Saturday 20 February 2016

दिल दोस्ती दुनियादारी प्रेक्षकांचा निरोप घेतेय

                    दिल दोस्ती दुनियादारी हि मालिका आज प्रेक्षकांचा निरोप घेतेय गेल्या वर्षभर दिल दोस्तीतल्या माजघरातील हे दोस्त प्रेक्षकांच्याही माजघरातील झाले होते विशेष म्हणजे महाविद्यालयातील समकालीन युवकांच्या पसंतीची असलेली हि मालिका वयाच बंधन पार करत जेष्ठांच्याही आवडीची बनली हे खरेतर माजघरातील कलाकारांच यशच आणि अर्थातच लेखिका दिगदर्शकाचही !  दिल दोस्तीच आर्या आंबेकर व जुईली जोगळेकरने म्हटलेल शीर्षक गीतही अल्पावधीतच लोकप्रिय झाल
                  सुरवातीला उनाड वाटलेली माजघरातील हि दोस्त मंडळी जसजसे एपिसोड प्रक्षेपित होत गेले तसतशी त्यांच्यातली प्रगल्भता अन त्यांच्या स्वभावातले विविध पैलू उलगडत गेले त्यांच्यातल एकमेकांना सावरून घेण ,धीर देण अन नैराश्य घालवत पुन्हा आत्मविश्वासाने आपल्या मित्रांना उभ करण्याचा एक अनोखा पैलू प्रेक्षकांना पहायला मिळाला
                     सध्याच्या कट ,कारस्थान ,खून मारामारया ,तुरुंगवास आणि त्याच त्याच रटाळ कथानक असलेल्या मालिकांमध्ये हि मालिका आपल्या साधेपणामुळे अन दोस्तातल्या सच्चेपणामुळे इतर मालिकांपेक्षा वेगळी ठरली आणि म्हणूनच प्रेक्षकांच्या विशेष पसंतीची ठरली काही अपवाद वगळता ह्या मालिकेतील मनमोकळा संवाद अन कधी कोपरखळी मारत तर कधी शाब्दिक कोटी करत केलेले नर्म विनोद प्रेक्षकांना वर्षभर मनमुराद हसवत होते ह्या दोस्तांमधली चिडवाचिडवी ,खेचाखेची पेक्षकांना रिझवत होती दिवसभराच्या कामान कंटाळलेल्या अन मरगळलेल्या मनात उत्साह जागवित होती (प्रत्यक्षात मात्र हे कलाकार शुटींगच्या वेळी रात्री जागुन अभिनय करत होते ) रात्री उशीरान प्रक्षेपित होणारया ह्या मालिकेन सगळ्यांना मनमोकळ हसवल हलक फुलक मनोरंजन केल हे दोस्त कधी एकमेकांशी भांडत ,कधी एकमेकांची बाजू घेत त्यांना अडचणीतून बाहेर काढून मदतीचा हात देत, एकमेकांचे हात गुंफत अखेरपर्यंत एकजुटीन राहिले दोस्तांच्या यशासाठी प्रसंगी माघार घेत राहिले एकमेकांच्या यशाने आनंदित झाले तर अपयशान दु:खी! कोठेही कुटील कारस्थान नव्हत कि एकमेकांचे पाय ओढण नव्हत ! तर होत एकत्रित येऊन आत्मविश्वासाने आलेल्या प्रसंगाला धैर्याने सामोरे जाण्याच बळ देणार मैत्रबंध !
                         नवीनच संसाराच सुखस्वप्न घेऊन आपल्या जोडीदारासोबत रहायला आलेल्या विवाहित रेशामाला नवरयाची "लिव इन रिलेशनशिप" मधली प्रेयसी पाहून झालेल्या मानसीक आघातातून सावरत नव्या आयुष्यात नव्यान जगण्याची नवसंजीवनी देणारे हे दोस्त कैवल्यला त्याच्या गाण्याच्या करिअर मध्ये आलेल अपयश असो कि मिनलच्या नाटयप्रवेशाच्या वेळी डळमळीत झालेला तिचा आत्मविश्वास असो त्यांना उभारी देण्यात त्यांना यशस्वी करण्यात आणि सुजयच्या बहिणीच मानसिक दौर्बल्य दूर करण्यातही हे दोस्त यशस्वी ठरले हे दोस्त एकमेकांच्या मानसिक एकांताच्या वेळी एकमेकांचे आधार झाले
