Tuesday 14 February 2023

Curiosity यानाला मंगळावरील पुरातन काळच्या आटलेल्या पाण्याच्या स्रोत सापडले

 Rippled texture on the surface of Mars

Curiosity यानाने संशोधित केलेला मंगळावरील Marker Band ह्या भागातील पुरातनकाळच्या आटलेल्या लाटांच्या खुणा आणि आटलेले सरोवर -फोटो नासा संस्था -(J.PL Lab ) 

नासा संस्था -8 फेब्रुवारी 

नासाचे Curiosity मंगळयान 2012 पासून मंगळावर कार्यरत आहे मंगळावरील पुरातनकाळच्या सजीवसृष्टीच्या अस्तित्वाला दुजोरा देणारे पुरावे शोधण्याचे काम हे मंगळयान करत आहे आजवर ह्या यानाने तेथील अत्यंत महत्वपूर्ण संशोधित माहिती आणि नमुने गोळा केले आहेत आणि आता Curiosity मंगळयान मंगळभूमीवरील पुरातनकाळच्या पाण्याच्या आटलेल्या स्त्रोताच्या भागात पोहोचले आहे 

मंगळावरील Marker Band Valley ह्या भागात Curiosity यानाला पुरातन काळच्या प्रवाहित पाण्याच्या आटलेल्या स्वरूपातील खुणा सापडल्या आहेत हा भाग कोरडा वाळवंटीय असून तेथील मातीत Sulfate आणि मिठाचे क्षार विपुल प्रमाणात आढळले आहेत शास्त्रज्ञांच्या मते पुरातनकाळी येथे प्रवाहित पाण्याचे अस्तित्व होते ह्याचा हा ठोस पुरावा आहे करोडो वर्षांपूर्वी तेथे पाणी प्रवाहित स्वरूपात अस्तित्वात होते आणि कालांतराने ते नष्ट झाले तेव्हा त्यातील मिनरल्स,सल्फेट आणि मीठ देखील पाण्यासोबत आटले आणि सूक्ष्म स्वरूपात तेथील मातीत अस्तित्वात राहिले ह्या भागात आटलेले सरोवर आणि प्रवाहित लाटांच्या लहरीच्या खुणा फोल्डिंगच्या स्वरूपात आहेत आणि आजूबाजूला सरोवराच्या पाण्यातील गाळांमुळे तयार झालेल्या सेडीमेंटरी खडकांचे थर आढळले आहेत 

ह्या आटलेल्या पाण्याच्या लाटांच्या लहरी पाहून Curiosity टीम मधील शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले आहेत ह्या सरोवरातील पाणी आटले तेव्हा त्याच्या तळाशी जमलेला गाळ देखील वाळला आणि तेथे खडकाच्या स्वरूपात अस्तित्वात राहिला तेव्हा गाळातील मातीतील मिठाचे आणि सल्फेटचे अंश देखील आटलेल्या अवस्थेत अस्तित्वात राहिले नासाच्या Jet Propulsion Lab चे Curiosity Project Scientist  Dr .Ashwin Vasavada म्हणतात,Curiosity यानाने ह्या मोहिमेत आतापर्यंत संशोधित केलेल्या भागांमध्ये हा भाग मंगळावरील पुरातन काळच्या पाण्याच्या अस्तित्वाला दुजोरा देणारा उत्कृष्ट पुरावा आहे प्रवाहित पाणी आणि पाण्याच्या लाटांच्या आटलेल्या खुणा ह्या मोहिमेत आम्हाला प्रथमच आढळल्या आहेत आजवर आम्ही मंगळभूमीवरील हजारो फुटावरून सरोवराचा भाग शोधला पण असे ठिकाण सापडले नव्हते मंगळावरील Mount Sharp ह्या भागातील 5k.m.उंचीवरील पर्वतीय दऱ्याखोऱ्यांच्या ह्या भागातील उतारावरून आम्ही पाण्याच्या झऱ्याचे,प्रवाहाचे स्रोत व सरोवर पाहण्याचा प्रयत्न केला कारण ह्या भागात पुरातन काळी पाण्याचे अस्तित्व असल्याचा अंदाज आम्हाला होता हा भाग पाण्याच्या अस्तित्वाने समृद्ध असावा त्यामुळे तेथे सूक्ष्म सजीवसृष्टीच्या उत्पत्तीचीही शक्यता असावी असे आमचे मत होते पण अखेर ह्या रुक्ष वाळवंटात आम्हाला पुरातनकाळच्या पाण्याच्या अस्तित्वाचे पुरावे सापडले 

