Sunday 27 August 2017

अमेरिकन नागरिकांनी लुटला खग्रास सूर्यग्रहणाचा आनंद


                             अमेरिकेतून दिसलेले पूर्ण रूपातील खग्रास सूर्य ग्रहण फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -२२ ऑगस्ट 
हौशी अमेरिकन नागरिक आणि वैज्ञानिकांनी शंभर वर्षानंतर एकवीस ऑगस्टला दिसलेल्या खग्रास सुर्ग्रहणाच्या ह्या अभूतपूर्व सुवर्ण पर्वणीचा मनमुराद आनंद लुटला एरव्ही सूर्यग्रहण पाहण्यासाठी इतर देशात जाणारे अमेरिकन आपल्याच देशातील ग्रहण पाहण्याची हि सुवर्णसंधी सोडणार नव्हतेच !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांनीही व्हाईट हाऊस मधून आपल्या पत्नीसोबत हे ग्रहण पाहिले विशेष म्हणजे ट्रम्प ह्यांनी तिथे उपस्थित लोकांनी नको नको म्हणत असताना देखील क्षणभर उघडया डोळ्यांनी चष्मा न घालता हे ग्रहण पाहिले

       अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पत्नीसोबत उघडया डोळ्यांनी सूर्य ग्रहण पाहताना -फोटो -नासा संस्था

अमेरिकेच्या चौदा राज्यात हे ग्रहण दिसले ह्या ग्रहणाचा काळ दोन मिनिटांपेक्षा जास्त होता ह्या वेळेस दिवसा सर्वत्र अंधार पसरल्यामुळे लोकांनी दिवसा रात्रीचा अनुभव घेतला ग्रहण काळातील पूर्ण रूपातील हिऱ्याच्या अंगठीच्या स्वरूपातील सूर्याला पाहून O! My God! My God ! अमेझिंग ! lovely ! अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया उपस्थितांच्या तोंडून बाहेर पडली काहींनी आनंदाने जल्लोष करत ग्रहणाचा आनंद व्यक्त केला

                          खग्रास सूर्यग्रहणादरम्यान काळवंडलेल्या सूर्याचा तेजोमय मुकुट -फोटो नासा संस्था

 अंतराळवीरांनीही अंतराळ स्थानकातून हे ग्रहण पाहिले आणि त्याचे फोटोही पाठवले विशेष म्हणजे खग्रास सूर्यग्रहणाच्या फोटोमध्ये अंतराळात भ्रमण करणारे अंतराळस्थानकही फोटोबद्ध झाले अंतराळवीरांसाठी हा क्षण औसुक्यपूर्ण आणि अविस्मरणीय होता हे दृश्य अलौकिक होते असे ते म्हणतात

     कमांडर FyodorYurchikhin ह्यांनी अंतराळस्थानकातून टिपलेले खग्रास सूर्यग्रहण - फोटो -नासा संस्था

                    ग्रहणाच्या फोटोमध्ये फोटोबद्ध झालेले अंतराळस्थानाक - फोटो नासा संस्था

ह्या शतकी खग्रास सूर्य ग्रहणासाठी गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिकेतील नासा संस्थेतून खास तयारी करण्यात येत होती त्यासंबधीत बातम्याही प्रसारित होत होत्या हे ग्रहण कोठे दिसणार,त्यासाठी काय तयारी करावी ग्रहण पाहताना कोणती खबरदारी घ्यावी ग्रहण कसे पाहावे ह्यासारख्या सूचना देतानाच त्या संबंधीत प्रबोधनपर कार्यक्रमही नासा संस्थेने आयोजित केले होते विशेषतः मुलांना पृष्ठयांचे बॉक्स कापून त्यात ब्लॅक फिल्म बसवुन ग्रहण पाहण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते 
नासा संस्थेने बारा ऑगस्टला प्रसारित केलेल्या बातमीत ह्या खग्रास सूर्यग्रहणाचे नासा t.v वरून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार असल्याच तसेच एअरक्राफ्ट,स्पेसक्राफ्ट आणि अंतराळस्थानकातूनही ह्या ग्रहणाचे प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते त्यासाठी ठिकठिकाणी मुख्य चॊकात स्क्रीनही बसवण्यात आले होते हे ग्रहण आपल्या कर्मचाऱयांना पाहता यावे म्हणून कंपन्यांनी आधीच सुटीही जाहीर केली होती
आणि अखेर शंभरवर्षानंतर अमेरिकेत सूर्याच्या खग्रास ग्रहणाचा क्षण येताच उत्साही अमेरिकन लोकांनी रस्त्यावर येऊन ग्रहण पाहण्यासाठी गर्दी केली विद्यार्थ्यांनी मिकी माऊस व मानवी चेहऱ्याचे कागदी मुखवटे बनवून डोळ्यांच्या ठिकाणी काळी फिल्म बसवुन ते घालुन हे ग्रहण पाहिले तर नागरिकांनी खास काळा चष्मा घालुन ह्या सुवर्ण संधीचा लाभ घेतला आधी सांगितल्या प्रमाणे नासा संस्थेने ठिकठिकाणी स्क्रीन वरून लोकांना हे ग्रहण दाखवले

