अंतराळवीर Shane Kimbrough पृथ्वीवर परतण्याच्या तयारीत -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -5 एप्रिल
अमेरिकेच्या नासाचे अंतराळ मोहीम 50 चे कमांडर Shane Kimbrough, रशियाचे flight Engineer Sergey Ryzhiko आणि Andry Borisonko हे तीन अंतराळवीर दहा एप्रिलला पृथीवर परतणार आहेत
हे तीनही अंतराळवीर दहा एप्रिलला दुपारी चार वाजता सोयूझ MS -02 ह्या अंतरिक्ष यानातून पृथ्वीवर परतणार आहेत दुपारी चारला त्यांचे यान स्थानकातून निघेल व सात वाजून वीस मिनिटाला कझाकस्थान येथे पोहोचेल (5.20 p.m. स्थानिक वेळ )
मोहीम 50 चे अंतराळवीर Snane Kimbrough Sergey Ryzhiko आणि Andry Borisonko
9 एप्रिलला नासाचे सध्याचे कमांडर Shane Kimbrough अंतराळ स्थानकाची सूत्रे flight Engineer Peggy Whitson हिच्या हाती देतील ह्या अंतराळवीरांच्या परतीचे थेट प्रक्षेपण नासा TV वरून करण्यात येईल
10 एप्रिल ला
12.15 a.m- फेअर वेल , 3.30 a.m.Undocking, 6 a.m. De orbit burn & landing coverage
9 a.m. - Video file hatch closure,un docking & Landing activities
11 एप्रिल
12 p.m ला .- पृथ्वीवर अंतराळवीर व्यवस्थित पोहोचल्यानंतरचे लाइव टेलिकास्ट आणि Shane Kimbrough ह्यांच्याशी मुलाखतीचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल
हे अंतराळवीर ऑकटोबर मध्ये अंतराळ स्थानकात गेले होते त्यांनी तिथे 173 दिवस वास्तव्य केले अंतराळ स्थानकात सध्या सुरु असलेल्या Biology .Biotechnology ,Earth Science आणि Physical Science ह्या विषयीच्या शंभरावर प्रयोगात सहभाग नोंदवून संशोधन केले व अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी Shane Kimbrough ह्यांनी स्पेसवॉक सुद्धा केला
आता अंतराळ स्थानकाची सूत्रे Peggy Whitson हिच्या हाती असतील तिच्या सोबत रशियन अंतराळवीर
Oleg Novitskiy व Thomas Pesquet (E SA ) हे दोन अंतराळवीर असतील हे तिघेही आता तिथे सुरु असलेल्या प्रयोगांवर संशोधन करतील वीस एप्रिलला नवीन तीन अंतराळवीर अंतराळ स्थानकात राहण्यासाठी जातील तोवर हे तिघे अंतराळ स्थानक सांभाळतील
No comments:
Post a Comment