Saturday 23 July 2022

स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी अंतराळवीर Samantha आणि Oleg Artemyev ह्यांचा Space Walk संपन्न

ESA (European Space Agency) astronaut Samantha Cristoforetti works outside the space station's Russian segment to configure the new European robotic arm. Credit:NASA TV

अंतराळवीर Samantha Cristoforetti आणि अंतराळवीर Oleg Artemyev स्थानकाबाहेरील रशियन सेगमेंट मध्ये स्पेसवॉक करताना -फोटो नासा संस्था 

नासा संस्था - 21 जुलै 

नासाच्या अंतराळ मोहीम 67चे अंतराळवीर आणि कमांडर Oleg Artemyev आणि फ्लाईट इंजिनीअर Samantha Cristoforetti ह्या दोघांनी गुरुवारी स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी स्पेसवॉक केला 

ह्या दोघांनी बुधवारीच ह्या स्पेसवॉकची तयारी सुरु केली होती त्यांनी त्यांचे Orlan Spacesuit चेक केले चार्ज करून इतर आवश्यक तयारी केली गुरुवारी सकाळी 10.50a.m. ला हे दोघे स्पेसवॉक साठी स्थानकाबाहेर पडले आणि सात तासांनी स्पेसवॉक संपवून संध्याकाळी 5.55p.m.ला स्थानकात परतले स्पेसवॉकसाठी अंतराळवीर Oleg Artemyev ह्यांनी परिधान केलेल्या रशियन स्पेससूटवर लाल रंगांच्या रेषा होत्या तर अंतराळवीर Samantha ह्यांनी घातलेल्या रशियन स्पेससूटवर निळ्या रंगांच्या रेषा होत्या

सात तास पाच मिनिटांच्या ह्या स्पेसवॉक मध्ये ह्या दोघांनी स्थानकाच्या रशियन सेगमेंट मधील बाहेरील 37 फूट लांबीच्या Manipulator system जवळील भागात Platform &Workstation Adapter Hardware फिट केले व दहा Nano satellites install केले ह्याचा उपयोग स्थानकाला रेडिओ electronics data मिळवण्यासाठी होईल शिवाय ह्या दोघांनी स्थानकाच्या रशियन सेगमेंट मधील Nauka Laboratory ह्या भागात रोबोटिक आर्म फिट केला ह्या स्पेसवॉकर्सनी रोबोटिक आर्मसाठीचे External Control Panel कादून दुसरीकडे बसविले

हा तिसरा नवीन रोबोटिक आर्म आहे ह्या आधी स्थानकात Canadian नी बनविलेला Canadarm-2 आणि जापनीज रोबोटिक आर्म  बसविलेला आहे ह्या रोबोटिक आर्मचा उपयोग स्थानकाच्या मेंटेनन्स साठी,रिसर्चसाठी आणि इतर कामासाठी होतो युरोपियन आर्मचा उपयोग पेलोड हलविण्यासाठी एक ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी व रशियन सेगमेंटच्या बाहेरील भागातील Equipment इतरत्र नेण्यासाठी होतो ह्या शिवाय ह्या अंतराळवीरांनी ह्या स्पेसवॉक मध्ये पुढील स्पेसवॉक साठीचीही तयारी करून ठेवली 

अंतराळवीर Oleg Artemyev ह्यांच्या अंतराळ कारकिर्दीतला हा सहावा स्पेसवॉक होता तर अंतराळवीर Samantha Cristoforetti ह्यांचा हा पहिलाच स्पेसवॉक होता आजवर स्थानकाच्या दुरुस्तीसाठी केलेला हा 251वा  स्पेसवॉक होता आणि ह्या वर्षातील हा सहावा स्पेसवॉक होता

अंतराळवीर Kjell Lindgren आणि Jessica Watkins ह्यांनी स्थानकातून साधला लाईव्ह संवाद

 अंतराळवीर Jessica Watkins आणि अंतराळवीर Kjell Lindgren  स्थानकातून लाईव्ह संवाद साधताना -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -18 जुलै 

नासाच्या अंतराळ मोहीम 67 चे अंतराळवीर Kjell Lindgren आणी Jessica Watkins ह्यांनी Huston मधील WYPR(NPR) Redio (Baltimore )येथील Tom Hall (Midday )ह्यांच्याशी लाईव्ह संवाद साधला त्याचा हा वृत्तांत 

Tom-Dr.Watkins आणी Dr.Lindgren तुम्हाला पाहून आनंद झाला आधी तुम्ही आमच्यासाठी वेळ दिल्याबद्दल तुमचे आभार 

Dr.Watkins तुझी हि पहिली अंतराळवारी आहे त्या साठी तु दीर्घकाळ ट्रेनिंग घेतल असेल ह्या पहिल्या अंतराळ निवासातील तुला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट कोणती आहे ?

