Saturday 29 June 2024

चंद्रावरील भविष्यकालीन घर बांधणीसाठी Fungi चा वापर करून बनविलेल्या पर्यावरण पूरक विटांची नासा संस्थेतर्फे निवड

  A pile of white bricks in a pile.

Mycelium ,Yard waste आणि Wood Chips ह्या पासून नासाच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक विटा -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -26 जुन  

नासाच्या आर्टेमिस मोहिमे अंतर्गत अंतराळवीर चंद्रावर जाणार आहेत तेथे भविष्यकालीन मानवी वास्तव्यासाठी पोषक वातावरण,पाणी आणि राहण्यायोग्य ठिकाणाचा शोध घेणार आहेत सध्या त्याची जय्यत तयारी सुरु आहे भविष्यकालीन चंद्र आणि मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या परग्रहावरील निवासासाठी आणि मानवी वसाहतीसाठी तेथे वास्तव्य करण्यासाठी घरांची आवश्यकता भासणार आहे नासाच्या अभिनव उपक्रमा अंतर्गत नागरिकांना चंद्रावर निवास करण्यायोग्य घर बांधण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करण्याची संधी जाहीर केली होती त्याच उपक्रमा अंतर्गत California येथील नासाच्या Ames Research Center मधील शास्त्रज्ञांनी घरबांधणीसाठी आवश्यक असलेल्या Fungi पासून बनविलेल्या पर्यावरण पूरक विटांची निवड निश्चित केली आहे 

शास्त्रज्ञांनी ह्या विटा Mycellia ह्या मशरूम सारख्या दिसणाऱ्या Fungi पासून तयार केल्या आहेत ह्या Fungi च्या जमिनीखाली मातीत पसरलेल्या सूक्ष्म धाग्यासारख्या दिसणाऱ्या मुळांचा वापर ह्यात केला आहे ह्या विटा वजनाने हलक्या आणि पर्यावरण पूरक आहेत ह्या विटांमध्ये वापरण्यात आलेल्या Mycellia चा वापर पाणी गाळण्यासाठी आणि सांडपाण्यातून खनिज पदार्थ वेगळे करण्यासाठी होऊ शकतो

भविष्यकालीन चंद्र आणि मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी आणी तेथील मानवी निवास निर्मिती साठी Lander आणि Rover पाठवले जातील पण घर बांधण्यासाठी लागणाऱ्या विटा तयार करण्यासाठी नासाच्या Mycotecture Project Team मधील शास्त्रज्ञांनी नाविन्यपूर्ण संकल्पना सादर केली आहे त्यांनी मश्रुम सारख्या दिसणाऱ्या Mycelium Fungi आणि त्यातील सूक्ष्म तंतूंचा वापर विटा बनविण्यासाठी केल्याने ह्या विटा पृथ्वीवर वापरण्यात येणाऱ्या विटांपेक्षा वजनाने हलक्या आहेत त्या मुळे भविष्य कालीन अंतराळ मोहिमेत इतर बांधकाम साहित्यासोबत पृथ्वीवरून चंद्रावर पाठवणे सोपे होईल शिवाय ह्या विटा साचेबद्ध आकारात तयार करता येतात त्या मुळे घर बांधताना ज्या साचेबद्ध आकारात त्या बनविल्या जातील तसाच आकार त्यांना प्राप्त होईल पाणी घालून त्याचा वापर करता येऊ शकतो  Mycellia मध्ये वातावरणातून सूर्यकिरणांच्या मदतीने हवेतील Oxygen शोषून Co2 बाहेर टाकल्या जाईल आणि ह्या विटांमध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता असल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन देखील राखले जाईल ह्या विटांवर आजूबाजूच्या दूषित वातावरणाचा परिणाम होऊ नये म्हणून सुरक्षित ठिकाणी त्या ठेवल्या जातील 

अंतिम निवड करण्याआधी नासाच्या Innovative Concept Program (NIAC) द्वारे ह्या विटांचे आधी नासा संस्थेतील लॅब मध्ये परीक्षण केले गेले ह्या बुरशीचा उपयोग करून Bio Composites,Fabricated prototypes ह्या सारख्या अनेक गोष्टींची लॅब मधील परग्रहा सारख्या कृत्रिम वातावरणात चाचणी घेतली गेली ह्या विटांमध्ये वापरण्यात आलेले इतर साहित्य व तेथील किरणोत्सर्गापासून ह्या विटांचा बचाव करण्यासाठीचे उपाय ह्या बाबी विचारात घेऊन चांद्रभूमीवरील घराचे नमुना मॉडेल बनविण्यात आले हि नाविन्यपूर्ण संकल्पना फक्त परग्रहावरच नाही तर पृथ्वीवरही उपयुक्त ठरू शकते

