Tuesday 30 April 2024

Boeing Starliner अंतराळयानाच्या पहिल्या मानवी ऊड्डाण चाचणीसाठी अंतराळवीर Sunita Williams आणी Buch Wilmore स्थानकात जाण्यासाठी सज्ज

 

अंतराळवीर Sunita Williams आणि Butch Wilmore नासाच्या Florida येथील Kennedy Space Center मध्ये Flight Test साठी दाखल झाल्यानंतर

नासा संस्था - 29 एप्रिल

अमेरिकेची बंद पडलेली अमेरिकन भूमीतून स्वनिर्मित अंतराळ यान ऊड्डाण मोहीम पुन्हा सुरु झाल्यानंतर अमेरिकेने खाजगी संस्थांना अंतराळयान बनविण्यासाठी आणी व्यावसायिक अंतराळयान  ऊड्डाणाची परवानगी दिली त्या नंतर Space X Crew Dragon व Cargo Ship अंतराळस्थानकात अंतराळवीरांची व सामानाची  सुखरूप  ने आण करीत आहेत आता Boeing Starliner अंतराळयान मानवी ऊड्डाणासाठी सज्ज झाले आहे येत्या 6 मेला ह्या अंतराळयानाची मानवी ऊड्डाण चाचणी होणार आहे

नासाची अंतराळवीर Sunita Williams आणी Butch Wilmore हे दोघे ह्या ऊड्डाण चाचणीत सहभागी होऊन स्थानकात वास्तव्यास जाणार आहेत सध्या त्यांचे ऊड्डाणपुर्व ट्रेनिंग सुरू आहे या मोहीमेत Butch Wilmore कमांडरपद आणी Sunita Williams पायलटपद सांभाळणार आहेत 

नासाच्या Florida Space Force Station मधील Cape Canaveral Space Launch Complex 41 येथील ऊड्डाण स्थळावरुन Boeing Starliner अंतराळयानातुन हे अंतराळवीर स्थानकात जाण्यासाठी ऊड्डाण करतील 6 मेला सोमवारी 10.34 p.m.ला Atlas V Rocket च्या सहाय्याने Boeing Starliner अंतराळयान ह्या अंतराळवीरांसह स्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावेल आणि 8 मेला बुधवारी स्थानकात पोहोचेल

हे दोन्हीही अंतराळवीर स्थानकात एक आठवडा वास्तव्य करतील त्या नंतर ते पृथ्वीवर परततील सध्या हे अंतराळवीर उड्डाणस्थळी दाखल झाले असून उड्डाणपूर्व तयारीत व्यस्त आहेत ह्या अंतराळविरांची नव्या अंतराळयानातुन हि पहिलीच  व्यावसायिक ऊड्डाण चाचणी असल्यामुळे आवश्यक ऊड्डाणपुर्व चाचण्या घेण्यात आल्या असून ह्या अंतराळवीरांनी 26 एप्रिलला अंतराळयानातील Software System चेकिंग,स्पेससूट चेकिंग व इतर आवश्यक गोष्टी चेक केल्या 

Boeing Starliner  अंतराळयान Spacious आहे त्यामध्ये चार अंतराळवीर आरामात बसून अंतराळ प्रवास करू शकतील अंतराळयानाच्या यशस्वी उड्डाण मोहिमेनंतर ह्या अंतराळयानाच्या व्यावसायिक अंतराळ उड्डाणावर शिक्कामोर्तब होईल आणि त्या नंतर अंतराळवीरांना स्थानकात नेण्याण्यासाठी व स्थानकात सामान नेण्याआणण्यासाठी कार्गोशिप साठी ह्या यानाचा नियमित वापर सुरु होईल 

ह्या Boeing Starliner अंतराळयानाच्या आणि अंतराळवीरांच्या ह्या पहिल्या स्थानकाकडील उड्डाणाचे व स्थानकातील  प्रवेशाचे लाईव्ह प्रसारण नासा टी वी .वरून करण्यात येणार आहे