Watkins -हो ,ह्या मिशनसाठी आम्ही बराच काळ ट्रेनिंग घेतल माझी हि पहिलीच अंतराळवारी असल्याने अंतराळ प्रवास,स्थानकातील वास्तव्य हा माझ्यासाठी अत्यंत रोमांचक अनुभव होता मी Geologist असल्याने मला इथे स्थानकाच्या खिडकीतून खाली पृथ्वीकडे पहायला खूप आवडत पृथ्वीवरील वेगवेगळे भाग जिथे मला जावस वाटत होत आणि जायची ईच्छा आहे तो भाग मी ईथे वरुन पाहु शकते तेव्हा खूप अमेझिंग फिलींग येत 

Tom - Dr  Lindgren ,ह्या  मोहिमेसाठी तुम्ही दीर्घकाळ कठीण ट्रेनिंग घेतल असेल हि मोहीम सोपी नाही तुमच्या साठी सगळ्यात challenging गोष्ठ कोणती होती ?

Kjell Lindgren - हो ! अशा प्रकारची मोहीम कठीणच असते आणि आमच्यासाठी Challenging गोष्ठ म्हणजे बदललेला launching चा प्लॅन आमच launching लांबल त्या मुळे आमच्या schedule मध्ये  देखील थोडेफार बदल झाले आमची पृथ्वीवर परतण्याची तारीखही पण आम्हाला ट्रेनिंग मध्ये अशा कठीण परिस्थितीत adjust होण्याच ट्रेनिंग दिलेल असल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आताच स्थानकात Space X -25 Cargo Vehicle पोहोचले त्या मुळे आम्ही अत्यंत बिझी होतो त्यातील सामान काढण वै. 

Tom -Watkins तुझ काय मत आहे ? तुला काय Challenging वाटत ? सध्या स्थानकात सात अंतराळवीर वास्तव्य करत आहेत त्या मुळे राहण्यासाठी कमी जागा असल्याने तुमच्या प्रायव्हसीत बाधा येते का ?

Watkins -आम्ही चौघेजण इथे आणि तीन रशियन अंतराळवीर रशियन सेगमेंट मध्ये राहात असल्यामुळे प्रायव्हसीचा प्रॉब्लेम येत नाही माझे सहकारी अंतराळवीर खूप चांगले आहेत आम्ही चौघेजण आमच्या रशियन अंतराळवीर सहकाऱ्यांसोबत इथे वास्तव्य करतो,संशोधन करतो मोकळ्या वेळेत एकत्र येतो गप्पा मारतो एकत्र जेवण करतो त्या मुळे काही प्रॉब्लेम येत नाही उलट सगळ्यांची चांगली ओळख होते एकमेकांना समजून घेता येत आणि आम्ही इथे सर्वजण आनंदात मजेत वेळ घालवतो 

Tom -Lindgren हि तुझी दुसरी अंतराळवारी आहे ह्या आधीही तू स्थानकात वास्तव्य केले आहेस आधीच्या आणि आताच्या वास्तव्यात काय फरक जाणवतो ?

Lindgren -मी लकी आहे मला दुसऱ्यांदा स्थानकात राहायची संधी मिळालीय ह्या आधी मी 2015च्या अंतराळ मोहीमे अंतर्गत स्थानकात वास्तव्य केले होते त्या वेळेस आम्ही तिघे होतो आणि आम्ही सोयूझ अंतराळयानातून अंतराळ प्रवास केला होता आता आम्ही चौघे होतो आणि मी ह्या वेळेस Space X Crew Dragon मधून अंतराळ प्रवास केला Space X Dragon स्पेसियस आहे आरामदायी आहे सोयूझ यानात जागा कमी होती पण स्थानक त्यात सुरु असलेले सायंटिफिक प्रयोग स्थानकासाठीचा Space Walk सगळ  सारखच आहे फक्त माझ्या सोबतचे अंतराळवीर बदलले आहेत आधीचे अंतराळवीर चांगले होते आताचेही आहेत आताच्या रशियन अंतराळवीरांसोबत राहण्याचा अनुभव छान आहे अंतराळवीर बदलले तरी आम्ही सारखीच मजा अनुभवतो स्थानक आता अद्ययावत झाले आहे 

Tom -Watkins तू Geologist आहेस त्या मुळे तुझ्या संशोधनाच स्वरूप काय आहे तू करत असलेल्या संशोधनाचा उपयोग पृथ्वीसाठी आणि भविष्यकालीन अंतराळ मोहिमेसाठी कसा उपयुक्त ठरेल ?

