Thursday 16 March 2023

स्थानकात पार पडला Space X Crew-5च्या अंतराळविरांचा Farewell Ceremony



Space X Crew-5 चे अंतराळवीर नुकतेच  पृथ्वीवर परतले परतण्याआधी स्थानकात Farewell Ceremony पार पडला तेव्हा नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या 

Nicole Mann -मला ह्या क्षणी माझ्या भावना व्यक्त करावयाच्या आहेत मला नासा संस्थेचे,नासा संस्थेतील हजारो कर्मचाऱ्यांचे आभार मानावयाचे आहेत त्यांच्या सहकार्यानेच स्थानकात आम्ही सहा महिने राहू शकलो त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे आम्ही सायंटिफिक संशोधन आणि Space Walk करू शकलो त्यांच्या मुळेच आम्हाला हि संधी मिळाली ह्या अंतराळ मोहीम 68 मध्ये आम्हाला सहभागी होण्याचा मान मिळाला मला आज माझ्या सहकारी अंतराळवीरांचेही आभार मानावयाचे आहेत ते खूप अमेझिंग आहेत आम्ही एकत्र ट्रेनिंग घेतल एकत्र काम केल ह्या सहा महिन्यांच्या स्थानकातील वास्तव्या दरम्यान खूपदा कठीण परिस्थितीशी सामना करावा लागला खूप challenges आले प्रत्येकवेळी आम्ही त्याला यशस्वीपणे सामोरे गेलो त्यावर मात केली आम्हाला जेव्हा गरज वाटली तेव्हा सारे एकमेकांच्या मदतीला धावले Josh बुद्धिमान पायलट आहे त्याच व्यावसायिक कर्तृत्व कौतुकास्पद आहे त्याने कितीतरी वेळा आम्हाला वाचवल आहे त्या बद्दल Thanks Josh !  Koichi खूप शांत आहे त्याच्याकडे असाधारण बुद्धिमत्ता आहे कित्येकदा आम्हाला संशोधनात अडचण आली किंवा काही प्रश्न निर्माण झाले तर तो लगेच सोडवतो तो नेहमीच सगळ्यांच्या मदतीला धावतो Anna देखील कर्तृत्ववान आणि कुशाग्र आहे एखादी गोष्ट तिच्या लगेचच लक्षात येते तिच्यात माहिती आत्मसात करण्याची कुवत आहे आमची हि टीम खूप छान होती ह्या झिरो ग्रॅव्हीटीतील वास्तव्यात अनेक गमतीजमती अनुभवल्या जगण्याच वास्तव समजल आम्हाला आमच्या संशोधनाच्या कामातून मोकळा वेळ मिळाला की,आम्ही स्थानकाच्या खिडकीतून खाली पृथ्वीकडे पाहायचो तिचे सौन्दर्य न्याहाळायचो ह्या अफाट विश्वाकडे पाहताना ह्या विश्वातील आपली जागा कुठे आहे ?आपण कुठे आहोत? किती छोटे आहोत हे जाणवल आता आगामी काळात अंतराळविश्वात नव्या मोहिमा राबविल्या जातील त्यांची प्रगती आपण पहाणार आहोत Artemis ,Orion आणि मंगळ मोहिमेसाठी आमच संशोधन उपयुक्त पडणार आहे आम्ही ह्या मोहिमांचा भाग होतो ह्याचा आनंद होतोय आमच्यासाठी हि अभिमानाची बाब आहे हा सन्मान आम्हाला नासा संस्थेमुळे मिळाला त्यांनी हि संधी आम्हाला दिल्यामुळे आम्ही लकी आहोत नासा संस्थेचे पुन्हा आभार ! काही दिवस आम्ही ह्या नव्या अंतराळवीरांसोबत अकराजण एकत्र राहिलो खूप छान आहेत सारे आम्ही खूप एन्जॉय केल 

