Saturday 30 April 2022

Space X-crew-4 चे चार अंतराळवीर स्थानकात सुखरूप पोहोचले

   Crew-4 astronauts, from left, Jessica Watson, mission specialist; Bob Hines, pilot; Kjell Lindgren, commander and Samantha Cristoforetti, mission specialist, are positioned inside SpaceX’s Crew Dragon Freedom. Crew-4 launched to the International Space Station from Launch Complex 39A at Kennedy Space Center in Florida at 3:52 a.m. EDT on April 27, 2022. 

         Space X -Crew -4 चे अंतराळवीर अंतराळ प्रवासाच्या दिशेने प्रवासा दरम्यान-फोटो नासा संस्था 

नासा संस्था -27 एप्रिल  

Space-X Crew -4 अंतराळ मोहिमे अंतर्गत बुधवारी 27 एप्रिलला अंतराळवीर Kjell Lindgren अंतराळवीर Bob Hines  अंतराळवीर Jessica Watkinsआणि युरोपियन अंतराळवीर Samantha Cristoforetti हे चौघे स्थानकात सहा महिने रहाण्यासाठी गेले आहेत

बुधवारी 3.52 मिनिटाला ह्या चारही अंतराळवीरांना घेऊन Space X Crew Dragon नासाच्या केनेडी स्पेस सेंटर मधील 39-A ह्या उड्डाणस्थळावरून स्थानकाच्या दिशेने अंतराळ प्रवासास निघाले आणी रात्री 8.15 मिनिटाला स्थानका जवळ पोहोचले एक तासांनी 9.15 मिनिटाला Crew Dragon मधील स्वयंचलित यंत्रणेने स्थानक आणि Crew Dragon ह्यांच्यातील Hatching प्रक्रिया पार पडली त्या नंतर अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला स्थानकात सध्या राहात असलेल्या अंतराळवीरांनी ह्या चारही अंतराळवीरांचे स्थानकात स्वागत केले त्यानंतर काही वेळाने अंतराळवीरांचा Welcome Ceremony पार पडला त्यावेळी सर्वांनी एकत्रित नासा संस्थेशी लाईव्ह संपर्क साधला आणि सुरक्षित पोहोचल्याचे सांगितले 

 Crew-4 NASA astronauts Mission Commander Kjell Lindgren, Pilot Bob Hines, and Mission Specialist Jessica Watkins, and Mission Specialist Samantha Cristoforetti of ESA (European Space Agency) were greeted by Crew-3 as they arrived to the International Space Station.

 अंतराळात पोहोचल्यानंतर स्थानकातील अंतराळवीरांसोबत Kjell Lindgren,अंतराळवीर Bob Hines अंतराळवीर Jessica Watkinsआणि अंतराळवीर Samantha Cristoforetti एकत्रित -फोटो नासा संस्था

अंतराळवीर Kjell Lindgren आणि अंतराळवीर Samantha ह्यांची हि दुसरी अंतराळवारी आहे 2009 मध्ये Kjell Lindgren अंतराळवीर झाले आणि 2015 मध्ये नासाच्या अंतराळ मोहीम 44-45अंतर्गत पहिल्यांदा स्थानकात राहायला गेले त्या वेळी त्यांनी स्थानकात 141 दिवस वास्तव्य केले होते अंतराळवीर Samantha अंतराळमोहीम 42-43 अंतर्गत 2015 मध्ये स्थानकात राहायला गेल्या होत्या त्यावेळी त्यांनी स्थानकात पाच महिने वास्तव्य केले होते अंतराळवीर Jessica Watkins आणि अंतराळवीर Bob मात्र पहिल्यांदाच स्थानकात राहायला गेले आहेत 

ह्या अंतराळवीरांच्या अंतराळ प्रवासदरम्यान काही अडचण येऊ नये म्हणून Space X Crew ड्रॅगनच्या स्वयंचलित यंत्रणेवर नासाच्या केनेडी स्पेस सेंटर आणि Johnson स्पेस सेंटर मधून नियंत्रण ठेवण्यात आले होते ह्या अंतराळ प्रवासा दरम्यान अंतराळवीरांनी संस्थेशी लाईव्ह संपर्क साधला त्या वेळी त्यांना संस्था प्रमुखांनी तुमचा प्रवास कसा सुरु आहे  तुमचे अनुभव शेअर करा असे सांगितले तेव्हा सर्वांनी प्रवास व्यवस्थित सुरू आहेे असे सांगत त्यांचा अनुभव शेअर केला 

अंतराळवीर Kjell Lindgren ह्यांनी Dragon ला अंतराळवीरांनी Freedom असे नाव दिल्याचे सांगत ह्या वेळेसचा अनुभव छान आहे प्रवास आरामदायी आहे ड्राइव्हिंग स्मूथ आहे असे सांगितले शिवाय Dragon मधून प्रवास करताना launching प्रक्रिया प्रत्यक्ष पाहायला मिळाल्याचेही सांगितले  

अंतराळवीर Jessica ह्यांनी माझा हा पहिलाच अंतराळप्रवास असल्याने मी यानाच्या खिडकीतुन बाहेर पाहायचा अनुभव घेतेय पृथ्वीवरच्या रात्रीदिवसाचा अंधार उजेडाचे चक्र आणि पृथ्वीवरच्या सजीव सृष्ठीचे विलोभनीय दृश्य पााहुुन मी आनंदीत झाले आहे विशेषतः मी Geologist असल्यामुळे पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या खडकांचे निरीक्षण व अभ्यास करण्याची मला आवड आहे आणी आत्ता मला अंतराळातून ते पहाण्याची अमुल्य संधी  मिळालीय पृथ्वीच सौन्दर्य अलौकिक आहे! तुम्हीही पहा!अस म्हणून तिने कॅमेऱ्यातून पृथ्वीदर्शन घडवल प्रवासा दरम्यान आम्ही जेवण,नास्ता आणि झोपही घेतली आमचा प्रवास छान सुरु आहे अस सांगितल 

