
नासाच्या Axiom -4 मोहिमेतील अंतराळवीर स्थानकात पोहोचल्या नंतर स्थानकातील अंतराळवीरांशी संवाद साधताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -26 जुन
नासाच्या Axiom-4 मोहिमेतील अंतराळवीर अखेर एक महिन्यानंतर स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाले आणी काही वेळातच यानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यरत झाली यान रॉकेट पासुन वेगळे झाले आणी अत्यंत वेगाने यानाचा अंतराळ प्रवास सुरु झाला काही वेळातच यानाने अंतराळातील झीरो ग्रॅव्हीटीत प्रवेश केला 28 तासांच्या अंतराळ प्रवासानंतर गुरुवारी अंतराळयान 6.31a.m.(EDT) वाजता स्थानकाच्या Harmony Module जवळ पोहोचले त्यानंतर स्वयंचलित यंत्रणेने स्थानक आणि अंतराळ यान ह्यांच्यातील Hatching आणि Docking प्रक्रिया पार पडली 8.14 a.m.(EDT)हे अंतराळवीर स्थानकात पोहोचले तेव्हा स्थानकातील अंतराळ मोहीम 73 च्या अंतराळवीरांनी त्यांचे स्थानकात स्वागत केले
अंतराळयान ग्रेस झिरो ग्रॅव्हीटीत पोहोचताच नासा संस्थेने लाईव्ह संपर्क साधुन ह्या अंतराळवीरांशी संवाद साधला संस्था प्रमुख- "Peggy , welcome to Space ! तुमचा अंतराळ प्रवास कसा सुरू आहे ?"
अंतराळ यान झीरो ग्रॅव्हीटीत पोहोचल्यावर नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधताना अंतराळवीर Peggy,अंतराळवीर Slawosz,अंतराळवीर शुभांशु आणि अंतराळवीर Tibor -फोटो -Axiom संस्था
Peggy- "Thanks! Grace कडून आणी आमच्या चौघांतर्फे तुमचे आणी पृथ्वी वासियांचे स्वागत ह्या नवीन अंतराळयानाचे नाव आम्ही Grace ठेवले आहे अंतराळयानाला नवेपणाचा वास येत आहे अंतराळ प्रवास छान सुरु अंतराळ प्रवासाचा अनुभव नेहमीच आनंददायी आणी मजेशीर असतो ह्या वेळेस Axiom मोहिमेतील दुसऱ्या अंतराळ प्रवासात ह्या नव्या तिन अंतराळवीरांसोबत अनुभव शेअर करतानाचा अनुभव नवा आहे !"
Slawosz- "अदभूत ! प्रवास खूप छान सुरू आहे आम्ही फक्त चौघेच नाही तर आमच्या सोबत हा Zero g indicater Joy पण आहे तोही आता झीरो ग्रॅव्हिटित तरंगतोय आम्ही स्वतःला सावरत त्याला पकडतानाची मजा अनुभवतोय झिरो ग्रॅव्हीटीत शिरल्यावर आणि बेल्ट काढल्यावर थोड अनइझी वाटल पण क्षणातच सावरलो पहिल्यांदा प्रवास करतानाचा आणी खाली पृथ्वीच अदभूत सौंदर्य पहाण्याचा हा थरारक क्षण अनुभवतोय आता आम्ही युरोप ईटली,सिसली,ग्रीस आयलॅन्डच्या वरून प्रवास करत आहोत अंतराळवीर Peggy ह्यांनी यानाच्या खिडकीतून खाली दिसणाऱ्या पृथ्वीच अद्भुत सौंदर्य सर्वांना दाखवल! आम्ही पृथ्वीच्या वरून अंतराळातून आमच्या देशाकडे,पृथ्वीच अदभुत सौंदर्य प्रत्यक्षात पहातोय खरोखरच हा क्षण अमुल्य आहे अविस्मरणीय आहे!"