   ग्रहणाचा आनंद घेताना नागरिक ,छोटी मुले आणि नासासंस्थेतील पदाधिकारी फोटो-नासा संस्था 

             खग्रास चंद्रग्रहण पाहून आनंद व्यक्त करताना अमेरिकन नागरिक -फोटो -नासा संस्था

हे ग्रहण भारतातून पाहता आले नाही कारण त्या वेळेस रात्र होती पण हे ग्रहण उत्तर अमेरिका ,दक्षिण अमेरिका ,पश्चिम यूरोप आफ्रिका व उत्तर पूर्व आशिया खंडात दिसले 


Saturday 19 August 2017

नासाच्या अंतराळ मोहीम 52 च्या अंतराळ वीरांनी केला स्पेसवॉक यशस्वी

              कमांडर  Fyodor Yurchikhin नॅनो सॅटलाईट बॉंक्स घेऊन स्पेसवॉकच्या तयारीत  

नासा संस्था 17 ऑगस्ट
नासाच्या अंतराळ मोहीम 52 चे कमांडर Fyodor Yurchikhin आणि फ्लाईट इंजिनीअर Sergey Ryazanskiy ह्या दोन्ही अंतराळवीरांनी 17 ऑगस्टला यशस्वी स्पेसवॉक केला अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी व पाच नॅनो सॅटलाईट रिलीज करण्यासाठी हा स्पेसवॉक केल्या गेला सुरवातीला हा स्पेसवॉक सहा तासांनी संपेल अशी अपेक्षा होती मात्र हा स्पेसवॉक संपायला 7 तास 34 मिनिटे लागली सकाळी 10.36 मिनिटाला सुरु झालेला हा स्पेसवॉक संध्याकाळी 6.10 मिनिटांनी संपला ह्या स्पेसवॉक साठी दोन्ही अंतराळवीरांनी निळया रंगाच्या रेषा असलेला रशियन Orlan स्पेससूट परिधान केला होता

                      नासाचे अंतराळवीर  Fyodor Yurchikhin  व  Sergey Ryazanskiy स्पेसवॉक करताना 

अंतराळ स्थानकाच्या airlock च्या बाहेरील रशियन सेगमेंट मध्ये शीडी लाऊन ह्या दोन्ही अंतराळवीरांनी स्थानकाच्या बाहेरील भागाची तपासणी केली शिवाय ह्या अंतराळवीरांनी अकरा पाउंड वजनाची पाच नॅनो सॅटलाईट अंतराळात रिलीज केली ह्या नॅनो सॅटलाईट मध्ये नवीन 3-D प्रिंटिंग टेक्नॉलॉजिचा उपयोग केला असून पाच पैकी एका सॅटलाईटवर अंतराळातील कमी गुरुत्वाकर्षणाचा काय परिणाम होतो ह्याचे निरीक्षण नोंदवण्यात येणार आहे दुसऱया नॅनोसॅटलाईट मध्ये पृथ्वीवरील मानवाच्या अकरा बोलीभाषा मधील रेकॉर्ड केलेल्या शुभेच्छांचा समावेश आहे
रशियाच्या पहिल्या Sputnik 1 ह्या अंतराळयानाच्या लाँचिंगला यंदा साठ वर्षे पूर्ण झाली आहेत तसेच रशियन शास्त्रज्ञ Konstantin Tsiolkovsky ह्यांची 160 वी जयंती आहे त्या प्रित्यर्थ तिसरा नॅनोसॅटेलाईट अवकाशात प्रक्षेपित करण्यात आला आहे
अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकाच्या तयारीसाठी केलेला हा 202 वा स्पेसवॉक होता अंतराळवीर Yurichikhin ह्यांचा हा नववा स्पेसवॉक होता तर अंतराळवीर  Sergey  ह्यांचा हा चवथा स्पेसवॉक होता ह्या दोनही अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकाच्या आगामी स्पेसवॉक साठी आवश्यक ती कामगिरीही ह्या स्पेसवॉक मध्ये केली आहे 