                          दिल दोस्तीतले हे सारे दोस्त आपआपल्या भूमिकेत सरस ठरले प्रसंगी कठोर पण मदत करणारा तत्वनिष्ठ आणि कंटाळवाण बौद्धिक घेणारा ,बहिणीच्या आजारपणामुळे खचलेला तरीही त्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जाणारा सुजय सुव्रत जोशीन उत्तम साकारला मराठी न समजल्यान गोंधळणारी निरागस अन कचरयातून कला साकारताना कधी नवीन कपड्यांना कात्री लावत तर कधी कामाच्या वस्तू वापरून धमाल उडवून देणारी ख्रिस्चन  Ana पूजा ठोंबेन छान वठवली तर थोडीशी बॉईश ,dashing , मिनल स्वानंदिन छान साकारली  सखी गोखालेनही साधी पण तितकीच कणखर सारया दोस्तांना वळण लावत अस्ताव्यस्त घर सावरत आपल दु:ख विसरून सगळ्यांना प्रेमान करून खाऊ घालणारी भाऊक रेशमा छान साकारली ह्या दोघींतही आपल्या आईवडिलांचे अभिनयाचे गुण उपजतच उतरलेत  गंगाधर टिपरे नंतर बरयाच वर्षांनी लोकांना हि मालिका आपलीशी वाटली  अभियंता पुष्कराज चीरपूटकरन भडक डोक्याचा खादाड पण मनान हळवा आशु छान वठवला तर किंजलन आपल्या गुजराती बोलण्यातून   विनोद  घडवत मालिका कंटाळवाणी होऊ दिली नाही अमेय वाघचा कैवल्य तर उत्तमच! त्यान आधी सिनेमातून अभिनय केल्याने त्याच्या अभिनय सहज सुंदर आहे
                              गेल्या वर्षभर हे दोस्त आपल्या अभिनयातून संवादातून प्रेक्षकांना हसवत  होते त्याचं  मनोरंजन करत होते विशेषत: रेशमा तिचा नवरा राकेश सोबत न राहता तिच्या ह्या मित्रांसोबत रहाते हे सत्य तिच्या आईवडील व इतरांपासून लपवण्यासाठीची कसरत करताना ,त्यातून अभावितपणे होणारे गैरसमज अन घडणारे विनोद ह्या मुळे गेले वर्षभर हि मालिका उत्तरोत्तर रंगत गेली आणि मनोरंजक ठरली सुरवातीला उद्धट वाटणारी हि दोस्त मंडळी शेजारच्या  निकम आजीच्या बाबतीत मात्र हळवी होतात तिचा आदर राखतात   कैवल्यचे आईबाबा असो कि रेशमाचे आईवडील ह्या जेष्ठांचाहि ते आदर करतात हे एपिसोड मधून लोकांना पाहायला मिळाल अन बहुदा ह्याच मुळे हि मालिका जेष्टांनाही पहायला आवडली ह्या मालिकेतील प्रगल्भा ,निशा ,राकेश ,नागावकर ह्याचाही अभिनय चांगला होता ह्या साऱ्यांनीच मालिकेत विनोदी रंग भरले
                              आता मात्र दिल दोस्ती  हि मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय दिल दोस्तींच्या चाहत्यांसाठी हा निरोप हुरहूर  लावणारा असेल पण लवकरच ह्या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे अशी बातमी आहे पण तूर्तास तरी मालिका संपतेय आणि लोकांना हवीहवीशी वाटत असतानाच संपतेय हेच ह्या मालिकेच यश आहे  पण दिल दोस्तीतले हे दोस्त आपल्याला इतर टी.वि. मालिकेतून कार्यक्रमातून दिसतील अशी आशा करू यात  



No comments:

Post a Comment