Wednesday, 30 September 2026

नासाच्या Deep Space food challenge सपर्धेतील विजेत्यांची घोषणा

Deep Space Food Challenge Mars to Table

 

नासा संस्था - 30 सप्टेंबर  

नासा आणि कॅनडियन स्पेस एजन्सी तर्फे भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी Deep space food challenge Mars to table -2026 हि स्पर्धा जाहीर करण्यात आली होती ह्या मध्ये अंतराळवीरांसाठी विकसित जीवनसत्त्वयुक्त उत्पादित अन्नप्रणालीचा वापर करून अंतराळातील जेवणातील नाविन्यपूर्ण अन्नपदार्थ कमी वेळेत,कमी श्रमात निर्धारित परिस्थितीत आणि साहित्यात तयार करून त्यांचा आराखडा सादर करण्याची संधी देण्यात आली होती नासा आणि CSAच्या नियमानुसार निकषांची पूर्ती करणाऱ्या अंतिम विजेत्या स्पर्धकाची नावे गुरुवारी घोषित करण्यात आली  

ह्या स्पर्धेत जगभरातील 33 देशातील आणी अमेरिकेतिल 28 राज्यातील नागरीक सहभागी झाले होते त्यातील निवडक 113 स्पर्धकांमधुन पाच जणांची अंतिम निवड करण्यात आली त्यांना 650,000 डॉलर ची बक्षिसे देण्यात आली 300000 डॉलरचे पहिले बक्षीस Philadelphia येथील Chinyere Ukeje ह्यांना मिळाले असून त्यांनी Adaptive Nourishment Infrastructure (ANI) अन्न तंत्रज्ञान प्रणाली सादर केली दुसरे 200,000 डॉलरचे बक्षीस Rosemead येथील Cislune  ह्यांना मिळाले असून त्यांनी Fresh Ferment Reserve Food Infrastructure चा वापर करून विकसित अन्न तंत्रज्ञान प्रणाली सादर केली 

भविष्यकालीन दूरवरच्या अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर आणि अंतराळ स्थानकातील अंतराळवीरांना पौष्टिक,सकस आणि चविष्ट अन्न निर्मिती करता यावी ह्या साठी आणी पृथ्वीवरील धान्य ऊत्पादन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी नासा संस्था आणी कॅनडीयन स्पेस एजन्सी (CSA) ह्यांनी Deep Space Food Challenge स्पर्धा जाहीर केली होती ह्या स्पर्धेत अंतराळवीरांच्या निरोगी आरोग्यासाठी त्यांना जीवनसत्त्वयुक्त पौष्टिक आणी सुरक्षित अन्न ऊत्पादन प्रणाली संशोधीत करण्याची संधी देण्यात आली होती हे अन्न ऊत्पादन कमी साहित्य,कमी पाणी वापरून,कमी जागेत करता येणे आवश्यक होते 

अंतराळविरांना अंतराळातील झीरो ग्रव्हिटितील तरंगत्या वातावरणात पाण्याच्या कमतरतेत पदार्थ बनवणे अशक्य असते त्या मुळे सध्या स्थानकात वास्तव्य करणाऱ्या अंतराळविरांना पृथ्वीवरील नासा संस्थेत तयार केलेले डिहायड्रेटेड प्रिझर्व केलेले अन्न पाठविले जाते पण भविष्यकालीन मंगळमोहिमेतील अंतराळविरांना मंगळावर  पोहोचण्यासाठी नऊ महिने लागतील आणी ईतके दिवस हे प्रिझर्व अन्न पुरणार नाही स्थानकातील अंतराळविरांना वेळोवेळी स्थानकात जाणाऱ्या कार्गो शिप मधून अंतराळमोहिमेतील अंतराळविरांसोबत अन्न फळे व इतर सामान पाठविण्यात येतात पण मंगळमोहिमेतील अंतराळविरांना असे अन्नपदार्थ व सामान पाठवता येणार नाही नासा आणी कॅनडियन स्पेस संस्थेने जाहीर केलेल्या ह्या स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना ह्या समस्या विचारात घेऊन धान्य ऊत्पादन आणी अन्नपदार्थ निर्मितीचे एकत्रित नवीन विकसीत तंत्रज्ञान सादर करणे आवश्यक होते  

ह्या वर्षी ह्या स्पर्धेचे नियम आव्हानात्मक होते भविष्यकालीन अंतराळवीरांच्या नऊ महिन्यांच्या अंतराळ प्रवासा दरम्यान 15 अंतराळवीरांच्या एका टीमला 500 मंगळ दिवसांच्या (पृथ्वीवरील 513 दिवस) अपेक्षित कलावधीमध्ये पुरेल इतके आणि अंतराळातील विपरीत वातावरणात खराब न होता सुरक्षितपणे टिकू शकतील अशा विकसित वैविध्यपूर्ण सकस अन्नपदार्थांच्या कार्यप्रणालीचा आणि अंतराळातील भोजनाचा एकत्रित संकल्पित आराखडा सादर करण्यास सांगण्यात आले आणि त्याचा व्हिडीओ पाठविण्यास सांगण्यात आले होते 

