Friday 31 May 2024

Arizona वाळवंटात नासाच्या आर्टेमिस मोहिमेतील Moon Walk आणि Technology चाचणी संपन्न

NASA astronauts Kate Rubins and Andre Douglas push a tool cart loaded with lunar tools through the San Francisco Volcanic Field north of Flagstaff, Arizona, as they practice moonwalking operations for Artemis III. 

 नासाचे अंतराळवीर Kate Rubins आणि Andre Douglas San Francisco Volcanic Field North Flagstaff  Arizona येथील वाळवंटातArtemis मोहिमेतील Tool Cart चाचणी दरम्यान -फोटो नासा संस्था 

नासा संस्था - 31 मे

नासाच्या आर्टेमिस -III मोहिमे अंतर्गत अंतराळवीर चंद्रावर जाणार आहेत चांद्रभूमीवर उतरून तिथल्या भूपृष्ठावरील,वातावरणातील आणि भूगर्भातील संशोधित माहिती आणि नमुने गोळा करणार आहेत सध्या ह्या मोहिमेची जय्यत तयारी सुरु आहे अंतराळवीरांना चंद्रभूमीवर फिरण्यासाठी नासा संस्थेने रोव्हर तयार करण्याची तीन कंपन्यांना परवानगी दिली होती ह्या अंतराळवीरांच्या आर्टीमस चांद्रमोहिमेसाठी नवीन स्पेससूटही तयार करण्यात आला आहे ह्या मोहिमेतील अंतराळवीरांसाठी तयार करण्यात आलेला स्पेससूट,रोव्हर त्यातील सायंटिफिक उपकरणे  आणि अत्याधुनिक यंत्रणा ह्यांच्या परिपूर्णतेची चाचणी एक आठवडाभर घेण्यात आली 

नासाचे अंतराळवीर Kate Rubins आणि Andre Douglas ह्या दोघांनी एकत्रित ह्या चाचणीत सहभाग नोंदवला San Francisco येथील Arizona वाळवंटात हि चाचणी पार पडली ह्या चाचणी दरम्यान ह्या अंतराळवीरांनी आर्टीमस मोहिमेतील भविष्यकालीन अंतराळवीरा सारखाच स्पेससूट परिधान करून Lunar Roving Robot आणि त्यातील यंत्रणेच्या परीपूर्णतेची चाचणी घेतली ह्या वाळवंटी भागातून मार्गक्रमण करताना स्पेस सूट सिस्टीम आणि रोव्हर मधील सर्व सायंटिफिक  प्रयोगासाठी वापरण्यात येणारी Operation  System,हार्डवेअर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कार्यक्षमता चेक केली आणी मातीचे नमुनेही गोळा केले

NASA astronaut Kate Rubins observes a geology sample she collected during a simulated moonwalk.

अंतराळवीर Kate Rubins Arizona वाळवंटातील Moon Walk दरम्यान नमुने गोळा करताना -फोटो -नासा संस्था

Arizona वाळवंटाचा हा भाग चंद्रभूमीशी साधर्म्य असलेला आहे इथे भूकंप प्रवण क्षेत्र आणी craters आहेत त्यामुळे अपोलो मोहिमेतील अंतराळवीरांच्या ट्रेनिंगसाठी देखील हा भाग वापरण्यात आला होता नासाच्या JPL संस्थेचे प्रमुख ,Flight Controllers ह्या मोहिमेतील.शास्त्रज्ञ,ईंजीनीअर्स आणी Field experts ह्यांच्या ऊपस्थितीत आणी मार्गदर्शनात अंतराळवीरांनी हि चाचणी पुर्ण केली  

भविष्यकालिन आर्टिमस मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षितेसाठी आणी यशस्वीतेसाठी ह्या Moon Walk आणी Technology testची आवश्यकता होती असे नासाच्या J.PL संस्थेच्या Field Test Director Barbara Janoiko म्हणतात भविष्य कालीन आर्टीमस मोहिमेतील अंतराळवीरांच्या  चंद्र भुमीवरील मार्गक्रमणात,संशोधनात काही अडथळे येऊ नयेत त्यांची मोहीम निर्विघ्न पणे पार पडावी म्हणून हि तयारी करण्यात आली आर्टिमस III मोहिमेत चार Simulated Moon Walk आणी सहा Advanced Technology runs चा समावेश होता