Monday 29 April 2024

अंतराळस्थानाच्या तांत्रिक कामासाठी रशियन अंतराळवीर Oleg Kononenko आणि Nikolai Chub ह्यांचा स्पेसवॉक संपन्न

 Spacewalkers Oleg Kononenko and Nikolai are pictured shortly after their spacewalk began on Thursday, April 25, 2024, for hardware and science installation work. Credit: NASA TV

नासाच्या अंतराळ मोहीम 71 चे रशियन अंतराळवीर Oleg Kononenko आणि Nikolai Chub स्थानकाच्या रशियन सेगमेंट बाहेरील भागात स्पेसवॉक करताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -26 एप्रिल

नासाच्या अंतराळ मोहीम 71चे अंतराळवीर Oleg Kononenko आणि Nikolai Chub ह्यांनी अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी  25 एप्रिलला स्पेसवॉक केला हा स्पेसवॉक रशियन सेगमेंट बाहेरील भागातील Radar System मधील कामासाठी करण्यात आला 25 एप्रिलला हे दोन्ही अंतराळवीर 10.55 a.m.ला स्पेसवॉक करण्यासाठी स्थानकाबाहेर पडले आणि 3.33 p.m.ला स्पेसवॉक संपवून स्थानकात परतले 

चार तास छत्तीस मिनिटे चाललेल्या ह्या  स्पेसवॉक दरम्यान ह्या दोन्ही अंतराळवीरांनी रशियन सेगमेंट बाहेरील  Nauka Module भागातील  Synthetic Radar System वर पॅनल Install केले शिवाय स्थानकाच्या कामासाठी लागणारे Hardware आणि स्थानकातील लॅबमध्ये सुरु असलेल्या संशोधन आणि सायंटिफिक प्रयोगासाठी लागणारे सायंटिफिक उपकरण फिक्स केले शिवाय धुळीमुळे किंवा इतर कारणामुळे स्थानकाबाहेरील भाग खराब होतो तो भाग झिजतो,गंजतो हि झीज किती प्रमाणात झाली ह्याचे निरीक्षण नोंदविण्यासाठी प्रायोगिक साहित्य फिक्स केले 

ह्या दोन्हीही अंतराळवीरांनी ह्या स्पेसवॉक साठी आधीच तयारी करून ठेवली होती त्यांनी त्यांचे स्पेससूट चार्ज केले त्यातून लिकेज होत नाही ना ? ह्याचे चेकिंग केले आणि स्पेसवॉक साठी लागणारे Hardware ,बॅटरी व इतर साहित्य चेक केले होते ह्या स्पेसवॉक साठी अंतराळवीर Oleg ह्यांनी लाल रंगाच्या रेषा असलेला Orlan स्पेससूट परिधान केला होता आणि अंतराळवीर Nikolai ह्यांनी निळ्या रंगांच्या रेषा असलेला Orlan स्पेससूट परिधान केला होता 

अंतराळवीर Oleg Kononenko ह्यांच्या अंतराळ कारकिर्दीतील हा सातवा स्पेसवॉक होता आणि अंतराळवीर Nikolai Chub ह्यांचा हा दुसरा स्पेसवॉक होता अंतराळ स्थानकाच्या कामासाठी अंतराळवीरांनी केलेला आजपर्यंतचा हा 270 वा स्पेसवॉक होता

Wednesday 24 April 2024

गुरु ग्रहाच्या Jovian चंद्रावर ज्युनो यानाला आधळले ज्वालामुखीच्या ऊद्रेकानंतर निर्माण झालेले तळे व डोंगर

 Looking Into Io's Loki Patera (Artist's Concept)

 नासाच्या ज्यूनो अंतराळयानातील Juno Cam Imager ने घेतलेल्या क्लोजअप वरून शास्त्रज्ञांनी Animation द्वारे तयार केलेला जोव्हियन चंद्रावरील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर निर्माण झालेल्या Loki Patera तळ्याचा फोटो -फोटो -नासा संस्था

