Saturday 29 July 2023

Artemis मोहिमेतील अंतराळविरांच्या स्पेससुटवरील Moon Dust Cleaning साठी बार्बी डॉलचा वापर

 नासा संस्थेत बार्बी डॉलच्या Space Suit वर लिक्विड नायट्रोजन स्प्रे मारून Moon Dust Cleaning चा प्रयोग करताना - फोटो -WSU

नासा संस्था -24 जुलै

नासा संस्थेच्या Artemis मोहिमेची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे ह्या मोहिमेतील अतराळवीरांचे अंतीम ट्रेनिंग सुरु आहे पुढच्या वर्षी हे अंतराळवीर चंद्रावर जाणार आहेत तेथील भुमीवर पाऊल ठेवणार आहेत आणी चंद्रभूमीवरील वातावरणात संशोधन पण करणार आहेत अंतराळवीर चंद्रभूमीवर प्रवेश करतात तेव्हा ते तेथील वातावरणातील धुळ,व रोगजंतूच्या संपर्कात येतात आणी त्यांच्या स्पेससुटवर,यानावर,यानातील उपकरणावर धुळ जमते हि चंद्रभुमीवरील धुळ साफ करणे अत्यंत कठीण असल्याचे आधीच्या अपोलो चांद्रमोहिमेतील अंतराळविरांमुळे शास्त्रज्ञांना कळाले  

चंद्रभुमीवरील वातावरणातील विद्युतभारीत धुलीकण स्पेससुटवर धुळीसोबत जमतात आणी हे धुलीकण अत्यंत चिकट असतात त्यामध्ये टोकदार वाळूकणही असतात  ब्रशने साफ केल्यानंतरही स्पेससूट वर चिकटून राहतात  स्पेससुटवर हे कण कोठेही चिकटल्यामुळे स्पेससुट फाटण्याची शक्यता असते स्पेससूट व्यवस्थित Lock न झाल्याने leakageची समस्या ऊद्भवते अंतराळवीरांच्या अंतराळ मोहिमेत,स्पेसवॉक दरम्यान देखील अंतराळविरांना ह्या समस्यांना सामोरे जावे लागते हे ईलेक्ट्रोभारीत धुलीकण आणि इतर रोगजंतू अंतराळविरांच्या श्वासोच्छ्वासाद्वारे शरीरात प्रवेश करतात त्यामुळे संसर्ग होऊन फुफ्फुसाला सुज येणे,घसा सुजणे,सर्दी आणी ताप येऊन तब्येतिला धोका निर्माण होणे ह्या सारख्या समस्या उद्भवतात म्हणूनच नासा संस्थेत Artemis मोहिमेतील अंतराळविरांच्या सुरक्षेसाठी स्पेससुट वरील Moon Dust Cleaningसाठी नवनवीन प्रयोग करण्यात येत आहेत नवनवीन ऊपक्रम राबविण्यात येत आहेत   

ह्याच ऊपक्रमा अंतर्गत नासा संस्थेने Artemis मोहिमेसाठी नागरिकांकडून नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करण्याची स्पर्धा जाहीर केली होती ह्या स्पर्धेत Washington University येथील मेकॅनिकल आणी मटेरिअल्स इंजिनीअरिंग कॉलेज चे Associate प्रोफेसर Jacob Leachman आणि त्यांच्या विध्यार्थ्यांच्या टीमने Artemis Award जिंकला त्यांनी संशोधित केलेला अंतराळविरांच्या स्पेससुट वरील Moon Dust Cleaning चा यशस्वी प्रयोग त्यांनी नुकताच नासा संस्थेतील शास्त्रज्ञांपुढे करून दाखविला त्या साठी त्यांनी बार्बी डॉलचा वापर केला गरम फ्रायपॅन वर पाणी टाकल्यावर जसे पाण्याचे थेंब हवेत ऊडुन वाफेत रुपांतरीत होतात तसेच स्पेससुटवरील धुलीकण देखील नायट्रोजन स्प्रे मारल्यावर हवेत ऊडुन नाहिसे होतात व स्पेससुट खराब न होता स्वच्छ होतो असे ह्या टिमच्या प्रोफेसरांनी सांगितले

  1965 मध्ये Mattel कंपनीने अंतराळविरांसारखा सोनेरी स्पेससुट परीधान केलेली अंतराळवीर बार्बी डॉल बाजारात आणली होती Mattel कंपनीचे Co Founder Ruth Handler ह्यांनी तरुणींनी अंतराळ क्षेत्रात करिअर करावे ह्या हेतूने बार्बीला ह्या वेषात बाजारात आणले आणि हि अंतराळवीर बार्बी तरुणीच्या भावी आयुष्यातील स्वप्न साकारणारी ठरली त्यानंतर पायलट आणी अंतराळविश्वातील अनेक रुपात बार्बी बाजारात आली आणी तरुणीमध्ये प्रेरणादायी ठरली नासामध्ये पहिल्या महिला अंतराळविराची निवड होण्याआधीच बार्बी खेळण्यातील अंतराळवीर झाली होती आणी आता खरोखरच बार्बीचा आर्टिमस मोहिमेतील Moon Dust Cleaning प्रयोगासाठी अंतराळविश्वात प्रवेश झाला आहे `

Two Barbie dolls float in microgravity in front of a window on the International Space Station. Both dolls wear white flight suits with blue trim inspired by astronaut attire. The doll on the left is caucasian with blond hair, and the doll on the right is Black with natural curls. Through the window, the edge of Earth can be seen, with blue ocean and white swirling clouds, in contrast to the inky expanse of space beyond. Credit: Mattel

नासा संस्थेतील शास्त्रज्ञांनी बार्बी डॉलला अंतराळविरांसारख्या कापडाचा स्पेससुट घालून त्यावर स्पेससुट Dust Cleaningचा प्रयोग केला आहे ह्या आधी विजेते विद्यार्थी आणी त्यांच्या Associate Professor Jacab Leackman ह्यांनी स्पेससुटच्या कापडाचा तुकडा वापरला त्यावर ज्वालामुखीच्या राखेचा थर लावला आणी चंद्रावरील वातावरणा सारख्या वातावरणात बंद काचेच्या Box मध्ये हा तुकडा ठेऊन त्यावर लिक्वीड नायट्रोजनचा स्प्रे मारला तेव्हा कापडावरील सर्व धुळ ऊडुन कापड स्वच्छ झाले होते हा प्रयोग सिलेक्ट झाल्यानंतर नासा संस्थेतील शास्त्रज्ञांनी त्या प्रयोगाची चाचणी केली 

आता ह्याच प्रयोगासाठी नासा संस्थेतील शास्त्रज्ञांनी बार्बी डॉलचा वापर केला बार्बीला अंतराळविरांसारखा स्पेससुट घालून त्यावर ज्वालामुखीची राख लावली ह्या राखेत चंद्रावरील वातावरणातील धुळ आणी मातीतील समान घटक असल्याने त्याचा वापर करण्यात आला त्यानंतर चंद्रावरील वातावरणा सारखे कृत्रिम वातावरण असलेल्या चेंबर मध्ये बार्बी डॉल ठेऊन 360 अंशात सर्व बाजूने बार्बी फिरवत स्पेससुटवर लिक्विड नायट्रोजनचा स्प्रे मारण्यात आला तेव्हा  नायट्रोजनच्या वाफेसोबत स्पेससुट वरील विद्युतभारीत अपायकारक धूलिकण कण देखील नष्ट झाल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले

No comments:

Post a Comment