Wednesday, 31 December 2025

Esa च्या Mars Express आणी Exomars ने टिपले मंगळावरील धुलीवादळात ऊडणाऱ्या धुळीचे कण

 Mars Express sees a dust devil dancing across Mars 

 Mars Express आणि Exo Mars TGO ने कॅमेराबद्ध केलेल्या मंगळभूमीवरील चक्रीवादळातील वाऱ्यासोबत उडणाऱ्या घुलीकणांची हालचाल (Dancing dust devils)-फोटो- Esa -संस्था  

   युरोपियन स्पेस एजन्सी (Esa) -31 डिसेंबर

युरोपियन स्पेस.एजन्सी(ESa) च्या Mars Express आणी Exo Mars Trace Gas Orbiter Spacecraft मधील अद्ययावत कॅमेऱ्याद्वारे विस वर्षात घेतलेल्या फोटो व व्हिडीओंच्या सखोल संशोधना नंतर शास्त्रज्ञांनी मंगळावरील Tornado सारख्या 1039 चक्रीवादळातील वावटळीचा मागोवा घेतला मंगळावरील धुळ ह्या वावटळीत हवेत कशी ओढल्या जाते आणी वादळ क्षमल्यावर भुभागावर कशी वहात जाते किंवा ऊडत जाते ह्याची शास्त्रज्ञांनी  संशोधीत केलेली हि माहिती Science Advances मध्ये ऑक्टोबर महिन्यात प्रसिद्ध झाली आहे

शास्त्रज्ञांनी काढलेल्या प्रथमिक निष्कर्षा नुसार मंगळावरील चक्रीवादळ व वहाणाऱ्या वाऱ्याचा वेगाची तिव्रता पृथ्वीवरील वादळी वाऱ्यापेक्षा जास्त असते हे ह्या संशोधनमुळे कळाले आहे ह्या फोटोमध्ये वादळी वावटळीतील  धुलीकणाची हालचाल,वेग आणी दिशा कॅमेराबद्ध करण्यात यानातील अद्ययावत यंत्रणा यशस्वी झाली ह्या आधी अशी डिटेल माहिती मिळाली नव्हती 

अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ मंगळावरील चिकट धुळीवर ऊपाय शोधत आहेत कारण मंगळावरील वादळात  अंतराळयान त्यावरील सौरपॅनल्स,रोबोटिक ऊपकरणे रोबोटिक आर्म्स ह्यावर तेथील चक्रिवादळात ऊडालेली धुळ.धुळीकण जमतात आणी चिकटपणा मुळे ती धुळ पृथ्वीवरच्या धुळीसारखी सहजासहजी ऊडुन जात नाही किंवा आकाशातील ढगात जमुन पावसाळ्यात धुऊन निघत नाही त्यामुळे अंतराळयाने आणि त्यातील यंत्रणा ठप्प होते कधी वादळानंतर काही दिवसांनी अंतराळयान कार्यरत होते तर कधी हि यंत्रणा निकामी होते त्यामुळे संशोधनात बाधा येते 

ह्या फोटो मुळे धुलीकणाच्या प्रवासाची गती व दिशाचे मोजमाप करणे शास्त्रज्ञांना शक्य झाले आधी असा संशोधित  डेटा ऊपलब्ध नव्हता मंगळभूमीवर मोठ्या प्रमाणात विस्तीर्ण पसरलेले वाळवंट व ज्वालामुखी प्रवण क्षेत्र आहे ज्वालामुखी मुळे तयार झालेले खड्डे आहेत,उंचसखल भाग व गुहा आहेत मंगळावर सर्वत्र पसरलेली हि धुळ दिवसा सुर्याच्या ऊष्णतेपासुन संरक्षण करू शकते आणी रात्री थंडीपासून बचावासाठी ब्लॅंकेट सारखे काम करु शकते  असे शास्त्रज्ञांचे मत आहे 

वादळी वाऱ्यामुळे वातावरणात उडालेल्या धुळीचे कण आकाशातील ढग तयार करण्यासाठीच्या प्रक्रियेची सुरवात करतात आणी वादळ पाण्याची वाफ हवेत सोडतात पृथ्वीवर पावसाने धुळ वाहून जाते पण मंगळावर बराच काळ राहते आणी ग्रहावर पसरते म्हणून मंगळावरील हवामान समजण्यासाठी हि संशोधित माहिती उपयुक्त ठरेल मंगळ भूमीवरील चक्री वादळात  गोलाकार वाहणारे आणि प्रचंड वेगाने धुळ आत खेचणारे वारे हे धुळीचे कण,माती कुठे कधी आणि कशी ऊचलतात ह्याची आणखी सखोल संशोधीत माहिती मिळवण्यासाठी शास्त्रज्ञ ऊत्सुक आहेत 

 ExoMars TGO catches dust devils on Mars

मंगळभूमीवरील चक्रीवादळातील वेगवान वाऱ्यासोबत हवेत उडणारे धुळीचे कण (Dust Devils) फोटो - युरोपियन स्पेस एजन्सी  

2004 पासुन Mars Express आणी 2016 पासून ExoMars Trace Gas Orbital मार्फत घेतलेल्या फोटो व व्हिडिओ मुळे हि संशोधीत माहिती मिळवण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले ह्या माहिती मुळे भविष्य कालीन मानवसहित अंतराळमोहिमेतील अंतराळवीरांना मंगळावरील निवासासाठी तेथे पाऊल ठेवण्यासाठी पूर्व नियोजन करताना ऊपयुक्त ठरेल आमच्या अपेक्षेपेक्षा हि संशोधीत माहिती सखोल आहे असे Esa चे Project Scientists Colin Wilson म्हणतात


Thursday, 25 December 2025

स्थानकातील अंतराळवीरांच्या पृथ्वीवासीयांना शुभेच्छा ! Happy Christmas ! Merry Christmas !