Josh Cassada - मला Duck चेही सहकारी अंतराळवीरांसोबत आभार मानावयाचे आहेत त्याची लीडरशिप चांगली होती आमच्या स्थानकात येण्यापासून पृथ्वीवर परत जाण्यापर्यंतची ह्या माझ्या सहकारी Crew 6 च्या अंतराळ वीरांसोबत काही दिवस राहायला मिळाल आमची मोहीम 68 ची टीम छान होती त्यांच्या सोबतचे स्थानकातील दिवस आनंदात गेले नासा संस्थेतील सर्वांचे आभार ! ज्यांच्यामुळे मी इथे आलो त्यांनी इथल्या वास्तव्या दरम्यान वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केल त्याशिवाय हे शक्य नव्हत माझे कुटुंबीय,मित्र ज्यांनी आम्हाला सपोर्ट केल,प्रोत्साहन दिल त्या साऱ्यांचे आभार मला आशा आहे कि,मी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे उत्तम काम केलय निश्चितच त्यांना माझा अभिमान वाटेल ! इथल्या वास्तव्या दरम्यान आम्ही संशोधन केल Space Walk केले आणि पृथ्वीवरून स्थानकात आलेल्या अंतराळयान ,Cargo Ship च  स्थानकात स्वागत केल आम्हाला त्या मुळे शिकायला अनुभवायला मिळाल त्या बद्दल नासा संस्थेचे  आभार !

Koichi Wakata - ह्या क्षणी माझ्या भावना संमिश्र स्वरूपाच्या आहेत ह्या स्थानकातील वास्तव्यातील कडू गोड आठवणी मनात दाटून आल्या आहेत मी ह्या झिरो ग्रॅव्हीटीत सहा महिने वास्तव्य केल आणि आता पृथ्वीवर घरी  परत  जातोय ह्या सुपर अंतराळवीरांसोबत काम करायला मिळाल ते दिवस आनंददायी होते ह्या विपरीत वातावरणातील वास्तव्यात अनेकदा कठीण प्रसंग आले पण आमच्या टीमच्या सहकार्याने आणि नासा संस्थेच्या मार्गदर्शनामुळे आम्ही त्यावर मात करू शकलो म्हणून जगभरातील नासा संस्थेतील सर्वांचे आभार ! आमच्या launching पासून इथे पोहोचेपर्यंत आणि इथल्या वास्तव्यातील प्रत्येक क्षणी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केल आता पृथ्वीवर परतणार आहोत स्थानकाची धुरा आता योग्य हाती आहे Sergey ती जाबाबदारी छान सांभाळेल आम्ही चौघेही तुला मिस करू  Sergey तुझ्या सहकार्याबद्दल Thanks !आणि तुला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा ! 

Anna Kikina - मी कित्येक वर्षे स्थानकात येण्याच स्वप्न पाहायची आणि एक दिवस अचानक ती संधी मिळाली मी स्वप्नातल्यासारख  क्षणात स्थानकात  पोहोचले सुद्धा क्षणभर मला हे सार स्वप्नच वाटल पण इथल्या झिरो ग्रॅव्हीटीत हे खर असल्याची खात्री पटली हे सारच अद्भुत होत माझ्यासाठी मला हि संधी दिल्याबद्दल नासा संस्थेचे आभार माझे सहकारी अंतराळवीर खूप छान होते आम्ही एकत्र काम केल एन्जॉय केल त्यांच्या प्रमाणेच माझ्याही भावना आहेत ह्या विश्वातील नासा संस्थेतील सर्वांचे खूप,खूप आभार त्यांच्या मुळेच मी इथे पोहोचले ज्यांनी आम्हाला सपोर्ट केल मार्गदर्शन केलं त्या सर्वांचे आभार ह्या  मोहिमेचा भाग होण माझ्यासाठी आनंददायी होत त्यांच्या सोबत काम करताना सुरक्षित वाटल सर्वांनाच असे मित्र आणि अस इंटरेस्टिंग काम करायला मिळो तुमच्या आयुष्यात ,तुमच्या करिअर मध्ये तुम्हा सर्वांचे आभार !

Space X Crew-5चे अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परतले

  Roscosmos cosmonaut Anna Kikina, left, NASA astronauts Josh Cassada and Nicole Mann, and Japan Aerospace Exploration Agency (JAXA) astronaut Koichi Wakata, right.

 अंतराळवीर Anna Kikina ,JoshCassada ,Nicole Mann आणि Koichi Wakata पृथ्वीवर परतण्याच्या तयारीत फोटो -नासा संस्था

 नासा संस्था 12 मार्च

नासा आणी Space X चे अंतराळवीर Nicole Mann,Josh Cassada जपानचे अंतराळवीर Koichi Wakata आणी रशियन अंतराळवीर Anna Kikina  त्यांचा स्थानकातील 157 दिवसांचे वास्तव्य संपवून अकरा मार्चला  पृथ्वीवर परतले ह्या चारही अंतराळवीरांसह Endurance Space X Dragon शनिवारी सकाळी 9.02 वाजता Florida येथील  Mexico तील समुद्राच्या खाडीत ऊतरले Endurance अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत शिरताच पॅराशुटच्या सहाय्याने खाली समुद्रात ऊतरले 