NIAC program टीमचे प्रमुख Jon Nelson म्हणतात, "Mycotecture Off Planet हि संकल्पना अंतराळ विश्वातील भविष्य कालीन शोधमोहिमेची पायाभरणी आहे  2024च्या जानेवारीत ह्या प्रोजेक्ट ची निवड झाली पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात चाचणी झाल्यानंतरचा हा तिसरा टप्पा आहे!" येत्या दोन वर्षात हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी नासा संस्था दोन दशलक्ष डॉलरची मदत करणार असून NASA Ames मधील वरिष्ठ शास्त्रज्ञ व ह्या मोहिमेचे टीम प्रमुख Lynn Rothschild हे ह्या कामाचे नेतृत्व करतील

ह्या विटांची अंतिम निवड झाल्यानंतर नासाचे Administrator Bill Nelson म्हणाले,"नासा संस्थेतील शास्त्रज्ञ परग्रहावरील संशोधनासाठी आणि तेथील भविष्यकालीन मानवी निवासासाठी सतत प्रयत्न करत असतात नासा संस्था देखील नवनवीन उपक्रम राबवून आजवर अस्तित्वात नसलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनेला प्रोत्साहन देते भविष्यकालीन दूरवरच्या अंतराळ मोहीमांसाठी अशा शोधांची गरज आहे नासाच्या Space Technology आणि NIAC च्या टीमने मिळून ह्या विटांचा शोध लावला आहे हा नाविन्यपूर्ण शोध आगामी आर्टेमिस मोहिमेसाठी उपयुक्त आहे ह्या शास्त्रज्ञांनी अशक्य ते शक्य करून दाखविले आहे आर्टेमिस मोहिमेतील अंतराळवीरांच्या चांद्रभूमीवरील वास्तव्यासाठी आणि तेथील भविष्यकालीन मानवी वसाहत निर्मितीच्या पायाभरणी साठीचा हा शुभारंभ आहे अंतराळविश्वातील  हि नवी पाऊलवाट भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या मंगळ निवासासाठीही उपयुक्त ठरेल!"

Tuesday 25 June 2024

नासाच्या HERA मोहिमेतील भावी अंतराळवीरांचे प्रतिनिधी पृथ्वीवरील शास्त्रज्ञ निर्मित कृत्रिम मंगळभूमीतून परतले

 Three HERA crew members pose for a selfie inside the loft area of the Human Exploration Research Analog (HERA) habitat, holding up a bag of mixed salad greens, or lettuce, that they grew inside the habitat during their 45-day simulated journey to Mars. 

नासा संस्थेतील शास्त्रज्ञ निर्मित कृत्रीम मंगळभुमीत HERA मोहिमेतील अंतराळविरांच्या प्रतिनिधींनी Loft area मधील Plant growth chamber मध्ये उगवलेल्या Lettuce च्या भाजी सोबत काढलेला फोटो-फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -25-जुन

नासाच्या भविष्य कालीन मंगळ मोहिमेत अंतराळवीर मंगळावर जाणार आहेत तिथे मानवी वास्तव्यासाठी पृथ्वी सारखे पोषक वातावरण असलेल्या ठिकाणाचा शोध घेऊन मंगळावरील संशोधित माहिती मिळवणार आहेत ह्या मोहिमेची पूर्वतयारी सध्या नासा संस्थेतील शास्त्रज्ञ करीत आहेत त्या साठी नासाच्या J.PL संस्थेतील शास्त्रज्ञांनी संस्थेतील मोकळ्या जागेत मंगळासारखे वातावरण असलेली कृत्रीम मंगळभूमी निर्माण केली आहे मंगळ मोहिमेतील अंतराळविरांची मोहीम सुरक्षित होण्यासाठी आणी मंगळावरील वातावरणाचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो हे संशोधीत करण्यासाठी HERA मोहीम राबविण्यात येत आहे

HERA mission मधील अंतराळवीरांचे प्रतिनिधी नासाच्या शास्त्रज्ञ निर्मित कृत्रिम मंगळ भूमीत प्रवेश करताना -फोटो -नासा संस्था