 नासाच्या अंतराळ मोहीम 74चे जपानी अंतराळवीर Kimiya Yui अंतराळवीर Mike Fincke,Chris williams आणि Zena Cardman स्थानकातून लाईव्ह संवादाद्वारे पृथ्वी वासियांना ख्रिसमस निमित्त शुभेच्छा देताना -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था - 24 डिसेंबर 

नासाच्या अंतराळ मोहीम 74चे अंतराळवीर Mike Fincke अंतराळवीर Zena Cardman अंतराळवीर Chris Williams आणि जपानी अंतराळवीर Kimiya Yui ह्यांनी पृथ्वीवासीयांना लाईव्ह संवादा द्वारे Christmas च्या शुभेच्छा दिल्या 

अंतराळवीर Mike -"तुम्हा सर्वांना आमच्या मोहीम 74 मधील अंतराळवीरांतर्फे नाताळच्या शुभेच्छा!आता आम्ही अंतराळातील स्थानकातून भ्रमण करत असताना तुम्हा सर्वांबद्दल सणांच्या सुट्टीबद्दल विचार करत आहोत ह्या सुट्टीच्या काळात आपण आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत आनंदात ख्रिसमस साजरा करतो आणि हे वर्ष कस गेल ह्याचा विचार करतो आमच्यासाठी हे वर्ष खूप वैशिष्टपूर्ण आहे कारण आम्ही इथे स्थानकातील आमच्या अंतराळवीर मित्रांसोबत आहोत आम्हाला नुकत्याच पृथ्वीवर परतलेल्या आमच्या मोहीम 73मधील अंतराळवीरांची उणीव जाणवतेय आमची फॅमिली पण इथे नाही ह्याच वाईट वाटत असल तरी आमची हि स्पेस फॅमिली इथे आहे आणि आम्ही एकत्रित ख्रिसमस सण साजरा करणार आहोत आणि फक्त आम्हीच नाही तर जगभरातील नासा संस्थेतील आमच्या टीममधील सर्वजण Houston,Huntsville,Munich,Moscow,Scubaआणि Japan जिथे,जिथे हा सण साजरा होतो त्या देशातील नागरिकांसोबत आम्ही हा सण साजरा करणार आहोत !"

Chris- "ह्या सणातील पारंपारिक गोष्टी इथे आम्ही करू शकत नसलो तरीही आम्ही इथे नव्या गोष्ठीची सुरवात करणार आहोत त्या साठी आम्ही स्थानकात डेकोरेशन केले आहे आमच्याकडे छोटेसे ख्रिसमस ट्री आहे त्याला आम्ही डेकोरेट केलय इथल्या Airlock ला काही बुट अडकवले आहेत हे सार cheerful आहे आम्ही इथे नवी परंपरा सुरु केलीय ती खूप सुंदर आहे आणि स्पेशलही आम्ही हे सार इथे करू शकलो म्हणून आनंदित आहोत आणि ख्रिसमस साजरा करण्यासाठी उत्सुक आहोत !"

Zena -"मला वाटत आपल्यापैकी अनेकजण अनेक कारणाने ख्रिसमसच्या सुट्टीत घराबाहेर असताना इतरत्र हा सण साजरा करतात  इथे स्थानकातही अनेक अंतराळवीर येऊन गेले त्यांनी देखील कुटुंबियांपासून दूर स्थानकात ख्रिसमस साजरा केला Mike ने सांगितल्याप्रमाणे हा सण आमच्यासाठी स्पेशल आहे अंतराळ स्थानकातील अंतराळ मित्रांसोबत हा सण आम्ही साजरा करणार आहोत आणि ह्या टीममधील पृथ्वीवरील सर्वांसोबत आम्ही ख्रिसमस साजरा करणार आहोत नासा संस्थेतील सर्वांनी आमची आमच्या कुटुंबीयांची काळजी घेतली त्या बद्दल त्यांचे आभार त्यांच्यामुळेच इथे स्थानकात हा सण साजरा करण्याची अमूल्य संधी मिळाली मला वाटत आम्ही Santa च्या थोडेसे वर अंतराळात भ्रमण करत ख्रिसमस साजरा करतोय 

Kimiya -ख्रिसमस जपानमध्येही आम्ही साजरा करतो आणि New year पण आम्ही साजरा करतो आम्ही नासा संस्थेचे,कुटुंबियांचे आभार मानतो त्यांच्यामुळेच आम्हाला स्थानकातील स्पेस फॅमिली सोबत ख्रिसमस साजरा करायला मिळाला त्यांच्या मुळेच आम्ही इथे सुरक्षित आहोत आणि विशेष म्हणजे मी माझ्या ह्या अंतराळवीर मित्रांना जापनीज फुड देणार आहे

पृथ्वीवासियांनो आनंदात ख्रिसमस साजरा करा आणि सुखी भविष्यकाळाची आशा करा !

आम्हा चौघांतर्फे Happy Christmas ! Merry Christmas ! & Happy Happy New Year !  

Blue Origin NS -37 मोहिमेतील सहा प्रवासी अंतराळ पर्यटनावरून परतले

 

Blue Origin नस-37चे अंतराळ प्रवासी अंतराळ पर्यटनास निघण्याआधी -Joey Hyde,JasonStansell,Hans Koenigemann,Michaela Benthaus,Neal Mitch आणि Adonis Pouroulis-फोटो -Blue Origin 

Blue Origin -24 डिसेंबर

अमेरिकेने अंतराळ विश्वातील व्यावसायिक अंतराळ ऊड्डाणासाठी खाजगी कंपन्याना मान्यता दिल्यानंतर Blue Originने अंतराळ पर्यटनाचा शुभारंभ केल्यानंतर त्याला मिळालेला सामान्य नागरिकांचा ऊत्स्फुर्त प्रतिसाद वाढतच आहे त्यामुळे आता हि  अंतराळ पर्यटन मोहीम नियमित सुरु झाली आहे 20 डिसेंबरला  Blue Origin -NS -37 मोहिमेअंतर्गत सहा अंतराळ प्रवासी अंतराळ पर्यटन करून परतले ह्या पर्यटकांमध्ये Michaela (Michi) Benthaus, JoeyHyde ,Hans Koenigsmann, Neal Mitch, Adonis Pouroulis , Jason Stansell ह्यांचा समावेश होता ह्या वेळेसच्या मोहिमेचे वैशिष्ठ म्हणजे ह्या पर्यटकांमध्ये प्रथमच अपघाती अपंगत्व आलेल्या तरुणीचा समावेश होता 