नासा संस्था-19 एप्रिल

नासाच्या जुनो मोहीमेतील ज्युनो अंतराळयान गुरु ग्रहाविषयी माहिती मिळवण्यासाठी 5 ऑगस्ट 2011 मध्ये पृथ्वीवरुन गुरुच्या दिशेने अंतराळ प्रवासास निघाले आणी पाच वर्षांनी 5जुलै 2016 मध्ये गुरू ग्रहावर पोहोचले तेव्हापासून ज्युनो यान गुरु ग्रहाभोवती भ्रमण करत आहे गुरु ग्रहाभोवती भ्रमण करत असताना तेथील वातावरणातील व गुरू ग्रहाविषयी मिळालेली संशोधीत माहिती व फोटो पृथ्वीवर पाठवत आहे ज्युनो अंतराळयानाने भ्रमणा दरम्यान आजवर गुरु ग्रह व गुरुचे अनेक चंद्र ह्या विषयी अत्यंत महत्त्वपुर्ण संशोधीत माहिती पृथ्वीवर पाठविली आहे गुरु ग्रहाला सर्वाधिक म्हणजे 95 चंद्र आहेत त्यातील फक्त 4 मोठे चंद्र आहेत असा शोध गॅलिलिओ ह्यांनी ह्या आधीच लावला होता आता गुरुचा चंद्र Jovian विषयी नवी माहिती व फोटो ज्युनो यानाने पृथ्वीवर पाठविले आहेत 

 नासाच्या ज्युनो अंतराळ मोहिमेतील प्रमुख शास्त्रज्ञ Scott Bolton ह्यांनी हि नवी संशोधीत माहिती प्रसारित केली आहे ज्युनो यानाने गुरु ग्रहाच्या जोव्हियन चंद्राभोवती मारलेल्या नव्या फेऱ्या दरम्यान तेथील ज्वालामुखीनी भरलेल्या क्षेत्रातील नवीन माहिती मिळवली आहे  ज्युनो यानाला भ्रमणादरम्यान तेथील ज्वालामुखीच्या क्षेत्रात झालेल्या ज्वालामुखीच्या ऊद्रेकानंतर बाहेर पडलेला लाव्हा रस थंड होताना तेथे एक तळे व डोंगर  निर्माण झालेले आधळले ज्युनो अंतराळ यानाने यानातील अत्याधुनिक ऊपकरण व कॅमेऱ्याच्या सहाय्याने गोळा केलेली हि संशोधीत नवी माहिती व त्याचे फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत

https://www.nasa.gov/wp-content/uploads/2024/04/e1-pia25697-pj60-io-junocam.jpeg

 ज्यूनो अंतराळ यानाने गुरु ग्रहाभोवती मारलेल्या 60 व्या फेरी दरम्यान 9 एप्रिलला घेतलेला गुरु ग्रहाच्या जोव्हियन चंद्राचा फोटो -फोटो -नासा संस्था  

