Thursday, 1 February 2018

31जानेवारीला आकाशात ग्रहणग्रस्त आरक्त सुपरमून उगवला

                      यवतमाळ येथून टिपलेले खग्रास ग्रहण काळातील ब्लड सुपरमूनचे विलोभनीय रूप

यवतमाळ -31 जानेवारी
काल तब्बल 152 वर्षांनी पौर्णिमेचा चंद्र सुपरमून,ब्लड मून च्या रूपात प्रगटला ह्या महिन्यातली हि दुसरी पौर्णिमा होती आणि ह्या वर्षातल हे पाहिल चंद्र ग्रहण तेही खग्रास शिवाय सध्या चंद्र पृथ्वीच्या कक्षेतील अंतरही कमी झाल्याने चंद्राचा आकारही मोठा झालाय म्हणजे तो सुपरमूनच्या स्वरूपात दिसतोय (ह्या बाबतीतली सविस्तर माहिती तीन डिसेंबरच्या बातमीत ह्याच ब्लॉगवर)
कालचा सुपरमून ग्रहणग्रस्त झाल्याने ब्लड मूनच्या स्वरूपात दिसला एरव्ही पृथ्वी सूर्याभोवती आणि चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करतो पण काल सूर्य,पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आल्याने चंद्रावर पृथ्वीची पूर्ण सावली पडली आणि खग्रास चंद्रग्रहण झाले ग्रहणकाळात सूर्याची प्रकाश किरणे काहीकाळ फिल्टर होतात त्यामुळे चंद्र  लाल रंगाचा दिसतो म्हणून त्याला ब्लड मून म्हटल्या जात भारतात सर्वत्र अमेरिकेत ,ऑस्ट्रेलिया आणि इतर देशातही हे ग्रहण दिसल
ब्लड मून ,सुपरमून आणि खग्रास चंद्रग्रहण अशा त्रिवेणी संगमाच्या ह्या ऐतिहासिक पर्वणीच्या दुर्मिळ संधीचा आनंद घेण्यासाठी आणि आकाशातील ब्लड मूनच सुपरमूनच्या स्वरूपातल विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी  आपल्या कॅमेऱ्यात ,मोबाईल मध्ये फोटो घेण्यासाठी उत्साही सुशिक्षित लोकांनी गच्चीवर अंगणात गर्दी केली होती संध्याकाळी सहानंतर हा सुपरमून ग्रहणग्रस्त झाला आणि आठ वाजता ग्रहण सुटल खग्रास ग्रहणाच्या काळात त्याचा रंग मंगळाप्रमाणे तांबूस झाला होता खूप वर्षांआधी इंडोनिशियात झालेल्या भूकंपामुळे अंतराळात उडालेल्या धूलिकणांमुळे भूगर्भातून बाहेर पडलेल्या वायूंमुळे तेव्हाचा सुपरमून ग्रहणकाळात निळसर दिसला होता म्हणून त्याला ब्लु सुपरमून म्हटल गेल होत
विशेष म्हणजे सकाळ पासूनच ग्रहणाची शास्त्रोक्त माहिती खगोल शास्त्रज्ञ देत होते तर काही चॅनल्स वरून ग्रहणाच्या शुभ अशुभ फळाचं भाकीत वर्तवण्यात येत होत काहिनी तर टॅरो कार्डचाही उपयोग केला
ह्या काळात धार्मिक मंदिरेही बंद ठेवण्यात आली होती तरीही लोकांनी 152 वर्षांनी आकाशात घडलेल्या ह्या
ऐतिहासिक नैसर्गिकअविष्काराचा आनंद लुटत हा क्षण कॅमेराबद्ध केला हि नवीन प्रगत युगाची नांदीच होय