ह्या पर्यटकांविषयी- Florida येथील Joey Hyde Physicist आहेत त्यांनी त्यांच्या आजोबा सोबत 1988 मध्ये Space Shuttle Atlantis चे उड्डाण पाहिले त्यांना तेव्हापासूनच त्यांना अंतराळ उड्डाणाची आवड निर्माण झाली  German American Aerospace Engineer Hans ह्यांनी Space X energy Sector मध्ये काम केले आहे त्यांनी Reusable Spacecraft आणि Launch Vehicles मध्ये करिअर केले ते परवानाधारक पायलट आहेत त्यांनी स्वत:साठी विमान बनवले Neal नामांकित व्यावसायी आहेत त्यांची वडिलोपार्जित Laundry Lux कंपनी आहे त्यांनी Biomedical Research Institute विश्वस्त मंडळाचे ते अध्यक्ष आहेत त्यांनी विशेषतः Genetic Research ला प्राधान्य दिले आहे Adonis Entrepreneur Investor  नामांकित उद्योजक आणि Mining Engineer आहेत West Texas चे रहिवासी Jason Stansell Software Engineer आहेत त्यांनी स्वत:च्या अंगणातून अनेक व्यावसायिक अंतराळ उड्डाणे पाहिली ते साहसी उत्साही आणि विज्ञानप्रेमी आहेत त्यांना स्कुबा डायविंग,कार मोटार सायकल ड्रायविंग व विमान उड्डाणाची आवड आहे हे अंतराळ पर्यटन 2016 मध्ये कर्करोगाने निधन पावलेला त्यांचा भाऊ Kevin ला समर्पित करणार आहेत 

Michaela -Aerospace & Mechatronics Engineer आहे -Michi European Space Agency मध्ये कार्यरत आहे लहाणपणापासूनच तिला अंतराळविश्वाची आवड होती तिला खेळाची आणि पर्वतारोहणाची देखील आवड आहे 2018मध्ये Mountain Biking करताना तिचा अपघात झाला तिच्या पाठीच्या कण्याला इजा झाली त्यामुळे तिचे पाय निकामी झाले चालण्याची क्षमता गेली तरीही न डगमगता तिने तिची आवड जोपासत अंतराळवीर होण्यासाठी प्रयत्न केले न्यायालयात वकिली केली आणि 2022मध्ये Analog Astronaut Mission अंतर्गत रिसर्च उड्डाणात सहभागी झाली आता प्रथमच अपंग व्यक्तीही अंतराळ पर्यटन करू शकतो हे तिने प्सिद्ध केले आहे 

हे सहाही अंतराळ पर्यटक Blue Origin च्या West Texas येथील उड्डाण स्थळावरून सकाळी सव्वा आठ वाजता (CT ) New Shepard अंतराळ यानातून रॉकेटच्या सहाय्याने अंतराळात झेपावले काही वेळातच अंतराळयानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यरत झाली अंतराळयान रॉकेट पासून वेगळे झाले आणि अंतराळाच्या दिशेने मार्गस्थ झाले

यानाने अत्यंत वेगाने अंतराळ प्रवास करीत काही मिनिटातच पृथ्वी आणि अंतराळ ह्यांच्यातील 62 मैल (100k.m) अंतरावरील करमन रेषा भेदून अंतराळातील झिरो ग्रॅविटीत प्रवेश केला तेव्हा सर्वजण सीटच्या बाहेर पडले आणि झिरो ग्रॅव्हीटीत तरंगण्याचा अद्भुत आनंद घेतला त्या वेळी सर्वाच्या तोंडुन ऊत्स्फुर्त प्रतिक्रिया बाहेर पडल्या "Wow !We are in Space !This is amazing Indescribable feeling ! The Earth & Atmosphere is Awesome!"

  

 Blue Origin चे New Shepard अंतराळयान अंतराळात पोहोचल्यावर Michi आणि Hans अंतराळ पर्यटनाचा आनंद घेताना -फोटो -Blue Origin 

अवघ्या दहा बारा मिनिटांचा पृथ्वी ते अंतराळ असा अद्भुत प्रवास करून हे सहाही पर्यटक पृथ्वीवर सुखरूप परतले तेव्हा त्यांनी हा अंतराळ पर्यटनाचा लाभ सामान्य नागरिकांना दिल्याबद्दल Blue Origin कंपनीचे आभार मानले 

Michi अंतराळयानातून हसतमुखाने बाहेर पडली तेव्हा तेथे जमलेल्या सर्वांनी तिचे टाळ्या वाजवून स्वागत केले त्या वेळी Michi भावनिक झाली होती ती म्हणाली," खूप सुंदर अनुभव होता मी अंतराळात वर खाली तरंगत होते माझे पायही ठीक होते मी अंतराळातील ते दृश्य पाहून हसू शकले त्या प्रत्येक क्षणाचा आनंद उपभोगू शकले Awesome ! माझ्या अपघातानंतर मी माझे अंतराळात जाण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची आशा सोडली होती पण मी लकी ठरले माझे अंतराळात पर्यटन करण्याचे स्वप्न Blue Origin मुळे पूर्ण झाले त्या बद्दल त्यांचे आभार अंतराळ सर्वांसाठी खुले आहे त्या मुळे कितीही संकटे आली तरी तुम्ही तुमचे ध्येय सोडू नका जगात अशक्य काहीही नाही तुमचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहा अशी प्रितिक्रिया तिने व्यक्त केली 

  

 NS -37 मोहिमेतील अंतराळवीर Michaela Benthaus अंतराळ पर्यटनावरून परतल्यानंतर -फोटो -Blue Origin 

Hans -मी लहानपणापासून Mission  Control मधून अनेक अंतराळयानाचे ऊड्डाण पाहिले होते आणि आज मी प्रत्यक्षात अंतराळ यानात बसलो होतो खूपच अभूतपूर्व सुंदर क्षण होता तो आणि यान झिरो ग्रॅव्हीटीत शिरल्यावर अचानक बसल्या जागेवरून कुणीतरी खूप जोरात प्रचंड दाबाने बाहेर ढकलल्याचा अनुभव आला आणि क्षणात साऱ्यांचीच स्थिती सारखी झाल्याच लक्षात आल वजनरहित अवस्थेत सर्वचजण तरंगू लागलो आम्ही खाली पृथ्वीकडे पाहील ते दृश्य खूप अप्रतिम होत पण आजूबाजूचा काळोख माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त होता खूप अद्भुत अनुभव होता !"