गुरुच्या जोव्हियन चंद्रावरील हा भाग ज्वालामुखीनी भरलेला आहे डिसेंबर 2023 आणी फेब्रुवारी 2024 मध्ये चंद्राच्या Northern latitude च्या जवळुन 1,500k.m.(930 मैल) अंतरावरुन फेऱ्या मारताना ज्युनो यानाला हा भाग आढळला ह्या विषयी माहिती देताना ह्या मोहिमेचे प्रमुख शास्त्रज्ञ Boltonम्हणतात," जोव्हियन चंद्रावरील ह्या भागात भरपूर ज्वालामुखी आहेत पण मोहिमेतील शास्त्रज्ञांनी त्यातील काही भागाचा वेध घेतला ज्युनो यानातील अत्याधुनिक कॅमेऱ्यातील ऊपकरणाद्वारे जवळुन घेतलेल्या क्लोजअप मुळे हि माहिती मिळाली जोव्हियन चंद्राच्या ह्या भागातील ज्वालामुखीच्या  ऊद्रेकानंतर बाहेर पडलेल्या लाव्हारसापासुन तयार झालेल्या 200 मीटर लांबीच्या  (127मैल) Loki Patera नावाच्या तळ्याचा शोध आम्हाला लागला हे तळे लाव्हारस थंड होताना तयार झाले ह्या तळ्याच्या आतील भुगर्भात तप्त Magma असण्याची शक्यता आहे पण त्याचा वरील पृष्ठभाग काचेसारखा गुळगुळीत,चकचकीत आणी पारदर्शक आहे पृथ्वीवरील ज्वालामुखीच्या ऊद्रेकानंतर तयार होणाऱ्या ऑब्सिडियन काचेसारखाच हा भाग दिसत आहे बाजूला डोंगर देखील दिसत आहे !"

जुनोच्या रेडीओमिटर  (MWR) ऊपकरणाद्वारे संकलीत केलेल्या संशोधीत माहितीवरून जोव्हियन मध्ये गुरूच्या ईतर चंद्राच्या तुलनेत,तुलनेने गुळगुळीत पृष्ठभाग व मध्य अक्षांशा पेक्षाही थंड असलेले ध्रुव देखील आहेत

जुनो यानाने तेथील वातावरणातील चक्रीवादळे आणी पाण्याच्या अस्तित्वाच्या शोधाविषयीही संशोधीत माहिती मिळवली आहे गुरु ग्रहाच्या युरोपा ह्या चंद्रावर पाण्याचे फवारे उडत असल्याचे आढळल्यामुळे तेथे सखोल संशोधन करण्यात आले तेव्हा तेथील भुप्रुष्ठावर गोठलेल्या थंड बर्फ़ाचे तळे असल्याची संशोधित माहितीही मिळाली आहे उन्हाळ्यात अती उष्णतेने त्यातील बर्फ़ाचे थेंब वितळून वर उडत असल्याची माहितीही ह्या आधी शास्त्रज्ञांनी प्रसारित केली होती 

Thursday 11 April 2024

अमेरिकेत खग्रास सूर्यग्रहणा दरम्यान सूर्याच्या Diamond Ringचे चकाकते दर्शन

 A total solar eclipse is seen from the Indianapolis Motor Speedway, Monday, April 8, 2024, in Indianapolis, Indiana. A total solar eclipse swept across a narrow portion of the North American continent from Mexico’s Pacific coast to the Atlantic coast of Newfoundland, Canada. A partial solar eclipse was visible across the entire North American continent along with parts of Central America and Europe.  Photo Credit: (NASA/Joel Kowsky)

 खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळचे सूर्याला प्राप्त झालेले नैसर्गिक Diamond Ring चे विलोभनीय दृश्य  -फोटो नासा संस्था

नासा संस्था -9 एप्रिल 

ह्या वर्षातले पहिले खग्रास सूर्यग्रहण आठ एप्रिलला  घडले सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र आल्याने सूर्याला चंद्राने झाकोळले आणि काही मिनिट पृथ्वीवर अंधार पसरला ह्या चार मिनिटे बारा सेकांदाच्या काळात सूर्याने नैसर्गिक चकाकत्या डायमंड रिंगचा आकार घेतला होता चंद्र सूर्यापेक्षा आकाराने लहान असल्यामुळे आणि सूर्या भोवतीचा चकाकता करोना झाकल्या न गेल्यामुळे सूर्याला चकाकत्या अंगठीचे स्वरूप प्राप्त होते सूर्य म्हणजे प्रचंड पेटता धगधगता आगीचा गोळा आहे सूर्याच्या अंतर्गत भागात सतत स्फोट होत असतात आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या आगीच्या पेटत्या ज्वाळांचे लोट आणी प्रखर किरणे सूर्याभोवती करोनाच्या स्वरूपात जमा होतात सूर्य आणि करोना ह्या मध्ये असलेल्या मॅग्नेटिक फिल्ड मुळे तो भाग सूर्यापासून वेगळा दिसतो आणि हि नैसर्गिक पर्वणी पाहण्याची सुवर्ण संधी फक्त खग्रास ग्रहण काळातच मिळते

