Monday 3 April 2017

मंगळावरील वायूमंडलातील अधीकांश वायू अंतराळात झाले लुप्त मावेनचा निष्कर्ष


  मंगळावर पूर्वी वहात असलेले पाणी (काल्पनिक चित्र ) आणि आताचे रखरखीत वाळवंट फोटो -नासा संस्था

नासा संस्था -30 march
मंगळावरील वायूमंडलात अब्जावधी वर्षांपूर्वी सजीव सृष्टीसाठी आवश्यक असलेले वायू  अस्तित्वात होते पण त्यातील अधीकांश म्हणजे जवळपास 65 टक्के वायू अंतराळात झाले लुप्त झाले आणि मंगळ ग्रहावर ओसाड वाळवंट निर्माण झाले असा निष्कर्ष अमेरिकेच्या नासा संस्थेने काढला आहे
अमेरिकेच्या नासा संस्थेने नोव्हेंबर 2013 मध्ये मावेन हे मंगळ यान मंगळग्रहावरील वातावरणाची सखोल माहिती मिळवण्यासाठी पाठवले आहे आणि वेळोवेळी हे मानवविरहित यान तेथील फोटो व इतर माहिती गोळा करून पाठवत असते
University Of  Colorado येथील मुख्य संशोधक Bruce Jakosky ह्यांनी दिलेल्या माहितीनुसार  नुकत्याच मावेन कडून मिळालेल्या माहितीचा डेटा व फोटो वापरून संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे
मंगळावर अब्जावधी वर्षांपूर्वी सजीव सृष्टी अस्तित्वात होती ह्याचे पुरावे आता सतत मिळत आहेत मे 2016 मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीत मंगळ ग्रहावरील Naukluft ह्या पाठारी प्रदेशात पूर्वी पाणी वाहात असल्याचा सबळ पुरावा मिळाला होता त्यात वाहते पाणी आटल्याचा आणि नदीकाठच्या दगडात काही मिनरल्स ,चिखलाचा अंश आणि सेडीमेंटरी व वाळूचे खडकही सापडल्याची नोंद आहे शिवाय त्या आधीच्या बातमीत पाण्याचे गोठलेले बर्फाच्या स्वरूपातले अंशही सापडल्याचा पुरावा मिळाला आहे (वाचा ह्याच ब्लॉगवर ह्या संदर्भातल्या बातम्या ) त्या मुळेच संशोधकांचा उत्साह दुणावला आणि त्यांनी सखोल संशोधन सुरु ठेवले आहे
मावेनने दिलेल्या ताज्या माहिती नुसार अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळावर अत्यंत उष्ण वारे वाहात होते सौर वादळे सूर्याची अति प्रखर नीलकिरणे ,विद्युत भारित प्रकाशकिरणे ह्या मुळे नद्या आटल्या पाणी नष्ट झाले, मंगळावरील वायूमंडलातील सजीवांसाठी आवश्यक असलेले वातावरणही बदलले त्यातील सृष्टीसाठी उपयुक्त असलेले 65 टक्के वायू नष्ट झाले आणि अंतराळात लुप्त झाले सजीव सृष्ठीला आवश्यक असलेले वातावरणच नष्ठ झाल्याने सजीव सृष्टीचे अस्तित्वही संपले
अति उष्णतेने पाणी आटले ,नद्या नाले कोरडया पडल्या तर अती थंडीने आणि कमी प्रकाशामुळे पाणी गोठले आणि खडकात सूक्ष कणांच्या रूपात शिल्लक राहिले तसेच सजीव सृष्टीही म्हणजेच सूक्ष्म जिवाणू खडकात जीवाश्मांच्या रूपात अस्तित्वात असावेत असे संशोधकांना वाटतेय
जिथे पाणी प्रवाही स्वरूपात होते त्याच्या किनाऱयावरील खडकांवर सौर वादळामुळे व वातावरणातील सूर्याच्या प्रखर व विद्युत भारित अतिनील किरणांचा रासायनिक परिणाम होऊन खडकांची व जमिनीची धूप
झाली असावी आणि खडकातील वायूही नष्ट झाले असावेत मंगळावरील वायूमंडलातील अधिकांश कार्बन डाय ऑक्साईड वायू छोटया छोटया विस्फोटानंतर नष्ट झाले असावे शिवाय वातावरणाचा थर अत्यंत क्षीण ,पातळ ,अत्यंत थंड व गुरुत्वाकर्षणाच्या अभाव असल्याने कालांतराने तिथले स्थिर व प्रवाही वाहते पाणी नष्ट झाले असावे परिणामी आता तिथे रुक्ष वाळवंट निर्माण झाले आहे असा निष्कर्ष आता संशोधकांनी काढला आहे





No comments:

Post a Comment