Neal -खूप सुंदर अनुभव होता पृथ्वीवर ट्रेनिंग घेतलं तरीही झिरो ग्रॅव्हीटीतला वजन रहित अवस्थेत तरंगण्याचा अनुभव अनपेक्षित होता आपण आपल्याला सावरू शकत नाही आणि तिथून पृथ्वीदर्शनचा क्षण अमूल्य आहे पण तिथून दिसलेली अंतराळ आणि पृथ्वीमधली निळी पातळ रेषा आपल्या दृष्टीकोनात बदल घडवते आपल्याला पृथ्वी संवर्धनाचे पर्यावरण रक्षणाचे महत्व कळते हे ह्या पर्यटनाचे ठळक वैशिष्ठ आहे Blue Origin चे हे व्यावसायिक अंतराळ पर्यटन Extraordinary आहे !'

Joeys -ह्यांचा आज वाढदिवस होता आणि पर्यटकांनी उड्डाणा आधी अंतराळयानात Happy Birth Day song गाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या ,"माझ्या आयुष्यातील अंतराळयानात साजरा झालेला हा पहिला वाढदिवस उर्वरित आयुष्यात कायम लक्षात राहील अंतराळातील Zero G मधला Intense Kinetic Force खूप सुंदर थ्रिलिंगअनुभव असामान्य होता झिरो ग्रॅव्हीटीत प्रवेश केल्यावर माझ्या मेंदूतील संवेदना बधिर झाल्या अचानक सगळ जग गोलाकार फिरू लागल्याची जाणीव झाली आम्ही सर्व दिशेने तरंगू लागलो सगळ्यांनी एकमेकाला Hi केल आणि मी सायंटिफिक प्रयोग केला मी चेंडू भिरकावला आणि तो किती अंतरावर जातो ते पाहील तोही तरंगू लागला ह्या अमूल्य अद्भुत अनुभवासाठी Blue Origin चे आभार !"

ह्या सहाही अंतराळ पर्यटकांना त्यांची कर्तृत्व वैशिष्ठे कोरलेला NS-37-Mission Patch व अंतराळवीर झाल्याचे सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले 

  NS-37 patch featuring a hexagonal design with a stylized crew capsule in the center. Six crew member names are arranged around the edges.

DNA-Neal ह्यांच्या साठी विज्ञानाचे महत्व आणि प्रभाव ,पाणघोडा Michi साठी आवडत्या प्राण्याचे प्रतीक Adonis ह्यांच्यासाठी Baobab tree ,Joey ह्यांच्यासाठी Spiral galaxy Symbolizes ,Dog bone shape,stars,K Jason ह्यांच्या भावासाठी 

हे अंतराळ पर्यटक पृथ्वीवर परतल्यानंतर Blue Origin चे Senior Vice President - Phil Joyce ह्यांनी त्यांचे अभिनंदन केले ते म्हणाले," NS मोहिमेअंतर्गत आजवर 92 नागरिकांनी अंतराळ पर्यटन केले NS -37 हे ह्या वर्षातील 9वे अंतराळ पर्यटन होते येत्या वर्षात त्यात आणखी वाढ होईल ह्या मोहिमेद्वारे आजवर जगभरातील सायंटिस्ट,इंजिनीअर्स ,व्यावसायिक,डॉक्टर्स,अंतराळविश्व आणि सोशल माध्यमातील व्यक्तीसह अनेकांनी अंतराळ पर्यटनाचा अनुभव घेतला प्रत्येक उड्डाणानंतर त्यांच्या दृष्ठीकोनातील बदल आम्हाला प्रेरित करत ह्या मोहिमेतील Michi चे पर्यटन अंतराळ सर्वांसाठी खुले आहे हे सिद्ध करते तीच स्वप्न पूर्ण होण्यासाठी आमची मदत झाली ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो New Shepard अंतराळ यानाची रचना अद्ययावत असल्यामुळे आणि Launch Tower Lift असल्यामुळे अपंग ,अंध मूक बधिर व्यक्तीही त्याचा लाभ घेऊ शकतात

Thursday, 18 December 2025

नासाचे अंतराळवीरJonny kim रशियन अंतराळवीर Sergey Ryzhikov आणी Alexey Zubritsky पृथ्वीवर सुखरूप परतले

 a crowd gathers around a recently landed space capsule on a snow-dusted desert landscape

सोयूझ MS -27 अंतराळयान तिन्ही अंतराळवीरांसह Dzhezkazgan येथे सुरक्षित खाली उतरल्यावर नासाची रिकव्हरी टीम तेथे पोहोचली तेव्हा आजूबाजूला जमलेला बर्फ -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था - (Space news)- 9 डिसेंबर

नासाच्या अंतराळ मोहीम 73 चे अंतराळवीर Jonny kim रशियन अंतराळवीर Sergey Ryzikov आणी Alexey Zubritsky स्थानकातील त्यांचे आठ महिन्यांचे वास्तव्य संपवून मंगळवारी 9 डीसेंबरला पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत हे तीनही अंतराळवीर आठ एप्रिलला स्थानकात वास्तव्यास गेले होते

 स्थानकातुन निघण्यापूर्वी नासाच्या लाईव्ह संपर्कात ह्या अंतराळवीरांच्या Change The Commander आणि Farewell Ceremony पार पडला तेव्हा अंतराळवीरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले 

  

अंतराळस्थानकातील Change Of Command आणी Farewell Ceremony कार्यक्रमात अंतराळवीर Sergey Ryzhikov अंतराळवीर Mike Fincke ह्यांच्या हाती स्थानकाची जबाबदारी सोपवताना सोबत अंतराळमोहीम 73/74 चे सर्व अंतराळवीर एकत्रित -फोटो नासा संस्था 

Sergey Ryzhikov -"अंतराळमोहीम -73 आता संपत आलीय  स्थानकाच्या पंचविसाव्या वर्षी आणि अपोलो मोहिमेच्या पन्नासाव्या वर्षी आम्ही इथे वास्तव्यास आलो ईस्टरने आमची सुरवात झाली इथल्या आठ महिन्यांच्या कार्यकाळातील दिवस मैत्रीपूर्ण आणि आनंदात गेले आम्हाला इथे अत्याधुनिक संशोधन करायला मिळाले आपली टीम मनमिळाऊ आणि ग्रेट होती त्यात सहभागी झाल्यामुळे मला अभिमानास्पद वाटते तुमच्या सहकार्याबद्दल आणि ग्राउंड टीमच्या मार्गदर्शनामुळे हि मोहीम यशस्वी झाली त्या बद्दल सर्वांचे आभार आम्ही आता परतत आहोत पण इथे नवनवीन अनुभवी अंतराळवीर येतजात असतात आता देखील Mike इथे आहेत त्यांच्या हाती मी आता कमांडरपदाची आणि स्थानकाची जबाबदारी सोपवत आहे!" 