A total solar eclipse is seen in Dallas, Texas on Monday, April 8, 2024. A total solar eclipse swept across a narrow portion of the North American continent from Mexico’s Pacific coast to the Atlantic coast of Newfoundland, Canada. A partial solar eclipse was visible across the entire North American continent along with parts of Central America and Europe. Photo Credit: (NASA/Keegan Barber)

खग्रास सूर्यग्रहणादरम्यान दिसणारे सूर्याभोवतीच्या तेजोमय प्रभावळीचे मनमोहक दृश्य -फोटो -नासा संस्था

आठ एप्रिलला ह्या वर्षातले पहिले खग्रास सूर्यग्रहण Dallas , North America ,Atlantic सागराजवळील Newfoundland आणि Canada येथे दिसले अमेरिकेतील मध्य भागात आणि युरोप मध्ये खंडग्रास स्वरूपात दिसले ह्या नंतरचे खग्रास सूर्यग्रहण आता 2045 साली दिसणार असल्यामुळे हि नैसर्गिक पर्वणी पाहण्यासाठी अमेरिकेतील नागरिक हजारोच्या संख्येने खुल्या मैदानात एकत्र जमले होते नासाच्या संस्थेतील कर्मचारी आणि शास्त्रज्ञ हे ग्रहण खग्रास रूपात जिथेजिथे दिसणार होते त्या भागात पोहोचले होतेपरदेशातील शास्त्रज्ञ खगोलप्रेमी देखील हे ग्रहण पाहण्यासाठी अमेरिकेत पोहोचले होते

 

 खग्रास सूर्यग्रहणा दरम्यान सूर्याची वेगवेगळ्या आकारातील दृश्ये -फोटो -नासा संस्था

अंतराळस्थानकातील अंतराळवीरांनी देखील स्थानकातून ग्रहण पाहण्याचा आनंद लुटला ग्रहण होण्याआधीपासूनच नासा संस्थेतर्फे नागरिकांना ग्रहण पाहण्याचे आवाहन करण्यात येत होते त्या साठी कोणती काळजी घ्यायची,ग्रहण कसे पाहायचे ह्याची माहिती देण्यात येत  होती नागरिकांना ग्रहण पाहण्यासाठी खास तयार केलेल्या चष्म्याचे मोफत वाटप करण्यात आले होते

 Visitors to Russellville, Arkansas, gather to view the total solar eclipse April 8. NASA heliophysics and communication experts traveled to Russellville to engage and educate tourists and residents about the eclipse. Russellville experienced a total eclipse for 4 minutes, 12 seconds.

 खग्रास सूर्य ग्रहण पाहण्यासाठी अमेरिकन आणि परदेशी नागरिकांनी केलेली गर्दी -फोटो -नासा संस्था

अंतराळवीरांनी देखील ग्रहण पाहण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविली अनेक अंतराळवीरांनी वेगवेगळ्या भागातून ग्रहण पाहण्याची सुवर्णसंधी साधली अंतराळवीर Jeremy Hansen ह्यांनी Niagara Falls येथून ग्रहण पाहिले त्यांच्या प्रमाणेच हजारो नागरिक तेथे ग्रहण पाहण्यासाठी एकत्र जमले होते 