Thursday 17 August 2017

Space X Dragon मालवाहु अंतराळयान अंतराळस्थानकात पोहोचले


                     नासाचे Space X Dragon  अंतराळात उड्डाण करताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 16 ऑगस्ट
नासाचे Space X Dragon मालवाहु अंतराळयान काही टन आवश्यक सामान घेऊन अंतराळस्थानकात व्यवस्थित पोहोचले आहे ह्या मालवाहू अंतराळ यानाचे अंतराळ स्थानकाकडे उड्डाण झाल्यापासून ते अंतराळस्थानकात पोहोचेपर्यंतचे लाईव्ह प्रक्षेपण नासा t.v. वरून करण्यात आले होते
Space X  Dragon अंतराळ स्थानकाजवळ पोहोचल्या नंतर अंतराळवीर Jack Fischer व Paolo Nespoli ह्यांनी Cupola मधुन त्याचे निरीक्षण केले व सुरक्षित अंतरावर अंतराळ यान आल्यावर स्थानकाच्या रोबोटिक आर्मला आवश्यक सूचना दिल्या त्यानंतर हे अंतराळ यान स्थानकाशी जोडल्या गेले त्यासाठी आवश्यक असलेली डॉकिंगची सोय ह्या अंतराळवीरांनी स्पेसवॉकच्या वेळेसच केली होती
ह्या स्पेस X  अंतराळ यानातून अंतराळ स्थानकासाठी लागणारे तसेच अंतराळवीरांच्या संशोधनासाठी लागणारे सामान ,इंधन आणि अन्न पाठवण्यात आले आहे ह्या अंतराळ यानातून पाठवण्यात आलेल्या 64 टन वजनाच्या सामानात अंतराळ स्थानकासाठी लागणारे payload व इतर सामानासोबतच अंतराळवीरांसाठी खास स्वीट ट्रीटही पाठवण्यात आलीय त्या मध्ये आईस्क्रीम ,चॉकलेट्सचे लहान कप ,व्हॅनिला केक ,बर्थडे केक ,फ्लेवर्ड आइस्क्रीम व फ्रोझन अन्नाची पाकिटे ह्याचा समावेश आहे
तसेच ह्या मालवाहु अंतराळयानातून अंतराळवीरांच्या आज होणारया स्पेसवॉक साठीचे साहित्य आणि अंतराळ स्थानकात सध्या सुरु असलेल्या संशोधनासाठी लागणारे वैज्ञानिक साहित्य पाठवण्यात आले आहे शिवाय अंतराळवीर करणार असलेल्या पार्किंसन्स व lung कॅन्सर ह्यावरील आधुनिक व उपयुक्त संशोधनासाठी आवश्यक असलेले स्टेम सेल व  tissue सँपल्सचाही त्यात समावेश आहे
Space X Dragon एक महिनाभर स्थानकात राहील आणि सप्टेंबरमध्ये पृथ्वीवर परतेल तेव्हा त्यातून अंतराळवीरांनी संशोधित केलेल्या वैज्ञानिक प्रयोगांचे सॅम्पल्स पाठवले जातील. 

Tuesday 8 August 2017

यवतमाळात दिसलेले खंडग्रास चंद्र ग्रहण

                                ढगाळ वातावरणातुन क्षणभर ढगाबाहेर आलेला पौर्णिमेचा चंद्र

सोमवार - 6 ऑगस्ट
सोमवारी तारीख सहा ऑगस्टला राखी पौर्णिमा ,श्रावण सोमवार आणि खंडग्रास चंद्र ग्रहण एकाच दिवशी आले त्या मुळे राखी पोर्णिमेसाठीचा वेळ कमी असल्याने ग्रहणकाळात राखी बांधावी कि नाही ह्याची चर्चा सुरु असली तरीही खगोल प्रेमीनी मात्र खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी सोडली नाही

