Sunday 12 March 2017

बाल संशोधकांनी बनवल अंतराळवीरांसाठी संशोधित टेस्टी फूड

            मियामीतील विध्यार्थी Green Cuisine ह्या स्पर्धे अंतर्गत अंतराळवीरांसाठी बनवलेल्या पदार्थासोबत

नासा संस्था -10 march
अंतराळ वीरांना अंतराळ स्थानकात राहताना अंतराळातील झिरो ग्रॅव्हिटी मुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते विशेषतः झोप न येणे ,अस्थिरता,आरोग्य समस्या,सततची होणारी सर्दी आणि त्यामुळे तोंडाची चव जाण आणि अन्न बेचव लागण वैगरे. अंतराळात झिरो ग्रॅव्हिटीमुळे शरीरातील द्रवपदार्थ वरून खालच्या दिशेने न वाहता समान दिशेने वाहतात आणि त्या मुळेच ह्या समस्या उदभवतात अंतराळवीरांच्या बेचव जेवणाच्या समस्येवर संशोधक सतत उपाय शोधत असतात कारण आधीच त्यांचं जेवण पॅकबंद,फ्रोझन आणि अल्प असत अंतराळवीर स्थानकात करत असलेल्या महत्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना टेस्टी सकस अन्न देऊन फिट ठेवणे आवश्यक आहे
नासा संस्थेने ह्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी Growing Beyond Earth & Green Cuisine हि स्पर्धा आयोजित केली होती
मियामीतील Fairchild Tropical Botanic Garden मधील विध्यार्थ्यांनी हे चॅलेंज स्वीकारत शिक्षकांच्या
मदतीने ह्या स्पर्धेत भाग घेतला गेल्या दोन वर्षांपासून नासा संस्थेच्या केनेडी स्पेस सेंटर मधील वनस्पती तज्ञ संशोधकांच्या साथीने अंतराळवीरांचे जेवण टेस्टी बनवण्यासाठी काही भाज्यांच्या रोपांवर संशोधन करत होते
ह्या बाल संशोधकाच्या प्रयोगासाठी Fair child ह्या संस्थेने विशेष मदत केली त्यांनी त्या साठी उपलब्ध केलेल्या मिनी लॅब मध्ये अंतराळ स्थानकातील veggie project सारखीच वातावरण निर्मिती केल्या गेली व रोपे लाऊन ती वाढवल्या गेली त्या साठी नासा संस्थेने काही नियम घालून दिले होते त्याचे तंतोतंत पालन करत विद्यार्थ्यांनी हि रोपे विकसित केली त्या साठी त्यांना त्यांच्या शिक्षकांचे सहकार्य मिळाले
ह्या मिनी लॅब मध्ये रोपांची वाढ होताना त्या रोपांची पोषकता,त्यांच्या वाढीचा वेग ,त्यांची चव आणि विशेतः प्रतिकूल वातावरणात त्यांची तग धरून ठेवण्याची क्षमता ह्याचे विशेष निरीक्षण नोंदवून सखोल संशोधन केल्या गेले आणि आता त्यांच्या प्रयोगाला यश मिळाले आहे
विद्यार्थांच्या ह्या संशोधित विकसित रोपांना मिळालेले यश पाहून नासाच्या Veggie project च्या संशोधिका Dr. Gioia  Massa म्हणतात कि,ह्या संशोधित रोपांचा उपयोग आगामी अंतराळ मोहिमेतील अंतराळ वीरांना होईल Veggie project अंतर्गत रोपांची लागवड करताना ह्या संशोधनाचा data वापरून कोणती रोपे लावावीत व कशी लावावीत हे ठरवता येईल
दुसरया Green Cuisine ह्या  स्पर्धे अंतर्गत विद्यार्थ्यांनी अंतराळस्थानकातील अंतराळवीरांच्या जेवणाची चव वाढवणारे टेस्टी पदार्थ बनवले त्यांचे रोजचे जेवण ताजे herbs व ताजे मसाले वापरून रुचकर बनवण्याचे चॅलेंज ह्या विद्यार्थ्यांपुढे होते शिवाय त्यांनी पदार्थ बनवताना वापरलेले herbs आणि मसाल्यांचा उगम कुठे झाला ते कोठे आणि कसे वाढतात,मसाले कोठे आणि कसे तयार केले जातात त्यांची पोषकता त्यांचा आरोग्यावर होणारा परिणाम ह्या बाबतीतली सखोल माहिती मिळवून हे संशोधन करायचे होते आणि हे सर्व निकष वापरून विद्यार्थ्यांनी हा प्रयोग यशस्वी केला
नासाच्या केनडी स्पेस सेंटरच्या संशोधक Teresa Martinez विध्यार्थ्यांच्या ह्या यशाने खुश होऊन म्हणाल्या ,विद्यार्थ्यांनी बनवलेले हे पदार्थ तीव्र चवीचे व ताजे मसाले वापरून केल्यामुळे निश्चितच सकस व टेस्टी आहेत त्या मुळे अंतराळवीरांना टेस्टी जेवणाचा आनंद मिळेल अंतराळ स्थानकातील अंतराळवीर जेव्हा ह्या पदार्थांचा आस्वाद घेतील तेव्हा थेट अंतराळवीरांकडूनच ह्या विध्यार्थ्यांना त्यांच्या संशोधनाचे श्रेय मिळेल

No comments:

Post a Comment