Mike-"Thank You Sergey ,Jonny आणि Alexey! तुमच्या चांगल्या कामाबद्दल,तुमच्या मैत्रीपूर्ण सहकार्याबद्दल ग्राऊंड टीमच्या सहकार्यामुळे आपण हि मोहीम यशस्वी करू शकलो आता मोहीम 74 मध्ये देखील आम्ही आमचे उद्दीष्ठ साध्य करण्याचा प्रयत्न करत स्थानकाची आणि एकमेकांची काळजी घेऊ इथे पंचवीस वर्षांपासून अविरत संशोधन सुरु आहे हि आपल्यासाठी गौरवास्पद बाब आहे तुम्हा सर्वांतर्फे मी कमांडरपद स्वीकारत आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून हा सन्मान दिल्याबद्दल आभार मी नक्की तो सार्थ ठरवेन (बेल वाजवून सगळ्यांनी स्वागत केले ) आता मी कमांडर झालो म्हणून इथे सेलिब्रेशन करणार आहे आज जेमिनी 7 चा साठावा वर्धापन दिन आहे अमेरिकन अंतराळविश्वातील हि मोठी घटना होती आणि पहिल्यांदाच अंतराळवीर चौदा दिवसाच्या अंतराळ मोहिमेवर जाणार होते आणि Sargey ह्यांना स्थानकात 600 दिवस वास्तव्य केल्याबद्दल नासा संस्था त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांतर्फे हा patch देऊन सन्मानित करत आहे अभिनंदन! तुझ कर्तुत्व आम्ही पाहात आलोय तुझ्यासारखे खूप कमीजण असतात तु उद्दिष्ठ साध्य केलस त्यासाठी मी अनऑफिशिअली हा Crown(टोपी ) भेट देत आहे !" Sergey -मी तुम्हालाच हा Crown कमांडर झाल्याबद्दल भेट देतोय Thank You ! हा क्षण खूप इमोशनल आहे !"

Chris -" Sergey,Alexey,Jonny तुमच्या सोबतचा अल्प काळ खूप छान होता आपल द्येय साध्य करण्याच तुमच कसब प्रेरणीय आहे तुमचा परतीचा प्रवास सुरक्षित होवो!" अशीच प्रतिक्रिया नवीन अंतराळवीरांनी व्यक्त केल्या तुम्ही Excellent आहात! तुम्ही आमच छान  स्वागत केलत थोड्या दिवसात खूप शिकायला मिळाल आम्हाला तुमच्या सोबत जास्त दिवस व्यतीत करायचे होते पण तुम्ही आता परतत आहात तुम्ही सुरक्षित पृथ्वीवर पोचल्यावरच हि मोहीम पूर्ण होईल आणि आम्ही निश्चिन्त होऊ !"

Kimiya- Sergey तुमच्या ग्रेट लिडरशीप बद्दल आभार Alexy,Jonny तुमच्या सोबतचा काळ मजेत गेला तुम्ही आता परतणार म्हणून थोडे वाईट वाटतय पण तुम्ही सुरक्षित पोहचा तुमच काम वैशिष्ट्यपूर्ण होत तुम्ही जपलेल कल्चर प्रेरणीय आहे आम्ही पण ते जपण्याचा प्रयत्न करु 

Zena - Sergey, Alexey,Jonny तुमच्या सोबतचा काळ खूप छान गेला ह्या क्षणी मी भावनिक झाले आहे आम्ही तुम्हाला मिस करू Jonny माझा classmate आपण एकत्र Interview दिले इथे एकत्र व्यतीत केलेले दिवस सदैव स्मरणात राहतील त्या बद्दल आभार गुडबाय म्हणण काठिण आहे !"

Alexey -तुमच्या मोहिमेत सहभागी झाल्याचा अभिमान वाटतो हे आठ महिने आनंदात गेले पुन्हा पृथ्वीवर भेटू आपण इथे एकत्र संशोधन केल आपण एकमेकांशी अनेक गोष्टी शेअर केल्या एकमेकांना आधार दिला प्रोत्साहित केल आपल्या ग्रेसफुल मैत्रीचा बॉण्ड एकमेकांप्रती आदर आणि प्रेम कायम लक्षात राहील इथे येऊन संशोधन करण जितक महत्वाच आहे तितकच सर्वांनी एकत्रित आनंदात माणुसकी जपत वास्तव्य करण हे देखील महत्वाच आहे आणि हीच चांगल्या अंतराळवीरांची ओळख आहे आणि हेच अंतराळमोहिमेच्या यशाच रहस्य आहे त्यानंतर सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला  

   A man in a pressure suit and wool cap uses a piece of chalk to sign his name and the date on the outside of a space capsule

पृथ्वीवर सुखरूप परतल्यावर अंतराळवीर Sergey Ryzhikov ह्यांनी अंतराळयानावर परतल्याचा दिवस व तारखेची नोंद केली -फोटो -नासा संस्था 

सोयूझ अंतराळयान ह्या सर्वांसह 8.41 मिनिटांनी स्थानकातून पृथ्वीवर येण्याआठी निघाले आणि स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सकाळी दहा वाजून तीन मिनिटांनी (12.03 a.m. EST)  कझाकस्थानातील Dzhezkazgan येथे पोहोचले सोयुझ अंतराळयान पृथ्वीवर पोहोचताच हे अंतराळवीर पॅराशूटच्या सहाय्याने सुरक्षितपणे खाली आले तेव्हा नासाची रिकव्हरी टिम तेथे पोहोचली त्यांनी ह्या अंतराळवीरांना सोयूझ अंतराळयानातून ऊचलुन आणले आणि खुर्चीवर बसवले कझाकस्थानात तेव्हा अत्यंत थंडी होती आणी बर्फाचा पाऊस पडत होता ह्या अंंतराळवीरांना सुरक्षित स्थळी खुर्चीवर बसवून त्यांचे प्राथमिक चेकअप करण्यात आले त्यांची मोहीम यशस्वी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले शिवाय त्यांच्या चेहऱ्याचे पेंटिंग केलेल्या ट्रॅडिशनल रशियन डॉल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले अंतराळवीर Sergey आणी Jonny दोघेही फ्रेश दिसत होते हे दोघेही काही वेळ तेथे थांबले आणी त्यांनी पत्रकारांच्या काही प्रश्नांची ऊत्तरे दिली अंतराळवीर Sergey ह्यांनी Launching ते Landing पर्यंत हि मोहीम यशस्वी केल्याबद्दल टीममधील सर्वांचे आभार मानले आणि अंतराळवीर Jonny ह्यांनी देखील सर्वांचे आभार मानत आर्मी मधले करिअर ते अंतराळवीर आणि स्थानकातील वास्तव्याचा काळ खूप सुंदर होता असेही ते म्हणाले पण अंतराळवीर Alexey ह्यांना मात्र डायरेक्ट टेंट मध्ये नेण्यात आले  