शुभांशु -नमस्कार ! अंतराळातून तुमच्याशी संवाद साधतोय आताच Peggy ह्यांनी सांगितल्या प्रमाणे एक अनुभवी आणि आम्ही तिघे नवे अंतराळवीर सोबत अंतराळप्रवास करतोय हा क्षण जितका रोमांचक आहे तितकाच थरारक आहे उड्डाणाआधी माझ्या मनात एकच विचार होता एक महिन्याच्या Quarentine नंतर अखेर आम्ही उद्या अंतराळ प्रवास करणार आहोत जाण्याचा उत्साह होता अधीरता होती अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीत प्रवेश केला तेव्हा अचानक कुणीतरी मागून सीटवरून जोरात बाहेर ढकलल्याचा अनुभव आला पण सीटबेल्ट काढला तेव्हा मी तरंगू लागलो तो क्षण अद्भुत होता तो पृथ्वीवर अनुभवता येत नाही थोड्याच वेळात सार शांत झाल त्या साठी नासा संस्था ,Axiom संस्था आणि टीममधील सर्वांचे आभार त्यांच्या मुळेच आम्हाला हि अमूल्य संधी मिळाली आणि माझ्या कुटूंबियांचे आणि मित्रांचेही आभार त्यांनी आम्हाला सपोर्ट केल आमचा हा Zero g इंडिकेटर हंस ज्ञानाचे प्रतीक आहे सरस्वतीचे वाहन आहे हंगेरी आणि पोलंड मध्ये पण हे शुभ चिन्ह आहे Zero g वर लक्ष केंद्रित करण अत्यंत आवश्यक आहे ग्रेस अंतराळयान पण छान आहे झिरो ग्रॅविटीत प्रवेश केला तेव्हा अनइझी वाटल पण सगळ्यांनी सांगितल तु कालपासून खूप झोप घेत आहेस हे चागंले संकेत आहेत मला वाटत आता ह्याची सवय करून घ्यायला हवी ह्या अनुभवातून लहान मुलासारख शिकतोय लहानपणी पहिल पाऊल टाकताना आपण तोल सावरतो तसच शिक्षणाचा पहिला अनुभव नवीन वातावरणात स्थिर होण खूप आव्हानात्मक आहे मी माझ्या ह्या मित्रांसोबत हे वास्तव अनुभवतोय खरतर दुसऱ्यांना अस पाहण छान वाटत पण प्रत्यक्षात कठीण आहे हा प्रवास माझा एकट्याचा नाही माझ्यासोबत सारे भारतीय आहेत माझ्या खांद्यावर भारताचा तिरंगा आहे भारताने उचललेले अंतराळ विश्वातील हे पहिले ऐतिहासिक पाऊल आहे हा प्रवास स्मरणीय आणि रोमांचक करू या मी सोशल मीडियावरून लाईव्ह संपर्काद्वारे तुम्हाला ह्या मोहिमेची माहिती देत राहीन धन्यवाद !"
Tibor -"शुभांशु ने सांगितल्याप्रमाणे आमची राईड खूप अद्भुत आहे महिनाभराचा Quarentine चा काळ कंटाळवाणा होता पण ह्या तिघांसोबत मजेत गेला उड्डाणा आधी ग्रेस अंतराळयानात बसलो तेव्हाचा क्षण थरारक होता आम्ही वर्षभरापासून ट्रेनिंग घेत होतो Pilot Fighter,Jet Training पेक्षा रॉकेट लाँचिंगचा अनुभव वेगळा होता ग्रेस यान खूप जोरात उड्डाण करत तिथे गोंधळ होता इथे अंतराळात खूप शांतता आहे Peggy आमच्या तिघांची खूप काळजी घेतात आमचा हा पहिला अंतराळ प्रवास आहे त्या अनुभवी आहेत पृथ्वीसौन्दर्य अद्भुत आहे झिरो ग्रॅव्हीटीतला अनुभव मजेशीर आहे तितकाच कठीण पण हा अनुभव घेण्याची स्थानकात जाण्याची संधी दिल्याबद्दल नासा आणि Axiom संस्थेचे आणि आमच्या देशाचे देशवासियांचे आभार आमच Zero g हंस मी Slawoz ह्याच्या मुलाला समर्पित करतोय त्याला प्राण्यांची आवड आहे त्याच्याकडे पाहील्यावर मला त्याच्या उज्वल भविष्याची जाणीव होते आमचे हे अंतराळयान ग्रेस नवीन आहे त्याच Opening आम्ही Peggy ह्यांच्या हस्ते हा Axiom patch यानाच्या मध्यभागी लाऊन करत आहोत patch प्रमाणेच आपली पृथ्वी देखील ह्या सौरमंडळाच्या मध्यभागी आहे
स्थानकात प्रवेश करताच स्थानकातील अंतराळवीरांनी ह्या चौघांचे स्वागत केले त्यांना ज्युस प्यायला दिला त्यांची विचारपूस केली त्या नंतर काही वेळातच ह्या अंतराळवीरांचा नासाच्या लाईव्ह संपर्कात खेळीमेळीच्या वातावरणात Welcome Ceremony पार पडला
अंतराळ मोहीम 73 च्या कमांडरनी त्यांच्याशी संवाद साधला," Welcome मित्रांनो आम्ही तुमची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहात होतो तुम्हाला स्थानकात सुखरूप आनंदी चेहऱ्याने प्रवेश करताना पाहून आम्हालाही आनंद होतोय तुमच्या येण्याने आता स्थानकात सहा देशांचे अकरा अंतराळवीर मिळून आपण एकत्र संशोधन करणार आहोत Peggy तुम्ही पाचव्यांदा स्थानकात प्रवेश करत आहात तुमच्या अनुभवाचा आम्हाला फायदा होईल!"त्या वेळी सर्वांनी ह्या अंतराळवीरांनी केलेल्या स्वागता बद्दल आभार मानले शुभांशू म्हणाले," तुमच्या ह्या घराचा दरवाजा आमच्यासाठी तुम्ही उघडला त्या बद्दल आभार आता मला अंतराळविश्वातील अंतराळ प्रवासाच्या ह्या पहिल्या पडावावर पोहोचल्याच समाधान वाटतय ह्या वातावरणात थोड अनइझी वाटतय डोक जड झालय पण तुमच्या साथीन हळूहळू सावरेन आणि उत्कृष्ठ संशोधन करेन!"अंतराळवीर Tibor आणि Slawosz ह्यांनी देखील सर्वांचे आभार मानत असेच मनोगत व्यक्त केले त्या नंतर अंतराळवीर Peggy ह्यांनी ह्या तीन अंतराळवीरांना Axiom mission patch no लाऊन ते अंतराळवीर झाल्याचे जाहीर केले
No comments:
Post a Comment