अंतराळवीर Bob ह्यांनी प्रवासाचा अनुभव चांगला असल्याचे सांगत त्यांनी देखील क्षितिजावरच्या सुंदर रंगीबिरंगी प्रकाशपटलाच दर्शन घडवल शिवाय त्यांनी आणी अंतराळवीर Samantha ह्यांनी सोबत आणलेले Ziro -G इंडिकेटर Soft Toy दाखवले त्यांनी सांगितले मला माझ्या मुलीने Zippy Turtle दिलय ते तीच फेव्हरीट आहे आणि आमच्या ट्रेनिंग पासून ते आमच्या जवळ आहे सर्व ट्रेनिंग इव्हेंटमध्ये आणि फोटोत सुद्धा ते आमच्या सोबत होत विशेष म्हणजे 2017 मध्ये आमच्या अंतराळवीरांच्या ट्रेनिंग मध्ये आमच्या ग्रुपच नाव देखील Turtle होत आता माझी मुलगी ज्युलिया आणि Samantha ची मोठी मुलगी Kelsey ह्या दोघी बेस्ट फ्रेंड झाल्या आहेत 

अंतराळवीर Samantha म्हणाल्या माझी मोठी मुलगी Kelsey हिने मला मंकी दिलाय त्याच नाव Etta आहे ती इटालियन आहे इटालियन भाषेत लहान मंकीला Etta म्हणतात तिने मला सोबत नेण्यासाठी Etta ची निवड केली तेव्हा मीही Exited झाले कारण तोही माझ्यासोबत अंतराळप्रवास करणार होता माझ्या ह्या दुसऱ्या अंतराळ प्रवासाचा अनुभव अमेझिंग आहे रात्री प्रवासा दरम्यान झोपायच्या वेळेस अचानक माझी sleeping bag पुढे खिडकीच्या दिशेने ओढल्या गेली मी बाहेर पाहिल तेव्हा अंतराळयानाच्या पुढे प्रवास करतानाच्या ज्वलन प्रक्रियेमुळे बाहेर पडणाऱ्या ज्वाळांच्या प्रकाशाचा पट्टा मला दिसला तो धगधगता तेजस्वी प्रकाशझोत पाहून मला सिनेमातील भुताची आठवण झाली जो सुरवातीला प्रचंड तेजाने भव्य रूप घेतो आणि माणसा मागे धावतो आणि नंतर वेगवेगळे आकार घेत सावलीचे रूप घेतो आणि लुप्त होतो त्यावेळेसचा आवाज देखील सिनेमातील भुताच्या आवाजासारखा होता हे दृश्य खरच अमेझिंग होत  

ह्या वेळेस संस्थेतील प्रमुखांनी तुम्ही तुम्हाला दिलेली ट्रीट आणि जेवण केल का हे विचारल तेव्हा Samantha म्हणाल्या हो !आम्ही जेवण घेतल कुणीतरी Chocolate coated Candy ची बॅग काढली आणि सर्वांना दिली पण मी त्यावेळी दुसर काहीतरी खात असल्यान माझी Candy मात्र मला मिळाली नाही पण No Problem ! नंतर ते मला देणार आहेत सारेCrew mate जॉली आहेत खूप चांगले आहेत त्यामुळे आमचा प्रवास कंटाळवाणा झाला नाही 

आता हे चारही अंतराळवीर स्थानकात सहा महिने राहून अंतराळ मोहीम 67च्या अंतराळवीरांसोबत स्थानकात  सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील सध्या स्थानकातील अंतराळवीरांची संख्या अकरा झाली असून लवकरच Crew-3 चे अंतराळवीर पृथ्वीवर परततील

Wednesday 27 April 2022

Perseverance यानाने चित्रित केले मंगळग्रहावरील सूर्यग्रहणाचे फोटो आणि व्हिडिओ

 

 मंगळ ग्रहावरील सूर्यग्रहणादरम्यान  Perseverance यानाने टिपलेला मंगळाच्या फोबोस चंद्राचा हा विलोभनीय फोटो -फोटो नासा संस्था -(J.PL Lab)

नासा संस्था -(J.PL Lab )-22 एप्रिल 

नासाच्या मंगळमोहीमे अंतर्गत मंगळावर गेलेल्या Perseverance यानाने नुकतेच मंगळावरील यशस्वी एक वर्ष पूर्ण केले आहे ह्या एका वर्षात मंगळ यानाने कार्यरत राहून तेथील पुरातन जीवसृष्ठीच्या अस्तित्वाला दुजोरा देणाऱ्या पाणवठ्याच्या जागा शोधल्या यानातील रोबोटिक आर्मच्या साहाय्याने तेथील भूपृष्ठाखालील जमिनीचे उत्खनन  करून  तेथील खडक माती ,मिनरल्सचे नमुने देखील गोळा केले आणि आता Perseverance  यानाने मंगळ ग्रहावर नुकत्याच झालेल्या सूर्यग्रहणाची  खगोलीय घटना कॅमेऱ्यात यशस्वीपणे चित्रित केली आणि त्याचा लाईव्ह व्हिडिओ  पृथ्वीवर पाठवला आहे 

