
नासाच्या Axiom -4 मोहिमेतील युरोपियन अंतराळवीर Stawosz Uznansk नासाच्या अंतराळवीर Peggy Whitson इसरोचे भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि हंगेरियन अंतराळवीर Tibor Kapu -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -27 मे
अमेरिकेने अंतराळ विश्वातील अंतराळवीरांच्या अंतराळ प्रवासासाठी आणि अंतराळयान बनविण्यासाठी व्यावसायिक कंपन्यांना परवानगी दिल्यानंतर Space X कंपनीने ह्या मोहिमेत सहभागी होत शुभारंभ केला आणि Crew Dragon अंतराळ यानातून अंतराळवीरांना अनेकदा सुरक्षित अंतराळ प्रवास घडवत हि मोहीम यशस्वी केली त्या नंतर Axiom Space कंपनीनेही ह्या व्यावसायिक अंतराळ मोहिमेत पदार्पण केले आणि तीन वेळा ह्या मोहिमेतील अंतराळवीरांना सुरक्षितपणे स्थानकात नेऊन आणले आता नासाच्या Axiom -4 मोहिमेतील चार अंतराळवीर स्थानकात वास्तव्यास जाणार आहेत
Axiom -4 मोहिमे अंतर्गत नासाच्या अंतराळवीर आणि Axiom Space कंपनीच्या
Human Space Flight Director Peggy Whitson,भारतीय अंतराळ संस्था इसरोचे
अंतराळवीर शुभांशु शुक्ला,युरोपियन अंतराळवीर Stawosz Uznanski Wisniewski
(Poland ) आणि हंगेरीचे अंतराळवीर Tibor Kapu हे चार अंतराळवीर स्थानकात
वास्तव्यासाठी जाणार आहेत ह्या मोहिमेत अंतराळवीर Peggy Whitson ह्या
कमांडरपद तर शुभांशु शुक्ला हे पायलट पद सांभाळणार असून पोलंडचे अंतराळवीर
Stawosz आणि हंगेरीयन अंतराळवीर Tibor Kapu हे दोघे मिशन स्पेशॅलिस्ट पद
सांभाळणार आहेत
हे चार देशातील चार अंतराळवीर आठ जूनला 14 दिवसांच्या वास्तव्यासाठी स्थानकात जाणार आहेत नासाच्या फ्लोरिडा येथील Kennedy Space Center येथील उड्डाणस्थळावरून Space X Crew Dragon अंतराळ यान ह्या चार अंतराळवीरांसह 9.11a.m.ला अंतराळ स्थानकात जाण्यासाठी अंतराळात उड्डाण करेल ह्या व्यावसायिक मोहिमेत नासा आणि भारतीय अंतराळसंस्था ह्यांच्या सहकार्याने प्रथमच इसरोचे भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला सहभागी होणार आहेत पोलंड आणि हंगेरीचे अंतराळवीर देखील ह्या मोहिमेत पहिल्यांदाच सहभागी झाले आहेत
हे मल्टिनॅशनल अंतराळवीर त्यांच्या 14 दिवसांच्या वास्तव्या दरम्यान अंतराळातील ह्या फिरत्या स्थानकातील झिरो ग्रॅव्हिटीतील लॅब मध्ये सुरु असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभागी होणार आहेत आणि 60 वेगवेगळे अत्याधुनिक संशोधनात्मक सायंटिफिक प्रयोग करणार आहेत
Axiom -4 मोहिमेतील नासाच्या माजी अंतराळवीर Peggy Whitson अनेकवेळा स्थानकात वास्तव्यास गेल्या असून त्यांनी एक वर्ष सलग स्थानकात राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे त्या म्हणतात," Axiom मोहिमेतील विविध देशांच्या अंतराळवीरांसोबत काम करण्याचा अनुभव खूप छान आहे हे अंतराळवीर बुद्धिमान आहेत अंतराळविश्वातील संशोधन करण्याचा त्यांचा दृष्टिकोन नवा आहे त्यांच्या देशाच्या ह्या व्यावसायिक सहभागामुळे आमच्या मोहिमेला संशोधन करताना मदत मिळेल अंतराळ विश्वात व्यावसायिक दृष्ठीने औद्योगिक प्रगती होईल शिवाय त्यांच्या देशातील भावी पिढीला ह्या अंतराळविश्वात करिअर करताना प्रेरणा मिळेल आणि ह्या अमर्याद अंतराळ विश्वात संशोधन करण्यासाठीची पाऊलवाट मिळेल!"
ह्या आधी 2022एप्रिल मध्ये Axiom-1 मोहिमेतील अंतराळवीरांनी स्थानकात 17 दिवस वास्तव्य केले होते 2023 मध्ये Axiom -2 मोहिमेत चार अंतराळवीरांसह Peggy Whitson ह्यांनी कमांडरपद सांभाळत आठ दिवस स्थानकात वास्तव्य करीत हि मोहीम यशस्वी केली आणि 2024 च्या जानेवारी महिन्यात Axiom -3 मोहिमेतील अंतराळवीरांनी स्थानकात 18 दिवस वास्तव्य केले होते
अंतराळातील ह्या फिरत्या अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीतील प्रयोगशाळेत गेल्या चोवीस वर्षांपासून विविध देशांचे अंतराळवीर सतत जातात,तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतात आणि नवनवीन शोध लावतात पृथ्वीवर करता येत नाहीत अशा पृथ्वी संरक्षण,मानवी आरोग्यासाठी उपयुक्त आणि औद्योगिक विकासासाठीच्या संशोधनात सहभागी होतात स्थानकातील विपरीत वातावरणाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामाची संशोधित माहिती गोळा करतात अंतराळस्थानक म्हणजे अंतराळविश्वातील व्यावसायिक अर्थव्यवस्था विकसित करणारी Sprigboard आहे आणि ती अधिक सशक्त करण्याचे नासाचे द्येय आहे त्यासाठी ह्या व्यावसायिक संस्थेच्या सहकार्याने अंतराळ मोहिमा कमी खर्चात सुरक्षित आणि नियमित करण्याचा नासाचा उद्देश आहे ह्याचा उपयोग भविष्यकालीन मंगळ आणि दूरवरच्या अंतराळ मोहिमेसाठी होईल असे नासा संस्थेतील ISS Program Manager Dana Weigel म्हणतात,"आम्ही ह्या व्यावसायिक मोहिमेच्या यशस्वी सहभागामुळे आनंदित झालो आहोत आणि Axiom च्या नियमित व्यावसायिक सेवा सुरु करण्यासाठी उत्सुक आहोत "!
No comments:
Post a Comment