Wednesday 31 July 2024

नासाचे अंतराळवीर Sunita Williams आणि Butch Wilmore स्थानकातून लवकरच परतण्याची शक्यता

  Image shows Boeing's Starliner crew capsule docked to the Harmony module's forward port at the International Space Station

 अंतराळ स्थानकाच्या Harmony Module च्या समोरील भागात उभे असलेले Boeing Star Liner अंतराळयान -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -30 जुलै 

नासाचे अंतरवीर Sunita Williams आणि Butch Wilmore जून महिन्यात Boeing Star liner अंतराळयानाच्या Flight Test साठी स्थानकात गेले होते पण स्थानकात पोहोचल्यानंतर त्यांच्या Star liner अंतराळयानातील Thrusters मधून हेलियम लिकेज होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले अशा कंडिशनमध्ये स्थानकातून पृथ्वीवर परतणे अंतराळवीरांच्या सुरक्षिततेच्या दृष्ठीने धोकादायक असल्याने त्यांचे पृथ्वीवर परतणे लांबले होते पण आता नासा आणि बोईंग टीममधील इंजिनीअर्सनी मिळून ह्या समस्येवर उपाय शोधला आहे 

New Mexico येथील White Sand Test Facility मध्ये नासा आणी बोईंग टीममधल्या इंजिनीअर्सनी Boeing Star liner अंतराळयानातील थ्रस्टर्स मधील  Reaction control System (RCS) ची Hot Fire Test पूर्ण केली ह्या टेस्टच्या वेळी पृथ्वीवर Boeing Star liner अंतराळयान स्थानकात पोहोचत असतानाची स्थिती निर्माण करण्यात आली शिवाय ह्या अंतराळवीरांच्या पृथ्वीवर परतण्याआधी अंतराळयानाच्या स्थानकाबाहेर पडतानाची स्थिती त्या वेळेसचे De orbit burn आणि पृथ्वीवर पोहोचल्यानंतर Landing च्या स्थितीचा विचार करण्यात आला आणि हि टेस्ट करून अंतराळयानाची कार्यक्षमता तपासण्यात आली त्या नंतर यानातील RCSचे पुन्हा निरीक्षण करून त्यातील त्रुटीवर उपाय शोधण्यात आले 

27 जुलैला ह्या टीममधील इंजिनीअर्सनी पृथ्वीवर दुसरी टेस्ट पूर्ण केली त्या वेळी Boeing Star liner अंतराळयानातील Propulsion System चे चेकिंग त्यांनी केले ह्या पृथ्वीवरील टेस्टच्या वेळी अंतराळवीर Sunita Williams आणि Butch Wilmore ह्यांनी स्थानकात उभ्या असलेल्या Boeing Star liner अंतराळयानात बसून ह्या टेस्ट मध्ये सहभाग नोंदवला ह्या टेस्ट दरम्यान टीम मधील इंजिनीअर्सनी अंतराळयानातील  28 पैकी 27  थ्रस्टर्स चे Firing करून त्यांची कार्यक्षमता तपासली शिवाय हेलियम लिकेजचे प्रमाण नोंदवण्यात आले तेव्हा प्राथमिक टेस्ट नंतर सर्व थ्रस्टर्स पुन्हा Preflight स्थितीत आल्याचे आणि पृथ्वीवर परतण्यासाठी आवश्यक एव्हढे हेलियम त्यात शिल्लक असल्याचे निरीक्षणास आले आता थ्रस्टर्स मधील हेलियम लिकेज होत असलेला भाग पुन्हा बंद करण्यात आला आहे टेस्ट साठी  सिस्टीमचा भाग काही काळ उघडण्यात आला होता अंतराळयान जेव्हा स्थानकातून पृथ्वीवर परतण्यासाठी स्थानकातून बाहेर पडेल तेव्हा निघण्याआधी हे दोन्ही अंतराळवीर तो भाग उघडून त्यातून लिकेज होत नाही ना ह्याची खात्री करतील 