Watkins - मी इथून पृथ्वीचे ग्रहाच्या दृष्टीकोनातून निरीक्षण करते विशेषतः चंद्र आणी मंगळ ग्रहांचे मी पृथ्वीवरची  geological माहिती गोळा करते भविष्यकालीन चंद्र आणि मंगळ मोहिमेसाठी उपयुक्त माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करते त्या साठी Remote Sensing Instrument चा उपयोग होतो शिवाय आताच स्थानकात आलेल्या कार्गोशिप मधून अनेक प्रकारचे Earth Science Experiments आले आहेत त्यात पृथ्वीवरील धुळीचे निरीक्षण ,हवामानातील बदलांचे निरीक्षण त्यांचा पृथ्वीवर होणारा परिणाम या सारखे अनेक सायंटिफिक प्रयोग इथे केल्या जात आहेत हे सर्व संशोधन करताना geologist म्हणून मला निश्चितच आनंद मिळतो हे ग्रहनिरिक्षण भविष्यकालीन अंतराळ मोहिमेसाठी अत्यंत आवश्यक आहे आणि पृथ्वीसाठीही 

Tom - Lindgren तू डॉक्टर आहेस तू इमर्जन्सी फिजिशियनचे ट्रेनिंग घेतले आहेस तुझ्या पृथ्वीवरील प्रॅक्टिस मध्ये आणि दोनवेळच्या अंतराळमोहिमेतील स्थानकातील प्रॅक्टिस मध्ये तुला काय फरक जाणवला तुझा अनुभव कसा होता ?

Lindgren - मी दोन्हीवेळेसच्या अंतराळवीरांच्या टीमचा आभारी आहे सुदैवाने मला त्यांना इमर्जन्सी ट्रीटमेंट देण्याची वेळ आली नाही स्थानकातील Aerospace medicine प्रॅक्टिस आणि पृथ्वीवरील प्रॅक्टिस ह्यात फरक आहे इथे खूप काळजी घ्यावी लागते पृथ्वीवरील वातावरण आणि स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीतील वातावरण ह्यात फरक आहे इथे शरीर तरंगत राहिल्याने शरीरावर विपरीत परिणाम होतो शिवाय सतत तरंगत्या अवस्थेत असल्याने शारीरिक इजा होण्याची शक्यता असते ती होऊ नये म्हणून सतत काळजी घ्यावी लागते तसेच आजारी पडू नये म्हणूनही काळजी घेतल्या जाते आम्हाला हेल्दी डायट फूड दिल जात आम्ही व्यायाम करतो आणि हेल्दी राहण्याचा प्रयत्न करतो इथून पृथ्वीवर परतल्यानंतरही आम्हाला आमची काळजी घावी लागते त्या साठी काही औषधे दिली जातात  तिथे पृथ्वीवर Aerospace इमर्जन्सी फिजिशियन मध्ये जे शिकवल जात ते इथे स्थानकात प्रत्यक्षात अनुभवायला मिळत अंतराळवीरांमधील शारीरिक बदल प्रत्यक्षात पाहता येतात शरीरातील Cardiovascular System ,Bone loss वै गोष्टी प्रत्यक्षात पाहून त्यांचे निरीक्षण नोंदवून त्यावर संशोधन करता येत 

Tom -Watkins आतापर्यंत स्थानकात फक्त दहा आफ्रिकन अमेरिकन अंतराळवीरांनी वास्तव्य केलय तू पहिली आफ्रिकन अमेरिकन महिला अंतराळवीर आहेस स्थानकात वास्तव्य करणारी ह्याचा भविष्यात कसा फायदा होईल 

Watkins - मी ह्या अंतराळमोहिमेतील एक हिस्सा आहे आधी आणि आताही अंतराळमोहिमेतील मानवी सहभाग आफ्रिकन अमेरिकन अंतराळवीरांसाठी यशस्वी पाऊलवाट आहे मला स्थानकात वास्तव्य करण्याची संधी मिळाली मी लकी आहे भविष्यकालीन आर्टेमिस चंद्र आणि मंगळ मोहिमेसाठी आताच्या संशोधनाचा उपयोग होणार आहे हि माझ्यासाठी सन्माननीय गोष्ट आहे 

Tom - Watkins तू लहानपणापासूनच अंतराळवीर व्हायच हे ठरवल होतस का ? नक्की केव्हा हे तुला रियलाईझ झाल त्यासाठी कसे प्रयत्न केलेस ?

Watkins - हो ! मी नऊ वर्षाची होते तेव्हापासूच अंतराळवीर व्हायच माझ स्वप्न होत पण मी जेव्हा तारुण्यात प्रवेश केला तेव्हा मला जाणवल आणि मी अंतराळवीर व्ह्यायच ठरवल  नशिबाने मला माझ्या टीचर्स आणि कुटुंबीयांनी साथ दिली माझ्या गुरुंनी मला योग्य मार्गदर्शन केले धैर्य दिल आणि मदत केली मग मी माझ द्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न केले मार्ग शोधला आणि संधी मिळताच अंतराळवीर होण्यासाठी अर्ज केला म्हणून मी मला साथ देणाऱ्या,मार्ग दाखवणाऱ्या सर्वांचे आभार मानते 

Tom- Lindgren तुझही अंतराळवीर होण्याच स्वप्न होत का ?तू  डॉक्टर होतास इमर्जन्सी फिजिशियन म्हणून प्रॅक्टिस करत होतास मग अंतराळवीर झालास दोन्ही पैकी एक फिल्ड निवडण कठीण होत का ?