मंगळ ग्रहाला दोन चंद्र आहेत Phobos आणि Deimos ह्या दोन चंद्रापैकी Phobos ह्या बटाट्याच्या आकाराच्या चंद्राचे सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्यासमोरून जातानाचे विलोभनीय दृश्य Perseverance यानाने यानातील Mastcam -Z ह्या अत्याधुनिक कॅमेऱ्याच्या साहाय्याने कॅमेराबद्ध केले आणि त्याचा लाईव्ह व्हिडियोही चित्रित केला आहे मंगळावरील ग्रहणाच्या ह्या निरीक्षणामुळे शास्त्रज्ञांना चंद्राची मंगळाभोवतीची भ्रमणकक्षा आणि त्याचे मंगळ भूमी वरील गुरुत्वाकर्षणीय कक्षेकडे खेचल्या जाण्याची क्रिया ह्या संबंधित माहिती मिळाली आहे 

Perseverance यानाच्या मंगळ ग्रहावरील 397 व्या दिवशी म्हणजे  2 एप्रिलला हे ग्रहण यानातील Mastcam -Z ह्या कॅमेऱ्याने टिपले हे ग्रहण चाळीस सेकेंदापेक्षा किंचित जास्त वेळाचे होते  पृथ्वीवरील सूर्यग्रहणाच्या तुलनेत हे ग्रहण अत्यंत कमी वेळात संपले फोबोस चंद्र पृथ्वीच्या चंद्रापेक्षा आकाराने 157 पटीने लहान आहे आणि मंगळाचा दुसरा चंद्र Deimos त्याहीपेक्षा लहान आहे 

Perseverance यानाने घेतलेले सूर्यग्रहणाचे फोटो आणि व्हिडिओ  आजवर मंगळावर गेलेल्या यानांनी पाठवलेल्या सूर्यग्रहणाच्या फोटोंपेक्षा स्पष्ट आणि रेखीव आहेत 2004 मध्ये मंगळावर गेलेल्या Twin Mars Rover Spirit आणि Opportunity ह्यांनी पहिल्यांदा मंगळावरील सूर्यग्रहणाची घटना कॅमेऱ्यात चित्रित केली होती त्या नंतर Curiosity मंगळ यानाने Mastcam कॅमेऱ्याच्या साहाय्याने तेथील सूर्यग्रहणाचे लाईव्ह चित्रण करून त्याचा व्हिडिओ आणि फोटो पृथ्वीवर पाठवला होता 

पण 2021 मध्ये मंगळावर पोहोचलेल्या Perseverance यानाने यानातील अत्याधुनिक झूम कॅमेऱ्याच्या साहाय्याने सूर्यग्रहणाच्या वेळी फोबोसचा घेतलेला लाईव्ह व्हिडिओ अत्यंत स्पष्ट आणि सुंदर आहे त्याचे सारे श्रेय अर्थातच Perseverance यानाच्या टीमला जाते त्यांनीच हा कॅमेरा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून अद्ययावत केला अस San Diego Malin Space Scienceसंस्थेतील Perseverance टीमच्या सदस्य Rachel Howson म्हणतात आम्हाला हे फोटो आणि व्हिडिओ आधीपेक्षा चांगले येणार अशी अपेक्षा होतीच पण प्रत्यक्ष फोटो पाहून मी आश्चर्यचकित झाले कारण ते आमच्या अपेक्षेपेक्षाही चागले आणि स्पष्ट आले आहेत मंगळावरून पृथ्वीवर पोहोचताना ते सुरवातीला थोडेसे अस्पष्ट दिसले पण नंतर मात्र ते स्पष्ट दिसले हे फोटो पाहून मला वाढदिवस किंवा सुट्टीच्या दिवसाची आठवण आली कारण सुट्टी किंवा वाढदिवस येणार हे आपल्याला आधीच माहीत असत पण ती प्रत्यक्ष अनुभवतानाचा आनंद वेगळाच असतो 

Colorado Space Science Institute मधील खगोल शास्त्रज्ञ Mark Lemmon म्हणतात, Mastcam-Z  मध्ये  बसविलेले सौर फिल्टर सनग्लासेस सारखे काम करतात ते सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी करतात आणि त्यातील कलर मुळे व्हर्जन मध्ये देखील फरक पडतो आधीच्या तुलनेत आताचे फोटो चांगले आणि स्पष्ट आले आहेत ते ह्या मुळेच  सूर्यग्रहणाच्या वेळेसच्या फोबोसच्या सावलीच्या प्रतिमेत चंद्रावरील चढउतार स्पष्ट दिसत आहेत शिवाय आम्हाला त्यावरील सनस्पॉट्सही पाहता आले विशेष म्हणजे Perseverance यानाने पाहिलेले मंगळावरील सूर्यग्रहण आपल्याला जसेच्या तसे पाहण्याची सुवर्णसंधी मिळाली 

ह्या ग्रहणकाळात फोबोसची  मंगळावरील भ्रमण कक्षा त्यातील बदल आणि फोबोसचे मंगळावरील गुरुत्वाकर्षणीय वातावरणात खेचले जाणे हे निरीक्षण नोंदविल्या गेले त्या काळात मंगळभूमीवरील भूपृष्ठीय आवरणात आणि अंतर्गत भागात काय बदल जाणवले हे देखील नोंदवल्या गेले शास्त्रज्ञांच्या मते फोबोस हळूहळू मंगळा कडे खेचल्या जात आहे आणि आगामी दहा मिलियन वर्षात तो मंगळाकडे अधिकाधिक खेचल्या जाईल आणि मंगळभूमीवर आढळून नष्ठ होईल आताच्या Perseverance यानाने पाठवलेल्या सूर्यग्रहणाच्या लाईव्ह व्हिडिओ मुळे शास्त्रज्ञांना त्या बाबतीत संशोधन करताना सखोल माहिती मिळेल अशी आशा शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत


Tuesday 12 April 2022

नासाच्या Lunabotics स्पर्धेत श्रिया सावंत आणी लुसीया ग्रीसांतीची निवड जाहीर

Lucia Grisanti and Shriya Sawant, NASA's two national winners for the Lunabotics Junior contest

    नासाच्या Lunabotics स्पर्धेतील विजेती लुसिया ग्रिसांती रोबोसह आणि श्रीया सावंत -फोटो नासा संस्था

  नासा संस्था- 12 एप्रिल

अमेरिकेची बंद पडलेली चांद्रमोहिम पुन्हा सुरु झाल्यानंतर नासाच्या आर्टिमस मोहीमेची अंतीम तयारी जोरात सुरु आहे आर्टिमस मोहिमेत अमेरिकन नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी नासा संस्थेतर्फे वेगवेगळे ऊपक्रम राबविले जात आहेत आणी अमेरिकन नागरिक देखील त्यात ऊत्साहाने सहभागी होत आहेत ह्याच आर्टिमस मोहिमेत अमेरिकन विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी नासा संस्थेने हायस्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव स्पर्धा जाहीर केली होती 

केजी ते हायस्कूलच्या विद्यार्थ्यासाठी जाहीर झालेल्या Lunabotics Junior Contest ह्या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना Artemis चांद्रमोहिमेसाठी एका रोबोचे डिझाईन करण्याचे Challenge देण्यात आले होते हा रोबो चंद्रावरील खडबडीत कमी गुरूत्वाकर्षणीय वातावरणात तेथील भुपृष्ठावर फिरेल व तेथील भुभाग खणून चंद्रावरील माती,खडकाचा चुरा,धूळ ह्याचे मिश्रण (रेगोलीथ) गोळा करून तो नमुना कंटेनरमध्ये भरेल आणी विषेश म्हणजे हे डिझाईन युनिक असेल 

ह्या स्पर्धेला अमेरिकेतील 2,300 विद्यार्थ्यांनी ऊत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता नुकताच ह्या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून ह्या स्पर्धेत श्रिया सांवत आणी लुसीया ग्रिसांती ह्या दोन विद्यार्थीनी विजेता ठरल्या ह्या दोघींनी तयार केलेल्या रोबो डिझाईन मध्ये स्पर्धेतील सर्व आवश्यक गोष्टींंची पुर्तता करण्यात आली आहे

 Georgia Cumming येथील श्रिया सावंत ह्या  पंधरा वर्षीय विद्यार्थीनीने 6वी ते 12वी ह्या गटातील पहिले बक्षीस मिळवले असुन तीने RAD- Regolith Accretion Device हा रोबो डिझाईन केला आहे श्रिया सावंत हिने तयार केलेल्या डिझाईन मधला रोबो स्वयंचलित असुन त्या मध्ये एका बकेट ड्रमचा वापर केलेला आहे त्याच्या सहाय्याने रोबो चंद्रावरील भुमीचे ऊत्खनन करेल आणी चंद्रावरील माती धुळ,खडक ह्यांचे गोळा केलेले नमुने ड्रममध्ये भरेल विद्यार्थ्यांना रोबो डिझाईन करताना चंद्रावरील कमी गुरूत्वाकर्षण,धुळ,प्रदूषण आणी तेथील खडबडीत भुपृष्ठ अशा वातावरणात ऊत्खनन करताना आणी फिरताना रोबो स्थिर राहून त्याचे संतुलन राखण्याचे Challenge होते श्रियाने ते यशस्वीपणे पार पाडले 

 Tom River-New Jersey येथील नऊ वर्षीय लुसीया ग्रिसांती हिने केजी ते पाचवी ह्या गटात दुसरे बक्षीस मिळवले आहे तिने Olympus ह्या रोबोचे डिझाईन तयार केले आहे तिने रोबोला दिलेल्या नावात अमेरिकेची नासाची आधीची अपोलो मोहीम आणी आताची आर्टिमस मोहीम ह्याचा समावेश आहे ग्रीक पौराणिक कथांच्या अपोलो आणी आर्टिमसच्या घरावरून चांद्रमोहिमेसाठी नासाने हि नावे निवडली तिने सौर ऊर्जेवर चालणाऱ्या रोबोचे डिझाईन तयार केले असुन चंद्रवरील खडबडीत भुपृष्ठावरील भुमीवर ऊत्खनन करण्यासाठी रोबोला अणुकुचीदार चाके बसविली शिवाय खडकाला मातीपासून वेगळे करण्यासाठी शंकुच्या आकाराचे ऊपकरण बसवले ह्या शंकूच्या आकाराच्या ऊपकरणाच्या सहाय्याने रोबो जमिनीवरील व खालील भागात उत्खनन करेल आणि खोदलेल्या भागातील रेगोलीथ गोळा करेल  

ह्या स्पर्धेतील स्पर्धकांची निवड करण्यासाठी देशभरातील 500 शिक्षक,व्यावसायिक आणी नासा संस्थेतील मान्यवरांची समीती नेमण्यात आली होती त्यांनी अंतिम फेरीत विस जणांची निवड केली त्यांना Lunabotics ज्युनियर प्राईज देण्यात आले 

अंतीम निवडीनंतर निवड झालेल्या श्रिया आणी लुसीया ह्यांच्याशी त्यांच्या क्लासरूम मध्ये नासाच्या फ्लोरीडा येथील केनेडी स्पेस सेंटरचे डायरेक्टर Janet Detro ह्यांनी लाईव्ह संवाद साधुन ह्या रोबोच्या डिझाईन बद्दल सखोल माहिती जाणून घेतली त्या नंतर अंतिम निर्णय घेण्यात आला 

ह्या विद्यार्थीनींच्या निवडीनंतर नासाच्या STEM Engagement office मधील Associate Administrator Mike Kincaid आनंदित झाले आहेत ह्या विद्यार्थ्यांची कल्पकता,नाविन्य आणी ऊत्साह पाहून मी देखील Exited झालो ह्या मुलांचे असामान्य कर्तृत्व आणी बुध्दीची झेप पाहून भविष्यकालीन आर्टिमस पिढीच्या यशाची मला खात्री पटली !

