यवतमाळ येथे जून मध्ये सुरु झालेला पाऊस आता ऑगस्ट महिन्यातही सतत बरसतच आहे कधी जोरदार तर कधी रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे यवतमाळ येथील नदी, नाले दुथडी भरून वाहात आहेत यवतमाळला पाणी पुरवठा करणारी धरणेही आता पाण्याने भरली आहेत एकंदरीत पाऊस समाधानकारक व पुरेसा पडलाय असे असूनही उन्हाळ्यात सुरु झालेली पाणीकपात अजूनही सुरूच आहे
यवतमाळकर गेल्या वर्षभर कमी पावसामुळे पाणीटंचाईच्या समस्येला साथ देत आहेत यवतमाळात आधी एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा पाणी कपातीमुळे आठवड्यातून दोनदा करण्यात आला नंतर भयंकर उन्हामुळे निर्माण झालेल्या भीषण दुष्काळामुळे पाणी आठवड्यातून एकदाच सोडण्यात आले कधी उशिराने तर कधी अनियमित व कमी दाबाने अत्यंत गढूळ पाणी नळाला येत होते तरीही नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाला संयमाने साथ दिली कारण मागच्या वर्षी कमी पाऊस पडल्याने दुष्काळामुळे नदीनाले आटले होते धरणातील पाणीसाठाही अत्यल्प होता
विशेष म्हणजे उन्हाळ्यातच लोकांनी स्वयंस्फुर्तीने धरणातील साचलेला गाळ काढला होता आणि तोही लोकवर्गणी गोळा करून
आता नदीनाले तुडुंब पाण्याने भरले आहेत धरणेही पाण्याने भरली आहेत तरीही पाणीपुरवठा मात्र अजूनही आठवड्यातून दोनदाच केला जातोय पाऊस पडल्यामुळे आठवड्यातून एकदा केला जाणारा पाणीपुरवठा दोनदा केल्या जातोय पण अजूनही तो पूर्ववत झाला नाही
राज्यात सर्वत्र जिथे,जिथे समाधानकारक पाऊस झालाय व धरणे भरलीत तिथे पाणीकपात रद्द झालीय आणि पाणीपुरवठा नियमित केला गेलाय मग यवतमाळ येथे अपेक्षित पाऊस पडला असताना व धरणे ओव्हरफ्लो झाली असतानाही पाणी पुरवठा नियमित का होत नाहीय ?
विशेष म्हणजे सरकारकडून पाणीटंचाईच्या काळात आणि नंतरही पाणीप्रश्न सोडवण्यासाठी कोट्यावधीचा निधी मंजूर झाला आणि प्राप्तही झाला तरीही पाणीकपात सुरूच आहे
निवडणुकी आधी यवतमाळला चोवीस तास पाणी पुरवठा करू असे आश्वासन देणारे नेते पाणीपुरवठा नियमितही करू शकले नाहीत त्या मुळे संतप्त झालेले नागरिक आता पावसाळ्यातील हि पाणी कपात रद्द करून दररोज पाणी पुरवठा करावा अशी मागणी करत आहेत

No comments:
Post a Comment