हे अंतराळवीर पृथ्वीवर परतण्याआधीच नासाची Recovery team तेथे पोहोचली होती Endurance सुरक्षितपणे जहाजावर येताच ह्या टिममधील नासाच्या कर्मचाऱ्यांनी ह्या अंतराळवीरांना Endurance यानातुन सुरक्षितपणे बाहेर काढले तेव्हा ह्या अंतराळविरांच्या चेहऱ्यावर पृथ्वीवर परतल्याचा आनंद दिसत होता नासाच्या Recovery team मधील डॉक्टरांनी ह्या अंतराळविरांचे प्राथमिक चेकअप केले त्यानंतर ह्या अंतराळविरांना नासाच्या विमानाने Houston येथील Johnson Space Center येथे नेण्यात आले

अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परतल्यानंतर नासाचे Administrator Bill Nelson ह्यांनी ह्या चारही अंतराळवीरांचे अभिनंदन केले ते म्हणाले,"ह्या अंतराळवीरांनी त्यांच्या स्थानकातील सहा महिन्यांंच्या वास्तव्यात अंतराळविश्वासाठी आणी मानवासाठी मोलाचे संशोधन केले आहे त्याचा ऊपयोग भविष्यकालीन दुरवरच्या चांद्रमोहिम आणी मंगळ मोहिमेसाठी होईल !"

ह्या अंतराळवीरांनी त्यांच्या सहा महिन्यांच्या वास्तव्यात अत्यंत महत्वपूर्ण सायंटिफिक संशोधन केले आणि स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी Space Walkहि केला अंतराळवीर Josh Cassada आणि Frank Rubio ह्यांनी तीन  Space Walk केले तर अंतराळवीर Nicole Mann आणि Koichi Wakata ह्यांनी दोन Space Walk केले ह्या अंतराळवीरांनी स्थानकातील व्हेजी चेंबर मध्ये व्हेजी प्रोजेक्ट अंतर्गत मातीशिवाय रोपे वाढविण्याचा प्रयोग यशस्वी केला त्यांनी Hydroponic आणि Aeroponic Techniques चा वापर करून रोपांची यशस्वी लागवड केली ह्या शिवाय त्यांनी  छोट्या टोमॅटोंची रोपे वाढवून टोमॅटोही पिकवले 

हे अंतराळवीर 5 आक्टोबर 2022 मध्ये स्थानकात रहायला गेले होते त्यांच्या 157दिवसांच्या वास्तव्या दरम्यान त्यांनी पृथ्वीभोवती  2512 वेळा भ्रमण केले आणी 66577,531मैलाचा अंतराळप्रवास केला अंतराळवीर Nicole Mann,Josh Cassadaआणी Anna Kikina हे पहिल्यांदाच स्थानकात रहायला गेले होते Koichi Wakata मात्र पाचव्यांदा अंतराळस्थानकात रहायला गेले होते त्या दरम्यान त्यांनी स्थानकात 505 दिवस वास्तव्य

 

Thursday 9 March 2023

अंतराळवीर स्थानकात पोहोचताच पार पडला Welcome Ceremony

 The four SpaceX Crew-6 members joined the seven Expedition 68 crew members aboard the space station expanding its population to 11. Credit: NASA TV

Welcome Ceremony दरम्यान नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधताना स्थानकातील अकरा अंतराळवीरांसोबत Space X Crew 6 चे अंतराळवीर -फोटो -नासा संस्था

 नासा संस्था - 3 मार्च

Space X Crew -6 चे अंतराळवीर Steve Bowen ,Woody Houburg अरबी अंतराळवीर Sultan Alneyadi आणि रशियन अंतराळवीरAndry Fedyaev शुक्रवारी 3.45 a.m.वाजता स्थानकात पोहोचले तेव्हा अंतराळस्थानकातील अंतराळवीरांनी त्यांचे स्थानकात स्वागत केले स्थानकातील सातही अंतराळवीर स्थानकाच्या Hatchway मध्ये त्यांच्या स्वागतासाठी आधीच एकत्र जमले होते ह्या अंतराळवीरांनी एकमेकांशी हस्तांदोलन करून स्थानकात सुरक्षित पोहोचल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले त्या नंतर त्यांनी थोडावेळ एकमेकांशी संवाद साधला 