Friday, 26 January 2018

23 जानेवारीला अंतराळ मोहीम 54 च्या अंतराळवीरांनी केला यशस्वी space walk



                             नासाचे अंतराळवीर स्पेसवॉकची तयारी करताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -23 जानेवारी
नासाच्या अंतराळ मोहीम 54 चे flight  engineer Mark Vande Hei आणि अंतराळवीर Scott Tingle यांनी
 23 जानेवारीला अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी Space Walk केला
दोघांनी मिळून केलेला हा ह्या वर्षीचा पहिलाच स्पेसवॉक होता हा स्पेसवॉक सात तास चोवीस मिनिटांनी संपला
ह्या स्पेसवॉक मध्ये ह्या अंतराळवीरांनी स्थानकाच्या रोबोटिक आर्मवर काम केले त्यांनी रोबोटिक आर्मच्या Canadarm ह्या भागावरचा  Effector(LEE) replace केला रोबोटिक आर्मच्या शेवटच्या टोकांवर दोन redundant end Effector बसवलेले असतात त्यांचा उपयोग अंतराळ स्थानकात  कार्गोशिपचे आगमन झाल्यावर वेगवेगळ्या activities च्या वेळेस करण्यात येतो या शिवाय त्यांनी इतरही कामे केली
अंतराळ स्थानकाच्या दुरुस्तीसाठी आणि देखभालीसाठी केलेला हा आतापर्यंतचा 206 वा  स्पेसवॉक होता
Mark Vande Hei ह्यांच्या अंतराळ कार्यकाळातील हा तिसरा स्पेसवॉक होता आणि Scott Tingle ह्यांच्या अंतराळ मोहिमेतील हा पहिलाच स्पेसवॉक होता
Mark Vande Hei हे  29 जानेवारीला अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी पुन्हा स्पेसवॉक करणार आहेत त्या वेळेस त्यांच्या सोबत जपानचे अंतराळवीर व Flight Engineer Norishige Kanai हेहि स्पेसवॉक करतील  

Thursday, 18 January 2018

नासाच्या अंतराळमहिमेतील महिलांच्या प्रवेशाला झाली चाळीस वर्षे पूर्ण

                 16 जानेवारी 1978 साली निवड झालेल्या पहिल्या सहा महिला Astronauts फोटो -नासा संस्था
डावीकडून उभ्या -Kathryn Sullivan,Shannon W Lucid,Anna Fischer,Judith Resnik
खाली बसलेल्या -Saily K Ride आणि  M Rhea Seddon

नासा संस्था -17 जानेवारी
नासाच्या अंतराळमहिमेतील महिलांच्या प्रवेशाला सोळा जानेवारीला चाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत त्या आधी नासा संस्थेत अंतराळ मोहिमेसाठी महिलांना संधी दिल्या गेली नव्हती सोळा जानेवारी 1978 साली नासाची APOLLO मोहीम संपण्यात आली आणि नासा संस्थेने त्याच वेळेस अंतराळ वीरांच्या मोहिमेत महत्वपूर्ण बदलाचा निर्णय घेतला होता ह्या नवीन पर्वातील मोहिमेत नासा संस्थेने अंतराळवीरांच्या निवडीतही बदल करण्याचे ठरवले
ह्या नव्या पर्वातील पहिल्याच अंतराळ मोहिमेत नासाने Space Shuttle चा उपयोग करण्याचे ठरविले त्या मुळे सहा Mission Specialist , Pilot आणि Commander ह्यांना अंतराळात पाठवणे शक्य झाले ह्याचवेळी पहिल्यांदाच महिलांनाही संधी देण्याचे ठरले तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील वैज्ञानिक ,इंजिनीअर्स ह्यांनाही ह्या अंतराळ मोहिमेत सहभागी करण्यात आले आणि भिन्न वंशीय आफ्रिकन अशियन अमेरिकनांनाही संधी देण्यात आली
ह्या आधीच्या नऊ वर्षातील मोहिमेत निवड झालेल्या अंतराळवीरांची टीम वेगळी होती त्यात फक्त अनुभवी मिलिटरी जेट पायलट आणि अंतराळ शास्त्रज्ञांनाच प्राधान्य देण्यात आले होते
आताची रेकॉर्डब्रेकर अंतराळवीरांगना Peggy Whitson ने नासाच्या ह्या अंतराळ मोहिमेतील बदलाच्या वेळेस नुकतेच शालेय शिक्षण पूर्ण केले होते आणि Iowa Wesleyan College मध्ये Bsc Chemistry आणि Biology साठी प्रवेश घेतला होता  त्यांना ह्या नव्या बदलांचा फायदा मिळाला सगळ्यात जास्त काळ अंतराळात राहून जास्तवेळा स्पेसवॉक करण्याचे रेकॉर्डब्रेक यश चाळीस वर्षांपूर्वीच्या ह्या बदलामुळेच शक्य झाले हे सारे श्रेय नासा संस्थेचे आहे असे Peggy Whitson म्हणतात
तेव्हा अंतराळ मोहिमेतील महिलांची संख्या अवघी दहा टक्के होती आणि चाळीस वर्षांनी आता ती चौतीस टक्क्यांपर्यंत आलीय 2013 मध्ये अंतराळवीरांच्या टीम मध्ये महिला व पुरुष अंतराळवीरांची संख्या समान होती नासा संस्थेत आता आफ्रिकन,अमेरिकन , Pacific Islander ,Hispanic ह्यांची एकूण संख्या चोवीस टक्के आहे ह्या वैविध्याचा नासा संस्थेला अभिमान वाटतो आणि ह्या पुढेही ह्या भिन्नवंशीय लोकांना नासा संधी देईल ह्या साऱयांनी वेगवेगळ्या देशातून नसांमध्ये सहभागी होऊन अभिमानास्पद यश मिळवले आणि नासाच्या यशात भर टाकली आहे असे नासाचे अधिकारी म्हणतात
नुकतेच नासा संस्थेने प्रगतीचे आणखी एक पाऊल पुढे टाकत अमेरिकेतील Luciana Vega ह्या अकरा वर्षीय मुलीला नासा मोहिमेत सहभागी केले आहे नासाच्या Latest Doll ची अचूकता तपासण्यासाठी तिची मदत घेण्यात आली आतापर्यंतच्या अंतराळवीरापेक्षा ती वयाने सर्वात लहान आहे कदाचित ती पुढे मंगळ मोहिमेत सहभागी होऊन विक्रमही नोंदवेल असे मत शास्त्रज्ञ व्यक्त करतात