त्या मुळे आता ह्या दोन अंतराळवीरांच्या पृथ्वीवर सुरक्षित परतण्याचा मार्ग मोकळा झाला असून ते लवकरच पृथ्वीवर परततील असे Boeing चे Vice President आणि Program Manager , Mark Nappi  ह्या टेस्टच्या यशानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले ,"आता मी निश्चिन्त झालो आहे ! Boeing Star liner अंतराळयान आता ह्या दोन अंतराळवीरांना सुरक्षितपणे स्थानकातून पृथ्वीवर पोहोचवेल ते जसे गेले तसेच पृथ्वीवर सुरक्षितपणे पोहोचावेत हीच आमची इच्छा आहे Star Liner अंतराळयान स्थानकात पोहोचल्यानंतर पुन्हा त्यातून हेलियम लिकेज झाले नाही त्याची माहितीही आम्ही गोळा केली आम्ही ह्या दोन्ही अंतराळवीरांच्या सुरक्षिततेवर भर देत आहोत त्या साठी आम्ही सतत ह्या दोन्ही अंतराळवीरांशी लाईव्ह संवाद साधून आवश्यक सूचना देत आहोत आणि यानाच्या देखभालीवर दुरुस्तीवर लक्ष केंद्रित करीत आहोत त्यातील यंत्रणा अद्ययावत सॉफ्टवेअर बसवून, सिस्टिम चेक करीत आहोत सध्या ह्या अंतराळवीरांच्या पृथ्वीवर परतण्याची तारीख निश्चित ठरली नसली तरी ते लवकरच परतावेत ह्या साठी आमची टीम प्रयत्न करीत आहे !"

सध्या हे दोन्ही अंतराळवीर अंतराळ मोहीम 70-71च्या अंतराळवीरांसोबत तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी झाले आहेत ह्या अंतराळवीरांनी पृथ्वीवर पॅरिस मध्ये सुरु असलेल्या ऑलिंपिक खेळाडूंना स्थानकात खेळ खेळून प्रोत्साहन दिले सुरवातीला अंतराळवीर Sunita Williams ह्यांनी इलेक्ट्रिक मशाल पेटवून शुभारंभ केला त्या नंतर इतर अंतराळवीरांनी वेट लिफ्टिंग,रेसिंग,डिस्टन्स थ्रो, शॉट पुट,वेगवेगळ्या कसरतीचे प्रयोग केले पृथ्वीवर ऑलिम्पिक मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना खूप मेहनत करावी लागते पण इथे झिरो ग्रॅव्हीटीत वजनरहित अवस्थेत खेळताना आम्हाला सोपे जाते असे म्हणत त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या ! आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे

Saturday 27 July 2024

नासाच्या Space X Crew-9 मोहिमेतील चार अंतराळवीर ऑगस्टमध्ये स्थानकात जाणार

   https://www.nasa.gov/wp-content/uploads/2024/07/crew-9-5657c1.jpg

 नासाच्या Space X Crew -9 अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर Zena Cardman ,Nick Hague ,Stephanie Wilson आणि रशियन अंतराळवीर  Alexsander Gorbunov - फोटो -नासा संस्था

 नासा संस्था- 20 जुलै 

नासाच्या Space X Crew-9 अंतराळ मोहिमे अंतर्गत चार अंतराळवीर सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात जाणार आहेत नासाचे अंतराळवीर Zena Cardman ,Nick Hague,Stephanie Wilson आणी रशियन अंतराळवीर Alexsander Gorbunov ऑगस्टमध्ये स्थानकात वास्तव्यास जाणार आहेत अंतराळवीर Zena Cardman  ह्या मोहिमेतील कमांडर पद सांभाळणार असुन अंतराळवीर Nick Hague पायलटपद सांभाळणार आहेत अंतराळवीर Stephanie Wilson आणी अंतराळवीर Alexander Gorbunov हे दोघे मिशन स्पेशालिस्टपद सांभाळणार आहेत