अंतराळ स्थानकातील अंतराळवीर ग्रहणकाळात त्यांच्या संशोधनाच्या व इतर कामात व्यस्त होते तरीही अंतराळवीर Matthew Dominick आणि Jeanette Epps ह्या दोघांनी स्थानकाच्या Cupula मधून ग्रहण पाहण्याचा आनंद लुटला आणि ग्रहणाचे फोटो आणि व्हिडिओ काढला ह्या काळात स्थानक कॅनडाच्या South Eastern भागातून भ्रमण करत होते तेव्हा ह्या अंतराळवीरांनी चंद्राची पृथ्वीच्या वरील भागात पडलेली सावली कॅमेराबद्ध केली त्याचा लाईव्ह व्हिडिओ काढला हा भाग तेव्हा छत्रीसारखा दिसत होता हि सावली New York मधून New Foundland कडे प्रवास करीत होती आणि त्या वेळी सूर्याचा 90 टक्के भाग झाकला गेला होता पृथ्वीवरील नागरिक आकाशातील सुर्यग्रहण पाहु शकतात पण पृथ्वीवरुन सुर्यग्रहणाच्या वेळी पृथ्वीवर पडलेली सावली फक्त अंतराळातूनच पहाता येऊ शकते अंतराळवीरांमुळे पृथ्वीवासीयांना हि सावली लाईव्ह पाहायला मिळाली

The Moon's shadow, or umbra, on Earth was visible from the space station as it orbited into the path of the solar eclipse over southeastern Canada.

अंतराळवीरांनी  सूर्यग्रहणादरम्यान  पृथ्वीवर पडलेल्या सावलीचे कॅमेराबद्ध केलेले दृश्य -फोटो -नासा संस्था

सूर्य पूर्णपणे झाकल्यागेल्यानंतर पृथ्वीवर चार मिनिटे बारा सेकंद अंधार पसरला भर दिवसा अंधार पडल्यामुळे  पक्षांचा किलबिलाट ऐकू आला ग्रहण पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांनी आनंदाने जल्लोष केला काहींच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आम्ही लकी आहोत आम्हाला हे ग्रहण पाहायला मिळाले अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली   

नासा संस्थेने ह्या ग्रहणाच्या वेळी काही सायंटिफिक प्रयोग केले अंतराळात रॉकेट सोडून पृथ्वीच्या वरील भागातील वातावरणीय बदलांचे निरीक्षण नोंदविण्यात आले ह्या काळात पशुपक्षांच्या वागणुकीत होणारे बदल अभ्यासण्यात आले 

Monday 8 April 2024

नासा अंतराळवीर Loral O' Hara रशियन अंतराळवीर Oleg Novitskiy आणि बेलारुसची अंतराळवीर Marina पृथ्वीवर सुखरूप पोहोचले

   Crewmates (from left) Loral O'Hara from NASA, Oleg Novitskiy from Roscosmos, and spaceflight participant Marina Vasilevskaya will return to Earth aboard the Soyuz MS-24 crew ship. नासाचे अंतराळवीर Loral O'Hara,रशियन अंतराळवीर Oleg Novitskiy आणि बेलारूस Spaceflight Participant Marina पृथ्वीवर परतण्याच्या तयारीत -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -7 एप्रिल 

नासाच्या अंतराळमोहीम 70 चे अंतराळवीर Loral O' Hara रशियन अंतराळवीर Oleg Novitskiy आणि बेलारुसची Spaceflight participant Marina  Vasilevskaya सहा एप्रिलला पृथ्वीवर सुखरूप पोहोचले आहेत नासाच्या अंतराळवीर Loral O'Hara ह्या 15 सप्टेंबर 2023मध्ये अंतराळवीर Oleg Kononenko आणि Nikolai Chub सोबत सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात गेल्या होत्या अंतराळवीर Oleg आणि अंतराळवीर Nikolai एक वर्ष स्थानकात राहणार आहेत 

The Soyuz MS-24 crew ship carrying astronaut Loral O'Hara, cosmonaut Oleg Novitskiy, and spaceflight participant Marina Vasilevskaya descends to Earth beneath its main parachute. Credit: NASA TV

