Saturday 28 May 2016

नासाची अंतराळ वीरांगना केट रुबिन्स स्पेस स्टेशन मध्ये जाण्यासाठी सज्ज

            अंतराळ वीरांगना केट रुबिन्स -फोटो नासा संस्था

नासा संस्था -24 मे

नासाची अंतराळ वीरांगना केट रुबिन्स आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाण्यासाठी सज्ज झाली असुन अवकाश उड्डाण संदर्भातील तिची तयारी आता पूर्ण झाली आहे
नासाच्या मिशन 48/49 अंतर्गत अमेरिकेची काटे रुबिन्स 24 जूनला कझाकस्थान येथून अंतराळ स्थानकासाठी उड्डाण करेल  बैकानूर इथल्या कास्मोड्रोम इथून सोयुझ स्पेस क्राफ्ट मधून ती आणखी दोन अंतराळ वीरांसमवेत अंतरिक्षात झेप घेईल तिच्या सोबत रशियाचे अंतराळवीर Anatoly Ivanishin (Roscosmos) आणि जपानचे अंतराळवीर Takuya Onishi ( Aerospace Exploration Agency)
हे दोघेही जाणार आहेत रुबिन्स केटची हि पहिलीच अंतराळ्वारी वारी आहे तिची ह्या अंतराळ मोहिमेसाठी 2009 साली निवड झाली होती रुबिन्स अमेरिकेतील कनेक्टिक्युट मधल्या फार्मिंगटन इथे जन्मली आणि कॅलीफोर्नियाच्या नापा मध्ये वाढली सन डियागो युनिव्हरसिटी मधून तिने Bsc molecular boilogy आणि stanford युनिव्हरसिटी मधून कॅन्सर Biology त Phd  केले आहे 
त्या आधी ती अमेरिकेच्या  आर्मी मेडिकल रिसर्च Institute मध्ये कार्यरत होती तिथे तीने संसर्गजन्य रोगांच्या संदर्भातील संशोधनात सहभाग नोंदविला देवी रोगाच्या प्रसारावर नियंत्रण व प्रतिबंध ह्या संदर्भातील पहिले मॉडेल विकसित करण्यात तिचा महत्वपूर्ण सहभाग होता चौदा संशोधकांच्या संसर्गजन्य रोग नियंत्रण संशोधन चमूची ती प्रमुख होती त्यांनी सेन्ट्रल आफ्रिका व पश्चिम आफ्रिकेतील  इबोला व monkey pox ह्या  संसर्गजन्य रोगाचे जीवाणू आणि त्यांचे अनुवंशिक दुष्परिणाम ह्या बाबतीत महत्वपूर्ण संशोधन केले आहे
 अंतराळ स्थानकात पोहोचल्यावर हे तिघेही तिथे आधीच वास्तव्यास असलेल्या अंतराळवीरांसोबत राहतील रुबिन्स अंतराळ स्थानकातील फिरत्या प्रयोगशाळेत कमी गुरुत्वाकर्षाणाचा मानवी आरोग्यावर विशेषत: जीन्स ,हाडांच्या वस्तुमानातील बदल  हृदय ,रक्तवाहिन्या आणि रक्ताभिसरणातील अवकाशातील वातावरणात होणारे बदल ह्या संदर्भात सखोल संशोधन करणार आहे तसेच भौतिक विज्ञान ,पृथ्वी आणि अंतराळ विज्ञान ,तंत्रज्ञान आणि विकास कामे ह्या संदर्भातही हे संशोधक  संशोधन करतील अक्टोबर मध्ये तिचा अवकाश स्थानकातील संशोधनात्मक कार्यकाळ पूर्ण करून रुबिन्स तिच्या दोन सहकारी अंतराळवीरांसोबत पृथ्वीवर परतेल
सद्या रुबिन्स तिच्या चोवीस जूनच्या अंतराळ स्थानक निवासाच्या उड्डाणासाठीच्या आधीच्या तयारीसाठी मास्कोत असून तेथूनच ती तिच्या ह्या मोहिमे संदर्भात्तील संशोधना संबंधित पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देईल
एक जूनला नासाच्या satellite channel वरून  तिच्या ह्या मोहिमेचे ट्रेनिग विषयीची माहिती , त्या संदर्भातील तिची  video clip व मुलाखत लाइव टेलीकास्ट द्वारे दाखवल्या जाइल