हे चारही अंतराळवीर नासाच्या Florida येथील Kennedy Space Center मधील 39 A ह्या ऊड्डाण स्थळावरुन  Space X Crew Dragon मधून Falcon-9 रॉकेटच्या सहाय्याने  स्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावतील

अंतराळवीर  Zena Cardman आणी  Alexander Gorbunov हे पहिल्यांदाच अंतराळस्थानकात रहायला जाणार आहेत  अंतराळवीर Nick Hague दुसऱ्यांंदा स्थानकात रहायला जाणार आहेत तर अंतराळवीर Stephanie Wilson ह्यांची हि चवथी अंतराळवारी आहे त्यांनी STS-120,STS-121,STS-131 ह्या मोहिमे अंतर्गत स्थानकात वास्तव्य केले आहे त्यांच्या तीन वेळच्या अंतराळ कारकीर्दित त्यांनी स्थानकात 42 दिवस वास्तव्य केले आहे 

ह्या अंतराळविरांच्या ऊड्डाणाची निश्चित तारीख ठरली नसली तरीही हे अंतराळवीर ऑगस्टच्या मध्यंतरात स्थानकात जाणार आहेत


Saturday 20 July 2024

नासा संस्था Apollo-11 मोहिमेचा 55वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमाचे आयोजनाने साजरा करणार

 https://www.nasa.gov/wp-content/uploads/2023/05/as11-40-5875large.jpg

अंतराळवीर Buzz Aldrin 20 जुलै1969 ला चंद्रभुमीवर अमेरिकेचा झेंडा रोवल्यानंतर मागे अंतराळवीरांच्या पावलांचे ठसे -फोटो-नासा संस्था.

नासा संस्था-20 जुलै

20 जुलै 1969 ला नासाच्या अपोलो -11 चांद्र मोहिमेतील अंतराळवीर Neil Armstrong, Michael Collinsआणी Buzz Aldrin ह्यांनी पहिल्यांदा चंद्रभुमीवर पाऊल ठेवले होते त्या ऐतिहासिक घटनेचा आज पंचावन्नवा वर्धापन दिवस आहे अमेरिकेत पंधरा जुलै पासून पंचवीस जुलै पर्यंत हा वर्धापन दिन वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात येत आहे  ह्या अपोलो 11मोहिमेतील सहभागी मान्यवरांच्या ऊपस्थितीत हा वर्धापन दिन साजरा होत असुन त्यात विविध कार्यक्रमाचा समावेश आहे
19 जुलैला अपोलो 11 मोहिमेतील सहभागी महिला आणि Human Computer म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  Dorothy Vaughan ह्यांच्या अपोलो मोहिमेतील उत्कृष्ठ कार्याचे स्मरण करण्यात आले आणि  त्यांच्या सन्मानार्थ नासाच्या Huston येथील Johnson Space Center मधील 12न. च्या बिल्डिंगला त्यांचे नाव देण्यात आले त्याच्या  Ribbon cuttingचा शुभारंभ शुक्रवारी पार पडला 