Lindgren - हो ! मलाही अंतराळवीर व्हायच होत पण मी आधी मेडिसिनच क्षेत्र निवडल डॉक्टर होऊन प्रॅक्टिस केली दोन्ही क्षेत्र चांगले होते मला इमर्जन्सी डिपार्टमेंट मध्ये फिजिशियन म्हणून काम करण्याची संधी मिळाली पण मला नेहमी माझ अंतराळवीर होण्याच स्वप्न आठवायच तरीही मी ट्रेनिंग पूर्ण केल नंतर मला कळाल कि मी Aerospace medicine केल तर माझ स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल म्हणून मी Aerospace medicine च ट्रेनिंग घेतल मला त्याच दरम्यान Flight surgeon पदावर नोकरी मिळाली त्यामध्ये अंतराळवीर आणि त्यांचे कुटुंबीय ह्यांची काळजी घेण्यासाठी काम करायची संधी मिळाली आणि त्याच वेळेस अंतराळवीर पदासाठी निवड होणार असल्याचे कळाले मी अप्लाय केला आणि माझी 2009 मध्ये नासा मध्ये अंतराळवीर होण्यासाठी निवड झाली 

Tom -Watkins इथे Baltimore मध्ये वेब टेलेस्कोपशी संबंधित बरेच जण आहेत त्यांनी अंतराळातील दूरवरच्या  आजवर माहिती नसलेल्या भागातील ग्रहताऱयांचे अत्यंत सुंदर आणि आश्चर्यकारक फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत त्यामुळे लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे ते फोटो पाहून लोक ह्या मिशनकडे आकर्षित झाले आहेत तुझ काय मत आहे ?

Watkins -हो ! खरच हे Exiting आहे मला वाटत नासाच्या सर्व अंतराळ मोहिमा मध्ये लोकांचा सहभाग वाढला आहे लोक ह्या यशाने प्रेरित झाले आहेत नासाचे हे यश जगाला आणखी पुढे पुढे यशाच्या मार्गावर नेत आहे लवकरच सौरमाला आणि सौरमालेबाहेरील ब्रह्मांडातील दूरवरच्या ग्रहताऱ्यांबद्दलची मानवाला अज्ञात असलेली माहिती मिळेल आणि मानव अंतराळविश्वात प्रगत दिशेने वाटचाल करेल सध्या अंतराळ विश्वात व्यावसायिक कंपन्यानीही यशस्वी सुरवात केलीय Space X Dragon मधून आम्ही इथे पोहोचलो आहोत Boeing Starliner हि अंतराळस्थानकात येऊन गेले आता सामान्य लोकही अंतराळप्रवास करत आहेत आणि लवकरच Artemis -1चेही launching होईल तो क्षण सुपर Exiting चा असेल सध्याचा काळ अंतराळविश्वातील रोमांचक काळ आहे 

Tom -Lindgren स्थानकातील वास्तव्यानंतर तुझ्या मानवतेबद्दलचा दृष्टिकोनात काही फरक पडला का विशेषतः जागतिक दृष्टया ? 

Lindgren - हो ! निश्चितच फरक पडतो! इथे आल्यावर आमचा एक फायदा होतो आम्ही इथून पृथ्वीकडे पाहू शकतो पहिल्यांदा पृथ्वीच सौन्दर्य पाहून अचंबित होतो पृथ्वीवरची हिरवळ,पाणी वातावरण हे सार मानवी अस्तित्वासाठी आवश्यक आहे पण पृथ्वीवरची वृक्षतोड,हवेतील प्रदूषण आणि पाण्याचा अपव्यय पाहून वाईट वाटत इथे स्थानकातील वास्तव्यात आम्ही पाणी,अन्न आणि हवेचा तीस टक्के कमी वापर करतो ते वाचवण्याचा प्रयत्न करतो इथल्या कृत्रिम वातावरणात ह्या गोष्टींची कमतरता भासते दुसर म्हणजे इथे स्थानकाबाहेरचा काळोख,रुक्ष वातावरण आणि झिरो ग्रॅव्हीटीत राहताना पृथ्वीवरच दाट वातावरण पृथ्वीवरची हिरवळ आठवते आणि त्याच मोल जाणवत  पृथ्वीवरचे लोक हे सार तीस टक्केही वाचवताना दिसत नाहीत तेव्हा वाईट वाटत पृथ्वी रक्षणासाठी हे वाचवण किती आवश्यक आहे ते इथे आल्यावर कळत आणि आमच दुसर घर स्थानकाकडे पाहून मानवी कर्तृत्वाच कौतुक वाटत किती बुद्धिमत्ता वापरून त्यांनी हे वैशिष्ठपूर्ण असामान्य अंतराळातील फिरत घर बनवलय ह्याच आश्चर्य वाटत आणि इथे आंतरराष्ट्रीय टीमसोबत राहताना विश्वातील सर्व देश पाहायला मिळतात त्या देशातील अंतराळवीरांसोबत राहण्याची संशोधन करण्याची संधी मिळते थोडक्यात वैश्विक मैत्री होते दृष्ठीकोन वैश्विक होतो 

Tom -Watkins तुझ काय मत आहे ह्या बद्दल ?