Thursday 26 May 2016

अवकाशातील भुईचक्कर सारखे दिसणारे कृष्ण विवर


                अवकाशातील  भुई चक्कर सारखे दिसणारे कृष्ण विवर  -  फोटो -नासा संस्था
नासा संस्था -25 मे
नासाचे खगोल शास्त्रज्ञ हबल टेलिस्कोप ,चंद्रा एक्स रे ऑबझरव्हेटरी व स्पीटझर स्पेस टेलिस्कोपच्या सहाय्याने अवकाश निरीक्षण करत असताना त्यांना अवकाशातील हे  कृष्ण विवर दिसले  हे अवकाश निर्मित कृष्ण विवर दिवाळीतल्या फटाक्यातल्या भुईचक्कर सारखे दिसतेय जणु विधात्याने दिवाळीत ते पेटवलेय ! 
इटाली येथील संशोधक  Fabio Pacucci (SNS) ह्यांनी Royal Astronomical Society च्या रिसर्च पेपर मध्ये हि नवी माहिती नुकतीच प्रसारित केली आहे अवकाशातील हे अवकाश निर्मित भुईचक्कर भल्या मोठया कृष्ण विवरा मध्ये तयार झाले असावे असे संधाकांचे मत आहे कृष्ण विवराच्या आरंभाची महत्वपूर्ण माहिती ह्या कृष्ण विवराच्या शोधातून मिळाली असून हि आतापर्यंतची सर्वात मोठी शास्त्रीय उपलब्धी असल्याचे संशोधकांचे मत आहे
ह्या मिळालेल्या आधुनिक माहिती नुसार सुरवातीचे काही कृष्ण विवर हे अतिविशाल वायूंच्या ढगांच्या collapse  होण्यामुळे तयार झाले किंवा एखाद्या मोठया ताऱ्याच्या नष्ठ होण्यामुळे बाहेर पडलेल्या वायूंमुळे आणि नंतर हे वायू वेवेगळ्या प्रक्रियेतून गेल्या मुळे झालेल्या बदलांमुळे तयार झाले असावेत आणि ह्या विवराच्या उगमानंतर ते मोठे ,अति विशाल व अवाढव्य होत गेले असावे
शास्त्रज्ञ असे मत व्यक्त करतात कि,कृष्णविवरे हि सगळ्याच आकाशगंगेच्या मध्यभागी असतात त्यांनी शोधलेली काही कृष्ण विवरे तर सूर्यापेक्षा लाखपट मोठी असून विश्वाच्या आरंभापेक्षा एक अब्ज वर्षांनी लहान आहेत काहीच्या मते हे मोठे कृष्ण विवर आजुबाजुंचे वायू कृष्ण विवरात प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे ओढल्या गेल्या मुळे तयार झाले असावे तर काहीच्या मते अनेक लहान कृष्ण विवरे एकत्र आल्यामुळे हे अति विशाल अवाढव्य कृष्णविवर तयार झाले असावे पण ह्या साठी खूप कालावधी जावा लागतो आणि संशोधकांनी शोधलेले हे कृष्ण विवर मात्र अत्यल्प वेळेत मोठया ढगांच्या collapseहोण्याने त्वरित तयार झाले आहे अस संशोधकांच मत आहे भविष्यात जर ह्या कृष्ण विवराच्या आरंभाच्या पुराव्याला पृष्ठी मिळाली तर कृष्ण विवराच्या उत्पत्ती बद्दल अधिक माहिती मिळू शकेल
कृष्ण विवराचा उगम शोधणे अत्यंत कठीण आहे पण संशोधकांनी दोन कृष्णविवराच्या उगमाचा शोध लावल्याचा दावा इटालीच्या Astrophysics National Institute च्या Andra Grazian ह्यांनी केला आहे तरीही X Ray व इन्फ्रा रेड च्या सहाय्याने अजुन सखोल संशोधन केल्या जाइल मगच ह्या शोधाला पृष्ठी मिळेल
तूर्तास संशोधकांनी पाठवलेल्या ह्या फोटोतील ब्रम्हांडातील हे भुई चक्कर मात्र अत्यंत विलोभनीय दिसतेय
  

