मंगळावरील आकाशात 872 व्या मंगळ दिवशी 54 वे उड्डाण यशस्वी करून मंगळभूमीवर उतरलेले Ingenuity मार्स हेलिकॉप्टर -फोटो - नासा संस्था (J P L)
नासा संस्था-JPL- 8 ऑगस्ट
नासाच्या Perseverance मंगळयानासोबत मंगळावर पोहोचलेल्या Ingenuity मार्स हेलिकॉप्टरने मंगळावरील आकाशात 54वी यशस्वी भरारी मारली आहे Perseverance मंगळयान आणी Ingenuity हेलिकॉप्टर 19 एप्रील 2021 मध्ये मंगळावर पोहोचले तेव्हापासुन तेथे यशस्वीपणे कार्यरत आहे शास्त्रज्ञांनी मंगळावरील आकाशात पाच ऊड्डाणाच्या अपेक्षेने ह्या हेलिकॉप्टरचे डिझाईन केले होते पण शास्त्रज्ञांच्या अपेक्षेपेक्षा दसपटीहुनही जास्त यशस्वी ऊड्डाणे करून ह्या हेलिकॉप्टरने शास्त्रज्ञांना आश्चर्यचकीत केले आहे एप्रिलमध्ये दोन वर्षे पुर्ण होण्याआधीच Ingenuity हेलिकॉप्टरने तेथील आकाशात ऊड्डाणाचे अर्धशतक पुर्ण केले होते आता Ingenuity हेलिकॉप्टरने मंगळावरील आकाशात चोपन्नावे ऊड्डाण यशस्वी केले आहे
3 ऑगस्टला मंगळावरील 872 व्या मंगळ दिवशी Ingenuity हेलिकॉप्टरने तेथील
आकाशात चोपन्नावे ऊड्डाण केले मंगळभूमीवरील आकाशात Ingenuity हेलिकॉप्टरने सोळा फुट ऊंचीवरुन उड्डाण केले तेव्हा त्याचा वेग 2.5 मीटर
प्रतीसेकंद होता ह्या उड्डाणादरम्यान Ingenuity हेलिकॉप्टरने मंगळावरील 7.6 मैल अंतर पार केले हेलिकॉप्टर मधील अत्याधुनिक सॉफ्टवेअर व Navigation Camera च्या सहाय्याने त्या भागातील
फोटो,व्हिडीओ आणी महत्त्वपुर्ण माहितीही गोळा केली ह्या आधी Ingenuity हेलिकॉप्टरच्या 53 व्या उड्डाणात हेलिकॉप्टर नियोजित वेळेपेक्षा कमी वेळात मंगळ भूमीवर खाली उतरले होते उड्डाण करताना पर्वतीय भागात हेलिकॉप्टर स्वयंचलित यंत्रणेने उंचावर पोहोचले आणि हळू,हळू उंची कमी करत सुरक्षितपणे खाली उतरले होते हेलिकॉप्टर नियोजित वेळेपेक्षा लवकर खाली का उतरले हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी Ingenuity हेलिकॉप्टरचे 54वे उड्डाण घडवले आणि हे उड्डाण नियोजित वेळेत पूर्ण झाले
Ingenuity हेलिकॉप्टर फेब्रुवारी 2021 मध्ये Perseverance मंगळयानासोबत मंगळावर पोहोचले होते दोन वर्षांपासून Perseverance यान मंगळावरील पुरातन सजीव सृष्ठीच्या अस्तित्वाला दुजोरा देणारे पुरावे शोधण्याचे काम करत आहे मंगळावरील पुरातन काळी अस्तित्वात असलेले पण कालांतराने नष्ठ झालेले पाण्याचे स्रोत,मंगळ भुमीवरील आणी भुगर्भाखालील खडक,मिनरलस्,सजीवांचे अवशेष शोधण्याचे काम Perseverance यान करत आहे ह्या यानाला मंगळावरील सजीवांच्या अस्तित्वाला दुजोरा देणारी आणि पाण्याचे श्रोत असणारी ठिकाणे शोधून देण्याचे काम हे हेलिकॉप्टर करत आहे शीवाय भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी आणी मानवी निवासासाठी पोषक वातावरण असलेला भाग शोधण्याचे कामही हे हेलिकॉप्टर करत आहे
नासाच्या Perseverance टिममधील शास्त्रज्ञांनी Ingenuity हेलिकॉप्टरचे
डिझाईन ह्या कामासाठी केले तेव्हा त्यांना Ingenuity हेलिकॉप्टर कडून
मंगळावरील आकाशात पाचवेळा उड्डाणाची अपेक्षा होती पण Ingenuity
हेलिकॉप्टरने शास्त्रज्ञांच्या अपेक्षेपेक्षा दहापटीपेक्षाही जास्तवेळा उड्डाण करून
त्यांना आश्चर्यचकीत केले आहे नासाच्या वॉशिंग्टन येथील संस्थेचे Planetary Science चे डायरेक्टर Lory Glaze म्हणतात,"1903 मध्ये राईट
बंधूंनी पहिल्या प्रयत्नानंतर विमान ऊड्डाण सुरु ठेवले आणी यश मिळवले तसेच
Ingenuity च्या पहिल्या ऊड्डाणा नंतर न थांबता आम्ही सतत ऊड्डाण सुरू ठेवले
दरवेळी हे हेलिकॉप्टर नव्याने आकाशात ऊड्डाण करते आणी मंगळावरील नवीन भाग
शोधून तेथील संशोधीत माहिती गोळा करण्यात यशस्वी होते तेव्हा तेथील फोटो पाहून
आम्ही आश्चर्यचकीत होतो त्यामुळे आमच्या दृष्टिकोनात बदल होतो नवनवीन भुभाग
शोधण्याची आमची जिज्ञासा वाढते Ingenuity च्या मंगळावरील पहिल्या
उड्डाणाने आम्ही आनंदी झालो होतो पण आता Ingenuity ने उड्डाणाच्या अर्धशतकानंतरही कार्यरत राहून हि मोहीम यशस्वी केली आहे
Ingenuity हेलिकॉप्टरने संशोधीत केलेल्या ह्या माहितीचा ऊपयोग भविष्यकालीन मंगळ मोहिमेसाठी होणार आहे
No comments:
Post a Comment