Watkins -माझही मत Kjell सारखच आहे हे स्थानक सुरु ठेवण्यासाठी आणि आमच्या सुरक्षिततेसाठी आम्ही करत असलेल्या संशोधनासाठी सतत कार्यरत असणाऱ्या नासा संस्थेतील सर्वांचे कर्तृत्व असामान्य आहे त्यांच्यामुळेच आम्ही वैश्विक सहकारी अंतराळवीर एकत्रित काम करू शकतो आणि पृथ्वीच रक्षण करण किती आवश्यक आहे ते इथे आल्यावरच कळत 

Tom -Thank You So much! Safe Travels be Safe god speed !

Thursday 14 July 2022

नासाच्या James Web Telescope ने काढलेल्या ब्रम्हांडातील अज्ञात भागातील फोटो प्रकाशित

 An image of the edge of a nearby, young, star-forming region called NGC 3324 in the Carina Nebula. Captured in infrared light by NASA’s new James Webb Space Telescope, this image reveals for the first time previously invisible areas of star birth.

 नासाच्या James Web Telescope ने कॅमेराबद्ध केलेला ब्रह्मांडातील NGC 3324 Carina Nebula ह्या भागातील फोटो -फोटो नासा संस्था 

नासा संस्था -12 जुलै 

नासा आणि ESA ह्यांच्या सहकार्याने तयार केलेल्या James Web Telescope ने चित्रबद्ध केलेल्या ब्रह्मांडातील दूरवरच्या अज्ञात घडामोडीचे पहिले फोटो आता सर्वसामान्यांना पाहण्यासाठी उपलब्ध झाले आहेत सोमवारी Washington येथील White house मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष Joe Biden ह्यांच्या हस्ते ह्या पहिल्या फोटोंचे व व्हिडिओचे प्रकाशन करण्यात आले 

ह्या वेळी बोलताना Joe Biden म्हणाले,"James Web Telescope ने कॅमेराबद्ध केलेल्या ब्रह्मांडातील दूरवरच्या ठिकाणच्या आणि आजवर मानवाला अज्ञात असलेल्या घडामोडीचे हे फोटो आणि माहिती नवी आहे अमेरिकेने ह्या टेलिस्कोप द्वारे ते प्राप्त केले आहेत आजवर तेथे कोणीही पोहोचले नव्हते  ह्या घटनेमुळे अंतराळविश्वात अमेरिकेची ऐतिहासिक नोंद झाली आहे हे फोटो अमेरिकेतील नव्या तरुण पिढीला आणि लहान मुलांना प्रेरणादायी ठरतील त्यांना ह्या जगात अशक्य काही नाही हे कळेल हे फोटो रंगीत स्पष्ठ आणि नाविन्यपूर्ण आहेत    

 distant galaxies appear as bright glowing spots in this Webb telescope image, with some smeared by gravitational lensing; foreground stars appear bright with six-pointed diffraction spikes, owing to the shape of Webb's mirrors

 नासाच्या James Web Telescope मधील कॅमेऱ्याने चित्रबद्ध केलेला ब्रह्मांडातील दूरवरच्या SMACS 50723 ह्या भागातील तारका समूह आणि मध्यभागी त्यातील अस्पष्ट धूसर वस्तू फोटो -नासा संस्था 

नासा संस्थेने जेम्स वेब टेलिस्कोप 2021च्या डिसेंबर मध्ये अंतराळात प्रक्षेपित केला होता ह्या अथांग विश्वातील मानवाला अज्ञात असलेल्या गोष्ठी आणि घडामोडींचा शोध घेण्यासाठी ह्या टेलिस्कोप मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला ह्या विश्वातील अत्यंत सूक्ष्म घडामोडींचे निरीक्षण नोंदवून त्यांचे लाईव्ह चित्रण करता यावे म्हणून ह्या टेलिस्कोप मध्ये पूर्वी पेक्षा अधिक शक्तिशाली कॅमेरे बसविण्यात आले आहेत त्या मुळेच आता विश्वातील  अत्यंत दूरवरच्या आणि पुरातन आकाशगंगा,कृष्णविवर त्यातील ताऱ्यांचा उगम,अस्त,त्यांची निर्मिती प्रक्रिया आणि त्या भोवतालची वातावरण निर्मिती ह्या बद्दल माहिती मिळाली 

side-by-side views of Southern Ring planetary nebula as seen by Webb telescope (NIRCam, left; MIRI, right) against black backdrop of space; a bright star appears at center in both images, surrounded by an undulating ring of gas

        ब्रह्मांडातील ताऱ्याचा अस्त होण्याआधी त्याच्या पासून बाहेर पडणारे वायू -फोटो नासा संस्था 

नासा संस्थेने उपलब्ध केलेला हा फोटो आल्हाददायी आणि नयनरम्य आहे प्रथमदर्शनी आपल्याला हा फोटो पृथ्वीवरील डोंगराळ भागातील चंद्रोदयाच्या वेळचा आहे असे वाटते आजूबाजूला डोंगर त्यावर निळे आकाश आणि त्यात चमकणारे तारे पाहून हा समज होऊ शकतो पण प्रत्यक्षात फोटोतील वातावरण अत्यंत उष्ण,घोकादायक आणि भयाण काळोखातील कृष्णविवरातील निर्वात पोकळीतील आहे 