ह्या मोहिमे अंतर्गत Jason Lee ,Stephanie Navarro,Shareef Al Romaithi आणि Piyumi Wijesekara हे चार धाडसी नागरिक ह्या मोहीमेत सहभागी झाले होते भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळविरांचे प्रतिनिधीत्व करणारे हे धाडसी नागरिक 10 मेला नासाच्या JPL संस्थेतील शास्त्रज्ञ निर्मित पृथ्वीवरील कृत्रीम मंगळभुमीत 45 दिवसांच्या वास्तव्या साठी गेले होते आता 24 जुनला ते ह्या भुमीतील वास्तव्य संपवुन परतले

 Two HERA crew members pose inside the habitat in front of the plant growth chamber they used to grow lettuce during their 45-day simulated Mars journey. The crew members are each holding lettuce plants that were grown. Behind them is the chamber emitting a bright white and pink-tinted light. HERA Mission मधील सहभागी अंतराळवीरांचे प्रतिनिधी Shareef Al Romaithi आणि Josan Lee नासा संस्थेतील कृत्रिम मंगळ भूमीतील Plant Growth Chamber मध्ये उगवलेली Lettuce च्या भाजीची पाने दाखवताना -फोटो -नासा संस्था

ह्या अंतराळविरांचे प्रातिनिधित्व करणाऱ्या धाडसी नागरिकांना ह्या कृत्रीम मंगळभुमीत बंदिस्त करण्यात आले होते त्यांंना त्यांच्या कुटुंबीयांपासुन दुर ठेवण्यात आले होते फक्त नासा संस्थेतील प्रमुख त्यांच्या संपर्कात होते 

ह्या 45 दिवसांच्या वास्तव्यासाठी त्यांना भविष्यकालिन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी आवश्यक असलेल्या अंतराळवीरांसारखे ट्रेनिंग देण्यात आले होते त्यांनी ह्या शास्त्रज्ञ निर्मित मंगळ भुमीत सध्या अंतराळ स्थानकात रहात असलेल्या अंतराळ विरांसारखाच Space Walk केला संशोधनात सहभाग नोंदवला आणी रोपांची लागवड देखील केली भविष्य कालीन मंगळ मोहिमेतील अंतराळविरांना पृथ्वीवरील अन्नावर अवलंबून न रहाता ताजे व पोषक अन्न मिळावे ह्या साठी त्यांना मंगळभूमीत अन्न भाजी,फळे ह्यांची लागवड करावी लागेल त्या साठी मंगळासारख्या वातावरणात आणी मातीत रोपांची लागवड करण्यात येत आहे ह्या चार अंतराळवीरांच्या प्रतिनिधींनी ह्या कृत्रीम मंगळ भुमीतील Loft Area मधील Plant Growth Chamber मध्ये Lettuceच्या रोपाची लागवड केली आता त्यांची वाढ झाली आहे  ह्या प्रतिनिधित्व करणाऱ्या ऊमेदवारांनी ह्या भाजीच्या पानासोबत त्यांचे सेल्फी काढून  नासा संस्थेला पाठवले नासा संस्थेने हे फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत

मंगळ मोहिमेतील अंतराळवीर प्रत्यक्ष मंगळावर जाण्याआधी मंगळासारख्या वातावरणात राहिल्यावर मानवी शारीरावर काय विपरीत परिणाम होतो ह्या कठीण परीस्थितीला मानवी शरीर कसे सामोरे जाते त्यांच्यात काय मानसिक बदल होतात ह्या विषयीचे संशोधन करण्यासाठी हि मोहीम राबविण्यात येत आहे

मंगळ मोहिमेतील अंतराळवीर पृथ्वी पासुन हजारो मैल दुर अंतरावर अंतराळ प्रवास करणार आहेत तेव्हा त्यांना पृथ्वीवरील लोकांशी त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधता येणार नाही म्हणून त्यांना सगळ्यांपासून दुर ह्या भुमीत बंदिस्त करण्यात आले हे अंतराळवीर त्या काळात ह्या कृत्रीम मंगळभुमीतुन बाहेर पडु शकले नाहीत त्यांच्या कुटुंबीयांशी किंवा बाहेरच्या कोणाशीही संपर्क साधु शकले नाही फक्त नासा संस्थेतील प्रमुख त्यांच्या संपर्कात होते 

भविष्य कालीन अंतराळवीर मंगळावर जाण्यासाठी अंतराळ प्रवास करतील तेव्हा काही कारणाने त्यांना  पृथ्वीवरील नासा संस्थेशी संपर्क साधण्यास वेळ झाल्यास किंवा संपर्क यंत्रणा बंद पडल्यास,अचानक काही समस्या उद्भवल्यास किंवा यानात बिघाड झाल्यास त्या वर कुशलतेने मात करून परिस्थतीवर नियंत्रण मिळवुन पुढे मार्गक्रमण करता यावे म्हणून ह्या अंतराळविरांना आपदकालीन Operation, Maintainence Training देण्यात आले होते हे चार भावी अंतराळवीरांचे  प्रतिनिधी तेथे Human health Studies वर सुरू असलेल्या वेगवेगळ्या अठरा संशोधनात सहभागी  झाले होते