आगामी आर्टिमस मोहीमेतील तीन अंतराळवीरांमध्ये एका महिला अंतराळविराचा समावेश आहे ह्या मोहिमेतील आणी भविष्यकालीन मानवी अंतराळ मोहिमेत चंद्रावर जाणाऱ्या अंतराळयानासाठी तळ तयार करण्यासाठी तसेच भविष्यकालीन मानवी निवासासाठी तेथे Water Harvesting आवश्यक आहे शिवाय तेथून रॉकेट ऊड्डाणासाठी ईंधनाचीही आवश्यकता आहे त्या साठी तेथील भूपृष्ठाचे ऊत्खनन करून भुगर्भातील खणलेल्या मातीत  मिनरल्स आणी खनिजांचा शोध घेतल्या जाणार आहे 

Sunday 10 April 2022

Axiom -1 मोहिमेतील चार अंतराळवीर स्थानकात सुखरूप पोहोचले

 

 The 11-person crew aboard the station comprises of (bottom row from left) Expedition 67 Flight Engineers Denis Matveev, Kayla Barron, Oleg Artemyev, and station Commander Tom Marshburn; (center row from left) Axiom Mission 1 astronauts Mark Pathy, Eytan Stibbe, Larry COnnar, and Michael Lopez-Alegria; (top row from left) Expedition 67 Flight Engineers Sergey Korsakov, Raja Chari, and Matthias Maurer.

 Axiom -1चे चारही अंतराळवीर स्थानकात पोहोचल्या नंतर Welcome ceremony दरम्यान स्थानकातील अंतराळवीरांसोबत नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधताना -फोटो नासा संस्था

 नासा संस्था -9 एप्रिल 

नासा संस्था,Space X आणि Axiom Space ह्यांच्या सहकार्याने अंतराळविश्वातील खाजगी व्यावसायिक अंतराळ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे ह्याच व्यावसायिक मोहीमेअंर्गत Axiom -1 ह्या मोहिमेद्वारा चार अंतराळवीर 8 एप्रिलला आठ दिवसाच्या वास्तव्यासाठी स्थानकाच्या दिशेने अंतराळप्रवासास निघाले आणि 21 तासांच्या अंतराळ प्रवासानंतर 9 एप्रिलला सुखरूप स्थानकात पोहोचले

Axiom -1 मोहिमेतील सहभागी चार अंतराळवीरांमध्ये 

  •  Michael Lopez Alegria - कमांडर
  • Larry Connor-(U.S) -Pilot
  •  Extan Stibbe(Israel )- Mission Specialist
  • Mark Patty(Canada )

ह्यांचा समावेश आहे  शुक्रवारी आठ एप्रिलला नासाच्या Kennedy Space Center Florida येथील उड्डाणस्थळावरून Space X च्या Endeavour अंतराळयानातून 11.17a.m.ला हे चारही अंतराळवीर अंतराळस्थानकाकडे रवाना झाले आणि नऊ एप्रिलला 8.29a.m.ला स्थानकाजवळ पोहोचले 

10.13 a.m.ला स्थानक आणि अंतराळयान स्वयंचलित यंत्रणेने जोडल्या गेल्या नंतर ह्या अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला स्थानकाच्या Harmony Module मधील Docking port च्या मधल्या भागातील Camera मध्ये काही कारणाने व्यत्यय आल्यामुळे स्थानकातील अंतराळवीरांना फोटो व व्हिडीओ व्यवस्थित न दिसल्यामुळे अंतराळयान स्थानकाशी नियोजित वेळेपेक्षा 45 मिनिटे ऊशीराने जोडले गेले

ह्या चारही अंतराळवीरांचे स्थानकात सध्या राहात असलेल्या अंतराळविरांनी स्वागत केले त्या नंतर Welcome ceremony पार पडला तेव्हा ह्या चारही अंतराळवीरांनी नासा ,Space X आणी Axiom Space संस्थेशी लाईव्ह संवाद साधला त्या वेळी ह्या अंतराळवीरांचे सर्वांनी अभिनंदन केले अंतराळविरांनी देखील आमचा अंतराळप्रवास खूप आरामदायी झाल्याचे सांगत तुम्ही आम्हाला हि संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार असे म्हणत आभार मानले तेव्हा नासाच्या Associate Administrator-Kathryn Lueders म्हणाल्या ,"तुम्ही सर्वजण खूप आनंदात दिसत आहात ह्या आठ दिवसात तुम्हाला सर्वांंना एकत्रित काम करायचे आहे त्यासाठी शुभेच्छा !"

  The 11-member crew aboard the station is composed of the seven-member Expediton 67 crew and the four-member Axiom Mission 1 crew.