                                                 चंद्राचा ग्रहण काळातील ढगाआड जातानाचा क्षण

यवतमाळ येथेही चंद्र ग्रहण दिसले असले तरीही पावसाळ्यातील ढगाळ वातावरणामुळे चंद्र ग्रहण पूर्णपणे दिसत नव्हते सुरवातीला तर पौर्णिमा असूनही चंद्र ढगाआड गेला होता त्या मुळे बारा पर्यंत अल्पकाळ चंद्र
ढगाबाहेर येत होता ग्रहण दहा वाजून वीस मिनिटांनी सुरु होऊन बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांला संपणार होते  सूर्य पृथ्वी आणि चंद्र जेव्हा एका रेषेत येतात तेव्हा चंद्र ग्रहण होते

                                                  खंडग्रास ग्रहणग्रस्त पौर्णिमेचा चंद्र

      नंतर मात्र सव्वा बाराला काही काळ चंद्र पूर्ण रूपात दृष्टीस पडला अर्थातच ढगाळ वातावर असल्याने
        त्याची प्रतिमा धूसर होती तरीही दिसलेल्या खंडग्रास चंद्रग्रहणाचे त्वरित घेतलेले हे फोटो

                                चंद्राला खंडग्रास ग्रहण लागल्यानंतर ढगाबाहेरील पौर्णिमेचा चंद्र

               त्याची प्रतिमा धूसर होती तरीही दिसलेल्या खंडग्रास चंद्रग्रहणाचे त्वरित घेतलेले हे फोटो

                                                                                                       फोटो -पूजा दुद्दलवार -BE( soft) BMC

Peggy Whitson स्थानकात सूर्यास्ताचा आनंद घेताना



      Peggy  Whitson  स्थानकातील cupola  मध्ये खिडकीतून सूर्यास्ताचा आनंद घेताना फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 6 ऑगस्ट
नासाची अंतराळवीरांगना Peggy Whitson हिने आजवर अनेक रेकॉर्ड ब्रेक केलेत सर्वात जास्तवेळा स्पेस मध्ये राहणारी व स्पेसवॉक करणारी पहिली महिला अंतराळवीर म्हणून तिने नाव कमावले आहेच शिवाय ह्या निवासादरम्यान कमांडरपदही अनेकदा भूषवले आहे तिला बागकामाची आवड आहे अंतराळातही कोबीची लागवड यशस्वी करून तिने त्याचे सॅम्पल्स पृथ्वीवर पाठवले आणि तिच्या सहकारी अंतराळवीरांना कोबी खाऊही घातली सध्या ती अंतराळ स्थानकात राहून वेगवेगळ्या विषयांवर संशोधन करतेय त्या साठी तिने पृथीवर परतण्याचा निर्णय रद्द करून स्थानकातील तिचा मुक्कामही वाढवला तिच्या ह्या निर्णयाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी स्वागत करत तिचे खास अभिनंदनही केले
ती सतत स्थानकातून नासा संस्थेद्वारे तिच्या चाहत्यांशी,विद्यार्थ्यांशी नासा t.v. वरून लाईव्ह संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देते तिथे कर्तृत्व व काम करण्याची क्षमता अफाट आहे ती प्रचंड उत्साही आहे तेही 57 व्या वर्षी असे तिचे सहकारी अंतराळवीर म्हणतात ती त्यांच्यासाठी प्रेरणादायी आहे
आता तिच्या अंतराळस्थानकातील निवासाला 638 दिवस पूर्ण झालेत अशाच एका निवांत क्षणी सूर्यास्ताचा आनंद घेतानाचा फोटो तिने तिच्या चाहत्यांशी ट्विटर वरून शेअर केला