काही वेळातच स्थानकात  Welcome Ceremony  पार पडला तेव्हा सारे अंतराळवीर एकत्र जमले नासाच्या Associate Administrator  Kathy Leaders ह्यांनी Space X Crew -6 च्या अंतराळवीरांशी लाईव्ह संवाद साधला आणि  स्थानकात सुरक्षित पोहोचल्या बद्दल त्यांचे अभिनंदन केले त्या म्हणाल्या," तुमचे अंतराळ स्थानकात जाणे अचानक समस्या ऊदभवल्यामुळे लांबले होते तरीही ऊशीराने तुम्ही स्थानकात सुरक्षित पोहोचला आहात हे पाहून आम्हाला आनंद झाला येत्या काही महिन्यात तुम्हाला खूप काम करावे लागेल लवकरच Space X Crew-5 चे अंतराळवीर पृथ्वीवर परतणार आहेत आणी Crew Vehicles पण स्थानकात येणार आहेत त्याची तयारी तुम्हाला करावयाची आहे शिवाय तिथे सुरू असलेल्या सांयटिफीक संशोधनात तुम्ही सहभागी व्हाल तेव्हा त्यातील प्रगती आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे नेहमीप्रमाणेच आम्हाला तुम्ही स्थानकात पोहोचल्याबद्दल अभिमान वाटतोय तुमचे अभिनंदन !आणी स्थानकात स्वागत !

मला U.A.E च्या Space Center चे डायरेक्टर Hamad Al Monsori ह्यांची ओळख करून देताना अभिमान वाटतोय ते सध्या आपल्या संपर्कात आहेत आणी तुमच्याशी लाईव्ह संवाद साधणार आहेत 

Hamad Al Monsori -Kathy,Thank you so much!  Woody,Bowen,Andrey आणी छोटा अंतराळवीर Sultan  Congratulations! तुम्हा सर्वांचे स्थानकात सुरक्षित पोहोचल्याबद्दल अभिनंदन! आता नासा Space X आणी UA.E ची अंतराळ संस्था एकत्रित काम करणार आहेत त्यामुळे कृपया मला आमच्या अरबी भाषेत बोलण्याची परवानगी द्या असे म्हणत त्यांनी अरबीत संवाद साधत अंतराळवीर सुलतान ह्याचे अभिनंदन करून त्याचे स्थानकात स्वागत केले आम्हाला तुझ्याकडून आता चांगल्या कामाची अपेक्षा आहे तुझ्यामुळे आपल्या देशाचे नाव उंचावले आहे आम्हाला तुझा अभिमान वाटतोय तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा ! असे म्हणत त्याचे अभिनंदन केले त्यांनी नासा संस्था ,Space X चेही आभार मानले तुम्हा सर्वांचे काम ह्या तीनही देशाला प्रगतीपथावर नेणार आहे असेही ते म्हणाले 

 Sergey Prokopyev - Woody,Bowen,Andrey आणि Sultanतुमचे स्थानकात स्वागत!आता आपल्याला एकत्र काम करावयाचे आहे Woody, Sultan,Andrey तुम्ही इथे स्थानकात पोहोचला आहात आता खरोखरच तुम्ही  अंतराळवीर झाला आहात तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो आणी तुमच्या हातुन चांगले कार्य घडो हि सदिच्छा ! तुमच्या स्थानकातील प्रथम प्रवेशाबद्दल अभिनंदन !

Stephen Bowen -मी पुन्हा अकरा वर्षांनी माझ्या स्थानकातल्या घरी पोहोचलो आहे Launching ला उशीर झाला पण अखेर आम्ही इथे पोहोचलो स्थानकाजवळ पोहोचलो तेव्हा बाहेरुन येताना मी स्थानकाकडे नजर टाकली तेव्हा  मला स्थानकातील बदल जाणवले स्थानकाबाहेरील वायर्सची संख्या वाढलीय आणि स्थानकातील अंतराळवीरांचीही संख्या वाढलीय हे पाहून आनंद झाला स्थानक आतूनही अत्याधुनिक झालय आता इथे मला सहा महिने काम करावयाचे आहे अंतराळवीर Koichi ला पाहून मला आनंद झाला 

Woody - खरंच आश्चर्यकारक आहे सार ! हे स्थानक बनविणारे शास्त्रज्ञ,इंजिनीअर्स,तंत्रज्ञ हयांच हे असामान्य कर्तृत्व पाहून मी चकित झालो कित्येक वर्षे ट्रेनिंग घेतल्यानंतर आम्ही आता खऱ्या अंतराळस्थानकात येऊन पोहोचलो आहोत नासाच्या Johnson Space Center मधल्या बिल्डिंग सारखच हे स्थानक आहे पण हे अंतराळात आहे मी ह्या क्षणी खूप आनंदात आहे ह्या Crew -6 मधील अंतराळविरांसोबतचा हा अंतराळप्रवास Space X सारच अमेझिंग ! ह्या मोहीम 68च्या अंतराळवीरांचा मला आदर वाटतोय त्यांच्यासोबत आता मला काम करायला मिळेल मला Frank सोबत काम करायला त्यांच्याकडून शिकायला आवडेल 