स्थानकात सध्या राहात असलेल्या सात अंतराळवीरांसोबत Axiom चे अंतराळप्रवासी खालच्या रांगेत -फोटो नासा संस्था 

ह्या अंतराळवीरांच्या स्थानकातील प्रवेशानंतर नासाचे Administrator Bill Nelson ह्यांनी Axiom,Space X नासा आणी Axiom टिममधील अंतराळवीरांचे अभिनंदन केले  ते म्हणाले ,"ह्या टिममधील सर्वांचे अथक परीश्रम,जिद्द आणी कर्तृत्वामुळे आजचे हे पहिले ऐतिहासिक ऊड्डाण शक्य झाले अंतराळ विश्वातिल व्यावसायिक ईंडस्ट्रीच्या सहकार्याने आता खाजगी अंतराळविरांना अंतराळस्थानकात नेणे,आणणे सोपे झाले आहे भविष्यकालीन मानवी अंतराळप्रवासाचा हा यशस्वी शुभारंभ आहे !"

Axiom चेअध्यक्ष आणी CEO-Michael Saffredini ह्यांनी देखील ह्या अंतराळवीरांचे अभिनंदन केले "ह्या चारही अंतराळवीरांच्या स्थानकातील प्रवेशाने अंतराळ विश्वातिल खाजगी अंतराळवीरांच्या अंतराळयात्रेच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे नासा आणी SpaceX ह्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे हा शुभारंभ भविष्यात यशाचे शिखर गाठेल ह्यात शंका नाही!"

ह्या चारही अंतराळवीरांनी ह्या मोहिमेसाठी अंतराळवीरांप्रमाणेच आवश्यक ट्रेनिंग घेतले आहे ह्या अंतराळवीरांच्या ट्रेनिंगला नासाच्या Huston येथील Johnson Space Center मध्ये 2021च्या ऑगस्ट मध्येच सुरुवात झाली होती  शीवाय त्यांनी E.SA,Space X आणी Axiom Space ह्या संस्थेतही ट्रेनिंग घेतले 

ह्या मोहिमेचे कमांडर अंतराळवीर Lopez-Alegria हे मुळचे स्पेनचे आहेत पण अमेरिकेतील California मध्ये त्यांचे शिक्षण झाले तेथेच ते स्थायिक झाले सध्या ते नासामध्ये अंतराळवीर आहेत

हे चारही अंतराळवीर आठ दिवस स्थानकात रहातील आणी अंतराळ मोहीम 67च्या अंतराळवीरांसोबत तिथे सुरू असलेल्या संशोधनात व कमर्शियल अँक्टिव्हिटीज मध्ये सहभागी होतील

Saturday 9 April 2022

नासाचे अंतराळवीर Mark Vande hei ह्यांनी परतण्याआधी त्यांच्या दीर्घकालीन वास्तव्याबद्दल स्थानकातून साधलेला संवाद

 NASA astronaut and Expedition 65 Flight Engineer Mark Vande Hei on the International Space Station.

 नासाचे अंतराळवीर Mark Vande Hei स्थानकातील वास्तव्यादरम्यान व्हेजी चेंबर मध्ये देखभाल करताना -फोटो नासा संस्था 

 नासा संस्था -

नासाचे अंतराळवीर Mark Vande hei अंतराळस्थानकात 355 दिवस रहाण्याचा विक्रम प्रस्थापित करून मागच्या आठवड्यात पृथ्वीवर परतले आहेत त्यांच्या ह्या दिर्घकालीन वास्तव्याबद्दल स्थानकातून परतण्याआधी त्यांनी Huston येथील नासा संस्थेशी साधलेल्या संवादाचा हा वृतांत

Rob Navies (Jscpao) - Mark! स्थानकातील दिर्घकाळचे वास्तव्य संपवून आता तु पृथ्वीवर परतणार आहेस स्थानकात जास्त दिवस रहाव लागेल अस तुला ऐनवेळी सांगण्यात आल तेव्हाची मनस्थिती कशी होती ?कशी तयारी केलीस ?

Mark- अगदी शेवटच्या दिवशी ऐनवेळी मला हि संधी मिळाली माझ्याकडे फक्त एक दिवस होता मी जास्त वेळ विचार करण्यात न घालवता तात्काळ त्या मिळालेल्या संधीवर फोकस केल आणी हि संधी घ्यायची ठरवल वेळ कमी असल्यामुळे मला ह्या ट्रिपच नियोजन आधी करता आल नाही नाहीतर आपण एखाद्या ट्रिपच नियोजन कित्येक दिवस आधीपासूनच ठरवतो मानवाला मिळालेल्या कल्पकतेच्या देणगीमुळे हे सहज शक्य होत पण माझ्याकडे वेळ कमी होता आणी ईच्छाशक्ती तीव्र होती नवीन काही तरी करण्याची दुर्मिळ संधी मिळणार होती त्या मुळे मी ती घेण्याच ठरवल

Rob - ह्या दिर्घकाळच्या वास्तव्यादरम्यान तुझी मानसिक स्थिती कशी होती विषेशतः विकेंडला असे अनेक विकेंड स्थानकात गेले तेव्हा कधी कंटाळवाणे क्षण आले का?

