नासा संस्था -26 Feb.
नासा संस्थेकडून 26 Feb. ला मिळालेल्या माहिती नुसार
अवकाश निर्मित निळ्या रंगाच्या आकर्षक बुडबुड्याचे हे मनमोहक दृश्य नासा व इसा ह्या अवकाश संशोधन संस्थेच्या संशोधकांनी हबल दुर्बिणीच्या सहय्यानी अचूक टीपलेय
हा निळसर बुडबुड्याच्या आकाराचा गोलाकार तेजोमेघ अवकाशातील धूळ ,हेलियम ,हायड्रोजन व इतर वायूंच्या संयुगांनी W.R.31 a ह्या तारयाभोवती तयार झाला असून त्याचे नाव W.R.31 a नेब्युला असे आहे हा ग्रह पृथ्वी पासून 30,000 प्रकाश वर्षे दूर असून 20,000 वर्षांपूर्वी तो तयार झाला असावा मात्र सध्या तो प्रसरण पावत आहे त्या मुळे 100,000 वर्षे एव्हडेच त्याचे आयुष्य असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे
No comments:
Post a Comment