आर्टिमस मोहीमेतील पहिले व्यावसायिक Odysseus रोबोटिक चांद्रयान चांद्रभूमीवर उतरण्याआधी -फोटो नासा संस्था
नासा संस्था -23 फेब्रुवारी
नासाच्या व्यावसायिक अंतराळ मोहिमेअंतर्गत आर्टिमस मोहिमेतील पाहिले व्यावसायिक Intuitive Machines कंपनीने तयार केलेले रोबोटिक Odysseus चांद्रयान 22 फेब्रुवारीला चांद्रभूमीवर सुरक्षीतपणे खाली उतरले नासाच्या अपोलो मोहिमेनंतर प्रथमच 52 वर्षांनी पाहिले व्यावसायिक रोबोटिक चांद्रयान सुरक्षीत चंद्रभुमीवर उतरले आहे
15 फेब्रुवारीला नासाच्या Florida येथील स्पेस सेंटर मधील 39 A ह्या ऊड्डाणस्थळावरुन सकाळी 1.05 a.m.(EST)वाजता Odysseus रोबोटिक चांद्रयानाने Space X Falcon 9 Rocket च्या सहाय्याने चंद्रावर जाण्यासाठी आकाशात ऊड्डाण केले आणी सात दिवसांच्या अंतराळप्रवासानंतर चंद्रावर सुखरूप पोहोचले ऊड्डाणानंतर यान राँकेट पासून वेगळे झाल्यानंतर काही वेळातच यानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित झाली आणी यानाने अंतराळप्रवासास सुरुवात केली काही वेळातच Odysseus यानाने 16 तारखेला अंतराळातून पृथ्वीचे अलौकिक सौंदर्य कॅमेराबध्द करत काढलेला फोटो नासा संस्थेत पाठविला
Odysseus चांद्रयानाने कार्यान्वित होताच अंतराळ प्रवासादरम्यान काही वेळातच टिपलेले पृथ्वीचे अलौकिक सौन्दर्य -फोटो नासा संस्था
Odysseus अंतराळयानातील Cryogenic ईंजीनमध्ये प्रथमच Liquid Oxygen आणी Liquid Methane वायुचा वापर करण्यात आला असून ह्या अंतराळ प्रवासादरम्यान यानाने किती प्रमाणात ह्या ईंधनवायुचा वापर केला ह्याची नोंद ठेवण्यात येणार आहे शिवाय भविष्यकालीन अंतराळमोहिमेतील अंतराळवीरांना तेथे वातावरणात ऊपलब्ध असलेल्या वायूपासून मानवी श्वासोच्छ्वासाठी आवश्यक असलेला Oxygen आणी मानवी निवासासाठी आवश्यक ईंधन निर्मिती करता येईल का ह्या बाबतीतही संशोधन करण्यात येणार आहे Odysseus यानात बारा सायंटिफिक कमर्शियल पेलोड पाठविण्यात आले आहेत त्यातील सहा पेलोड नासा संस्थेचे व सहा कमर्शियल आहेत छोट्या Cubesat च्या आकाराच्या ह्या पेलोडच्या सहाय्याने नासाचे शास्त्रज्ञ चंद्रावरील सायंटिफिक प्रयोग करणार आहेत
Odysseus यान सात दिवसांच्या अंतराळप्रवासानंतर गुरुवारी 22 फेब्रुवारीला 5.23 p.m.(CST) वाजता सुरक्षीतपणे चंद्राच्या कक्षेतुन खाली चंद्रभुमीवर ऊतरले ऊतरण्याआधी यानाने वेगावर नियंत्रण मिळवत वेग हळूहळू कमी करत खाली येत सुरक्षितपणे यान खाली ऊतरविले Odysseus यान चंद्रावरील दक्षिण ध्रुवावरील Malaport ह्या भागात ऊतरले आहे हा भाग दक्षिण ध्रुवावरील आसपासच्या डोंगराळ भागाच्या तुलनेत सपाट व सुरक्षित आहे हा भाग पृथ्वीवरुन चंद्राकडे पहाताना मानवाला सहजतेने दिसतो