नासाच्या Curiosity Mars rover ने मंगळावरील पाच वर्षे केली पूर्ण



                मंगळ ग्रहावरील पाच वर्षे कार्यरत असलेले  Curiosity Mars Rover  फोटो -नासा संस्था

नासा संस्था -5 ऑगस्ट
नासाच्या मंगळ मोहिमे अंतर्गत मंगळावर गेलेल्या Curiosity Mars rover ने पाच ऑगस्टला मंगळावरील यशस्वी पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण केली असून अजूनही हे अंतरिक्ष यान कार्यरत आहे
पाच वर्षांपूर्वी हे मंगळयान मंगळावरील माउंट शार्प ह्या भागात उतरले होते 5 ऑगस्ट 2012 मध्ये पहिल्यांदा अमेरिकेतील नासाच्या जेट प्रपल्शन लॅब मध्ये Curiosity  अंतरिक्ष यानाने पाठवलेले फोटो पोहोचले होते त्या मुळेच शास्त्रज्ञांच्या अपेक्षा वाढल्या होत्या Curiosity च्या पाच वर्षांच्या यशस्वी कामगिरीने  त्या आता पूर्ण झाल्या आहेत सध्या ह्या अंतरिक्ष मंगळ यानामार्फत मंगळ ग्रहावरील दऱ्याखोऱ्यातील पूर्वी अस्तित्वात असलेल्या पाण्याच्या स्रोताचे  व सजीव सृष्ठीच्या अस्तित्वाचे पुरावे गोळा केल्या जात आहेत सुरवातीला Curiosity मंगळयानाने मंगळावर पोहोचताच दहा मैलाचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला होता आणि आता ह्या पाच वर्षात मंगळावरील जवळपास दोन लाख फोटो पाठवले आहेत आणि पंधरा ठिकाणची जमीन खोदून दगड मातीचे नमुने गोळा केले आहेत मानवाप्रमाणेच ह्या Curiosity  Mars Rover ने स्वत:चे सेल्फीही काढून पाठवले आहेत
Curiosity मंगळयानाने आजवर अनेक महत्वपूर्ण कामे केली आहेत मंगळावरील नदी नाले,समुद्र,सरोवर खड्डे ,गोलाकार गोटे, खडक ,गाळ व चिखलामुळे तयार झालेले सेडीमेंटरी रॉक व दरयाखोरयातील पाण्याचे पूर्वी अस्तित्वात असलेले पाण्याचे आटलेले स्रोत शोधून त्यांचे फोटो काढून पृथ्वीवर पाठवले आहेत 


                   मंगळावरील नदीतल्या गाळाने तयार झालेले सेडीमेंटरी रॉक  फोटो -नासा संस्था

 जिथे,जिथे पूर्वी पाणी अस्तित्वात होते पण कालांतराने आटून नष्ट झाले पण तरीही तिथे पाण्यातील खडक  व मिनरल्सचे अवशेष तसेच राहिले अशी जागा शोधून तिथल्या जमिनीतील खोलवरच्या मिनरल्सयुक्त मातीचे नमुने,वाळलेल्या चिखलाचे फोटोही Curiosity ने पाठवले नदीचे अस्तित्व असलेल्या भागातील वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे वाळुत उठलेल्या लाटांच्या व चक्री वादळामुळे घोंघावणारया धुळीच्या लोटांचे फोटोही ह्या मंगळयानाने पाठवले आहेत


                              मंगळावरील वाळू आणि वाळूवर तयार झालेल्या लाटाचे फोटो - नासा संस्था

ह्या सर्व फोटो व माहितीवरून शास्त्रज्ञानीं केलेल्या संशोधनामुळे मंगळावर पूर्वी पाणी अस्तित्वात होते आणि ते वाहत्या स्वरूपात होते ह्याचे सबळ पुरावे मिळाले आहेत वाहत्या नदीसोबत आलेल्या गाळाचे कालांतराने थरावर थर साठत गेले आणि सेडीमेंटरी रॉक व टेकडया तयार झाल्या कालांतराने मंगळावरील वातावरणातील बदलामुळे जमिनीतील व नदीतील पाणी आटत गेले आणि नदीचे पात्र कोरडे पडले सरोवराचा आकार बदलत गेला तरीही तिथे लाखोवर्षे पर्यंत पाणी अस्तित्वात असल्याचा खुणा मिळाल्या आहेत


      पाण्याच्या अस्तित्वाचा पुरावा देणारी हि मातीच्या गाळांची जमीन व आटलेले स्रोत  फोटो - नासा संस्था

शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार तीन मिलियन वर्षांनंतर मंगळावरील वातावरण विरळ व थंड झाले असावे
Curiosity मंगळ यानाने आता मंगळावरील व अंतराळातील रेडिएशनचेही निरीक्षण नोंदवले असून ह्याचा उपयोग आगामी मानवसहित मंगळ मोहोमेसाठी व अंतराळ मोहिमेत मानवी निवासासाठी होईल अशी आशा शास्त्रज्ञांना वाटतेय Curiosity च्या ह्या पाच वर्षांच्या यशस्वी वाटचाली मुळे शास्त्रज्ञ आनंदित झाले असून  Curiosity कडून ह्याहुनही चांगली कामगिरी करून घेण्याच्या त्यांचा मानस आहे