Saturday, 6 January 2018

Happy New Year From Space Station

                New year साजरा करताना अंतराळवीर Joe Acaba ,Mark Vande आणि इतर अंतराळवीर
 फोटो- नासा संस्था
नासा संस्था - 2 जानेवारी
अंतराळवीर Mark Vande ,Joe Acaba  आणि स्थानकातील इतर अंतराळवीरांनी स्थानकात  New Year साजरा केला तेव्हाचा हा फ़ोटो त्यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी शेअर केला
आणि पृथ्वीवासीयांसाठी Happy New Year च्या शुभेच्छाही दिल्या


                                                    अंतराळवीरांनी लुटला पिझ्झा खाण्याचा आनंद  
                                                                               

नासा संस्था - 7 डिसेंबर
अंतराळस्थानकात पोहोचलेल्या कार्गोशिप मधून अंतराळवीरांसाठी पाठवण्यात आलेल्या आवश्यक सामाना सोबत पिझ्झाही पाठवण्यात आला होता डिसेम्बर महिन्यात अंतराळमोहीम 53च्या अंतराळवीरांनी त्याचा आस्वाद घेतला अर्थात हा पिझ्झा पृथीवासीयांसारखा त्यांना सह्जतेन मात्र खाता आला नाही कारण झिरो ग्रॅव्हिटी! त्या साठी त्यांना कसरत करावी लागली ह्या कसरतीतच आपला पिझ्झा जास्त टेस्टी व्हावा ह्या साठी त्यावरच ड्रेसिंग चांगल करण्याची चढाओढ ह्या अंतराळातील शेफ मध्ये चांगलीच रंगली त्याचा व्हिडीओही अंतराळवीरांनी पृथ्वीवरील चाहत्यांसाठी पाठवला आहे



Sunday, 24 December 2017

अंतराळ मोहीम 54 चे आणखी तीन अंतराळवीर स्थानकात पोहोचले



                   अंतराळ वीरांसह अंतराळयान अंतराळ स्थानकाकडे उड्डाण करताना -फोटो नासा संस्था

नासा संस्था -२२ डिसेंबर
रविवारी सतरा तारखेला नासाच्या अंतराळ मोहीम 54 चे अंतराळवीर Scott Tingle ,रशियन अंतराळवीर Anton Shkaplerov आणि जापनीज अंतराळवीर Norishige Kanai सोयूझ अंतरिक्ष यानाने अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले बैकानूर Cosmodrome वरून 2.21 a.m.ला सोयूझ यानाने अंतराळ स्थानकाकडे प्रयाण केले आणि मंगळवारी 3.43a.m.ला ते अंतराळ स्थानकात पोहोचले

                                       अंतराळवीर स्थानकात पोहोचल्यानंतर फोटो -नासा संस्था

स्थानकात पोहोचल्यावर अंतराळ स्थानकात राहत असलेले सध्याचे कमांडर Alexander Misurkin ,अंतराळवीर Joe Acaba आणि Mark Vande ह्यांनी त्यांचे स्वागत केले
आता हे तीन नवीन अंतराळवीर सहा महिने अंतराळ स्थानकात मुक्काम करतील व तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील आता स्थानकातील अंतराळवीरांची संख्या सहा झाली असून त्यातील चारजण अमेरिकन आहेत
हे सारे मिळून अंतराळ स्थानकातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम व त्यावर आधुनिक उपचार ह्यावर संशोधन करतील विशेषतः निद्रानाश व मानवी स्नायूंवरील दुष्परिणाम शिवाय fiber optic filament manufacturing benefits design of advanced optical materials& electronic devices ह्याचा त्यात समावेश आहे
अंतराळवीर Joe Acaba ,Alexander आणि Mark Vande फेब्रुवारी 2018 मध्ये पृथ्वीवर परततील तर हे नवीन तीन अंतराळवीर जून महिन्यात पृथ्वीवर परत येतील