 NASA astronaut Johnny Kim shows off the Matroyshka (stacking) doll he received upon his return to Earth Dec. 9, 2025. Kim and his crewmates landed safely aboard their Soyuz MS-27 spacecraft on the steppe of Kazakhstan, southeast of the town of Dzhezkazgan.

  

अंतराळवीर Jonny ह्यांना त्यांचा चेहरा पेंट केलेली रशियन ट्रडीशनल डॉल भेट देऊन स्वागत करताना - फोटो -नासा संस्था

त्यानंतर ह्या अंतराळवीरांना हेलिकॉप्टरने Karaganda येथील Recovery Camp   मध्ये नेण्यात आले तेथे त्यांचे पुढील चेकअप झाल्यानंतर अंतराळवीर Jonny ह्यांना नासाच्या विमानाने Huston येथे पोहोचवण्यात आले आणि रशियन अंतराळवीर Alexey आणि Sergey ह्यांना रशियातील Star City  येथे पोहोचविण्यात आले 

अंतराळवीर Sergey Ryzhikov  तिसऱ्यांदा स्थानकात राहायला गेले होते त्यांनी त्यांच्या अंतराळ कारकिर्दीत स्थानकात 603 दिवस वास्तव्य केले आणि तेथे सुरु असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभाग नोंदवला अंतराळवीर Jonny आणि Alexey मात्र पहिल्यांदाच स्थानकात राहायला गेले होते त्यांनी स्थानकात 245 दिवस वास्तव्य केले अंतराळवीर Jonny ह्यांनी स्थानकातील झिरो ग्रॅव्हिटित मानवी शरीरातील रक्तातील पेशींवर काय परिणाम होतो ह्या विषयी संशोधन केले पृथ्वीवरील Advance Space Based Tissue Production treatment साठी हे संशोधन उपयुक्त ठरेल 

Saturday, 13 December 2025

स्वर्णगिरी व्यंकटेश स्वामी मंदिरात तेलगु अभिनेता संदीप माधव ह्यांच्या राम बजरंग सिनेमाच शुटिंग

         स्वर्णगिरी मंदिरातील पाण्यातील विष्णूची सुंदर मूर्ती 

 स्वर्णगिरी मंदिर -12 डिसेंबर 

हैद्राबाद पासून जवळ स्वर्णगिरी पर्वतावरील निसर्गरम्य परिसरात नव्यानेच निर्माण झालेले व्यंकटेश स्वामी मंदिर म्हणजे दाक्षिणात्य द्रविडीयन शैलीतील उत्कृष्ठ वास्तुकलेचा अप्रतिम नमुना ह्या मंदिराचे वैशिष्ठ म्हणजे मंदिराच्या मागच्या भागात खाली छोट्या तळ्यातील पाण्यात विष्णूची काळ्या दगडात कोरलेली अप्रतिम सुंदर मूर्ती आणि वर डोंगरावर विष्णूची बारा फूट उंच मूर्ती असलेले आणि लक्ष्मीची आकर्षक मूर्ती असलेले प्रमुख मंदिर आणि इतरत्र छोटी देवांची मंदिरे बाहेर हनुमानाची भव्य मूर्ती आहे इथे येणाऱ्या भाविक पर्यटकांना इथल्या भक्तीमय वातावरणा बरोबरच तळ्यातील विष्णूची अप्रतिम मूर्ती आकर्षित करते इथे देखील तिरुपती ,तिरुमला देवस्थाना प्रमाणेच दररोज वेगवेगळ्या पूजा अर्चना अभषेक वै केल्या जातात 2018/2024 दरम्यान ह्या मंदिराची निर्मिती तज्ज्ञ वास्तुशास्त्रज्ञ आणि प्रथितयश उद्योगपती ह्याच्या सहकार्याने झाली आहे मंदिर नवीन असल्यामुळे आता हळूहळू त्याचा लौकिक वाढत आहे ह्या मंदिराची कीर्ती सर्वत्र पसरत असतानाच इथल्या निसर्गरम्य पवित्र वातावरणात सिनेमाचे शुटिंग करण्याची इच्छा सिनेदिग्दर्शकांना देखील झाली नऊ डिसेंबरला प्रसिद्ध तेलगू अभिनेता संदीप माधव ह्यांच्या राम बजरंग ह्या सिनेमातील गाण्याचे शूटिंग इथे झाले 

स्वर्णगिरी मंदिरात नेहमीप्रमाणेच भाविकांची गर्दी तिकीटाची रांग,दर्शनाची रांग,लक्ष्मी विष्णू आणि हनुमानाच्या भव्य मूर्तीच्या दर्शनाने तृप्त झालेल्या पर्यटकांची पावले आपसूकच मंदिराच्या मागे तळ्यातील झोपलेल्या विष्णूचे अप्रतिम सौन्दर्य पाहण्यासाठी तेथील सौदर्य कॅमेराबद्ध करण्यासाठी वळलेली सगळ्यांचीच फोटो काढण्यासाठीची धडपड तेथील निखळ निळ्या पाण्यातील फवारे आणी त्यातील मुर्ती सौन्दर्य आणि स्वत:ची छबी कॅमेराबद्ध करून सोशल मीडियावर अपलोड करण्यात मग्न दर्शनानंतर तिरुपती सारखेच चिंचेचा भात (पुलिआरु)आणि लाडूचा प्रसाद घेण्यासाठी गर्दी अर्थात रांग आणि बायकांची नारळ फोडण्यासाठीची लगबग इथे बायका सहजतेने नारळ फोडत होत्या 

