Peggy Whitson ,Shane Kimbrough (NASA) आणि Thomas Pesquet (ESA) ह्यांनी रोबोटिक ट्रेनिंग
दरम्यान घेतलेला हा सेल्फी फोटो -नासा संस्था
नासा संस्था-7 जानेवारी
नासाच्या अंतराळ मोहीम 50 चे कमांडर Shane Kimbrough व Flight Engineer Peggy Whitson ह्या दोघांनी स्पेस स्टेशनच्या तांत्रिक कामासाठी शुक्रवारी केलेला Space Walk यशस्वी झाला
Peggy Whitson आणि Shane KImbrough स्पेसवॉकला जाण्याआधी फोटो -नासा संस्था
सहा तास बत्तीस मिनिटांच्या ह्या स्पेस वॉक मध्ये ह्या दोन्ही अंतराळवीरांनी स्पेस स्टेशनच्या बाहेरील भागात रोबोटिक आर्मच्या मदतीने नवीन adapter plates install केले आणि स्टेशनच्या बाहेरील तीन जुन्या निकेल हायड्रोजन बॅटरीज बदलून त्या ठिकाणी नव्या Lithium ion बॅटरीज बसवल्या ह्या बॅटरीजचा उपयोग स्थानकातील सोलर arrays पासून मिळणारी सोलर इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करून ठेवण्यासाठी होतो
त्यांनी इतर अनेक तांत्रिक कामेहि केली ह्या स्पेसवॉक साठी लागणारे सामान जपानी कार्गोशिप मधून डिसेंबर मध्येच अंतराळस्थानकात पाठवण्यात आले होते
आता अंतराळस्थानकाच्या उरलेल्या कामासाठी तेरा जानेवारीला हे अंतराळवीर ह्या मोहिमेतील दुसरा स्पेसवॉक करणार आहेत
अंतराळवीर Snane Kimbrough व Peggy Whitson स्पेस वॉक करताना
नासाचे कमांडर Shane Kimbrough ह्यांचा हा चवथा स्पेसवॉक होता त्यांनी परिधान केलेल्या ड्रेसवर लाल रंगाच्या रेषा होत्या आणि त्यांच्या डोक्यावरील हेल्मेटमध्ये कॅमेरा( Camera 18 ) बसवलेला होता
नासाची flight engineer Peggy Whitson च्या करिअर मधला हा सातवा स्पेसवॉक होता
आता तिने सर्वात जास्तवेळा स्पेसवॉक करणाऱया अंतराळवीरांगनेच्या यादीत प्रथम स्थानावर असणारया नासाच्या अंतराळ वीरांगना Suni Williams ह्यांच्याशी बरोबरी केली आहे peggy ने परिधान केलेल्या ड्रेसवर रेषा नव्हत्या पण तिच्या डोक्यावरील हेल्मेट मधेही कॅमेरा बसवलेला होता ( Camera 20 ) ह्या दोन्ही अंतराळवीरांना Thomas Pesquet ह्या अंतराळवीराने मदत केली त्याचा हा पहिलाच स्पेसवॉक होता
ह्या अंतराळवीरांनी केलेला हा 196 वा स्पेसवॉक होता आतापर्यंत अंतराळस्थानकातील तांत्रिक कामासाठी अंतराळवीरांनी 195 वेळा स्पेसवॉक केले होते
स्पेस वॉक करणे अंतराळवीरांसाठी आवश्यक आणि आव्हानात्मक काम असले तरी तो जीवघेणा असतो आणि T.V. वर लाइव टेलिकास्ट पाहणाऱया सायंन्स प्रेमी प्रेक्षकांसाठी काळजाचा ठोका चुकवणारा आणि थरारक असतो कारण अंतराळात वातावरणविरहित अवस्थेत तरंगत वस्तू पकडणे ,फिटिंग करणे दुरुस्ती करणे अत्यंत कठीण असते विशेषतः महिलांसाठी आणि पेगीन हि यशस्वी कामगिरी तब्बल सातवेळा केलीय हि अभिनंदनीय बाब आहेच आता तेरा तारखेला ती पुन्हा स्पेसवॉक करणार आहे
No comments:
Post a Comment