आता हे चारही प्रतिनिधी नासा संस्थेतील पृथ्वीवरील कृत्रिम मंगळ भूमीतून पृथ्वीच्या वातावरणात बाहेर आले आहेत त्यांनी ह्या वास्तव्या दरम्यान ह्या पृथ्वीवरील कृत्रीम मंगळभुमीतील बंदिस्त वातावरणात राहिल्यावर मानवी आरोग्यावर शारीरिक मानसिक व मानवी प्रतिकार शक्तीमधे काय बदल जाणवतात ह्याचे निरीक्षण नोंदवून संशोधीत माहिती गोळा केली आहे

Friday 14 June 2024

अंतराळवीर Sunita Williams आणि Butch Wilmore ह्यांनी नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधत अंतराळप्रवासाचा अनुभव शेअर केला

 नासाच्या  Boeing Star liner अंतराळयानातुन सुरक्षितपणे स्थानकात पोहोचल्याच्या आनंदात Dance करताना अंतराळवीर Sunita Williams-फोटो -नासा संस्था

 नासा संस्था -11 जुन

Boeing  Star liner अंतराळ यानाच्या पहिल्या मानवी उड्डाण टेस्ट अंतर्गत अंतराळवीर Sunita Williams आणि Butch Wilmore सहा जूनला 3.45p.m.ला स्थानकात पोहोचले तेव्हा स्थानकात सध्या राहात असलेल्या अंतराळवीरांनी त्यांचे स्वागत केले अनेक अडचणींवर मात करीत अखेर जिद्दीने आणि धाडसाने हि मोहीम यशस्वी झाल्याने आनंदित झालेल्या अंतराळवीर Sunita Williams ह्यांनी स्थानकाच्या दारातून नाचतच प्रवेश केला आणि काही क्षण नाचून आनंद व्यक्त केला स्थानकातील अंतराळवीरांनी देखील त्यांना साथ दिली आमचे स्वागताचे हे क्षण खूप छान आहेत आमची Welcome Dance पार्टी झाली असे त्यांनी त्या नंतर नासा संस्थेशी साधलेल्या लाईव्ह संवादात सांगितले होते  

  The seven Expedition 71 crew members gather with the two Crew Flight Test members for a team portrait aboard the space station. In the front from left are, Suni Williams, Oleg Kononenko, and Butch Wilmore. Second row from left are, Alexander Grebenkin, Tracy C. Dyson, and Mike Barratt. In the back are, Nikolai Chub, Jeanette Epps, and Matthew Dominick. Credit: NASA TV

 नासाच्या  Boeing Star liner अंतराळयानाच्या Flight Test अंतर्गत स्थानकात पोहोचलेले अंतराळवीर Sunita Williams आणि Butch Wilmore -फोटो -नासा संस्था

आता स्थानकातील वास्तव्यादरम्यान 10 जूनला नासा संस्थेतील अधिकाऱ्यांनी ह्या अंतराळवीरांशी लाईव्ह संवाद साधून त्यांच्या Star liner अंतराळयान आणि अंतराळप्रवासाचा पहिला अनुभव ह्या विषयी जाणून घेतले नासाचे Administrator Bill Nelson, Deputy Administrator Pam Melroy ,Associate Administrator Jim Free आणि Johnson Space Center च्या Director Venessa Wyche ह्यांनी ह्या अंतराळवीरांशी लाईव्ह संवाद साधला 

Bill Nelson -"तुमचे स्थानकात स्वागत! तुम्ही ग्रेट आहात ! तुमचा अंतराळ प्रवास कसा झाला,तुमच्या अंतराळयानाचा त्यातून केलेल्या पहिल्या अंतराळ प्रवासाचा अनुभव कसा होता आणि स्थानकात पोहोचल्यावर तुम्ही आता काय फील करत आहात !"

अंतराळवीर Butch Wilmore -"Just Amazing ! प्रवास छान झाला Atlas रॉकेट स्थिर होऊन मार्गी लागले आणि जेव्हा अंतराळयान रॉकेट पासून वेगळे होत होते तेव्हा आम्ही सीटवरून मागे पुढे होत होतो Centaur Starts झाल्यावर लाईट गेले अंधार झाला हा नवा अनुभव थरारक होता कारण कुणालाच हि स्टेज माहिती नव्हती कारण पहिल्यांदाच हे यान अंतराळ प्रवास करत होते काही अंतर पार केल्यानंतर यान स्थिर झाले आणि आमचा अंतराळ प्रवास व्यवस्थित सुरु झाला तेव्हा आम्ही काही क्षण स्तब्ध होतो !"

