Space X Crew -6 चे नासाचे अंतराळवीर Andrey Fedyaev,अंतराळवीर Warren Hoburg ,रशियन अंतराळवीर Stephen Bowen आणि अरबी अंतराळवीर Sultan Alneyaddi Space X Dragon मध्ये ट्रेनिंग दरम्यान -फोटो नासा संस्था
नासा संस्था -19 फेब्रुवारी
नासाच्या Space X Crew -6 अंतराळ मोहिमेअंतर्गत चार अंतराळवीरांना घेऊन Space X Crew Dragon सातव्यांदा अंतराळस्थानकात जाणार आहे नासाचे अंतराळवीर Stephen Bowen अंतराळवीर Warren Hoburg अरबचे अंतराळवीर (UAE) Sultan Alneyadi आणि रशियन अंतराळवीर Andrey Fedyaev ह्यांचा त्यात समावेश आहे
26 फेब्रुवारीला नासाच्या Kennedy Space Center Florida येथील 39 Aउड्डाण स्थळावरून Space X Dragon स्थानकात जाण्यासाठी अंतराळात ऊड्डाण करणार आहे Endeavour अंतराळयान ह्या चार अंतराळवीरांना घेऊन सकाळी 2.07a.m.(EST) वाजता स्थानकाच्या दिशेने अंतराळात झेपावणार आहे आणि23 तासांच्या अंतराळ प्रवासानंतर 27 फेब्रुवारीला सकाळी 2.54a.m.वाजता स्थानकाच्या समोरील Port ह्या भागातील Harmony Module जवळ पोहोचेल
ह्या मोहिमेचे कमांडर पद अंतराळवीर Stephen Bowen पायलटपद Warren Hoburg सांभाळणार असून अंतराळवीर Sultan आणि Andrey हे दोघे ह्या मोहिमेत मिशन स्पेशालिस्ट पद सांभाळणार आहेत अंतराळवीर Bowen ह्यांची हि चवथी अंतराळवारी आहे ह्या आधी तीनवेळा ते अंतराळस्थानकात राहून आले आहेत ह्या मोहिमेत ते कमांडर असल्यामुळे पृथ्वीवरून स्थानकाकडे उड्डाण आणि परत पृथ्वीवर लँडिंग हि महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे रशियन अंतराळवीर Andrey Fedyaev ,Warren Hoburg आणि अरबी अंतराळवीर Sultan हे मात्र पहिल्यांदाच स्थानकात राहायला जाणार असून व्यावसायिक अंतराळयानातून अंतराळप्रवास करणारे ते पहिले अरबी अंतराळवीर आहेत
स्थानकात पोहोचल्यावर सध्या स्थानकात राहात असलेले अंतराळवीर त्यांचे तेथे स्वागत करतील ह्या अंतराळवीरांच्या अंतराळ उड्डाण आणि स्थानकातील प्रवेशाचे लाईव्ह प्रसारण नासा T.V.वरून करण्यात येणार असून हौशी नागरिकांना ह्या उड्डाण मोहिमेत आभासी उपस्थित राहण्याची संधी नासा संस्थेने उपलब्ध केलीआहे पण त्या साठी नासा संस्थेत नाव नोंदवून Virtual Gust Passport घेणे आवश्यक आहे
No comments:
Post a Comment