हा फोटो पृथ्वीपासून 2000 प्रकाशवर्षे दूर अंतराळातील दक्षिणेकडील NCG-3324  ह्या भागातील Carina Nebula  आणि त्या भोवतीच्या गॅसिअस वातावरणाचा आहे जेम्स वेब टेलिस्कोपच्या शक्तिशाली इन्फ्रारेड कॅमेऱ्याने हा फोटो कॅमेराबद्ध केला आहे ह्या फोटोत दिसणारे डोंगर म्हणजे आकाशगंगेतील कृष्णविवर त्यातील निर्वात पोकळीतील बाजूचे कडे आहेत आणि त्यातील तारे म्हणजे ह्या कृष्णविवरातील पोकळीतील प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे आत ओढल्या गेलेले अत्यंत उष्ण ग्रह तारे आहेत त्यांच्या सोबतच कृष्णविवरातील निर्वात पोकळीत ओढल्या गेलेले कॉस्मिक किरणे,अल्ट्रा व्हायोलेट किरणे ,विद्युतभारित किरणे त्या मुळे निर्माण झालेली उष्णता,रॅडिएशन प्रक्रियेमुळे तयार झालेले आगीचे लोट,त्यातून बाहेर पडणारे विषारी वायू ,धूळ आणि ह्या वातावरणातच होणारी नव्या ताऱ्यांची निर्मिती आणि जुन्या ताऱ्यांचा अस्त ह्या घडामोडीचे लाईव्ह चित्रण जेम्स वेबच्या कॅमेऱ्याने चित्रित केले आहे

 the galaxies in Stephan's Quintet appear as purple-pink swirls against the blackness of space in this JWST image; some foreground stars appear with diffraction spikes from the telescope's mirrors; numerous other galaxies and stars bespangle the image

                      ब्रह्मांडातील आकाशगंगेचा समूह आणि कृष्णविवर -फोटो नासा संस्था 

हे फोटो घेण्यासाठी जेम्स वेब कॅमेऱ्याला साडेबारा तास लागले ह्या फोटोतील ताऱ्यांची निर्मिती आणि अस्त हि प्रक्रिया अत्यंत जलद होती त्या मुळे ह्या वेगवान घडामोडींचे चित्रण करणे कठीण होते पण जेम्स वेब मधील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सेन्सिटिव्ह कॅमेऱ्याने हि निर्मिती प्रक्रिया तितक्याच वेगाने चित्रित केली फोटोतील डोंगर व रंगीत वातावरण कृष्णविवरातील विध्युत भारित वायू आणि गरम हवेमुळे बाहेर पडणारी धूळ ह्या मुळे तयार झाले आहेत आणि पृथ्वीपासून 7 प्रकाशवर्षे उंचीवर आहेत काही नवे ऊष्ण तारे  लाल रंगात दिसत आहेत तेथील अत्यंत प्रकाशमान Ionized किरणांचे वादळ आणि प्रचंड दाबामुळे बाहेर पडणारे वायू आणि धूळ ह्या धूसर वातावरणात नव्या ताऱ्याची निर्मिती स्पष्ठ दिसणे अशक्य असताना ह्या कॅमेऱ्याने चित्रित केलेल्या फोटोत ते स्पष्ठ आणि रेखीव दिसत आहेत नासा संस्थेने सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध केलेल्या इतर फोटोत अंतराळातील दूरवरच्या आकाशगंगांचा समूह,अंतराळात अस्त पावणाऱ्या ताऱ्याभोवतीचे वायूंचे ढगाळ वातावरण आणि त्यात चमकणाऱ्या ताऱ्यांचा समावेश आहे त्यातील एक तारा अत्यंत प्रकाशमान आहे 

हे फोटो पाहून नासाचे Administrator Bill Nelson आनंदित झाले आहेत ते म्हणतात ,"ह्या फोटो आणि लाईव्ह व्हिडीओ मुळे ब्रह्मांडातील मानवाला अज्ञात असलेली माहिती मिळाली आहे अशा अनेक अज्ञात गोष्ठी आगामी काळात प्राप्त होतील ह्या फोटोच्या सखोल संशोधनानंतर मानवाला ह्या विश्वातील अनाकलनीय गोष्ठीची उकल होईल आणि आपल्या पृथ्वीची निर्मिती आणि विश्वातील नेमके स्थान कळेल हे जेम्स वेब टेलेस्कोपच्या टीमच असामान्य कर्तृत्व आहे त्यांनी आमच स्वप्न सत्यात उतरवल आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो 

ह्या टीमचे प्रमुख सायंटिस्ट John Mather म्हणतात ह्या अथांग विश्वातील अत्यंत पुरातन दूरवरची निर्वात पोकळी त्यात चकाकणारे तारे ,तारकांचा समूह अस्त पावणाऱ्या ताऱ्याजवळ त्यातून बाहेर पडलेल्या रंगीबीरंगी वायूंचे डोंगर Absolutely Thrilling !