अंतराळवीर Sunita Williams - "खरोखरच हि सुंदर Spectacular ride होती आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून ह्या क्षणाची वाट पाहात होतो त्या मुळे सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्या आणि यानाचा अंतराळ प्रवास सुरु झाला तेव्हा आम्ही दोघे आपण खरच अंतराळ प्रवास करत आहोत अस एकमेकाला सांगत होतो अखेर प्रत्येक वेळी काहीतरी इंटरेस्टिंग घडत होत आम्ही दोधेही Tester असल्यामुळे आमच्या Prelaunch क्षणाचा अनुभव लिहून ठेवला कारण भावी पिढीतील अंतराळवीर जेव्हा Atlas रॉकेटचा अनुभव घेतील तेव्हा त्यांना हा अनुभव उपयोगी पडेल आम्ही अंतराळात प्रवेश केला यान प्रवासास लागले आणि आम्ही अनुभवाने शिकत गेलो अंतराळ प्रवासादरम्यान यानातील यंत्रणा देखील आम्ही चेक करत होतो !"

Pam Melroy -" तुम्हा दोघांना पुन्हा अंतराळ स्थानकात पाहून आनंद होत आहे तुमचे अभिनंदन ! Pretty Awesome ! एखाद्या नव्या यानाची Flight Test करण्यासाठीचा पहिला अंतराळ प्रवास करण अत्यंत कठीण आहे त्यात थ्रिल आहे आणि जबाबदारीही ! तुम्ही ती धैर्याने यशस्वीपणे पार पाडली आम्ही पण Super Exited आहोत त्या विषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या Launch बद्दलची लिहून ठेवलेली माहिती मी देखील वाचली मला ती आवडली तुमच्या पहिल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे अंतराळयानाविषयी,प्रवासादरम्यानची यंत्रणा हाताळणी त्यांची कार्यक्षमता ह्या विषयी !"

Butch Wilmore - "ह्यातील यंत्रणा Aircraft पेक्षा थोडी वेगळी आहे त्यातील Simulators चा अनुभव वेगळा आहे ते पॉवरफुल आहेत सुपीरिअर आहेत अत्याधुनिक आहेत त्या मुळे त्याची हाताळणी करताना अडचण आली नाही यानाच्या वेगावर नियंत्रण ठेवण वेग कमीजास्त करण,दिशा बदलण आणि काही अडचण आली तर त्यावर मात करून पुढे मार्गक्रमण करताना गरज पडली तर यान काही क्षण स्थिर ठेवण ह्या गोष्टी सहजतेने करता येतात तुम्ही म्हणालात तस हि पहिली मोहीम होती टेस्ट घेतानाचा प्रत्येक क्षण महत्वाचा होता प्रत्येक स्टेज महत्वाची होती नवीन होती त्या मूळे त्यावर control करताना दक्ष राहण आवश्यक होत हे सार थरारक होत तितकच जाबाबदारीचही शेवटी आम्ही ते साध्य केल !"

Sunita Williams - "मी यानातील डाव्या बाजूच्या सीटवर बसले होते मी बाहेर पाहात होते जोक करत होते मी म्हटल ,Its Mooning Sun Putting Tail !आणि यान अत्यंत स्मूथली प्रवास करू लागल आणि आम्हालाही थोडेस रिलॅक्स वाटायला लागल आम्हाला कोणाचाच गायडन्स नव्हता यानाचा वेग कधी कमीजास्त करायचा बाकीच्या यंत्रणा कशा वापरायच्या हे आम्हालाच ठरवायच होत आणि आम्ही एकमेकांना सूचना देत सार व्यवस्थित हाताळत मार्गक्रमण करत होतो ,खरच हा अंतराळ प्रवास छान आणि थक्क करणारा होता एका पॉईंट वर आम्ही यान स्थिर ठेवता येत का ह्याचाही अनुभव घेतला यानाची दिशा अशा रीतीने बदलली ज्यामुळे पृथ्वीवर संदेश पाठवताना संपर्क करताना अडचण येणार नाही आणि यानातील सौर यंत्रणेला सूर्याच्या दिशेने वळवून सौरऊर्जा मिळेल यान गोलाकार फिरवूनही पाहिले ह्या सर्व यंत्रणा चेक करताना काही वेळ आम्ही नासा संस्थेच्या संपर्कांबाहेर होतो काहीवेळ यानातील स्वयंचलित यंत्रणा बंद करून आम्ही यंत्रणा हाताळली अंतराळ प्रवासा दरम्यान संपर्क तुटला तर काही आपत्ती आल्यास त्यावर कसे नियंत्रण मिळवता येईल ह्या साठी आम्ही ह्या टेस्ट केल्या !"