Soyuz M.S.-24 अंतराळयान पृथ्वीवर पोहोचल्यानंतर पॅराशूटच्या साहाय्याने खाली उतरताना -फोटो -नासा संस्था

हे तीनही अंतराळवीर 5 एप्रिलला 11.54p.m.ला पृथ्वीवर येण्यासाठी स्थानकाबाहेर पडले आणि 6 एप्रिलला 3.17a.m.(12.17p.m.स्थानिक वेळ )ला पृथ्वीवर पोहोचले Soyuz M.S.-24 अंतराळयान ह्या तिघांसह पृथ्वीच्या कक्षेत शिरताच अंतराळवीर पॅराशूटच्या साहाय्याने कझाकस्थानातील Dzhezkazgan येथील वाळवंटात सुरक्षितपणे खाली उतरले तेव्हा नासाची Recovery Team तेथे पोहोचली त्यानंतर टीममधील नासाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढले आणि त्यांना खुर्चीवर बसविले टीममधील डॉक्टरांनी त्यांचे प्राथमिक चेकअप केले 

 

 अंतराळवीर Loral O'Hara पृथ्वीवर पोहोचल्यानंतर अंगठा दाखवून आनंद व्यक्त करताना -फोटो -नासा संस्था

अंतराळवीर पृथ्वीवर पोहोचताच त्यांनी पृथ्वीवरील सूर्यप्रकाश आणि मोकळ्या हवेत पहिला श्वास घेतला अंतराळवीर Loral O'Hara ह्यांनी तेथे हजर असलेल्या अंतराळवीरांना अंगठा दाखवत हसून प्रतिसाद दिला आणि त्यांनी  Loral ह्यांना स्थानकात सोबत नेण्यासाठी दिलेली डॉल देखील परत आल्याचे दाखविले बेलारूसच्या Marina ह्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली " पृथ्वीवर परतल्या नंतरचा हा क्षण खूप मोलाचा आहे कारण पृथ्वीवरील हे वातावरण स्पेशल आहे ह्याची जाणीव अंतराळ स्थानकात गेल्यावर होते पृथ्वीवरील नागरिक लकी आहेत म्हणूनच आपण त्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे !" अंतराळवीर Oleg ह्यांनी सोयूझ यानावर स्वाक्षरी केली त्यानंतर ह्या अंतराळवीरांना पुढील चेकअपसाठी कझाकस्थानातील Recovery Staging City मध्ये नेण्यात आले ह्या अंतराळवीरांच्या अंतिम चेकअप नंतर Loral O'Hara ह्यांना नासाच्या विमानाने Huston येथील Johnson Space सेंटर मध्ये नेण्यात येईल आणि दोन्ही अंतराळवीरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात येईल 

नासाच्या अंतराळवीर Loral O'Hara पहिल्यांदाच सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात गेल्या होत्या त्यांच्या ह्या पहिल्या अंतराळमोहिमेत त्यांनी स्थानकात 204 दिवस वास्तव्य केले आणि त्या दरम्यान त्यांनी मानवी Heart health ,Cancer Treatments आणि Space Manufacturing Techniques ह्या विषयात सखोल संशोधन केले अंतराळवीर Oleg Novitskiy ह्यांची हि चवथी अंतराळवारी होती त्यांच्या चार वेळच्या अंतराळ मोहिमेत त्यांनी 545 दिवस स्थानकात वास्तव्य केले आणि तेथे सुरु असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभाग नोंदवला ह्या अंतराळवीरांनी स्थानकात येणाऱ्या अंतराळवीरांचे,अंतराळयानाचे आणि कार्गोशिपचे स्थानकात स्वागत केले बेलारुसच्या Spaceflight participant Marina मात्र पहिल्यांदाच स्थानकात राहायला गेल्या होत्या त्यांनी स्थानकात 14 दिवस वास्तव्य केले