Sultan -मी अखेर इथे पोहोचलो ! खरंच मी हे आव्हान पेललय यशस्वी झालोय ! मी सुरक्षित आहे ! मला हि संधी दिल्याबद्दल U.A.E च्या Muhammad Center चे आभार त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नासा Space X संस्थेचेही आभार !माझे कुटुंबीय सहकारी ह्यांनी देखील मला इथे येण्यास प्रवृत्त केल त्याबद्दल त्यांचेही आभार !आमच्या देशाने अंतराळविश्वातील उचललेल हे प्रगतीपथावरच पाऊल कौतुकास्पद आहे मी माझ्या देशातील अंतराळप्रवास करणारा दुसरा अंतराळवीर आहे आणि स्थानकात राहणारा पहिला अंतराळवीर आहे मी खरोखरच भाग्यवान आहे मला हि संधी मिळाली मला देखील थोडेसे आमच्या अरबी भाषेत बोलावयाचे आहे आभार मानावयाचे आहेत असे म्हणत त्यांनी अरबी भाषेत संवाद साधत संस्था प्रमुखांचे आभार मानले 

रशियन अंतराळवीर Andrey Fedyaev ह्यांनी देखील रशियन भाषेत संवाद साधत रशियन संस्था Roscosmos मधील प्रमुख,नासा संस्था आणि Space X चे आभार मानले

Tuesday 7 March 2023

Space X Crew-6 चे अंतराळवीर स्थानकात पोहोचले

 The four SpaceX Crew-6 members (from left) Andrey Fedyaev, Woody Hoburg, Stephen Bowen, and Sultan Alnedayi, are pictured inside the Crew Dragon Endeavour prior to launching.

 Space X Crew -6 चे अंतराळवीर Stephen Bowen ,Woody Houburg रशियन अंतराळवीर Andry Fedyaev आणि अरबी अंतराळवीर Sultan Alneyadi स्थानकाकडे जाण्याच्या तयारीत -फोटो नासा संस्था

नासा संस्था -3 मार्च 

नासाच्या अंतराळ मोहीमेअंर्गत Space X Crew -6चे अंतराळवीर Stephen Bowen ,Woody Houburg अरबचे अंतराळवीर Sultan Alneyadi आणि रशियन अंतराळवीर Andry Fedyaev शुक्रवारी अंतराळ स्थानकात सुखरूप पोहोचले आहेत हे अंतराळवीर 26 फेब्रुवारीलाच  स्थानकात जाणार होते पण उड्डाणाआधी Space X Crew Dragon मध्ये अचानक समस्या उद्भवल्यामुळे त्यांचे उड्डाण रद्द झाले होते पण  नंतर 2 मार्चला  Space X च्या दुरुस्ती नंतर हे अंतराळवीर स्थानकाकडे रवाना झाले 

नासाच्या केनेडी स्पेस सेंटर मधील 39-A ह्या उड्डाणस्थळावरून Space X Crew Dragon  Endeavour गुरुवारी 2 मार्चला 12.15a.m. वाजता ह्या चार अंतराळवीरांसह स्थानकात जाण्यासाठी अंतराळात  झेपावले आणि शुक्रवारी 3 मार्चला 25 तासांच्या अंतराळ प्रवासानंतर 1.40a.m. वाजता स्थानकाजवळ पोहोचले 

 स्थानकाजवळ पोहोचताच  Endeavour अंतराळयानातील स्वयंचलित यंत्रणेने स्थानक आणि अंतराळयान ह्यांच्यातील Hatching आणि Docking प्रक्रिया पार पडल्यानंतर दोन तासांनी अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला 

अंतराळस्थानकात सध्या राहात असलेल्या अंतराळ मोहीम 68 च्या अंतराळवीरांनी त्यांचे स्थानकात स्वागत केले त्यानंतर ह्या अंतराळवीरांचा Welcome Ceremony पार पडला आता अंतराळस्थानकात अंतराळवीरांची संख्या 11 झाली असून हे सर्वजण एकत्रित तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील लवकरच अंतराळ मोहीम 68चे Crew-5अंतराळवीर पृथ्वीवर परतणार आहेत