प्रत्यक्षात आर्टिमस मोहिमेतील अंतराळवीर जेव्हा चंद्रावर पोहोचतील तेथील भुमीवर ऊतरुन संशोधीत माहिती व नमुने गोळा करतील तेव्हा हि चाचणी ऊपयुक्त ठरेल नासा संस्थेतील ह्या मोहिमेतील शास्त्रज्ञ आणी ईंजीनीअर्स त्यांना पृथ्वीवरून योग्य मार्गदर्शन करु शकतील हे अंतराळवीर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील संशोधनात्मक माहिती गोळा करतील तेथील आव्हानत्मक भौगोलिक परीस्थितीचा,वातावरणाचा आढावा घेतील संशोधित माहिती मिळवतील 

ह्या चाचणी नंतर आता ह्या मोहिमेतील Flight Controller,शास्त्रज्ञ,ईंजीनीअर्स आणी Field experts एकत्रीत जमुन चर्चा करतील आणी ह्या मोहिमेतील यंत्रणेत काही त्रुटी असल्यास दुर करतील

Wednesday 22 May 2024

Blue Origin च्या NS-25 मोहीममेतील सहा प्रवाशांनी घेतला अंतराळ पर्यटनाचा अदभुत अनुभव

 Ed Dwight Blue Origin च्या New Shepard अंतराळ यानातून अंतराळ पर्यटन करून पृथ्वीवर परतल्यावर -फोटो -Blue Origin

Blue Origin- 20 मे

Blue Origin च्या NS-25 मोहिमेतील सहा अंतराळ प्रवाशांनी 19 मे ला अंतराळ पर्यटनाचा अदभूत आनंद घेतला हे प्रवासी Blue Origin च्या व्यावसायिक मोहिमे अंतर्गत अंतराळ प्रवासास गेले होते Blue Origin ची हि सातवी यशस्वी अंतराळ पर्यटन मोहीम होती

ह्या मोहिमेत Manson Angel,Sylvain Chiron, Kenneth L.Hess,Carol Schaller, Gopi Thotukura आणी रिटायर्ड Air force Captain Ed Dwight ह्यांचा समावेश होता 

भारतीय वंशाचे Gopi Thotukura मूळचे भारतीय आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आहेत ते  कुशल आणि अनुभवी Pilot आणि Aviator आहेत त्यांना Jet ,Bush,Aerobatic व्यावसायिक विमान उड्डाणाचा अनुभव आहे शिवाय Seaplanes ,Gliders आणि Hot Air Balloons उड्डाणाचाही अनुभव आहे त्यांनी Embry-Riddle Aeronautical University मधून पदवी घेतली असून रस्त्यावर गाडी चालविण्या आधीच त्यांनी आकाशात विमान उड्डाण केले होते 

 

             Blue Origin NS -25 मोहिमेतील अंतराळ पर्यटक -फोटो -Blue Origin

हे सर्व अंतराळप्रवासी Blue Originच्या  New Sheperd अंतराळयानातुन अंतराळ पर्यटनास गेले होते Blue Origin च्या West Texas  मधील ऊड्डाण स्थळावरुन रविवारी New Sheperd अंतराळयान 9.36 वाजता रॉकेटच्या सहाय्याने ह्या अंतराळ प्रवाशांसह अंतराळात झेपावले आणी काही वेळातच अंतराळात पोहोचले यानाने अत्यंत वेगाने अंतराळ आणी पृथ्वीची सिमारेषा भेदली आणी यान पृथ्वीच्या वर 62 मैल अंतरावर (100कि.मी.) पोहोचले 

अंतराळातील झीरो ग्रॅव्हिटित पोहोचताच सर्वांनी आनंदाने जल्लोष केला आणी झीरो ग्रॅव्हिटितील वजनरहित अवस्थेत तरंगण्याचा अदभूत आनंद घेतला त्यांच्या तोंडून Oh! My God ! असे उद्गार बाहेर पडले सर्वांनी एकमेकांना अंतराळयानाच्या खिडकीतून पृथ्वीचे अलौकिक सौंदर्य पहा असे सांगितले

ह्या वेळी अंतराळातून Blue Origin शी लाईव्ह संवाद साधताना Ed Dwight म्हणाले ,"मी साठ वर्षांनी अंतराळात पोहोचलो माझी ईच्छा पुर्ण झालीय ह्यावर माझा विश्वास बसत नाही !"