Mark-  मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित केल मला आता ईथेच रहायचय हे मनाशी पक्क केल हळूहळू सवय झाली आपण सारेच सोशल मांईडेड असतो तीथे पृथ्वीवर आपण आपल्या मित्रांसोबत कुटुंबियांसोबत वेळ घालवतो तेव्हाच्या क्षणाच्या आठवणी मनात होत्या आणी पृथ्वीवर परतल्यानंतर पुन्हा आम्ही भेटणार होतोच ईथे संशोधन करण्याची झिरो ग्रॅविटीत राहण्याची अमूल्य संधी होती ती पृथ्वीवर अनुभवायला मिळणार नव्हती हे मनाशी पक्क केल होत आम्ही सर्व अंतराळवीर एकत्रित काम करतो वेळ मिळाला की वीकेंडला घरच्यांशी संवाद साधत होतो आणि मी रोज मेडीटेशन ,व्यायाम करत होतो जेव्हा कंटाळा येत होता तेव्हा चांगल्या गोष्ठी आठवत होतो त्या मुळे वेळ छान गेला

Rob - पृथ्वीपासून लांब रहाताना शारीरिदृष्ठ्या अस्वस्थतेचे क्षण अनुभवले असतील विषेशतः ह्या दिर्घकालीन वास्तव्यातील सर्वोच्य आनंदाचे आणी असहाय्यतेचे क्षण ह्या बद्दल सांग

Mark-माझ्या स्थानकातील वास्तव्यादरम्यानचा सर्वोच्च आनंदाचा अविस्मरणीय क्षण म्हणजे स्थानकातील झीरो ग्रव्हिटीत तरंगत माझ्या सहकारी अंतराळवीरांसोबत डोळ्यातील पाणी लपवत हसत हसत जेवण करण त्या क्षणी सहकारी अंतराळवीरांनी केलेल्या कमेंट्सच वाईट वाटुन न घेता खेळकरपणाने हसुन दाद देण कारण सगळ्यांची कंडीशन सारखीच असते आणी असहाय्य अवस्था म्हणाल तर ईथल्या झिरो ग्रॅव्हीटीत विपरीत वातावरणात सतत तरंगत रहाण आव्हानात्मक असत शारीरिकदृष्ठ्या खूप  प्राब्लेमचा सामना करावा लागतो विशेषतः Headaches, अशावेळी  खूप अस्वस्थता जाणवते पण खूप काम असत आणी आपोआपच परिस्थितीशी जुळवून घेतल्या जात 

Rob -तुम्ही स्थानकात सात किंवा जास्ती अंतराळवीर मिळुन रहाता अशावेळेस तुम्ही एकटेपणाचा सामना करता ह्यावर सहजासहजी विश्वास बसण कठीण असत मागच्या वर्षीच्या कोरोना काळात काळात तुमच्या कामा दरम्यान असे क्षण आले का?

Mark- मला तस वाटत नाही जर सकारात्मक विचार असतील तर एकटेपणा जाणवत नाही ह्या कोरोनाच्या काळात जेव्हा निर्बंध आले तेव्हा आपण सारेच घरात isolate झालो होतो तेव्हा घरात कीती कमीजण होते त्या बाबतीत आम्ही लकी ठरलो ईथे आम्ही सातजण होतो आम्ही त्या काळातही घरच्यांशी आणि सोशल मिडीयावरून लोकांशी संवाद साधु शकलो आम्ही आमच संशोधनही करत होतो त्यामुळे पृथ्वीवरच्या तुलनेत आम्ही ईथे सुरक्षित होतो त्या वेळी नासा संस्थेतील Health & performance group ने आम्हाला खूप मदत केली त्यांच्यामुळे आम्ही आमच्या घरच्यांशी बोलु शकलो आणी सोशलमिडीयावरून नवीन लोकांशीही संवाद साधु शकलो

Rob- Mark जेव्हा तुला माहिती आहे का कि तु ,पृथ्वीवर परतशील तेव्हा तु 151 मिलीयन मैलाचा अंतराळ प्रवास केलेला असेल म्हणजे जवळपास चंद्रावर 312 रांऊड ट्रिप! तसेच तु स्थानकात आलेल्या वेगवेगळ्या व्यावसायिक कंपनीच्या अंतराळयानाना पाहिले आहेस ह्या बद्दल आणी भविष्यात मानवी अंतराळप्रवासा बद्दलच तुझ मत काय आहे?

Mark-मला आनंद वाटतो  आणी मला विश्वास आहे की नासा संस्थेने  खाजगी कंपनीत व्यावसायिकदृष्ठ्या केलेली हि यशस्वी सुरवात आहे ह्या मुळे भविष्यात अंतराळवीरांचा अंतराळप्रवास सहजतेने सुरक्षित आणी आरामात होईल आणी आगामी काळात खाजगी अंतराळवीरांप्रमाणेच सामान्य लोकही सहजतेने आमच्या सारखेच अंतराळात भ्रमण करतील आणी त्यांना आकाशातील ग्रहांबद्दल जास्तीतजास्त माहिती मिळेल 

Rob- तुझ्या स्थानकातील वास्तव्या दरम्यान स्थानकात रशियन सिनेनिर्माता आणी रशियन सिनेअभिनेत्री स्थानकात आले होते शीवाय दोन जपानी अंतराळयात्रीही,ते अंतराळवीर नव्हते तरीही त्यांना स्थानकात येण्याची परवानगी मिळाली त्या बद्दल सांग !तो अनुभव कसा होता?

Mark- अमेझिंग! खरच आश्चर्यकारक अनुभव होता तो ! त्या दोघांनी आमच्यासारख प्रोफेशनल ट्रेनिंग घेतल नव्हत पण कमी ट्रेनिंग घेतल होत त्यामुळे ते स्थानकात कसे adjust होतील ह्याची आम्हाला काळजी होती पण आंतरिक ईच्छेच्या जोरावर त्यांनी हे साध्य केल ते खूप लवकर ईथल्या वातावरणात सरावले त्यांची एनर्जी बघून आम्हीही प्रेरित झालो होतो त्यांच्यासोबतचा काळ खूप छान गेला तसाच अनुभव दोन जपानी अंतराळ प्रवाशांचा होता ह्या चौघा स्थानकातील अंतराळगेस्ट सोबतचा काळ खूप छान होता आणी मला तो अनुभवता आला त्यांनी रीतसर परवानगी काढली होती इथे येण्याची !