https://www.nasa.gov/wp-content/uploads/2024/07/dorothy-vaughan.jpg
 
नासाच्या अपोलो 11 मोहिमेतील सहभागी महिला Human Computer Dorothy vaughan-फोटो-नासा संस्था 
16 जुलै 1969 ला हे तीन अंतराळवीर अपोलो यानामधून चंद्रावर जाण्यासाठी अंतराळात झेपावले आणी 20 जुलैला चंद्रावर पोहोचले तेथे पोहोचल्यावर अंतराळवीर Neil Armstrong आणी Buzz Aldrin ह्यांनी अपोलो यानाच्या Eagle moon मोड्युल मधून ऊतरून चंद्रभुमीवर पहिले पाऊल ठेवले आणी काही अंतर चालत गेले चंद्रभुमीवर त्यांनी 21तास 38मिनिटे व्यतीत केले त्या वेळात त्यांनी प्रथम तेथील भुमीत अमेरिकेचा झेंडा रोवला ह्या दोन्ही Moon Walker नी तेथे Launch pad वर लागलेल्या आगीत शहिद झालेल्या अपोलो मोहिमेतील अंतराळविरांचे नाव असलेले शौर्यपदक ठेवले आणी विश्वशांतीसाठीची काही स्मृतीचिन्हेही ठेवली
ह्या दोन्ही अंतराळविरांनी ह्या अपोलो मोहिमेचा चंद्रावर जाऊन पाऊलखुणा ठेऊन सुखरू पृथ्वीवर परतण्याचा मुळ ऊद्देश साध्य केलाच शिवाय तेथे काही अंतर चालत जाऊन तेथील भुमीचा मागोवा घेतला  तेथील भुमीवरील खडक आणी मातीचे नमुने गोळा केले या शिवाय त्यांनी चंद्रावरून पृथ्वीवर Signals येण्यासाठी TV Camera Deploy केला आणी पृथ्वीवासीयांसाठी ऊपयुक्त कामे केली पृथ्वीवरील 650 मिलीयन लोक हा ऐतिहासिक क्षण टि.व्हि.वरून पहात होते
अमेरिकेच्या अंतराळविश्वातील ह्या ऐतिहासिक यशाची  माहिती नवीन पिढीला व्हावी त्या निमित्ताने ह्या मोहिमेतील अंतराळवीरांची आणी ईतर सहभागी शास्त्रज्ञ,तंत्रज्ञ आणी टिममधील सर्वांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे 
नासाचे Administrator Bill Nelson म्हणतात1960 चे शतक आव्हानात्मक होते पण 1969 साली अपोलो 11मोहिमेतील अंतराळवीरांनी  अनेक अडचणीवर मात करत हि मोहीम यशस्वी केली आणी चंद्रावर पहिल्या मानवी पाऊलखुणा ठेवल्या ती छोटिशी ऐतिहासिक घटना भविष्यकालीन चंद्रमोहिमेसाठी यशस्वी पाऊलवाट ठरली आता पन्नास वर्षांनी पुन्हा एकदा आर्टिमस मोहिमेतील अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवणार आहेत जेव्हा अपोलो 11मोहिमेतील अंतराळवीर Eagle मोड्युल मधून चंद्रावर ऊतरले तेव्हा साऱ्या जगाच लक्ष तेथे होते साऱ्या जगाच्या शांतीसाठीव एकीसाठी आपण पुन्हा प्रार्थना करु या !त्यांच स्मरण करु या!

Friday 12 July 2024

Andre Douglas ह्यांची Artemis-ll मोहिमेतील Backup crew साठी निवड

 https://www.nasa.gov/wp-content/uploads/2024/07/andre-douglas.jpg

आर्टिमस मोहिमेतील Backup Crew Andre Douglas- फोटो- नासा संस्था

नासा संस्था- 3 जुलै 

नासाच्या आर्टिमस मोहिमे अंतर्गत चार अंतराळवीर चंद्रावर जाणार आहेत तेथील भुमीवर पाऊल ठेऊन तेथील संशोधीत माहिती गोळा करणार आहेत सध्या त्यांची अंतिम तयारी सुरु आहे 2024 मध्ये हे अंतराळवीर चंद्रावर जाणार होते पण काही कारणास्तव त्यांचे जाणे लांबले असले तरीही ह्या मोहिमेची  जोरदार तयारी सुरू आहे

आर्टिमस -ll मोहिमेतील अंतराळवीर Ried Wiseman, Victor Glover,Christina Koch आणी Canada चे अंतराळ वीर Jeremy Hansen ह्यांची निवड आधीच निश्चित झाली होती  ह्या चौघांचे ट्रेनिंग देखील पुर्ण होत आले असुन आता ऊड्डाणपुर्व अंतीम ट्रेनिंग सुरू आहे आता ह्या चार अंतराळविरांसोबत जास्तीच्या पाचव्या अंतराळवीराची निवड नासा संस्थेने केली आहे अंतराळवीर Andre Douglas ह्यांची आर्टिमस मोहिमेतील Backup Crew म्हणून निवड झाली आहे