भारतीय वंशाचे Gopi Thotukura ह्यांनी देखील ऊत्स्फुर्त प्रतिक्रिया व्यक्त करीत," भारताचा झेंडा दाखवत ह्या Blue Origin च्या व्यावसायिक मोहिमेत अंतराळप्रवास करायला मिळाला म्हणून सन्माननीय वाटत आहे मला भारताचा अभिमान वाटतो असे सांगितले !"

हे सर्व प्रवासी काही मिनिटे झीरो ग्रॅव्हिटिचा अदभूत आनंद घेऊन पृथ्वीवर सुखरूप परतले पृथ्वीच्या कक्षेत शिरताच हे सर्वजण पॅराशुटच्या सहाय्याने खाली ऊतरले 

Ed Dwight पृथ्वीवर परतले तेव्हा त्यांना प्रवास कसा झाला असे विचारले तेव्हा ," हा माझ्या आयुष्यातील life changing अदभूत अनुभव होता मी 91 व्या वर्षी अंतराळप्रवास करून आलो मी आनंदी आहे माझी  Black Astronaut म्हणून निवड झाली होती मी आवश्यक ट्रेनिंगही पुर्ण केले होते पण ऐनवेळी वर्णभेदामुळे मला अंतराळ प्रवासाची परवानगी मिळाली नाही माझ्यात पात्रता असुनही मला जाता आले नव्हते म्हणून मी निराश झालो होतो पण अखेर Blue Origin मुळे माझी ईच्छा पुर्ण झाल्याचे सांगितले 

ह्या मोहिमेनंतर Ed Dwight ह्यांची 91 व्या वर्षी अंतराळ प्रवास करणारे सर्वात Oldest Astronaut म्हणून विक्रमी नोंद करण्यात आली असून Gopi Thotkura ह्यांची Blue Origin मधून अंतराळप्रवास करणारे पहिले भारतीय पर्यटक अंतराळवीर आणी व्यावसायिक अंतराळप्रवास करणारे दुसरे अंतराळवीर म्हणून नोंद झाली आहे ह्या आधी रॉकेश शर्मा पहिल्यांंदा अंतराळात गेले होते 

ह्या सर्व अंतराळ प्रवाशांना आता अंतराळवीर झाल्याचा NS -25 Mission Patch देण्यात आला आणि अंतराळवीर म्हणून मान्यता देण्यात आली 


Friday 17 May 2024

सुर्याच्या अंतर्गत भागातुन अत्यंत शक्तीशाली आगीच्या ज्वाळांचे उत्सर्जन

  An image of the Sun shows a bright flash in the bottom right side where a solar flare erupts.

 14 मे ला सौर विस्फोट आणि सौर वादळा मुळे सूर्याच्या अंतरंगातून अंतराळात उत्सर्जित होणाऱ्या आगीच्या ज्वाळा -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -16 मे

सुर्याच्या अंतर्गत भागातून 13 मे व 14 मेला अत्यंत वेगाने शक्तीशाली आगीचे लोट अंतराळात फेकल्या गेल्याची माहिती नासाच्या Solar Dynamics Observatory ने दिली आहे ह्या वेगाने बाहेर पडणाऱ्या ज्वाळांचे फोटो देखील Solar Dynamics Observatory ने टिपले आहेत  ह्या फोटोत आगीच्या ज्वाळांचे लोट बाहेर फेकल्या गेल्या नंतर सूर्या पासून बाहेर पडलेल्या Ultra Violet rays मुळे हा भाग सोनेरी निळसर रंगाने अत्यंत प्रकाशमान झाला आहे  हे आगीचे लोट अंतराळात फेकल्या गेल्या मुळे पृथ्वीला धोका होऊ शकतो असा ईशाराही नासा संस्थेच्या वेधशाळेने दिला होता त्या मुळे पृथ्वीवरील यंत्रणा सतर्क झाली आणि स्थानकातील अंतराळवीरांनी काही विपरीत घडू नये म्हणून आधीच खबरदारी घेतली होती सौर उपकरण,सौर प्रणाली काही वेळ बंद ठेवली होती
 