प्रथम क्रमांक प्राप्त Chinyere Ukeje ह्यांनी ANI संकल्पना विकसित केली त्यांनी नियंत्रित जागेत व वातावरणात अन्न आंबवण व बुरशीची लागवड करून जैविक चक्राद्वारे पोषकतत्वयुक्त अन्न निर्मिती तंत्रज्ञान विकसित केले असे अन्न सुरक्षित सकस आणि टिकाऊ असते शिवाय अंतराळवीरांना हे अन्न पदार्थ अंतराळात तयार करता येऊ शकतात हे अन्न पदार्थ चविष्ठ असल्याने त्यांना नेहमीचे बेचव अन्न पदार्थ खावे लागणार नाही आणि हे वैविध्यपूर्ण अन्नपदार्थ आधी पृथ्वीवरील मर्यादित अन्नाचा वापर करून अंतराळात अर्ध्या प्रमाणात तयार करता येत असल्याने त्यांना ते ताजे खाल्ल्याचा आनंद मिळेल ANI हे नायजेरियातील कृषी क्षेत्रातील कापणी आणि सुपीकतेची पृथ्वीदेवतेच्या नावावरून ठेवण्यात आले ह्या विकसित अन्न तंत्रज्ञान प्रणालीमध्ये कमी वेळ,श्रम,कर्मचारी,उपकरणे पाणी आणि वीज पुरवठ्यात दररोज ताजे अन्नपदार्थ पुरवते 

अंतराळविरांना अंतराळस्थानकातील वास्तव्या दरम्यान सकस जीनवसत्वयुक्त ताजे अन्न मिळत नाही त्यामुळे अंतराळातील झीरो ग्रव्हिटित त्यांना अनेक शारीरिक समस्या ऊद्भवतात त्यांना ताजे सकस पौष्टीक अन्न मिळावे ह्यासाठी 2021-2024 दरम्यान ह्या स्पर्धेची प्रथम सुरवात झाली ह्या स्पर्धेला जगभरातुन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यांनी नाविन्यपूर्ण अन्न उत्पादन प्रणाली सादर केल्या त्यातुन ह्या Deep Space Food Challenge साठी आवश्यक असलेल्या सर्व बाबीची पूर्तता करणाऱ्या स्पर्धकांची तीन टप्प्यात निवड करण्यात आली ह्या स्पर्धकांचे विकसित उत्पादित अन्न त्याची मर्यादित जागेतील उत्पादन क्षमता,सुरक्षितता,सकसता व टिकाऊपणा ह्यांचे संशोधित निरीक्षण नोंदवण्यात आले त्यातील निवडक अंतिम स्पर्धकांचे अन्नपदार्थ बनवून अमेरिकेत जगभरातील मान्यवर उद्योजक,सेफ आणि नासा संस्थेतील तज्ज्ञांच्या उपस्थितीत दोन दिवसाच्या समिट मध्ये पदार्थांची चव चाखुन त्यांची   पोषकता आकर्षकता चेक करून अंतिम निवड करण्यात आली    

 ह्या मोहिमेचे नासाच्या अलाबामा मार्शल स्पेस सेन्टरचे प्रोग्राम मॅनेजर Jennifer Edmunson म्हणतात, "भविष्यकालीन मंगळ मोहिमेत आम्ही असे नाविन्यपूर्ण विकसित अन्नपदार्थ बनविण्यासाठी उत्सुक आहोत ह्या मोहिमेतील अंतराळवीरांना ह्या पौष्टीक अन्न तंत्रज्ञानाचा वापर करता येईल नासाने कॅनडीयन स्पेस एजन्सी सोबत आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेमुळे जगभरातील सर्जक वृत्तीचे नागरिक एकत्र आले त्यांना नाविन्यपूर्ण विकसित अन्न प्रणाली तत्रंज्ञान सादर करण्याची प्रेरणा मिळाली ह्याचा ऊपयोग भविष्यकालीन अंतराळवीरांना त्यांच्या परग्रहावरील वास्तव्यात होईल तसेच जगभरातील दुर्गम भागात जिथे सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पुरेसे जिवनसत्वयुक्त अन्न मिळत नाही त्यामुळे त्यांना रोगाशी सामना करावा लागतो अशा लोकांना देखील होईल हे स्पर्धेक आमच्या मोहिमेत सहभागी होऊन आम्हाला अंतराळविश्वातील संशोधनास मदत करत आहेत त्यामुळे आम्ही देखील प्रेरित झालो आहोत!"

 

No comments:

Post a Comment