Saturday 9 July 2022

अंतराळवीरांनी 4 जुलैला स्थानकात साजरा केला अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन

 Expedition 67 crew members are pictured enjoying pizza during dinner time aboard the space station in May of 2022.

 अंतराळवीर Jessica Watkins अंतराळवीर Bob Hines अंतराळवीर Kjell Lindgrenआणि Samantha Cristoforetti  सहकारी अंतराळवीरांसोबत एका पार्टी दरम्यान -फोटो नासा संस्था

नासा संस्था -5 जुलै 

गेल्या वीस वर्षांपासून अंतराळवीर 4 जुलैला अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन स्थानकात उत्साहात साजरा करतात त्या साठी त्यांची कामे लवकर आटोपून मोकळा वेळ काढतात स्थानकातील एखाद्या रिकाम्या जागेत त्यांच्याकडे असलेल्या सामानाचा वापर करून तो भाग सजवतात मागे अमेरिकेचा झेंडा लावतात लाईव्ह संवादाद्वारे संस्थेशी कुटुंबियांशी संवाद साधतात त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतात सर्वजण एकत्र येऊन पार्टीचे आयोजन करतात त्यासाठी त्यांना नासा संस्थेकडून खास पदार्थ पाठवले जातात त्याचा आस्वाद घेत हे अंतराळवीर हा दिवस आनंदात व्यतीत करतात 

ह्या वर्षीही अंतराळस्थानकात राहात असलेल्या अंतराळमोहीम 67 च्या अंतराळवीरांनी 4 जुलैला अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला ह्या अंतराळवीरांनी त्यांची महत्वाची कामे लवकर आटोपून ह्या साठी मोकळा वेळ काढला आणि रविवारी आणि सोमवारी स्वातंत्र्य दिना निमित्य मिळालेल्या सुट्टीचा आनंद लुटला 

अंतराळवीर Kjell Lindgren आणि Bob Hines ह्यांनी नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधत सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या त्या सोबतच त्यांनी नासाच्या Johnson Space Centerच्या साठाव्या वर्धापनदिना निमित्य शुभेच्छाही दिल्या 

त्यावेळी बोलताना Bob Hines म्हणाले ,"Johnson Space Center हे मानवी अंतराळ मोहिमेचे मुख्य केंद्र आहे इथूनच सर्व अंतराळ मोहिमांची आखणी केल्या जाते अंतराळवीरांची निवड प्रक्रिया,त्यांच ट्रेनिंग,अंतराळ यानाचे उड्डाण आणि लँडिंग प्रक्रिया देखील ईथुनच पार पाडल्या जाते Houston मधल्या संस्थेतुनच आपण सर्वांनी चांद्रभूमीवर पहिल्यांदा पाऊल ठेवलेल्या अपोलो मोहिमेतील अंतराळवीरांचा आवाज ऐकला होता आजवर ह्या संस्थेने अनेक अंतराळमोहिमा यशस्वी केल्या आहेत त्यातील अंतराळवीर अंतराळात प्रवास करून स्थानकात राहून आले आहेत ह्या पुढेही भविष्यकालीन चांद्र आणि मंगळ मोहिमेत विशेषतः आर्टेमिस चांद्र मोहिमेतील अंतराळवीर चंंद्रावर पोहोचतील ह्या संस्थेतील प्रमुख सायंटिस्ट,इंजिनीअर्स आणि कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! हा दिवस तुम्हा सर्वांना आनंदात जावो हि सदिच्छा ! आणी तुमच्या गौरवास्पद कामगिरीबद्दल अभिनंदन!"

Kjell Lindgren म्हणाले ,"Huston मधील Johnson संस्थेतील नासाचे कर्मचारी,स्टुडंट,टीम प्रमुख आणि शास्त्रज्ञांनी अनेक अंतराळ मोहिमांमध्ये सहभागी होऊन वेळोवेळी अंतराळवीरांना सहकार्य केले आहे त्यातील हजारो कर्मचाऱ्यांनी आम्हाला ट्रेनिंग देऊन अंतराळ भरारी मारण्यासाठी प्रवृत्त केले आहे  त्यांच्यामुळेच देशाच आमच आणि आमच्या फॅमिलीच नाव उंचावल त्या सर्वांचे आभार संस्थेतील कर्मचारी,तंत्रज्ञ ,शास्त्रज्ञांचे आणि Huston चेही विशेष आभार आणि त्यांना वर्धापन दिनानिमित्य शुभेच्छा ! Happy 4th July !