ऐनवेळी काही समस्या ऊद्भवल्यास ऊड्डाणाच्या वेळी काही अडचण आली किंवा एखादा अंतराळवीर जाण्यास असमर्थ असल्यास त्यांच्या ऐवजी Andre Douglas चंद्रावर जाण्यासाठी आर्टिमस मोहिमेत सहभागी होतील त्यासाठी त्यांना देखील ह्या चार अंतराळवीरांसोबत ट्रेनिंग देण्यात आले होते 

 Andre Douglas ह्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी ,त्यांचा Extensive Operational experience आणी नासा संस्थेतील ह्या कामातील कुशलता पाहून त्यांची निवड करण्यात आली त्यांच्या अंतराळवीर पदाच्या ट्रेनिंग मधला आणी नासा संस्थेतील वेगवेगळ्या विभागातील कामाचा उत्कृष्ट सहभाग पाहून आम्ही त्यांची निवड निश्चित केली असे नासाच्या Huston येथील Johnson Space Center मधील  Chief Astronaut Joe Acaba म्हणतात

Andre Virginia चे रहिवासी आहेत यांनी Coast Guard Academy London येथून  ME Mechanical केल त्या नंतर त्यांनी चार विषयात वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीतुन PHD केले त्यांनी वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतुन Systems Engineering मध्ये PHD केले शिवाय त्यांनी US Coast Gard Naval Architect,Salvage Engineer,Damage Control Assistant Officer Of the Deck म्हणून काम केलय John Hopkin University मध्ये त्यांनी नासा संस्थेतर्फे Maritime robotics,Planetary Defence and Space Exploration Missions मध्ये ते सहभाग नोंदवला होतापण

आर्टेमिस II मोहिमेतील चार अंतराळवीरांसोबत पृथ्वीवरील कृत्रिम चंद्रासारख्या भूमीवर पार पडलेल्या Moonwalk Spacewalk ,Space Suit टेस्ट, Lunar Terrian Vehical आणि Rover Test मध्ये ते सहभागी झाले होते

ह्या आधी Canada च्या CSA (कॅनडीयन स्पेस एजन्सी) नेही अंतराळवीर Jenni Wibbons ह्यांची Backup Crew म्हणून 2023 च्या नोव्हेंबरमध्ये निवड केली आहे

Tuesday 9 July 2024

नासाच्या CHAPEA अभियानातील भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील भावी अंतराळवीरांचे प्रतिनिधी Mars Dune Alpha मधील एक वर्षाचे वास्तव्य संपवून परतले

    2 CHAPEA-1 मोहिमेतील पहिल्या गृप मधील कमांडर Kelly Haston, Ross Brockwell ,Nathan Jones आणी Anca Selariu -फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 7 जुलै

नासाच्या Crew Health & Performance Exploration Analog (CHAPEA) मोहिमे अंतर्गत नासाच्या J.PL lab मध्ये शास्त्रज्ञांनी कृत्रिम मंगळसृष्टी निर्माण केली आहे नासाचे मंगळ मोहिमेतील अंतराळवीर प्रत्यक्ष मंगळावर जाण्याआधी आणि तिथे भविष्यकालीन मानवी वसाहत निर्माण करण्याआधी मंगळा सारखे वातावरण आणि भूमी असलेल्या ह्या शास्त्रज्ञ निर्मित मंगळसृष्टीत राहिल्यावर मानवी शरीरावर व आरोग्यावर काय परिणाम होतो हे संशोधित करण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे ह्या प्रयोगशील उपक्रमात सहभागी होऊन ह्या कृत्रिम मंगळ सृष्टीत एक वर्ष राहण्यासाठी धाडसी नागरिकांना नासा संस्थेने संधी उपलब्ध केली होती ह्या अभिनव उपक्रमा अंतर्गत निवड झालेल्या चार शिकाऊ अंतराळवीरांचा समावेश असलेले तीन गृप तयार करण्यात आले होते