Saturday 21 May 2016

शास्त्रज्ञांनी शोधले ब्रमांडातील पृथ्वीसारखे ग्रह

ब्रामांडातील नवीन संशोधित ग्रह-फोटो -नासा संस्था
नासा संस्था - 21 मे
     नासाच्या संशोधकांनी केप्लर मिशन अंतर्गत केलेल्या अवकाश संशोधनामुळे नुकताच ब्रमांडातील पृथ्वीसारख्याच आणखी ग्रहांचा शोध लागला आहे नासाच्या वाशिंग्टन येथील मुख्यालयातील प्रमुख शास्त्रज्ञ एलेन स्टोलन ह्यांनी दिलेल्या माहितीनुसार नासाच्या खगोल शास्त्रज्ञांनी केप्लर मिशन अंतर्गत केलेल्या अवकाश निरीक्षणानंतर अवकाशातील 1,284 ग्रहांचा शोध लावला आहे. 
        ह्या सापडलेल्या ग्रहांपैकी 550 ग्रह हे पृथ्वीसारखेच खडकाळ असून त्यातील नऊ ग्रहांवर पृथ्वी सारखेच वातावरण असून तिथे सजीव सृष्ठी आणि मानवी अस्तित्व असण्याची शक्यता शास्त्रज्ञांना वाटतेय पण हे नऊ ग्रह आपल्या सूर्य मालेत भ्रमण करीत नसून ब्रमांडात अस्तित्वात असलेल्या अनेक सूर्यमालेतील सूर्याभोवती भ्रमण करत आहेत हे ग्रह आपल्या सौरमालेबाहेर व अत्यंत दूर अंतरावर आहेत त्या मुळे तिथे मानव पोहोचणे सद्या तरी अशक्य आहे पण भविष्यात मात्र शास्त्रज्ञ त्या बाबतीत सखोल माहिती मिळवतील असा विश्वास त्यांना वाटतोय आणि सध्याची शास्त्रज्ञांची अफलातून अशक्य कोटीतील शक्य करण्याची यशस्वी कामगिरी पाहता ब्रमांडातील आपल्यासारखीच मानवी परग्रहवासी असलेले पृथ्वीसारखे ग्रह ते नक्की शोधतील ह्यात शंका नाही. 

Tuesday 17 May 2016

ग्रीनलंडच्या पश्चिम किनारयावरील आईसब्रीज

            ग्रीनलंडच्या पश्चिम किनारयावरील बर्फ व हिमनदी -फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 12 मे 
ग्रीनलंडच्या पश्चिम किनारयावर जमलेल्या बर्फाचे व बर्फामुळे तयार झालेल्या हिमनदीचा हा फोटो नासाच्या वैमानिकांनी NOAA-3 ह्या विमानातून टिपला आहे ऑपरेशन आइस ब्रिज हि नासाची मोहीम असून हे ह्या मोहिमेचे आठवे वर्ष आहे मागच्या सात वर्षात ह्या मोहिमे अंतर्गत नासाच्या शास्त्रज्ञांनी उत्तर धृवावरील बर्फीय थराची उपयुक्त माहिती जमा केली असून ह्या मोहिमे दरम्यान बर्फाच्या वाढणारया वा कमी होणारया उंचीच्या बदलाच्या निरीक्षण करताना शास्त्रज्ञांना 460 मैल लांब खोल दरी सापडली आहे ग्रीनलंडच्या दक्षिणेकडे देखील बर्फाखाली पाण्याचा प्रचंड साठा सापडला आहे
आइस ब्रिज मोहिमे अंतर्गत केलेल्या पाहणीमुळे शास्त्रज्ञांना उन्हाळ्यात बर्फ वितळण्याच्या वेळेचा अचूक अंदाज समजण्यास मदत  तर झालीच शिवाय बर्फाच्या रुंदीमध्ये होणारया बदलाचीही माहिती मिळाली आहे