अंतराळवीर Jessica Watkins आणि Samantha Cristoforetti ह्यांनी देखील सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्य शुभेच्छा दिल्या

नासाच्या Johnson Space center चा साठावा वर्धापनदिन आणि अंतराळवीरांचा स्वातंत्रदिनातील सहभाग

 houston_welcomes_msc_jul_4_1962

 Mercury अंतराळ मोहिमेतील सात अंतराळवीर आणि त्यांचे कुटुंबीय सत्कार समारंभा दरम्यान -फोटो नासा संस्था  

नासा संस्था - 

नासाच्या Huston येथील Johnson Space Center ला यंदा साठ वर्षे पूर्ण झाली आहेत 1962 च्या जुलै मध्ये ह्या संस्थेची स्थापना झाली सुरवातीला ह्या संस्थेचे नाव Manned Spacecraft Center (MSC) असे होते नंतर ह्या संस्थेला सध्याचे नाव देण्यात आले चार जुलै 1962 मध्ये अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी पहिल्यांदा ह्या संस्थेत Mercury अंतराळ मोहिमेतील सात अंतराळवीरांचा सत्कार करण्यात आला होता 

अमेरिकेच्या अध्यक्षांनी Mercury मोहिमेतील सहभागी सात अंतराळवीर आणि त्यांच्या कुटुंबियांना ह्या सोहळ्यासाठी खास आमंत्रित केले होते त्या वेळी ह्या अंतराळवीरांची जाहीर मिरवणूक काढण्यात आली होती तेव्हा हा सोहळा पाहण्यासाठी आणि ह्या अंतराळवीरांचे कौतुक करण्यासाठी हजारो नागरिक रस्त्यावर जमले होते त्यांच्या ह्या स्वागत समारंभाला Huston चे मेयर Lewis W Cutrer आणि MSC चे Director Robert R Gilruth उपस्थित होते 

1961साली अमेरिकेचे अध्यक्ष John F. Kennedy ह्यांनी इथेच सर्वप्रथम चांद्रमोहिमेची घोषणा केली अमेरिकेचे अध्यक्ष Ronald W Reagan ह्यांनी अमेरिकेच्या अंतराळमोहिमांसाठी संस्था विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले त्यानंतर पाच महिन्यांनी नासाच्या अंतराळ मोहिमांसाठी Huston मधील ह्या संस्थेची निवड करण्यात आली Huston आणि Space Center ह्यांच्यातले नाते अतूट आहे गेल्या साठ वर्षात Johnson Space Center मधील शास्त्रज्ञांनी अनेक यशस्वी अंतराळ मोहीमाचे उत्कृष्ठ नियोजन केले आणि त्या मोहिमेतील अंतराळ यानाचे  उड्डाण ,लँडिंग व ईतर तांत्रिक बाबी पार पाडल्या ह्या मोहिमेतील अंतराळवीरांची निवड करून त्यांना योग्य ट्रेनिंग देऊन ह्या मोहिमा यशस्वी केल्या आहेत Huston हेे माानवी अंंतराळ ऊड्डाणाचे मुख्य केंद्र आहे Huston मधील अनेक अंतराळमोहिमा यशस्वी झाल्यामुळे  Huston  City ला Space City USA ह्या नावाने ओळखले जाऊ लागले 

 sts_50_inflt_crew_photo_w_flag_jul_1992

  1992 मध्ये STS-50 अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर स्थानकात 4 जुलै ला स्वातंत्र्यदिन साजरा करताना -फोटो नासा संस्था

 1962 मध्ये चार जुलैला अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी अंतराळवीरांचा सत्कार पार पडल्यानंतर अंतराळवीरांचा पहिल्यांदा स्वातंत्र्य दिनात सहभाग नोंदविल्या गेला 1982 पर्यंत अंतराळवीर अंतराळात स्वातंत्र्यदिन साजरा करत नव्हते  1992 मध्ये STS-50 अंतराळ मोहिमेतील अंतराळ वीरांनी स्थानकात 4 जुलै साजरा केला त्यानंतर 1996,97 मध्ये अंतराळवीरांनी स्थानकात अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन साजरा केला 

 mir_21_lucid_on_mir_jul_4_1996

 अंतराळवीर Shannon W Lucid रशियन अंतराळस्थानाक Mir मध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करताना -फोटो नासा संस्था

जसजशा अंतराळ मोहिमा वाढल्या अंतराळस्थानक स्थापन झाले अंतराळवीर अंतराळ स्थानकात जाऊ येऊ लागले तिथे दीर्घकाळ वास्तव्य करून संशोधन करू लागले तसतसे त्या दरम्यान आलेला स्वातंत्र्यदिनही स्थानकातच साजरा करू लागले  सुरवातीला दिवसरात्रीचा अत्यल्प काळ आणि पृथ्वीच्या तुलनेत मिळालेला कमी वेळ ह्या मुळे ह्यात सातत्य नव्हते पण गेल्या वीस वर्षात अंतराळवीर नियमितपणे स्थानकात स्वातंत्र्यदिन साजरा करतात प्रत्येकाची स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची पद्धत वेगळी असते,युनिक असते कोणी अमेरिकेच्या झेंड्याशी साधर्म्य साधणारा ड्रेस घालून तर कोणी शूज घालून आपले देशप्रेम व्यक्त करतात 1996 साली अंतराळवीर Shannon W Lucid हिने रशियन अंतराळस्थानक Mir मध्ये अमेरिकेच्या झेंड्यासारखे शूज परिधान करून स्वातंत्र्यदिन साजरा केला होता