नासाच्या Axiom -4 मोहिमेतील अंतराळवीरासह Space X Crew Dragon अंतराळात झेपावले -फोटो नासा संस्था
नासा संस्था - 25 जुन
नासाच्या Axiom -4 अंतराळ मोहिमेतील चार अंतराळवीर अखेर स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाले ह्या आधी सहा वेळा स्थानकातील तांत्रिक समस्या आणि हवामान उड्डाणास अनुकूल नसल्यामुळे त्यांचे स्थानकात जाणे लांबले होते नासाच्या Axiom -4 मोहिमे अंतर्गत नासाच्या अंतराळवीर आणि Axiom Space कंपनीच्या Human Space Flight Director Peggy Whitson,भारतीय अंतराळ संस्था इसरोचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला,युरोपियन अंतराळवीर Slawosz Uznanski Wisniewski (Poland ) आणि हंगेरीचे अंतराळवीर Tibor Kapu हे चार अंतराळवीर स्थानकातील चौदा दिवसांच्या वास्तव्यासाठी स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाले ह्या मोहिमेत अंतराळवीर Peggy Whitson ह्यांनी कमांडरपद शुभांशु शुक्ला ह्यांनी पायलट पद आणि पोलंडचे अंतराळवीर Stawosz आणि हंगेरीयन अंतराळवीर Tibor Kapu ह्या दोघांनी मिशन स्पेशॅलिस्ट पद सांभाळले

नासाच्या Axiom 4 अंतराळ मोहिमेतील हंगेरियन अंतराळवीर Tibor Kapu ,भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला,नासाच्या अंतराळवीर Peggy Whitson आणि पोलंडचे अंतराळवीर Slawosz अंतराळ स्थानकाच्या दिशेने उड्डाण करताना -फोटो -नासा संस्था
नासाच्या फ्लोरिडा येथील Kennedy Space Center येथील 39A ह्या उड्डाण स्थळावरून सकाळी 2.31 वाजता Space X Crew Dragon ह्या सर्वांसह Falcon -9 रॉकेट च्या साहाय्याने अंतराळात झेपावले आणि गुरुवारी 26 जूनला 7a.m.ला स्थानकाच्या Harmony Module जवळ पोहोचेल स्थानकाजवळ पोहोचल्यानंतर Dragon मधील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित होऊन स्थानक व Dragon ह्यांच्यातील Hatching, Docking प्रक्रिया पार पडेल त्यानंतर हे अंतराळवीर स्थानकात प्रवेश करतील स्थानकात सध्या रहात असलेले मोहीम 73 चे अंतराळवीर ह्या अंतराळवीरांचे स्थानकात स्वागत करतील आणि Welcome Ceremony पार पडेल
हे मल्टिनॅशनल अंतराळवीर त्यांच्या 14 दिवसांच्या वास्तव्या दरम्यान स्थानकातील झिरो ग्रॅव्हिटीतील लॅब मध्ये सुरु असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभागी होणार आहेत आणि 60 वेगवेगळे अत्याधुनिक संशोधनात्मक सायंटिफिक प्रयोग करणार आहेत
Axiom -4च्या यशस्वी उड्डाणानंतर नासाचे Administrator Jenet Petro ह्यांनी आनंद व्यक्त केला," ते म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Tramp ह्यांच्या सहकार्याने पोलंड आणि भारताचे अंतराळवीर चाळीस वर्षांनी पहिल्यांदा स्थानकात जात आहेत त्यांचे अभिनंदन !"