Saturday, 16 December 2017

अंतराळवीर Randy Bresnik,Paolo Nespoli आणी SergeyRyazanskiy पृथ्वीवर परतले

                                       सोयूझ MS-05 अंतराळवीरांसह पृथ्वीवर उतरताना -फोटो नासा संस्था

नासा संस्था -14 dec.
नासाच्या अंतराळ मोहीम 54चे अंतराळवीर व कमांडर Randy Bresnik ,फ्लाईट इंजिनीअर Paolo Nespoli आणी Sergey Ryazanskiy गुरुवारी दुपारी अंतराळस्थानकातून पृथ्वीवर परतले
गुरुवारी दुपारी 3.37 मिनिटाला त्यांचे सोयूझ MS-05 हे अंतरिक्ष यान कझाकस्थानातील Dzhezkazgan येथे पोहोचले

ह्या तिघांनी अंतराळ स्थानकात 138 दिवस वास्तव्य केले अंतराळस्थानकातील वास्तव्यादरम्यान त्यांनी स्थानकातील फिरत्या प्रयोगशाळेत सुरु असलेल्या संशोधनात सहभाग नोंदवला त्यांनी अंतराळातील microgravity  चा शरीरावर होणाऱ्या बॅक्टेरियल इफेक्टवर ,पार्किसन्स ह्या रोगाचे ओरिजिन व त्यावरील आधुनिक उपचार आणि history of cosmic ray ह्यावरील संशोधनात सहभाग नोंदवला
शिवाय त्यांच्या कार्यकाळात स्थानकात आलेल्या तीन कार्गोशिप चे स्वागत करून त्यांच्या डॉकिंगची सोयही केली
Randy Bresnik ह्यांनी त्यांच्या वास्तव्यादरम्यान अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी तीन स्पेसवॉक केले
तर अंतराळवीर Sergey Ryazanskiy ह्यांनी देखील स्थानकाच्या कामासाठी एकदा स्पेसवॉक केला
ह्या अंतराळवीरांच्या वास्तव्यात पहिल्यांदाच स्थानकात सहाजणांनी एकत्रित राहून संशोधन केले
आता स्थानकाची सूत्रे अंतराळवीर Alexander Misurkin ह्यांच्या हाती असून त्यांच्या सोबत अंतराळवीर Joe  Acaba  आणि Mark Vande Hei  हे दोघे स्थानकात राहून आपले संशोधन सुरु ठेवतील  सतरा डिसेम्बरला नवीन तीन अंतराळस्थानकात राहण्यासाठी जातील

Monday, 4 December 2017

चाळीस वर्षांनी घडल सुपरमूनच विलोभनीय दर्शन



                                                           आकाशातील तेजोमय सुपरमून

 यवतमाळ -३डिसेंबर
 एरव्ही आपण आकाशात कलाकलाने वाढणारी चंद्रकोर किंवा पौर्णिमेचा चंद्र नेहमीच पाहतो पण कालच्या पौर्णिमेचा चंद्र मात्र वेगळा होता तब्बल चाळीस वर्षांनी चंद्र सुपर मॅन सारखा सुपरमूनच्या रूपात उगवला तो नेहमीपेक्षा सातपट मोठया आकाराचा अन पंधरा पटीन अधिक प्रकाशान अवस्थेत आकाशात अवतरला एरव्ही उशिराने पूर्ण रूपात प्रगटणारा हा तेजस्वी सुपरमुन काल मात्र संध्याकाळीच मोट्या आकारातील तेजोमय रुपात उगवला
आकाशात नजर जाताच त्याच्या भोवती पसरलेली तेजोमय आभा आणि त्याचा वाढीव आकार दृष्टीस पडत होता
त्याच्या ह्या मोट्या आकारामुळे त्याचे नामकरण सुपरमून असे झाले शिवाय सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे त्याला कोल्ड सुपरमून असं म्हटल जातंय
चंद्राला हे सुपरमूनच रूप प्राप्त होण्यामागे शास्त्रीय कारण आहे आकाशात जेव्हा  चंद्र व पृथ्वी परिक्रमा करतात तेव्हा चंद्र आणि पृथ्वी ह्यांच्या मधील अंतर कमी होत तेव्हा ते जवळ येतात आणि त्यांच्यातील कमी झालेल्या अंतराने चंद्राचा आकार व प्रकाशात वाढ होते काल चाळीस वर्षांनी हे अंतर जवळ जवळ पाच हजार किलोमीटरने कमी झाल होत त्या मुळे पृथ्वीवासीयांना सुपरमूनच विलोभनीय दर्शन घडल