Butch Wilmore - "ह्या Star liner यानातून पहिला अंतराळ प्रवास करायचा मान मिळण आमच्यासाठी गौरवास्पद आहे आम्ही लकी आहोत ह्या यानाच्या यशस्वी टेस्ट साठी सारेच उत्सुक होते जेव्हा रॉकेट प्रज्वलित होऊन यान स्थानकाच्या दिशेने अंतराळात झेपावले तेव्हा ह्या मोहिमेतील टीममधील सर्वांना आनंद झाला आणि आम्ही स्थानकात सुखरूप पोहोचल्यावर सर्वांनीं मोकळा श्वास घेतला आम्हाला निरोप द्यायला टीममधील सर्वजण,आमचे नातेवाईक मित्र हजर होते त्यांचे लक्ष आमच्या सुरक्षित अंतराळ प्रवास आणि स्थानकातील प्रवेशावर लागले होते अखेर आम्ही स्थानकात पोहोचलो हि मोहीम यशस्वी झाली पण हे यश आम्हा दोघांचं नाही तर टीममधील सर्वांच आहे आम्ही पुन्हा एकदा स्थानकात पोहोचलो आहोत इथे काही दिवस राहणार आहोत आमच्यासाठी अंतराळस्थानाक नवीन नाही आम्ही ह्या आधीही इथे येऊन राहून गेलो आहोत आता स्थानकाची रचना बदललीय स्थानक अत्याधुनिक झालय अंतराळस्थानकात एकाच वेळी तीन वेगवेगळे अंतराळयान पोहोचले आहेत जोडले गेले आहेत अस ह्या पूर्वी कधीही झाल नसेल!"

Bill Nelson -"तुम्ही अंतराळ प्रवासादरम्यान धैर्याने वेगवेगळे प्रयोग करून पाहिले हि संशोधित माहिती मिळवल्याबद्द्ल  आभार आता तुमचा स्थानकातील मुक्काम थोडा वाढलाय तुम्ही गौरवास्पद काम केलय !" 

Sunita Williams -"प्रत्येक अंतराळवीरांची इथे येण्याची स्थानकात वास्तव्य करण्याची इथल्या सायंटिफिक प्रयोगात संशोधनात सहभागी होण्याची इच्छा असते आता आम्ही इथे थोडे जास्त दिवस राहू शकू त्या बद्दल आभार साऱ्या जागाच लक्ष ह्या मोहिमेकडे होत हि मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद आहे !"

Vanessa Wyche - "तुम्हा दोघांना स्थानकात सुरक्षित पोहोचलेले पाहून आनंद होतोय तुमच अभिनंदन ! तुम्ही ह्या सर्वाचं ट्रेनिंग घेतलं असल तरीही नागरिकांना हे जाणून घेण्याची इच्छा आहे कि ह्या नव्या यानातून अंतराळ प्रवासाचा अनुभव वेगळा  होता का!"

Butch Wilmore -"आमच अतराळयान नवीन असल्याने अंतराळवीरांचा अंतराळ प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा ह्या साठी यानाची रचना,अंतराळवीरांना बसण्यासाठीचे सीट,त्यातील यंत्रणा,उपकरण आणि त्यांची कार्यप्रणाली अत्याधुनिक सोयीने उपयुक्त आहे त्या मुळे यंत्रणेची कार्यप्रणाली त्यांची हाताळणी नवी होती आमचे स्पेस सुट पण नवीन आहेत स्थानक मला नवीन नाही मी इथे येऊन गेलो आहे इथे वास्तव्य केले आहे त्या मुळे स्थानक मला माझ्या परिवारासारख वाटत जिथे आपण जा,ये करतो तसच !"

Sunita Williams - "मी पण इथे आधी वास्तव्य केलय पण आता स्थानक बदललय अत्याधुनिक झालय त्याची रचना बदललीय आता प्रत्येक कामासाठी इकडे तिकडे जाव लागत नाही एका ठिकाणाहून सर्व गोष्टी हाताळता येतात इथल जेवण,इथली व्यवस्था नवीन झालीय इथे पायाला IPad लाऊन तरंगत्या अवस्थेत फिरताना,काम करताना मजा येते बोअर होत नाही खूप सुंदर अनुभव आहे हा !"