अशातच मंदिरात सिने दिग्दर्शकाची सिनेमाचे गाणे शूट करण्यासाठीची तयारी सुरू होती सिने कॅमेऱ्यासाठी ट्रॉली त्या साठी रूळ ठेवलेले दिसले तेव्हा पहिल्यांदा तिरुपती प्रमाणे वेगवेगळ्या सेवाचे लाईव्ह चित्रण होत असेल असे वाटले पण हळूहळू तेथे स्पॉटबॉय,सहाय्यक कर्मचारी,हिरोला ऊन लागु नये म्हणून छत्री धरलेला स्पॉट बॉय दिसला  सहज चौकशी केली तेव्हा तिथल्या तेलगू भाषिक सहाय्यकाने तिथे बजरंग बाजी सिनेमातील गाण्याचे शूटिंग होणार असल्याचे ह्या सिनेमातील हिरो प्रथितयश पण हिरोईन नवोदित असल्याचे सांगितले लंच ब्रेक असल्याने त्यांचे जेवण सुरु असल्याने त्यांना यायला वेळ होता अर्थातच भाषा प्रॉब्लेम आला पण  हिंदी आणि इंग्रजीत संवाद साधला 

                                       

काही वेळातच इथे शुटिंग सुरु असल्याची बातमी सर्वत्र पसरली तेलगू भाषिक भाविक आणि इतर उपस्थित पर्यटकांची तेथे गर्दी जमली समोर प्रोड्युसर मॅडम आणि दिग्दर्शक बसले होते संदीप माधवन येताच सर्वांनी टाळ्या वाजवत जल्लोष केला कोरिओग्राफरने हिरो संदीप ह्यांना आणि डान्स ग्रुप मधील सर्व कलाकारांना नृत्याच्या स्टेप दाखवल्या,रिहर्सल झाली त्या नंतर Action,Cut Retake चा सिलसिला सुरु झाला दहाबारा रिटेक नंतर दिग्दर्शकाच्या मनाप्रमाणे स्टेप झाल्यानंतर डान्स मधील काही ओळींचे शूटिंग OK झाले विशेष म्हणजे सिनेमाचे हिरो संदीप ह्यांनी ह्या सर्व स्टेप्स समजून घेत न थकता तेव्हढ्याच जोशात शूटिंग पूर्ण केले .

                                 

त्यांच्याशी बोलण्याची त्यांच्या विषयी जाणून घेण्याची इच्छा असल्याने आधीच त्यांच्या सहाय्यकातर्फे परवानगी घेतली होती मधल्या काही वेळात फ्रेश झाल्यानंतर संदीप ह्यांनी त्यांच्या विषयी,ह्या सिनेमाविषयी माहिती दिली वेळ खूप कमी होता तरीही त्यांनी संवाद साधला ते म्हणाले ह्या आधी त्यांनी तीनचार सिनेमात हिरोचे काम केले आहे आता राम बजरंग सिनेमाचे शूटिंग सुरु आहे त्यातील गाण्यातील हा शेवटचा काही भाग इथे चित्रित होत आहे त्यांना ह्या सिनेमाविषयीच्या भावना काय असे विचारले तेव्हा त्यांनी खूप छान! असे सांगत जास्ती माहिती तुम्हाला सिने दुग्दर्शक सांगतील असे म्हटले ते कुठे आहेत असे विचारल्यावर त्यांना बोलवून त्यांची ओळख करून दिली तुमची हिरोईन कुठे आहे असे विचारल्यावर ह्या गाण्यात तिचे काम नाही असे सांगितले दिग्दर्शकांनी तुम्ही महाराष्ट्रीयन आहात का?असे विचारत हा सिनेमा मराठीत पण येणार असून  राम बजरंग  हा सिनेमा उन्हाळ्यात रिलीज होईल असे सांगितले ह्यात श्रद्धा आणि व्यक्तिगत स्टोरी देखील आहे असे सांगितले ! 

                               

                        तेलगू अभिनेता संदीप माधव व सिने दिग्दर्शक सिनेमा विषयी संवाद साधताना 

तेलगू अभिनेते संदीप माधव हैदराबादचे रहिवासी आहेत शाळा कॉलेज मध्ये असल्यापासूनच त्यांना अभिनय आणि खेळाची आवड आहे सुरवातीच्या काळात त्यांनी लोफर ,ज्योती लक्षमी ह्या सारख्या सिनेमात काम केले त्यांनी नाटकातही हिरोच्या भूमिका केल्या 2012 मध्ये त्यांनी रेल्वे स्टेशन ह्या सिनेमात काम केले  2013 मध्ये दलम आणि जॉर्ज रेड्डी ह्या सिनेमाचे दिग्दर्शक जीवन रेड्डी ह्याच्या सोबत त्यांनी अभीनयासोबतच सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले हा सिनेमा उस्मानिया युनिव्हर्सिटी मधील विध्यार्थी युवा नेत्याच्या जीवनावर आधारित होता  राम गोपाल वर्मा दिग्दर्शित Vangaveeti ह्या सिनेमातील त्यांची हिरोची भूमिका लोकप्रिय झाली 

संदीप माधव ह्यांची निगर्वी आणि सहजतेने त्यांच्या चाहत्यांसोबत संवाद साधण्याची वृत्ती त्यांना भविष्यात लोकप्रियता आणि यशाच्या मार्गावर नेईल ह्याची खात्री पटते राम बजरंगचे दिग्दर्शक सुधीर रेड्डी देखील निगर्वी आहेत 

Monday, 1 December 2025

अंतराळवीरांनी स्थानकातून पृथ्वीवासीयांना Thanks Giving Day निमित्त शुभेच्छा दिल्या

 

नासाचे अंतराळवीर Zena Cardman ,Jonny Kim ,Mike Fincke आणि जपानचे अंतराळवीर Kimiya Yui लाईव्ह संवादा दरम्यान स्थानकातून Thanks Giving Day च्या शुभेच्छा देताना -फोटो -नासा संस्था 

 