नासातील शास्त्रज्ञांनी यान सुरक्षितपणे खाली ऊतरावे म्हणून खबरदारी घेत यानाची चंद्राच्या कक्षेतील एक फेरी वाढविली होती आणी Odysseus यान बनविणाऱ्या टिममधील ईंजीनिअर्स आणी तंत्रज्ञांंनी यान चंद्रावर न आधळता सुरक्षित हळुवारपणे खाली ऊतरावे म्हणून यान बनवितानाच त्यात अत्याधुनिक यंत्रणा बसविली होती त्यामुळे हि मोहीम यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया Odysseus यानाच्या कंपनी प्रमुखांनी व्यक्त केली हि मोहीम यशस्वी झाल्यमुळे भविष्यकालीन अंतराळविश्वातिल अंतराळमोहिमेतील अंतराळवीरांना निश्चितच फायदा होईल आम्ही पुन्हा एकदा चंद्रावर पोहोचलो आहोत असे मत नासाचे Administrator Bill Nelson ह्यांनी व्यक्त केले
आता 14 दिवस Odysseus यानातील पेलोडच्या सहाय्याने ह्या दक्षिण धृवावरील मानवाला अज्ञात असलेली पुरातन काळातील सजीवांच्या अस्तित्वाची माहिती आणी ईतर सायंटिफिक माहिती गोळा करेल ह्या भागातील भौगोलिक स्थिती,Geological, Magnetic field आणी ईतर भुगर्भिय व भुपृष्ठीय संशोधीत माहिती गोळा करुन ती पृथ्वीवर पाठवेल शिवाय भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांना राहण्ययोग्य पोषक वातावरण असलेली जागा शोधेल आणी यानातील अत्याधुनिक कँमेऱ्याच्या सहाय्याने फोटो काढून पाठवेल ह्या भागात शास्त्रज्ञाना ह्या आधी बर्फाचे अस्तित्व आधळले असल्यामुळे तेथील पाणवठ्याची ठिकाणे पाण्याचे स्रोत असलेल्या ठिकाणाचा शोध घेईल अंतराळवीरांना तेथून पृथ्वीवर संदेश पाठविण्यासाठी योग्य जागा शोधेल शिवाय चंद्रावर यान ऊतरवताना ह्या आधीच्या अपोलो मोहिमेतील अंतराळवीरांना व अंतराळयानाला हवेत ऊडालेल्या धुळीमुळे समस्या निर्माण झाली होती कारण ह्या धुळीचे कण हवेतच तरंगत होते यानावर जमलेली धुळ निघत नव्हती आर्टिमस मोहिमेतील आणी भविष्यकालीन मोहिमेतील अंतराळयान व अंतराळवीरांना ह्याचा त्रास होऊ नये म्हणून तेथील धुलीकणांचे संशोधनही करण्यात येणार आहे त्या साठी यानात अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे
ह्या माहितीचा ऊपयोग आर्टिमस मोहिमेतील अंतराळविरांच्या चांद्रमोहिमेसाठी होईल आणी भविष्यकालीन व्यावसायिक मोहिमेतील अंतराळवीरांसाठीही होईल व्यावसायिक मोहीमेतील खाजगी कंपनींंचे अंतराळयान ऊतरण्यासाठी आणी भविष्यातील तेथून परत पृथ्वीवर येण्यासाठी तेथून ऊड्डाणासाठी वाहनतळ म्हणून वापरण्यासाठी होणार असल्याने शास्त्रज्ञ चंद्रावरील अशा जागेचा शोध घेत आहेत पृथ्वीसारखे पोषक वातावरण व पिण्यायोग्य पाण्याचा शोध लागल्यास भविष्यकालीन मानवी निवासासाठीही ह्या मोहिमेचा ऊपयोग होणार आहे
चंद्रावर 15 दिवसच सुर्याचा प्रकाश पडत असल्याने आणी यानातील यंत्रणा सौरऊर्जेवर कार्यान्वित होत असल्यमुळे यान 14 दिवस चंद्रावर कार्यरत राहील नतंर काहीकाळ यान सुप्ताअवस्थेत राहील
No comments:
Post a Comment