Vanessa -"Sunita तुझ्या स्थानकातील प्रवेशाच्या वेळचा Dance सोशल मिडीयावर सर्वत्र व्हायरल झालाय त्या बद्दल सांग !

Sunita Williams -" खरच खूप सुंदर क्षण होता तो! अनेकदा आमच उड्डाण ऐनवेळी रद्द झाल लांबल होत अखेर अनेक अडचणींवर मात करून स्थानकात पोहोचल्याचा आनंदाचा क्षण ! थोडफार hatching च्या वेळच Background Music होत आमच्या स्वागताला स्थानकातील सारे अंतराळवीर हजर होते त्यातील काही ओळखीचे होते त्यांची पुन्हा स्थानकात भेट झाली होती Tracy ,Pojo,Janette आम्ही एकत्र ट्रेनिंग घेतलय Mike ,Bar Classmate होते आम्ही खूप दिवसापासून एकमेकांना ओळखतो ,Oleg Nikollai ,Sasha ची launching च्या आधी ओळख झाली त्या मुळे आमची पुनर्भेट झाल्याचा आनंद व्यक्त करण्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती ती!"

Butch Wilmore -"Suni चा Dance व्हायरल होणार अस मला वाटल होत म्हणूनच मी Dance केला नव्हता ! 

त्या नंतर नासा आणि बोईंगच्या अधिकाऱ्यांनी अनेक अडचणींवर मात करून धैर्याने स्थानकात पोहोचून हि मोहीम यशस्वी केल्याबद्दल आणि प्रवासादरम्यान नवीन संशोधित माहिती मिळवल्याबद्दल पुन्हा एकदा ह्या दोन्ही अंतराळवीरांचे अभिनंदन केले आणि कार्गोशिप स्थानकात पोहोचल्यामुळे आणि Space Walk मुळे त्यांचे पृथ्वीवर परतणे काही दिवस लांबल्याचे सांगितले आणि त्यांना स्थानकातील वास्तव्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांचा निरोप घेतला 

Thursday 6 June 2024

नासाचे अंतराळवीर Sunita Williams आणि Butch Wilmore Boeing Star Liner अंतराळयानाच्या मानवी उड्डाण चाचणीसाठी स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ

  

 नासाचे अंतराळवीर Sunita Williams आणि Butch Wilmore Boeing Star Liner अंतराळयानातून स्थानकाच्या दिशेने अंतराळात झेपावताना -फोटो नासा संस्था

नासा संस्था -6 जुन 

नासाचे अंतराळवीर Butch Wilmore आणि भारतीय वंशाची अंतराळवीर Sunita Williams बुधवारी  नासाच्या  Boeing Star liner अंतराळयानाच्या मानवी उड्डाण चाचणीसाठी अंतराळ स्थानकात गेले आहेत Boeing Starliner हे नवे व्यावसायिक अंतराळयान नासाच्या अंतराळवीरांना स्थानकात नेण्या,आणण्यासाठी आणि खाजगी अंतराळ वाहतुकीसाठी बनविण्यात आले आहे ह्या अंतराळयानाच्या पहिल्या दोन मानव विरहित अंतराळ उड्डाण चाचण्या यशस्वी झाल्यानंतर ह्या यानाच्या पहिल्या मानवी उड्डाण चाचणी अंतर्गत हे दोन्ही अंतराळवीर एक आठवड्याच्या वास्तव्यासाठी स्थानकात गेले आहेत 

ह्या आधी Boeing Starliner यानाची उड्डाण चाचणी एकदा अंतराळयानातील लिकेज प्रॉब्लेम मुळे आणि दुसऱ्यांदा उड्डाणाच्या अंतिम क्षणी रॉकेट प्रज्वलित झाल्यानंतरही कॉम्पुटर प्रणालीत बिघाड झाल्याने उड्डाणास विलंब झाल्याचे लक्षात येताच रद्द करण्यात आली होती अखेर ह्या सर्व समस्यांचे निराकरण करून Boeing Starliner अंतराळयान स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाले बुधवारी पाच जूनला नासाच्या Florida येथील Cape Canaveral Space Force Station मधील उड्डाण स्थळावरून 10.52a.m.ला ह्या अंतराळवीरांसह Boeing Star Liner अंतराळयान Atlas V Rocket च्या साहाय्याने यशस्वीपणे अंतराळात झेपावले आणि काही वेळातच अंतराळयान रॉकेट पासून वेगळे होऊन अंतराळ स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाले 