 25 जूनला CHAPEA-1 मोहिमेतील पहिल्या गृप मधील कमांडर Kelly Haston, Ross Brockwell ,Nathan Jones आणी Anca Selariu  हे चार धाडसी प्रतिनिधी एक वर्षाच्या वास्तव्यासाठी ह्या पृथ्वीवरील कृत्रिम मंगळसृष्टीत राहायला गेले होते आता 378 दिवसांच्या वास्तव्यानंतर ते पृथ्वीवरील भूमीत परतले आहेत

 Mars Dune Alpha ह्या शास्त्रज्ञ निर्मित मंगळ भूमीतील 3D Printed Habitat असलेल्या जागेत ह्या अंतराळवीरांच्या प्रतिनिधींनी एक वर्षांपेक्षा जास्त काळ वास्तव्य केले आणि ह्या मानवी संशोधनात्मक अभियाना अंतर्गत मंगळ मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या सायंटिफिक प्रयोगात सहभाग नोंदवला मंगळ मोहिमेसाठी आवश्यक असलेले Mars Space Walk ह्या कृत्रिम मंगळासारख्या वातावरणात आणि लाल मातीत भाजीपाल्याची यशस्वी लागवड केली शिवाय अंतराळयानाची देखभाल व दुरुस्ती अचानक समस्या उद्भवल्यास,आपद्कालीन परिस्थीतीत नासा संस्थेशी संपर्क साधण्यास वेळ झाल्यास समस्येवर मात करून पुढे मार्गक्रमण करण्याची क्षमता   आणि सगळ्यात महत्व्याची गोष्ठ म्हणजे ह्या भूमीत त्यांच्या कुटुंबीयांपासून पृथ्वीवासीयांपासून दुर बंदिस्त अवस्थेत राहण हे सार ह्या प्रतिनिधींनी यशस्वीपणे पार पाडल ह्या एक वर्षांहून जास्त काळात त्यांचा त्यांच्या कुटुंबियांशी कोणताही संपर्क नव्हता फक्त नासा संसंस्थेतील ह्या मोहिमेतील प्रमुख त्यांच्या संपर्कात होते ह्या काळात त्यांनी अत्यंत मोलाची संशोधित माहिती गोळा केली आहे

सहा जुलैला नासाच्या Huston येथील  Johnson Space Center  मध्ये ह्या प्रतिनीधीच्या मंगळभूमीतून पृथ्वीवरील प्रवेशाच्या वेळी त्यांच्या स्वागताला नासाचे Deputy Director-Steve Koerner ,अंतराळवीर Kjell Lindgren -Deputy Director व Flight Oprations  ,Principal Investigater- CHAPEA Grace Douglas ,Judy Hayesआणि Julie Kramer हजर होते 