 2024 च्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सौर वादळाला सुरवात झाली सूर्याच्या बाहेरील करोनाच्या सक्रिय स्फोटक क्षेत्रातून ज्वालाग्नी भडकत होता त्यातून आगीचे लोट विद्युत भारित सूक्ष्म कण बाहेर पडत होते 7-11 मे ह्या दिवसात स्फोटाची तीव्रता वाढली सौरवादळे होऊन मोठया प्रमाणात आगीचे लोट बाहेर पडू लागले 13 व 14 मेला सौर वादळ आणखीनच तीव्र झाले आणी करोनाच्या सक्रिय स्फोटक क्षेत्रातील दोन भागातून 13 तारखेला  संध्याकाळी 10.09 वाजता आणि 14 तारखेला 8.55 ला पुन्हा शक्तिशाली धगधगत्या आगीच्या ज्वाळांचे अनेक लोट बाहेर पडले त्या पैकी आठ ज्वाळा अत्यंत शक्तिशाली होत्या हे सौर वादळ आणि त्यामुळे बाहेर पडणाऱ्या आगीच्या ज्वाळा ताशी तीन मिलियन मैल वेगाने पृथ्वीच्या दिशेने बाहेर पडत होत्या असे सौर वादळ 2003 मध्ये झाले होते त्या नंतर वीस वर्षांनी आता पाहायला मिळाले असे नासाचे शास्त्रज्ञ म्हणतात 
हे सौरवादळ जेव्हा पृथ्वीवर पोहोचले तेव्हा विद्युत भारित किरणे,वायू,धूलिकण ह्यांनी तयार झालेले ढग  आकाशात जमले त्या मुळे पृथ्वीवासीयांना आकाशात रंगीबेरंगी Auroraचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळाले दक्षिण अमेरिका,कॅलिफोर्निया आणि उत्तर भारतातील काही भागात ह्या Aurora चे दृश्य दिसले 


Red and green streaks of an aurora radiate out from the center of the photo. Black silhouettes of trees line the edge.

10 मे ला South Western British Columbia येथे दिसलेले सौर वादळामुळे निर्माण झालेले नयनरम्य Aurora चे दृश्य -फोटो -नासा संस्था
 
सर्व जगाला प्रकाशमान करणारा सुर्य प्रत्यक्षात आगीचा पेटता गोळा आहे त्याच्या अंतर्गत भागात ज्वलनशील पदार्थ आणी वायूमुळे सतत आग घुमसत असते आणी त्यापासून तयार होणारे आगीचे लोट,ज्वाळा,विध्युत भारीत किरणे वायुकण प्रचंड वेगाने सुर्याच्या करोना ह्या भागात फेकल्या जातात त्यामुळे तेथील भागात तीव्र उष्णता आणि प्रकाश असतो ह्या भागातील चुंबकीय क्षेत्रात ज्वलनशील पदार्थ,वायू,विद्युतभारीत किरणे,विद्युतभारीत कण गोलाकार फिरत असतात तेथे सतत ऊष्ण सौर वारे वहात असतात,सौरवादळे होतात जेव्हा ह्या वादळाची तिव्रता वाढते तेव्हा शक्तीशाली स्फोट होतात आणि त्यामुळे निर्माण झालेले आगीचे लोट ह्या चुंबकीय क्षेत्रातुन बाहेर अंतराळात फेकल्या जातात आणी ह्या भडकत्या शक्तीशाली ज्वाळांमधून अपायकारक विनाशकारी सौर कीरणे बाहेर पडतात पृथ्वीवरील रेडिओ Communications ,Electric Power Grids ,Navigation Signals अंतराळ यान आणि अंतराळस्थानकात राहणाऱ्या अंतराळवीरांसाठी  हे सौर वादळ धोकादायक ठरू शकते

Wednesday 15 May 2024

Blue Origin 19 मेला सहा नागरिकांना अंतराळ पर्यटन घडवणार

 

   Blue Origin च्या NS -25 अंतराळयानातून अंतराळ पर्यटन करणारे नागरिक -फोटो -Blue Origin