सूर्याचे बुध ग्रहण

               बुध ग्रहण - फोटो -नासा संस्था

नासा संस्था -10 मे
मंगळवारी नऊ मेला सूर्याला बुधाचे ग्रहण लागले होते  अक्षय तृतीयेच्या दिवशी भारतीयांना सूर्यावर टिंबाच्या रूपातील बुध ग्रहणाचे दुर्मिळ दृश्य पहायला मिळाले  तसेच अमेरिकेतूनही हे बुध ग्रहण दिसले
नासाच्या खगोल शास्त्रज्ञांनी पेनिसिल्विनिया  व बोयेरटावऊन ( Boyertown ) येथुन दुर्बिणीच्या सहाय्याने छायाचित्रीत केलेले हे दृश्य 
 शंभर वर्षात फक्त तेरावेळा बुधग्रहण होते  सूर्य व पृथ्वी ह्यांच्या मधून बुध ग्रह जेव्हा मार्गक्रमण करतो तेव्हा तो सूर्याच्या पृष्ठभागावर छोट्या काळ्या टिंबाच्या रुपात दिसतो त्यालाच बुध ग्रहण म्हणतात  ह्या आधी 2006 साली  सूर्याला बुध ग्रहण लागले होते बुध सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह असून त्याला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यास 88 दिवस लागतात 
भारतात दुपारी चार साडेचारला बुध ग्रहण सुरु झाले व रात्री उशिरा संपले हे ग्रहण सूर्य मावळण्याच्या वेळेस लागल्याने भारतीयांना फक्त सहा साडेसहाच्या दरम्यान पाहता आले भारतातील इतर भागांप्रमाणेच ते विदर्भातही दिसले यवतमाळ येथूनही ते  साडेचार ते पाच वाजताच्या दरम्यान सूर्यावर छोटया बिंबाच्या रुपात दिसले अर्थात हे ग्रहण काळ्या फिल्म व दुर्बिणीच्या तसेच आरशा वरून परावर्तीत करून पाहिले गेले 

Tuesday 3 May 2016

मंगळाच्या नाऊक्लुफ्ट पाठारावरील आटलेले पाण्याचे स्त्रोत व खडकाळ भाग

         मंगळाच्या नाऊक्लुफ्ट  पाठारावरील आटलेले पाण्याचे स्त्रोत व खडकाळ भागाचा हा फोटो नासाच्या
         Curiosity ह्या मंगळ यानाच्या सहाय्याने शास्त्रज्ञांनी छायांकित केला आहे
               मंगळावरील Naukluft पाठारावरील नदीचा प्रवाह व खडक -फोटो -नासा संस्था
नासा संस्था-
ह्या फोटोत दिसणारा हा उंच सखल भाग " नाउक्लुफ्ट पाठार" ह्या नावाने ओळखला जातो एप्रिल मध्ये नासाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात ह्या फोटोतील सखल भागात खोलवर पूर्वी वाहत्या व आता आटलेल्या नदीचा सबळ पुरावा सापडला आहे ह्या नदीच्या वाहत्या पाण्यासोबत (आधीच्या बातमीत लिहल्या प्रमाणे) वाहात आलेला कचरा दगड ,माती ,वाळू  व इतर गाळ वर्षानुवर्षे तिथेच साचून त्या पासून तयार झालेले  सेडीमेंटरी खडक ,वाळूचे खडक व काही मिनरल्स आढळले आहेत त्यात सापडलेल्या चिखलाच्या अंशामुळे तिथे पूर्वी पाणी वहात होत ह्या गोष्टीला पृष्ठी मिळाली आहे शिवाय तिथल्या वाळूचे खडक वारयामुळे  धूप होऊन उडून आलेल्या वाळूमुळे व नंतर नदीतील वाहत आलेल्या गाळाच्या थरांमुळे तयार झाल्याच्या खुणा आढळल्या आहेत नंतर पाणी आटल्यामुळे किंवा नष्ट झाल्यामुळे ह्या दगडांचे थर कठीण व जाड झाले असावेत  ह्या फोटोमुळे शास्त्रज्ञांना मंगळावरील मातीत असलेल्या मिनरल्स व इतर घटकांच्या अस्तित्वाचे  अधिक संशोधन करता येईल नासा संस्थेतर्फे येत्या काही वर्षात मंगळावर मानव पाठवण्याची तयारी सुरु असून मंगळावरील मानवी वास्तव्यासाठी आवश्यक वातावरण व आवश्यक घटकाचे संशोधनही  सुरु आहे

Sunday 1 May 2016

यवतमाळ येथे उन्हाचा तडाखा पाणी टंचाईने नागरिक हैराण

यवतमाळ -३० एप्रिल २०१६
ह्या वर्षी एप्रिल मध्येच उन्हाची तीव्रता जाणवत असून अजून मे महिना बाकी आहे एप्रिल मध्येच  उष्णतेचा पारा  यवतमाळ येथे चाळीसच्या वर गेला होता काल यवतमाळ येथे पारा ४३ अंश सेल्सिअस येव्हढा नोंदल्या गेला  उन्हामुळे रस्ते निर्मनुष्य झाले असून सकाळी नऊ नंतर उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे त्यातच पाणी टंचाई मुळे घरातील कुलरही बंद आहेत  शिवाय झाडेही पाण्याविना वाळू लागल्या मुळे उन्हाची दाहकता नागरिकांना असह्य झाली आहे विदर्भात सर्वात जास्त तापमान नागपूर येथे ४५. ३ तर चंद्रपूर येथे ४४ अंश सेल्सिअस इतके नोंदविल्या गेले