Rob - आता वर्षभरानंतर तु स्थानकातून परतणार आहेस ह्या क्षणी तुझ्या मनात नेमक्या काय भावना आहेत!

Mark  - खरच खूप कठीण आहे ह्या क्षणीच्या भावना शब्दात व्यक्त करण !खरतर संमिश्र भावना आहेत ! पृथ्वीवर परतल्यानंतर मी माझ्या कुटुंबीयांना भेटणार ह्याचा आनंद आहे मागच्या वर्षीच्या जानेवारी महिन्यानंतर मी माझ्या पत्नीला प्रत्यक्षात पाहिल नाही त्यामुळे तो क्षण आनंददायी असेल पण मी माझ्या पत्नीला प्रॉमिस केलय की ह्यापुढे मी स्थानकात रहायला जाणार नाही ह्याच दु:ख आहे कारण हे स्थानकातल घर माझ्यासाठी स्पेशल आहे ईथे मला आंतरदेशीय मित्र मिळाले त्यांच्या सोबत संशोधन करायची संधी मिळाली आम्ही सर्वांनी ईथे एकत्रित सण साजरे केले पार्टी केली त्याच्या आठवणी अविस्मरणीय आहेत त्या माझ्या मनात कायम रहातील मी नासा संस्थेचा खूप,खूप आभारी आहे त्यांनी मला स्थानकात रहाण्याची संशोधन करण्याची अमुल्य संधी दिली त्यांच्यामुळेच मी ईथे राहु शकलो मला ईतके छान मित्र मिळाले पण मी परत ईथे येऊ शकणार नाही ह्याच वाईट वाटतय त्यामुळे ह्या क्षणी मनात कडुगोड आठवणी आहेत आता उर्वरित आयुष्य मी देशासाठी आणी संशोधनासाठी घालवणार आहे 

Rob-तुम्ही स्थानकातून परतताना आणी सोयुझ MS-19मध्ये शिरताना Hatching च्या वेळी स्थानकाचा फोटो आणी व्हिडीओ काढण्याची परवानगी घेतली आहे अंतराळवीर Pyotr Dubrov ह्यांना ती मिळालीय ह्या बद्दल सांग

Mark- निश्चितच!आम्ही तिघेही स्थानकातून निघताना नवीन Docking portवरून निघणार आहोत सोयुझ यानात खूप कमी जागा असते त्याही कंडीशनमध्ये Pyotr निघताना स्थानकाचे फोटो आणी व्हिडीओ घेणार आहे Pyotr कमांडरसीट जवळच्या जागेत झोपलेल्या पोजमध्ये बसेल म्हणजे त्याला थोडी मोकळी जागा मिळेल आणी hatchingच्या वेळी habitation compartment मध्ये असलेल्या स्थानकाच्या समोरच्या भागातील खिडकीतून फोटो आणी निघतानाच्या प्रक्रियाचे व्हिडीओ शुटिंग करेल त्या वेळी मी त्याला मदत करेन आणी व्हिडीओ घेतल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या सीटवर बसु हा आमच्यासाठी नवा अनुभव असेल

 Rob- सुरवातीच्या आणी नंतरच्या launching आणि landing मध्ये काय फरक होता ?

Mark-खूप फरक होता आधी अनुभव नसल्याने पहिला अनुभव खूप मजेशीर होता सुरवातीला अंतराळात शिरताना खूप ऊष्णतेचा सामना करावा लागला आणी अचानक पृथ्वीची कक्षा भेदल्यावर वजनरहित अवस्था झाल्यावर सिटवरुन मागेपुढे होताना बेसावध असल्यामुळे स्थीर रहाण कठीण झाल होत नंतर स्थानकातील झिरो ग्रॅविटीत स्थिरावताना हळूहळू सवय झाली तसच परतताना पॅराशूट कधी ऊघडेल,ऊघडेल की नाही आपण जिंवत परतु की नाही असे वाटत असतानाच अचानक पॅराशूट ऊघडल्यावर आणी जमिनीवर ऊतरताना पहिल्यावेळी अनुभव नसल्याने डोक्यावर पडल तर लागेल अशी भीती होती शीवाय खाली ऊतरण्याआधी हवामानाचा अंदाज घेऊन मगच खाली ऊतरण्याची परवानगी मिळते अशावेळेस वाट पहाण खूप कंटाळवाण असत पण दुसऱ्या वेळेस आधीच्या अनुभवाचा फायदा होतो ऊतरताना आपल्या डोक्याला लागणार नाही ह्याची काळजी घेतल्या जाते मागच्या वेळेस आम्ही फेब्रुवारीच्या महिन्यात परतलो त्यामुळे पृथ्वीवर थंड वातावरण होत त्यामुळे परतल्यानंतर प्रथम आम्ही तेथील मातीचा भाजीपाल्यांच्या पिकांचा सुगंध घेतला आता भर ऊन्हाळ्यात परतणार आहोत

Rob- हो ! ह्या वेळी कझाकस्थानातील वातावरण 50 डिग्री फॅ.ईतके ऊष्ण आहे! परतल्यानंतर पहिली गोष्ट कोणती करणार आहेस

Mark-  मी माझ्यासाठी आणी पत्नीसाठी  Coffee बनवणार आहे आणी आम्ही दोघे Coffee,Guacamole आणी Chips चा आस्वाद घेत एकत्रित गप्पा मारत शनिवार निवांत घालवणार आहोत