 NASA’s Curiosity used its Mastcam to capture this 360-degree panorama of “Marker Band Valley” Curiosity मंगळयान 16 डिसेंबर 2022ला मंगळावरील 3,684 व्या मंगळदिवशी Marker Band Valley  येथे कार्यरत असताना -फोटो -नासा संस्था

Mount Sharp हा भाग सेडीमेंटरी खडकांच्या लेयर्सनी बनलेला आहे त्या काळी प्रवाहित पाण्यातील वहात आलेला गाळ,माती आणि वाळू ह्या पासून तयार झालेल्या खडकांचे एकमेकांवर थर साचून हे खडक तयार झाले असावेत खालचे थर प्राचीन असून सर्वात वरचा खडकांचा थर नंतर साचलेल्या गाळापासून तयार झालेला आहे हा भाग उंच पर्वत आणि लहानमोठ्या डोंगरांचा आहे हे वातावरण आणि तेथील आटलेल्या सरोवराच्या आणि लाटांच्या खुणा पाहून शास्त्रज्ञांना मंगळावर पुरातन काळी पृथ्वीसारखे वातावरण अस्तित्वात असण्याची शक्यता वाटते त्या मुळे एकेकाळी पृथ्वीसारखे उबदार वातावरण आणि सजीवसृष्टीचे अस्तित्व असलेला हा भाग कालांतराने वाळवंटात कसा परावर्तित झाला ह्याचे संशोधन शास्त्रज्ञ करत आहेत 

ह्या पर्वतीय भागाच्या पायथ्यापासून अर्धा मैल उंचीवर Curiosity मंगळ यान चढले तेव्हा Curiosity यानाला ह्या आटलेल्या लाटांचा भाग आढळला ह्या भागाला Marker Band असे नाव देण्यात आले आहे ह्या सरोवराभोवती एक डार्क रंगाच्या खडकांचा पातळ थरही आढळला असून तो उर्वरित भागापासून वेगळा आहे आणि अत्यंत कठीण  खडकांनी बनलेला आहे Curiosity यानाला तो फोडता न आल्याने तेथील नमुना घेण्यात अपयश आले ह्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या "Vera Rubin Ridge " ह्या भागातील खडक असेच कठीण असल्याने Curiosity यानाला ते फोडण्यासाठी तीनवेळा प्रयत्न करावे लागले होते Marker Band ह्या भागात ह्या टीमला एक वैशिष्टपूर्ण आकाराचा खडक आढळला तेथील भौगोलिक घडामोडीमुळे हा खडक तयार झाला असावा

पुढच्या आठवड्यात ह्या टीममधील शास्त्रज्ञ त्या भागातील नरम खडकांचा शोध घेतील Marker Band भागापासून दुरवर Gediz Vallis Ridge ह्या भागातील आटलेल्या खोऱ्यात पाण्याच्या स्रोताचे अवशेष सापडू शकतात अशी शक्यता शास्त्रज्ञांना वाटते तेथे वादळामुळे दरी निर्माण झाली असावी आणि पर्वतावरून पाण्याचा प्रवाह खाली वहात येऊन पायथ्याशी प्रवाहाचे नदीत रूपांतर झाले असावे शिवाय मंगळावरील पुरातन काळच्या भौगोलिक घडामोडी अती पावसाने आलेला पूर आणी भूस्खलन होऊन तेथील मोठमोठे खडक,मातीचे ढिगारे वाहून खालीपर्यंत आले असावे Curiosity यानाला मागच्या वर्षी दोनवेळा असे ढिगाऱ्यांनी बनलेले दगडांचे थर आढळले होते पण हे निरीक्षण दुरून केलेले होते आता तेथे सखोल संशोधन केले जाईल 

लाटांचे तरंग,आटलेल्या ढिगाऱ्यांचे प्रवाह आणि तेथील लयबद्ध थर पाहून मंगळावर करोडो वर्षांपूर्वी प्रवाहित स्वरूपात पाण्याचे अस्तित्व होते आणि कालांतराने नंतर ते आटले आणि नष्ट झाले ह्याचा हा सबळ पुरावा आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात

No comments:

Post a Comment