळ स्थानकात साडेसहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी जाणार आहेत
हे तीनही अंतराळवीर कझाकस्थानातील बैकोनूर Cosmodrome वरून Soyuz MS-16 ह्या अंतराळयानातून अंतराळ स्थानकाकडे उड्डाण करणार आहेत बैकोनूर येथून Soyuz MS-16 हे अंतराळयान ह्या तीन अंतराळ वीरांना घेऊन 4.05a.m.(स्थानिक वेळ )ला अंतराळात झेपावेल आणी सहा तासांच्या अंतराळ प्रवासा नंतर अंतराळ स्थानकाजवळ  पोहोचेल त्या नंतर सोयूझ यान चार प्रदक्षिणा पूर्ण करेल हे अंतराळ यान 10.16 a.m.ला स्थानकाच्या Zveda Service Module जवळ पोहोचताच यान स्थानकाशी डॉकिंगने जोडल्या जाईल 
त्या नंतर स्थानकाचे दार उघडल्या जाईल आणि अंतराळवीर स्थानकात प्रवेश करतील
सध्या अंतराळ स्थानकात राहात असलेले कमांडर Oleg Skripochka,flight engineer Jessica Meir आणि Andrew Morgan अंतराळ स्थानकात ह्या तिन्ही अंतराळवीरांचे स्वागत करतील यान व स्थानक यांच्यातील Docking आणि Hatching पूर्ण झाल्यानंतर दोन तासांनी सहाही अंतराळवीर एकमेकांचे अभिनंदन करतील
अंतराळवीर Chris Cassidy आणिAnatoly Ivanishin ह्यांची हि तिसरी अंतराळवारी आहे तर  Ivan Vagner मात्र पहिल्यांदाच स्थानकात राहायला जाणार आहेत
ह्या अंतराळवीरांच्या अंतराळ उड्डाणाचे आणि अंतराळ स्थानकाच्या प्रवेशाचे लाईव्ह प्रक्षेपण नासा T.V. वरून करण्यात येणार आहे 17 एप्रिलला अंतराळवीर Oleg Skripochka ,Andrew Morgan आणी Jessica Meir पृथ्वीवर परतणार आहेत
त्यानंतर अंतराळ स्थानकाचा ताबा ह्या तीन अंतराळवीरांकडे सोपवण्यात येईल 15 एप्रिलला Command Change Ceremony पार पडेल आणि Chris Cassidy अंतराळस्थानकाचे कमांडरपद सांभाळतील हे तीन अंतराळवीर अंतराळस्थानकात राहून तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभाग नोंदवतील
 

Monday 6 April 2020

नासाच्या अंतराळ मोहीम 63चे तीन अंतराळवीर अंतराळ स्थानकात जाण्यासाठी सज्ज


 Expedition 63 crewmembers arrive at the Baikonur Cosmodrome
 अंतराळवीर Ivan Vagner,Anatoly Ivanishin आणी Chris Cassidy बैकोनूर येथील Cosmodrome वर पोहोचल्यानंतर -फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 2 एप्रिल
अमेरिकेत सध्या कोरोनाच्या संसर्गा मुळे संपूर्ण lock down सुरु आहे आवश्यक सेवा वगळता सर्व  व्यवहार ठप्प आहेत अत्यंत गजबजलेल्या रस्त्यांवर शुकशुकाट आहे माल्स बंद आहेत अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना Work At  Home च्या सूचना दिल्या आहेत नासा संस्थेतही सध्या Work At Home सुरु आहे फक्त अत्यंत महत्वाच्या मोहिमेतील कर्मचारी तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ नासा संस्थेतील घरी किंवा ऑफिस मध्ये काम करता येत नसल्यामुळे संस्थेत कार्यरत आहेत तरीही नासा संस्थेने अत्यंत महत्वाच्या पूर्व नियोजित अंतराळ मोहिमा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे
ह्याच मोहिमे अंतर्गत अंतराळ मोहीम 63चे तीन अंतराळवीर 195 दिवसांच्या अंतराळ स्थानकातील वास्तव्यास जाणार आहेत 26 मार्चलाच त्यांचे ट्रेनिंग संपले आणी लाँचिंगची तयारीही पूर्ण झाली आहे
जाण्या आधी सध्याच्या कोरोना संसर्गाच्या थैमानामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ह्या तिनही अंतराळवीरांना दोन आठवडे Quarantine मध्ये ठेवण्यात आले होते पृथ्वीवरील कोरोनाच्या संसर्गापासून त्यांचे रक्षण व्हावे त्यांची तब्येत बिघडू नये आणि त्यांच्या सोबत पृथ्वीवरून कोरोनाचे जंतू अंतराळ स्थानकात जाऊन तिथल्या झिरो ग्रॅविटीतल्या अत्यंत थंड वातावरणात राहत असलेल्या अंतराळवीरांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून हि काळजी घेण्यात आली
अमेरिकन अंतराळवीर Chris Cassidy रशियन अंतराळवीर Anatoly Ivanishin आणि Ivan Vagner ह्यांची उड्डाणाची तयारी पूर्ण झाल्यानंतर ह्या तिघांनीही कझाकस्थानातील बैकोनूर येथील Cosmodrome मधल्या Cosmonaut हॉटेल बाहेरिल ग्राउंड मध्ये पारंपारिक Flag Raising ceremony पार पाडला त्यांनी रशियातील  Gagarin Cosmonaut Training Center स्टार सिटी इथल्या Gagarin Museum ला देखील भेट दिली आणि तेथील  अंतराळात जाणारे पहिले अंतराळवीर युरी गँगरीन ह्यांच्या पुतळ्याला अभिवादन करून फुले वाहिली