                               पाणी पुरवठा तीन दिवसांनी आणि अशुद्ध 
     
आधीच असह्य उन्हाळा त्यात सततच्या दुष्काळामुळे यवतमाळ येथील नदी ,विहरी आटल्या आहेत त्यात आता एक महिना पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक असल्याची माहिती प्रसारित झालीय त्या मुळे लोकांना आता दर तीन दिवसानंतर पाणी पुरवठा केल्या जातोय कधी कधी तर टाकी साफ करण्याच कारण तर कधी आणखी काही कारण सांगून अचानक पाणी येणार नाही असे सांगण्यात येते तेव्हा नागरिकांच्या त्रासात भर पडते  विशेष म्हणजे हा पाणी पुरवठा अत्यंत कमी दाबाने होतो त्या मुळे तीन दिवस पुरेल इतका पाणी साठा करण्यातच गृहिणींचा वेळ जातो शिवाय हे पाणी अत्यंत गढूळ असते गेल्या काही दिवसात तर पाण्याला इतका ब्लिचिंग पावडरचा वास येतोय कि ते पाणी नागरिक पिऊ शकत नाहीत हि पावडर आरोग्याला घातकही आहे त्या मुले नागरिकांचे आरोग बिघडत आहे असले अशुध्द पाणी पाहुन पाणी शुद्धीकरण यंत्रणा अस्तित्वात आहे कि नाही ? पाणी व्यवस्थित  शुध्द केल्या जातेय कि नाही? हे संबंधित अधिकारी तपासतात कि नाही असा प्रश्न पडतो ह्या बाबतीत विचारणा करण्यासाठी पाणी पुरवठा विभागात फोन केल्यास फोन कधीच उचलल्या जात नाही फोनची रिंग वाजतच रहाते पण फोन उचलल्या जात नाही त्या मुळे इतर संबंधितांना फोन करावा लागतो पण त्यांचेही फोन उचलल्या जात नाहीत त्या मुळे नागरिकांना माहितीही मिळत नाही पाइप लाइन फोडण्याचे प्रकार तर सतत घडत असतात ब्लीचिंगचा वास असलेले पाणी पिऊ न शकल्याने लोकांना पाणी विकत घ्यावे लागते त्या मुळे त्यांना नाहक भुर्दंड सोसावा लागतोय तर पाणी विक्री करणाऱ्यांचा मात्र धंदा जोरात सुरु आहे
    पिवळे व ब्लीचिंग पावडरचा वास असलेले पिण्यास अयोग्य पाणी (शास्त्री नगर )
गेल्या दहा वर्षात आणि आता नवीन सरकार आल्यावरही कोट्यावधीचा निधी पाणी व्यवस्थापनेसाठी मंजूर होऊन खर्च झाल्याची माहितीही प्रसारित झालीय तरीही पाणी टंचाई निवारण का झाले नाही ? यवतमाळात ह्या वर्षी पुरेसा पाऊस अल्पावधीतच झाला काही ठिकाणी तर पूरही आला पण योग्य नियोजनाभावी धरण भरताच जास्तीचे पाणी रस्त्यावर सोडले जाते त्या मुळे कित्येकांच्या शेतीचे ,घराचेही नुकसान होते आणि लोक मात्र पाणी टंचाईने दरवर्षी त्रासतात आता काही स्वयंसेवी संघटना लोकांच्या मदतीने तलावातील गाळाचा उपसा करत आहेत शिवाय त्या साठी निधीही गोळा केल्या जातोय म्हणजे पुन्हा नागरिकांच्या माथी  पैशाचा भुर्दंड !  ह्या संघटनांनी संबंधीत आमदार खासदार व सरकारकडून मंजूर झालेला निधी मागावा त्यांना तो देण्यास बाध्य करावे आणि गाळ साफ करण्यासाठीही कर्मचारी नित्युक्त करायला लावावे हि कामे शेतकरयांना दिल्यास त्यांना रोजगार मिळेल शिवाय ते आत्महत्त्याहि  करणार नाहीत
हा नागरिकांचा हक्क आहे  असे झाल्यासच निधीचा योग्य वापर होईल व पाणी टंचाई आगामी काळात होणार नाही त्या साठी लोक जागृती होणे अत्यंत आवश्यक आहे