ह्या स्वागत समारंभाच्या वेळी Steve Koerner म्हणाले," ह्या चार धाडसी प्रतिनिधींचे स्वागत करण्यासाठी मी आतुर झालो आहे त्यांनी ह्या Mars Dune Alpha मधील 1700 sq ft जागेत बंदीस्त अवस्थेत वास्तव्य केलय CHAPEA अभियान भविष्य कालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षितते साठी आणी ह्या मंगळ.ग्रहासारख्या वातावरणात राहिल्यावर मानवी आरोग्यावर शारीरिक आणी मानसिक दृष्टया काय परिणाम होतो हे संशोधित करण्यासाठी आहे विशेषत: त्यांच्या आरोग्यदायी पोषणासाठी आवश्यक आहे ह्या धाडसी प्रतिनिधींनी ह्या भूमीतील बंदिस्त वातावरणात त्यांच्या कुटुंबीयांपासून दूर राहून हि अत्यंत कठीण मोहीम यशस्वी केली आहे त्यांना मर्यादित प्रमाणात अन्न देण्यात आले होते आणि नासा संस्थेच्या कडक निर्बंधात ठेवण्यात आले होते पण त्यांनी हसतमुखाने हि मोहीम यशस्वी केली त्यांना लागणाऱ्या भाजीपाल्याची यशस्वी लागवड केली ह्या मोहिमेतील आवश्यक बाबीची पूर्तता करून सायंटिफिक प्रयोग केले आणि संशोधित माहिती गोळा केली आहे त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या कुटुंबियासारखेच आम्ही देखील उत्सुक आहोत त्यांचे त्यांनी केलेल्या ह्या कार्याबद्दल आभार ! ही अवघड मोहीम यशस्वी केल्याबद्दल ह्या चौघांचे अभिनंदन ! आता ते बाहेर येतील पण ते वर्षभर ह्या वातावरणात राहिल्यामुळे त्यांना काही दिवस तज्ज्ञांच्या देखरेखीखाली राहावे लागेल त्यांच्या तब्येतीसाठी हे आवश्यक आहे त्या नंतर अंतराळवीर Kjell Lindgren ह्यांनी नासा संस्थेतील Mars Dune Alpha चा बंद दरवाजा उघडला आणि चारही प्रतिनिधी Mars Dune Alpha मधून बाहेर आले 

  Inside the habitat, the CHAPEA mission 1 crew harvested a tomato.

CHAPEA -1मधील भावी अंतराळवीरांच्या प्रतिनिधींनी Mars Dune Alpha मध्ये लावलेल्या रोपांना आलेले टोमॅटो 

अंतराळवीर Kjell Lindgren  ह्यांनी त्यांचे स्वागत केले ,"तुम्हा सर्वांचे ह्या भूमीत स्वागत ! तुम्ही अद्भुत आहात ! साहसी आहात ! ही मोहीम यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन ! इथे वास्तव्य करणे सोपे नव्हते आजचा दिवस असाधारण आहे तुम्हा सर्वांचे घरी परतण्यासाठी स्वागत! हि नासा संस्थेतील कृत्रिम मंगळसृष्टी तयार करण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ,इंजिनिर्स,अभियंते,तंत्रज्ञ ह्या मोहिमेतील टीम प्रमुख आणी कर्मचारी ह्या साऱयांनीच अथक परिश्रम केले आहेत त्या सर्वांचे आभार भविष्य कालीन मंगळ मोहिमेसाठी ह्या चौघांनी अत्यंत कठीण परिस्थितीत केलेल हे संशोधन अंतराळवीरांच्या मंगळ मोहिमेसाठी पथदर्शक ठरेल ह्या संशोधनावर उमटलेले तुमच्या हाताचे ठसे भविष्य काळात मंगळावर पोहोचतील तुम्ही एक वर्षासाठी तुमचे करिअर बाजूला ठेवून ह्या मोहिमेत सहभागी झालात तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल,संशोधनाबद्दल आभार ! "

त्या नंतर इतर मान्यवरांनी देखील ह्या चौघांचे अभिनंदन केले आणि त्यांना त्यांच्या ह्या एक वर्षाच्या कृत्रिम मंगळसृष्टीतील वास्तव्याबद्दलचे अनुभव शेअर करण्यास सांगितले 

कमांडर Kelly Hatson - हा क्षण अत्यंत आश्चर्यचकित करणारा आहे ! इथे  मी तुम्हा सर्वाना Hello करू शकत आहे! माझा विश्वास बसत नाही तुम्ही सर्वांनी आमचे छान स्वागत केलय त्या बद्दल तुम्हा सर्वांचे आभार! इथे राहण आव्हानात्मक होत सुख दुःखाचे क्षण होते खूप हार्डवर्क होत थोडीफार मजा पण आली हा युनिक अनुभव दुर्मिळ होता इथे राहण्याची संशोधन करण्याची संधी दिल्याबद्दल नासा संस्थेचे आभार माझे कुटुंबीय, माझे मित्र आणि इथले सहकारी ज्यांनी आम्हाला प्रेरित केल त्या सर्वांचे आभार! टीममधील सर्वांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केल आमची काळजी घेतली त्या बद्दल आभार!"