नासाचे Administrator Bill Nelson म्हणतात ,"Boeing Star liner यानाच्या मानवी उड्डाण चाचणीत ऐनवेळी आलेल्या समस्येमुळे ह्या मोहिमेला विलंब झाला तरीही निराश न होता नासाच्या ह्या दोन्ही बोल्ड अंतराळवीरांनी आलेल्या कठीण परिस्थितीवर धैर्याने मात केली आणि अखेर तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवत हि मोहीम यशस्वी केली आता हे अंतराळवीर नवीन कोऱ्या अंतराळयानातून Star liner यानाच्या पहिल्या ऐतिहासिक उड्डाण चाचणीसाठी स्थानकाच्या दिशेने सुरक्षित अंतराळ प्रवास करत आहेत हे पाहून आनंद होत आहे नवीन अंतराळ यानातून मानवी उड्डाण चाचणी  जितकी रिस्की आहे तितकीच Exciting आहे आणि हि पहिली चाचणी घेण भविष्यकालीन अंतराळवीरांच्या अंतराळप्रवासासाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे  Boeing Star liner अंतराळयानातून भविष्यकालीन अंतराळवीरांच्या उड्डाणाच्या शुभारंभासाठी Go Butch !,Go Suni! !"

 Image NASA astronauts Suni Williams and Butch Wilmore inside Boeing's Starliner spacecraft ahead of launch on Wednesday, June 5, 2024.

 नासाचे अंतराळवीर Sunita Williams आणि Butch Wilmore Boeing Star Liner अंतराळयानातून स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ होताना -फोटो -नासा टी वी

Boeing Commercial Crew Program मोहिमेचे Vice President Mark Nappi ह्यांनी देखील Boeing Star liner अंतराळयानाच्या यशस्वी उड्डाणानंतर आनंद व्यक्त केला Boeing Star liner अंतराळयान जेव्हा रॉकेट पासून वेगळे झाले आणि अंतराळात पुढच्या प्रवासाच्या दिशेने मार्गस्थ झाले तेव्हा यान योग्य दिशेने व्यवस्थित प्रवास करत असल्याची खात्री झाली ह्या दोन्ही अंतराळवीरांचा अंतराळ प्रवास सुरक्षित होऊन ते सुखरूप स्थानकात पोहोचावेत आणि पुन्हा सुरक्षितपणे पृथ्वीवर पोहोचावेत अशी आमची इच्छा असल्याने आम्ही त्याच्या सुरक्षित उड्डाणाला महत्व दिले 

Boeing Star liner च्या पहिल्या दोन मानव विरहित चाचणीच्या यशानंतरची हि तिसरी मानवी उड्डाण चाचणी आहे हे दोन्हीही अंतराळवीर अंतराळ प्रवासादरम्यान अंतराळ यानाची उड्डाण क्षमता,यानातील अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रणा त्यांची कार्यान्वित होण्याची क्षमता Transportation System,Environmental control system आणि पृथ्वीवरून स्थानकात जाऊन पुन्हा परत पृथ्वीवर सुखरूप परतण्याची क्षमता ह्या बाबीचे निरीक्षण नोंदवतील ह्या अंतराळप्रवासा दरम्यान Boeing आणि नासा संस्थेतील ह्या मोहिमेतील प्रमुख त्यांच्या लाईव्ह संपर्कात असतील आणि ह्या स्वयंचलित यंत्रणेवर लक्ष ठेवतील सर्व बाबींची व्यवस्थित पूर्तता झाल्यानंतरच Boeing Starliner च्या भविष्यकालीन अंतराळमोहिमेसाठीच्या वापरासाठी अंतिम मंजुरी देण्यात येईल

Boeing Star Liner अंतराळयान जेव्हा स्थानकाच्या Harmony Module जवळ पोहोचेल तेव्हा यानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित होईल आणि स्थानक आणि अंतराळयान ह्यांच्यातील Hatching आणि Docking प्रक्रिया पार पडेल ह्या अंतराळवीरांच्या 25 तासांच्या अंतराळ प्रवासानंतर गुरुवारी सहा जूनला 12.15p.m.ला अंतराळयान स्थानकाजवळ पोहोचेल स्थानकात सध्या राहात असलेल्या नासाच्या अंतराळ मोहीम 71 चे अंतराळवीर त्यांचे स्थानकात स्वागत करतील हे अंतराळवीर एक आठवडा स्थानकात वास्तव्य करतील आणि तेथे सुरु असलेल्या सायंटिफिक प्रयोगात सहभागी होतील