Saturday 8 April 2017

                          Shane Kimbrough  आणि PeggyWhitson स्पेस वॉक दरम्यान  फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 30 march
नासाच्या अंतराळ मोहीम 50 चे कमांडर Shane Kimbrough आणि फ्लाईट इंजिनीअर Peggy Whitson  ह्यांनी नुकताच अंतराळ स्थानकाबाहेर स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी सात तासाचा स्पेस वॉक यशस्वी केला
ह्या स्पेस वॉक दरम्यान दोन्ही अंतराळ वीरांनी रोबोटिक आर्मच्या साहाय्याने अंतराळ स्थानकाच्या बाहेरील भागात इलेक्ट्रिक कनेक्शनसाठी केबल जोडणी केली ह्या मुळे आगामी काळात पृथ्वीवरून स्थानकात येणारया मालवाहू अंतराळ यानाच्या डॉकिंगची सोय होईल
अंतराळ वीर स्थानकातील बाहेरील उघडया भागाला चार थर्मल प्रोटेक्शन शिल्ड बसवणार होते पण दुर्दैवाने त्यातील एक थर्मल प्रोटेक्शन शिल्ड बसवताना अंतराळवीरांच्या हातून निसटले अंतराळवीरांनी ते शिल्ड पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण ते शिल्ड अंतराळात उडून गेले उर्वरित तीन शिल्ड बसवण्यात मात्र अंतराळवीर यशस्वी झाले
अंतराळवीर Shane Kimbrough व Peggy Whitson अंतराळस्थानकाबाहेरील भागात स्पेसवॉक करत होते तिथल्या एका नवीन डॉकिंग पोर्टचे कनेक्शन निघाले होते हे दोन्ही अंतराळवीर त्या पार्टला झाकण्याचे काम करत होते त्याच दरम्यान त्यांच्या हातून हे शिल्ड निसटले आणि अंतराळात उडाले विशेष म्हणजे हि घटना घडण्याआधी साडे तीन तास पर्यंत त्यांचा स्पेसवॉक व्यवस्थित सुरु होता हे थर्मल शिल्ड दोरयाने बांधलेले नव्हते त्या मुळे ते निसटले आता ते परत मिळणे कठीण आहे
उडून गेलेले शिल्ड अंतराळ स्थानकासाठी आवश्यक होते हे शिल्ड अंतराळ स्थानकाला अंतराळातील बदलत्या तापमानामुळे होणारया दुष्परिणामापासून वाचवते तसेच अंतराळात तरंगणाऱया दगड ,इतर वस्तू आणि उल्कापिंडापासून स्थानकाचा बचाव करते
अमेरिकेतील नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटर मधील शास्त्रज्ञानीं हा भाग झाकण्यासाठी त्यांना काही उपयुक्त सूचना दिल्या त्या नुसार ह्या दोन्ही अंतराळवीरांनी PMA -3 ह्या अडॉप्टरला नवीन शिल्ड बसविले आणि त्याला Cummerbund असे निकनेम दिले हे शिल्ड कमरबेल्ट सारखे असून tuxedo ह्या ड्रेस मध्ये कमरेच्या फिटींगसाठी  वापरतात
 अंतराळवीरांनी केलेला हा स्पेसवॉक सात तास चार मिनिटे पर्यंत सुरु होता Peggy Whitson हिचा हा आठवा स्पेसवॉक होता
आणि तिने आता सर्वात जास्त स्पेस वॉक करणाऱया महिला स्पेसवॉकरचा रेकार्ड ब्रेक केला आहे ह्या आधी सुनीता विल्यम्स हि सर्वात जास्त वेळा स्पेसवॉक करणारी पहिली महिला स्पेसवॉकर होती तिचा रेकार्ड आता पेगीने मोडला आहे  

No comments:

Post a Comment