Ross Brockwell  -" CHAPEA टीममधील सर्वांचे आभार! माझ्या कुटुंबीयांमुळे आणि माझ्या सहकारी मित्रांमूळे मला इथे राहून संशोधन करण शक्य झाल ह्या एक वर्षात त्यांची उणीव जाणवली मी त्यांच्या जवळ नव्हतो त्यांनी मला सतत प्रेरणा दिली हे संशोधन महत्वाचे होते त्याचा उपयोग भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी होणार आहे आणि आम्ही त्यात सहभागी झालो माझ्यासाठी हि अमूल्य संधी होती त्या साठी नासा संस्थेचे आभार इथे राहण कठीण होत पण आव्हानात्मक होत मी ईथे हेअर सायन्सवर पण प्रयोग केले आणी माझ्या मित्रांनी त्याला साथ दिली अस ते गमतीने म्हणाले!'

 Nathan Joens- मी खूप Exited आहे ! माझ्या डोक्यात असंख्य विचार येत आहेत माझ्या भावना संमीश्र आहेत माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडतील अशी भीती वाटतेय पण मी माझ्या भावनांवर ताबा ठेवलाय आम्ही इथे एक वर्षांहून जास्त दिवस वास्तव्य केल सुरवातीला पहिल्या काही दिवसात मला खूप कठीण गेल पण नंतर ह्या सहकारी मित्रांच्या सहकार्यामुळे सार सुरळीत झाल इथे राहण सोप नव्हत रोजच नवीन आव्हानाला सामोरे जाव लागल पण त्यामुळेच नव अनुभव आला शिकायला मिळाल नासा संस्थेमुळे हे शक्य झाल माझ्या कुटुंबियांच्या सहकार्या शिवाय हे शक्य नव्हत मी फिजिशियन आहे ते काम सोडून मी इथे आलो नासा संस्थेने आम्हाला ह्या मोहिमेत सहभागी होण्याची संधी दिली त्या मुळे आम्ही मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी संशोधन करू शकलो आता वाटतय किती भर्रकन हे वर्ष संपल नासा संस्थेतील ह्या टीम मधील सर्वांचे आभार !"

Anca Selariu  -माझ्या भावना देखील अशाच आहेत ! मी युनीव्हर्सीटीत शिकत असताना आम्ही अंतराळवीराचे भाषण ऐकले तेव्हाचे शब्द माझ्या अजूनही लक्षात आहेत एखाध ध्येय गाठण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि अथक परीश्रम करण्याची तयारी हवी आपण काय साध्य केलय हे पाहाण आवश्यक आहे असं ते म्हणाले होते मला ह्या अभिनव उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली ह्या मंगळ भूमीत राहायला मिळाल हे साहसी काम करायला मिळाल त्या बद्दल नासा संस्थेचे आभार मला नेहेमी विचारल जात की मंगळ मोहीमच का राबविल्या जाते मंगळाचीच निवड का केली जाते ? कारण मंगळ ग्रहावर संशोधनास वाव आहे तिथे जाण सोप नसल तरी शक्य आहे आता अनेक देशांचे अंतराळयान तेथे पोहोचले आहेत आणि संशोधित माहिती गोळा करत आहेत त्या मुळे तेथे अंतराळविश्वातील एकी पाहायला मिळतेय आणि मी ह्या मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षे साठीच्या संशोधनात्मक अभियानात सहभागी झाले हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे माझ्या कुटुंबीयामुळे आणि नासा संस्थेमुळे हे शक्य झाले !