नासा संस्था -1 डिसेंबर 

अमेरिकेत दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील चवथ्या गुरुवारी Thanks giving Day उत्साहात साजरा केल्या जातो अमेरिकन नागरिक त्यांचे कुटुंबीय,नातेवाईक आणि मित्रांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करतात सर्वजण एकत्र येऊन पार्टीचे आयोजन करतात आणि वेगवेगळ्या खास पारंपारिक पदार्थांचा समावेश असलेल्या मेजवानीचा आस्वाद घेतात पृथ्वीपासून दूर अंतराळ स्थानकात तरंगत्या अवस्थेत राहणाऱ्या अंतराळवीरांना मात्र कुटुंबियांसोबत हा डे साजरा करता येत नाही पण अंतराळवीर स्थानकातील मित्रांसोबत स्थानकात हा दिवस साजरा करतात पार्टी करून पृथ्वीवरून त्यांच्यासाठी आलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतात नासा संस्थेशी लाईव्ह संपर्क साधून पृथ्वीवरील कुटुंबियांशी संवाद साधतात आणि Thanks giving Day च्या शुभेच्छा देतात  

ह्या वर्षी देखील सध्या स्थानकात वास्तव्यास असलेले नासाचे अंतराळमोहीम 73 चे अंतराळवीर Zena Cardman, Mike Fincke,Jonny Kim आणि जपानचे अंतराळवीर Kimiya Yui ह्या चौघांनी Thanks Giving Day च्या आधी नासा संस्थेशी लाईव्ह संपर्क साधत पृथ्वीवासीयांना Thanks Giving Day निमित्त शुभेच्छा दिल्या 

Zena -"Hello,स्थानकात तुम्हा सर्वांचे स्वागत,आम्ही आता येणाऱ्या काळातील सणांच्या सुट्ट्यांचा विचार करतोय आणि तुम्हाला शुभेच्छाही देतोय! Jonny Thanks Giving Day बद्दल तुझ मत काय आहे तुझ्यासाठी किती महत्वपूर्ण आहे हा दिवस?

Jonny -"माझ्यासाठी Thanks Giving Day म्हणजे आपल्या आयुष्यातील काही काळ थांबून आपल्याला प्रेरित करणाऱ्या आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीचे आभार मानण्याचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस Thanks Giving म्हणजे Pause,Slowdown & Reflect! प्रामुख्याने ह्या वर्षाबद्दल बोलायच झाल तर मला इथे स्थानकात तुमच्यासोबत वास्तव्य करायला संशोधन करायला मिळाल माझ्यासाठी हे अभिमानास्पद आहे तुमच्या सहकार्याबद्दल मैत्रीबद्दल मी स्वत:ला नशीबवान समजतो पण त्याचवेळी मी जेव्हा माझ्या कुटुंबियांबद्दल मित्राबद्दल विचार करतो तेव्हा इथे मला त्यांची उणीव भासते मला इथे येण्यासाठी प्रेरित केल्याबद्दल,मला वेळोवेळी साथ दिल्याबद्दल मी त्या सर्वांचे एका शब्दात आभार मानतो त्यासाठी एक संबंध पुरेसा आहे Its Just gratitude !" Kimiya तुझ काय मत आहे ? 

Kimiya -"आमच्या जपानमध्ये Thanks Giving Day नसतो पण इथे स्थानकात वेगवेगळ्या देशातील अंतराळवीर एकत्र वास्तव्य करतात संशोधन करतात तेव्हा आपण सगळ्यांच्या संस्कृतीचा आदर करतो खरच Thanks Giving Day ची पद्धत खूप चांगली आहे आपल्याला मदत करणाऱ्याबद्दल जाणीव ठेवून कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते मी पण तुमच्यासोबत हा दिवस साजरा करणार आहे तुमच्या सोबत डिनरमध्ये सहभागी होऊन तुमच्या स्पेशल पदार्थांचा आस्वाद घेणार आहे तुमचा काही स्पेशल प्लॅन आहे का ?

Mike - "Thanks giving day च्या जेवणातील पदार्थांचा आस्वाद घेण मला खूप आवडत ह्या वर्षी स्थानकातील हा माझा दुसरा Thanks giving day आहे त्या मुळे त्याला विशेष महत्व आहे मागच्या वेळेस Shuttle Crew सोबत हा दिवस साजरा केला आणि ह्या वेळेस तुमच्या सोबत साजरा करणार आहे आता सोयूझ मधून नवीन अंतराळवीर येतीलआणि त्यांच्या सोबत आपल्यासाठी Thanks giving चे खास पदार्थ पण येतील म्हणून मी उत्सुक आहे Thanks giving चे पारंपारिक Turkey चे विविध पदार्थ Cranbery Sauce इथे आहेच मी त्यावर toss करेन रशियन Cranbery sauce वैशिष्टपूर्ण असत ते मी इथे मिस करत होतो आता मी त्याचा आस्वाद घेऊ शकेन अर्थातच मला इथे माझ्या कुटुंबीयांची उणीव जाणवतेय पण इथे मी तुमच्या सोबत space family सोबत हा दिवस साजरा करेन  हे खूप सुंदर क्षण आहेत आणि आता त्यात नवे अंतराळवीर सामील होणार आहेत त्यामुळे माझ्या आनंदात भर पडेल Zena आपल्याकडे असलेले Food Packet दाखवणार आहेस ना !"

 Zena -"हो का नाही दाखवणार ? आपल्यासाठी हे फक्त  अन्न पदार्थ नाहीत तर आपल्या सर्वांच्याच रोजच्या आयुष्यातील आवश्यक भाग आहे आणि नासा संस्थेने आपल्या आरोग्याची काळजी घेत आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी खूप छान पदार्थ येणाऱ्या सणांसाठी पाठवले आहेत त्यात Turkey आणि Mike ने सांगितल्या प्रमाणे काही पारंपारिक नॉनव्हेज पदार्थासोबतच Mashed Potatoes आणि अनेक डेलिशिअस पदार्थांचा समावेश आहे आपण आता येणाऱ्या नवीन अंतराळवीरांसोबत त्याचा आस्वाद घेणार आहोत मी देखील त्यांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे कारण आता आपली मोहीम संपत आलेली असताना सगळ्यांसोबत हा दिवस साजरा करायला मिळतोय Jonny तुला काय वाटतय !"

Jonny -"खरच खूप सुंदर क्षण सगळ्यांचे आभार मानण्याचा एकत्र साजरा करण्याचा हि खूप अमूल्य संधी आहे!"

Mike ,Zena  ,Kimiya ,Jonny -आम्हा सर्वांतर्फे Happy Thanks Giving Day! तुमच्या कुटुंबियांसोबत ,मित्रपरिवारांसोबत खूप enjoy करा आणि पार्टीमध्ये पारंपारिक पदार्थांचा आस्वाद घ्या! आणि हा दिवस आनंदात घालवा !