Axiom -3 मोहिमेतील चार अंतराळवीर Space-X-Crew Dragon मधून पृथ्वीवर परतण्यासाठी निघताना -फोटो नासा संस्था
नासा संस्था -9 फेब्रुवारी
नासाच्या Axiom 3 मोहमेतील अंतराळवीर Michael Lopez Alegria ,Walter Villadei, Marcus Wandt आणी Alper Gezeravci त्यांचे स्थानकातील वास्तव्य संपवून 7 फेब्रुवारीला सकाळी 9.20 मिनिटांनी(EST) स्थानकातून पृथ्वीवर येण्यासाठी स्थानकाबाहेर पडले आणि 9 फेब्रुवारीला शुक्रवारी सकाळी 8.30 मिनिटांनी(EST) पृथ्वीवर पोहोचले Space X Crew Dragon Freedom ह्या चार अंतराळवीरांसह अमेरिकेतील फ्लोरीडामधील Daytonaयेथील समुद्राच्या खाडीत सुरक्षीत खाली उतरले
पृथ्वीवर परतण्याआधी ह्या अंतराळवीरांचा स्थानकात Farewell ceremony पार पडला त्या वेळी ह्या चारही अंतराळवीरांनी स्थानकातील आमचा मुक्काम वाढला तरीही मोहीम 70 मधील सर्व अंतराळवीरांनी आम्हाला खूप सहकार्य केले आमचे स्थानकातील दिवस मजेत गेले त्या साठी स्थानकातील सर्व अंतराळवीरांचे Axiom संस्थेचे आमच्या देशाचे आणि नासाचे आभार! त्यांच्यामुळेच आम्हाला इथे येण्याची,राहण्याची,संशोधन करण्याची संधी मिळाली असे मनोगत व्यक्त केले स्थानकातील अंतराळवीरांनी देखील ह्या अंतराळवीरांचा अंतराळ प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून शुभेच्छा दिल्या
Axiom मोहीमेतील अंतराळवीर परतण्याआधी स्थानकातील Farewell Ceremony दरम्यान अकरा अंतराळवीरांसह एकत्रीत -फोटो-नासा
अंतराळवीर Andreas- "आता Axiom -3 मधील अंतराळवीर पृथ्वीवर परतत आहेत सगळ्या चांगल्या गोष्ठी लवकर संपतात त्यांच्या सोबतचा काळ खूप मजेत गेला खराब हवामानामुळे त्यांना परतण्यास वेळ झाला पण आम्ही आमच्या कामातून वेळ काढून एकत्र वेळ घालवला Marcus बरोबर संध्याकाळी घालवलेला वेळ कायम स्मरणात राहील Happy Journey To All !"
अंतराळवीर Jasmin -मला हे चार अंतराळवीर स्थानकात राहायला येणार होते तेव्हा आम्ही अकरा अंतराळवीर स्थानकात कसे राहणार अशी काळजी होती पण ह्या चौघांनी छान काम केले त्यांच्या सोबतचा काळ मजेत गेला जरी आम्ही त्यांच्या सोबत स्थानकात दोनअडीच आठवडेच राहिलो तरीही आमचा बॉण्ड आम्ही पृथ्वीवर परतल्यानंतरही कायम असाच राहील आता मी अभिमानाने सांगू शकते कि,स्थानकात नऊ देशातील अकरा अंतराळवीरांसह आम्ही वास्तव्य केल एकत्रीत संशोधनात सहभागी झालो हि माझ्यासाठी गौरवास्पद बाब आहे म्हणूनच हे Inter National Space Station स्पेशल आहे हे चारही अंतराळवीर सुखरूप पृथ्वीवर पोहोचावेत हि शुभेच्छा !
Space X Crew Dragon Freedom Axiom मोहिमेतील चार अंतराळवीरांसह Daytona खाडीत उतरले -फोटो नासा संस्था
नासाच्या व्यावसायिक अंतराळ मोहिमे अंतर्गत Axiom मोहिमेतील हे चार अंतराळवीर 18 जानेवारीला दोन आठवड्यांसाठी स्थानकात वास्तव्यास गेले होते पण लँडिंगच्या ठिकाणच्या खराब हवामानामुळे हे अंतराळवीर पूर्व नियोजित वेळेत पृथ्वीवर परतू शकले नाहीत त्यांचा स्थानकातील मुक्काम वाढला त्या मुळे स्थानकातील अठरा दिवसांच्या वास्तव्यानंतर हे चारही अंतराळवीर नऊ फेब्रुवारीला पृथ्वीवर परतले अंतराळ प्रवासासह ह्या अंतराळवीरांनी बावीस दिवसात हि मोहीम पूर्ण केली ह्या अंतराळवीरांनी त्यांच्या स्थानकातील वास्तव्यादरम्यान तेथे सुरु असलेल्या तीस सायंटिफिक संशोधनात सहभाग नोंदविला
Space X Crew Dragon अंतराळातील पृथ्वीची कक्षा भेदून पृथ्वीवर पोहोचुन खाली उतरताच नासाची Recovery Vessels तेथे पोहोचली नासाच्या Recovery Vessels मधील नासाच्या टीमने Space X Crew Dragon आणि अंतराळवीरांना बोटीपर्यंत आणले
Space X Crew Dragon Shannon Recovery बोटी जवळ पोहोचताच Shannon Recovery बोट आणि Dragon मधील Docking आणि Hatching प्रक्रिया पूर्ण झाली नासाच्या Recovery टीमने ह्या अंतराळवीरांचे प्राथमिक चेकअप केल्यानंतर अंतराळवीर Dragon मधून बाहेर पडले स्थानकातील वास्तव्यादरम्यान झिरो ग्रॅव्हीटीत तरंगत्या अवस्थेत राहिल्यामुळे पृथ्वीवरील वातावरणात प्रवेश करताना उभे राहून पाऊल टाकताना,चालताना त्यांना थोडा वेळ लागला त्या नंतर आवश्यक चेकअप नंतर ह्या अंतराळवीरांना नासाच्या विमानाने नासाच्या Florida Space Center मध्ये नेण्यात आले तेथून आवश्यक प्रक्रिये नंतर त्यांना त्यांच्या गावी पोहचवण्यात येणार आहे
No comments:
Post a Comment