Blue Origin- 15 मे 

सामान्य हौशी नागरिकांना अंतराळ पर्यटन घडविण्यासाठी अमेरिकेने खाजगी कंपन्यांंना परवानगी दिल्या नंतर Blue Origin कंपनीने नागरिकांना  New Shepard अंतराळयानातुन सहा वेळा अंतराळ पर्यटन घडविले आता सातव्यांंदा Blue Origin सहा प्रवाशांना अंतराळ पर्यटन घडविणार आहे 

 

                    Blue Origin कंपनीने   NS -25 मोहिमेसाठी बनविलेला Mission Patch

19 मेला कंपनीच्या West Texas येथील Launch -1 ऊड्डाण स्थळावरुन NS-25 अंतराळयान NS Rocket च्या सहाय्याने ह्या सहा नागरिकांसह अंतराळात ऊड्डाण करेल Blue Origin च्या NS-25 अंतराळयानातुन अंतराळ प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये 

Mason Angel,Sylvain Chiron ,Kenneth L Hess,Carol Schaller,Gopi Thotakura,Former Airforce Captain Ed Dwight ह्यांचा समावेश आहे Ed Dwight ह्यांची अमेरिकेचे अध्यक्ष John F.Kennedy ह्यांनी 1961मध्ये Black अंतराळवीर म्हणून निवड केली पण वर्णभेदामुळे त्यांना अंतराळ प्रवासास परवानगी मिळाली नव्हती

हे सहा प्रवासी NS -25 अंतराळ यानातुन काही मिनिटे अंतराळ प्रवास करतील अंतराळयान पृथ्वी व अंतराळ ह्या मधील कक्षा भेदून पृथ्वीच्या वर62 मैल ( 100कि.मी.) अंतरावर पोहोचेल तेव्हा काही मिनिटे हे अंतराळ प्रवासी वजनरहित अवस्था अनुभवतील आणी यानात 360 अंशात सर्व बाजूने तरंगण्याचा अद्भुत अनुभव घेतील आणी पुन्हा काही मिनिटात पृथ्वीवर सुखरूप परततील 

 Blue Origin च्या ह्या सातव्या मोहिमेसाठी  NS -25 Mission Patch बनविण्यात आला असून त्यावर ह्या अंतराळ प्रवाशांचे वैशिष्ट दर्शविणारी चिन्हे कोरली आहेत


Sunday 5 May 2024

नासाच्या आर्टिमस मोहिमेतील चंद्रवृक्ष लागवडीसाठी संस्थाची निवड जाहीर


                      

नासाच्या North Carolina येथील Governors Mansion Ceremony मधील शुभारंभाच्या कार्यक्रमातील Loblolly Pine Artemis I Moon Tree -फोटो -नासा संस्था

नासा संस्था- 5 मे

नासाच्या आर्टिमस मोहिमेतील चंद्रवृक्ष लागवड अभियाना अंतर्गत नागरिकांना त्यांच्या घरी किंवा संस्थेत रोप लागवड करण्याची सुवर्णसंधी नासा संस्थेने जाहीर केली होती त्याला इच्छुक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नासा संस्थेकडे आलेल्या शेकडो अर्जातून रोप लागवडीसाठी काही संस्थांची निवड निश्चित करण्यात आली हि रोप लागवड मोहीम 2024 -2025 मध्ये राबविण्यात येणार असून टप्प्या टप्प्याने ह्या रोपांचे वाटप करण्यात येणार आहे

नासा संस्थेने ह्या चंद्र वृक्षाच्या रोप लागवडीसाठी निवड निश्चित करताना संस्थेतील संबंधित व्यक्तींची आवश्यक पात्रता त्यांची रोप लागवडीची आवड,ती वाढवताना जोपासना करण्याची वृत्ती रोपांची काळजी घेण्याची क्षमता आणि भविष्यात ह्या वाढलेल्या चंद्र वृक्षापासून आर्टीमस जनरेशन मधील मुलांना मिळणारी शैक्षणिक संधी ह्या बाबींचा विचार केला गेला

नासाचे Administrator Bill Nelson म्हणतात,"ह्या आर्टीमस वृक्ष लागवड अभियाना नंतर चंद्र वृक्षाच्या नव्या युगाचा शुभारंभ होईल कारण पृथ्वीवरील सर्व मानवाचा अंतराळावर हक्क आहे अवकाश आपल्या सर्वांचे आहे जेव्हा हि आर्टीमस जनरेशन रोपांची लागवड करतील त्यांची जोपासना करतील काळजी घेतील तेव्हा भविष्यकालीन अंतराळवीरांना आणि संशोधकांना रोप लागवडीसाठी सुपीक जमिनीचा शोध घेण्यासाठी प्रेरित करतील !"