शुभांशु शुक्ला हे अंतराळप्रवास करणारे दुसरे भारतीय अंतराळवीर आहेत ह्या आधी रॉकेश शर्मा अंतराळात गेले होते चाळीस वर्षांनी पुन्हा भारतीय अंतराळवीर स्थानकात राहायला जाणार असल्याने भारतात उड्डाणाआधी अत्यंत आनंदाचे वातावरण होते नासा संस्थेतर्फे ह्या उड्डाणाचे लाईव्ह प्रसारण करण्यात आल्याने नागरिकांना हा उड्डाण सोहळा लाईव्ह पाहायला मिळाला शुभांशु शुक्ला ह्यांच्या कुटुंबियांसाठी आणि लखनौ वासियांसाठी हा लाईव्ह उड्डाण सोहळा लखनौ मधील शुभांशु ह्यांच्या शाळेत दाखविण्याची खास सोय करण्यात आली होती उड्डाणाआधी सकाळी अंतराळवीर शुभांशु ह्यांनी video call वरून त्यांच्या आई वडिलांशी संवाद साधला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले यशस्वी उड्डाण पाहिल्या नंतर त्यांचे आईवडील काही क्षण भावुक झाले होते त्यांच्या आईला अश्रू अनावर झाले हा आमच्यासाठी आणि देशासाठी अभिमानाचा क्षण आहे हे आनंदाश्रू आहेत त्याचे स्वप्न पूर्ण झाले मी आता त्याच्या स्थानकातील प्रवेशासाठी आणि सुरक्षित पृथ्वीवर परत येण्याची वाट पाहीन तो उत्कृष्ट संशोधन करेल असे त्या म्हणाल्या
उड्डाणा नंतर Dragon अंतराळात पोहोचताच नासा संस्थेने ह्या अंतराळवीरांशी लाईव्ह संवाद साधत नवीन Dragon मधून प्रवास कसा सुरु आहे हे विचारले तेव्हा अंतराळातील नव्या अंतराळयानाचा हा छान वास येत आहे दरवेळी अंतराळ प्रवास करताना नवा अनुभव मिळतो आणि तो आनंददायी असतो ह्या मोहिमेतील विविध देशांच्या तीन अंतराळवीरां सोबतचा प्रवास नवा आहे त्यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव देखील खूप छान होता हे अंतराळवीर बुद्धिमान आहेत अंतराळविश्वातील संशोधन करण्याचा त्यांचा दृष्टिकोन नवा आहे त्यांच्या देशाच्या ह्या व्यावसायिक सहभागामुळे आमच्या मोहिमेला संशोधन करताना मदत मिळेल अंतराळ विश्वात व्यावसायिक दृष्ठीने औद्योगिक प्रगती होईल शिवाय त्यांच्या देशातील भावी पिढीला ह्या अंतराळविश्वात करिअर करताना प्रेरणा मिळेल आणि ह्या अमर्याद अंतराळ विश्वात संशोधन करण्यासाठीची पाऊलवाट मिळेल!" ह्या वेळी तिन्ही देशाच्या अंतराळवीरांनी त्यांना ह्या मोहिमेत सहभागी करून हि अंतराळ प्रवासाची अनमोल साधी दिल्यामुळे लाईव्ह संवाद साधत नासा ,Axiom आणि कुटुंबियांचे आभार मानत हा पृथ्वी दर्शनाचा अंतराळ प्रवासाचा अनुभव अद्भुत असल्याचे सांगितले नासाच्या माजी अंतराळवीर Peggy Whitson ह्या अनेकवेळा स्थानकात वास्तव्यास गेल्या असून त्यांनी एक वर्ष सलग स्थानकात राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला
ह्या आधी 2022एप्रिल मध्ये Axiom-1 मोहिमेतील अंतराळवीरांनी स्थानकात 17 दिवस वास्तव्य केले होते 2023 मध्ये Axiom -2 मोहिमेत चार अंतराळवीरांसह Peggy Whitson ह्यांनी कमांडरपद सांभाळत आठ दिवस स्थानकात वास्तव्य करीत हि मोहीम यशस्वी केली आणि 2024 च्या जानेवारी महिन्यात Axiom -3 मोहिमेतील अंतराळवीरांनी स्थानकात 18 दिवस वास्तव्य केले होते
अंतराळातील ह्या फिरत्या अंतराळ स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीतील प्रयोगशाळेत गेल्या चोवीस वर्षांपासून विविध देशांचे अंतराळवीर सतत जातात,तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतात आणि नवनवीन शोध लावतात पृथ्वीवर करता येत नाहीत अशा पृथ्वी संरक्षण,मानवी आरोग्यासाठी उपयुक्त आणि औद्योगिक विकासासाठीच्या संशोधनात सहभागी होतात स्थानकातील विपरीत वातावरणाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामाची संशोधित माहिती गोळा करतात अंतराळस्थानक म्हणजे अंतराळविश्वातील व्यावसायिक अर्थव्यवस्था विकसित करणारी Sprigboard आहे आणि ती अधिक सशक्त करण्याचे नासाचे द्येय आहे त्यासाठी ह्या व्यावसायिक संस्थेच्या सहकार्याने अंतराळ मोहिमा कमी खर्चात सुरक्षित आणि नियमित करण्याचा नासाचा उद्देश आहे ह्याचा उपयोग भविष्यकालीन मंगळ आणि दूरवरच्या अंतराळ मोहिमेसाठी होईल असे नासा संस्थेतील ISS Program Manager Dana Weigel म्हणतात,"आम्ही ह्या व्यावसायिक मोहिमेच्या यशस्वी सहभागामुळे आनंदित झालो आहोत आणि Axiom च्या नियमित व्यावसायिक सेवा सुरु करण्यासाठी उत्सुक आहोत
No comments:
Post a Comment