मागच्या महिन्यात 24 एप्रिलला ह्या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ झाला आर्टीमस -II मोहिमेतील अंतराळवीर Christina Koch ह्यांनी त्यांच्या North Carolina राज्याला भेट दिली तेव्हा आर्टीमस मोहिमेच्या स्मरणार्थ तेथील Governor Mansion मधील Tree Dedication Ceremony समारंभात सहभागी होत त्यांनी पहिल्या चंद्रवृक्षाचे रोप लावून ह्या अभियानाचा शुभारंभ केला  Christina Koch ह्यांच्या Alma Mater White Oak High School तर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला 

नासाच्या अपोलो -14 चांद्र मोहिमेत ह्या चंद्र वृक्षांच्या रोपांच्या बिया अंतराळवीर Stuart Roosa ह्यांनी चंद्रावर सोबत नेल्या होत्या त्यांनी अमेरिकेतील Forest Officer ला विनंती करून 500 रोपांच्या बिया त्यांच्या सोबत चंद्रावर नेण्यासाठी मागितल्या होत्या ह्या बियांवर अंतराळप्रवासा दरम्यान आणी चंद्रावरील वातावरणात काय बदल होतो त्यांची वाढ कशी होते ह्या बाबतीत त्यांना संशोधन करावयाचे होते ह्या रोपांच्या बियांनी देखील अंतराळयानातून त्यांच्या सोबत चंद्राच्या पृष्ठभागाभोवती भ्रमण केले होते  ह्या मोहीमेतील अंतराळवीर चंद्रभुमीवर ऊतरुन तेथील मातीचे नमुने गोळा करून आणे पर्यंत त्यांनी यानातुन चंद्राभोवती फेऱ्या मारल्या होत्या ह्या बियांनी चंद्रावर 270,000 मैलाचा अंतराळ प्रवास केला पृथ्वीवर परतल्यानंतर नासा संस्थेत त्यांची लागवड करण्यात आली त्या नंतर 2022 मध्ये आर्टीमस -1 मोहिमेतील Orion अंतराळ यानातून त्यातील काही रोपे चंद्रावर पाठवण्यात आली होती त्या मध्ये मूळ चंद्रवृक्षातील Sycamores,Sweetgums Douglas Firs,Loblolly pins आणि Giant Sequoias ह्या जातीच्या रोपांसह इतर रोपांचा समावेश होता

ह्या मोहिमेतील Forest Service Chief Randy Moore म्हणतात "ह्या रोपांचा पृथ्वीपासून चंद्र आणि पुन्हा पृथ्वी पर्यंतचा हा प्रवास किती अविश्वसनीय आहे आता ह्या रोपांच्या प्रवासाचा हा अंतिम टप्पा आहे ह्या देशातील संस्थेत किंवा कॅम्पस मध्ये ह्या रोपांची वाढ होताना पाहायला आम्ही उत्सुक आहोत हि झाडे जेव्हा वाढतील तेव्हा ती शतकानुशतके मानवाला आनंद देतील,सावली देतील आणि शास्त्रज्ञाना शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरतील !''

अमेरिकेतील 48 राज्यातील 50 संस्थांच्या अर्जाचे काळजीपूर्वक निरीक्षण करून हि निवड करण्यात आली असून आता 2024-2025 ह्या वर्षात टप्प्या टप्प्याने ह्या चंद्रवृक्षांच्या रोपांचे वाटप करण्यात येणार असून अमेरिकेतील फॉरेस्ट डिपार्टमेंट मधील अधिकारी आणि नासा संस्थेतील ह्या अभियानातील शास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनात ह्या रोपांची लागवड व जोपासना करण्यात येईल