Tuesday 8 February 2022

अंतराळवीर Mark Vande Hei ह्यांच्या स्थानकातील वास्तव्याला 300 दिवस पुर्ण

 NASA astronaut Mark Vande Hei is studies cotton genetics for the Plant Habitat-5 space agriculture experiment.

अंतराळवीर Mark Vande Hei स्थानकातील लॅब मध्ये Plant Habitat -5अंतर्गत Cotton Genetics वर संशोधन करताना -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -4 फेब्रुवारी 

नासाच्या अंतराळ मोहीम 66चे अंतराळवीर Mark Vande Hei ह्यांच्या अंतराळ स्थानकातील वास्तव्याला तीन फेब्रुवारीला 300 दिवस पुर्ण झाले आहेत त्यांच्या सोबतच अंतराळवीर Pyotr Dubrov ह्यांनी देखील अंतराळ स्थानकात आता 300 दिवस वास्तव्य केले आहे 9 एप्रिल 2021 मध्ये ते अंतराळस्थानकात राहायला गेले होते 

ह्या आधी महिला अंतराळवीर Christina Koch ह्यांनी अंतराळस्थानकात 328 दिवस रहाण्याचा विक्रम प्रस्थापित  केला होता तीन मार्चला Mark Vande ह्या विक्रमाची बरोबरी करतील आणी 15 मार्चला अंतराळवीर Scott Kelly ह्यांनी अंतराळस्थानकात 340 दिवस मुक्काम करून स्थापित केलेल्या विक्रमापर्यंत पोहोचतील Mark Vande 30 मार्चला पृथ्वीवर पोहोचतील तेव्हा त्यांनी स्थानकात जास्त दिवस रहाण्याचा विक्रम प्रस्थापित केलेला असेल

 हे तिनही अंतराळवीर स्थानकातील वास्तव्यादरम्यान तेथील फिरत्या lab मध्ये सुरु असलेल्या संशोधनात सहभागी झाले शिवाय त्यांनी अंतराळस्थानकातील तांत्रिक दुरुस्तीसाठी आवश्यक असलेला Space Walk ही केला पण ह्या अंतराळवीरांचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतःवरील संशोधनात सहभागी झाले अंतराळस्थानकातील दिर्घकालीन वास्तव्यादरम्यान मानवी शरीरावर काय परिणाम होतो त्यांच्या मानसिक आणी शारिरीक आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात तिथल्या झीरो ग्रव्हिटीवर मात करून शरीर त्याला कसे प्रतिसाद देते,कसे तग धरते ह्या सर्वाचे निरीक्षण नोंदवून त्यांच्या शरीरातील हार्ट,डोळे,रक्त व ईतर गोष्टींची नियमित तपासणी करून त्याचे नमुने घेऊन त्यावर त्यांनी सखोल संशोधन केले आहे अंतराळ स्थानकात झिरो ग्रॅव्हिटी असल्यामुळे पृथ्वीसारखे वातावरण नसते गुरुत्वाकर्षणाअभावी सतत तरंगत्या अवस्थेत राहावे लागते तिथे सरळ स्थिर अवस्थेत उभे राहता येत नाही चालता बसता किंवा इतर हालचाली करता येत नाहीत त्या मुळे शरीरातील हाडांना,स्नायूंना व्यायाम होत नाही सतत उलट्या सुलट्या कोणत्याही दिशेने तरंगत राहिल्याने शरीरातील रक्ताभिसरणावर विपरीत परिणाम होतो त्यामुळे शरीरातील सर्वच अवयवांवर विपरीत परिणाम होतो अंतराळवीर तिथे काहीवेळ व्यायाम करून ह्या वर मात करतात तिथे पृथ्वीसारखे वातावरणच नसल्यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो त्यांना ताज्या भाज्या फळे अन्न मिळत नाही योग्य व्हिटॅमिन्स न मिळाल्याने हाडे कमकुवत व ठिसूळ होतात ,डोळ्यावर परिणाम होतो अंतराळवीर जेव्हा परत येतात तेव्हा काही काळ त्यांना चालताना त्रास होतो कारण ते चालण विसरतात पण योग्य उपचारानंतर ते पूर्ववत होतात सहा महिन्यात त्यांची हि अवस्था होते मग जास्त काळ जर मानव अशा झिरो ग्रॅविटीत राहिला तर त्यांच्यात काय फरक पडतो ते ह्या वातावरणाला कसे सामोरे जाते ह्या विषयीच्या संशोधनात  हे अंतराळवीर सहभागी झाले ह्या संशोधनाचा ऊपयोग भविष्यकालीन दुरवरच्या अंतराळ मोहिमातील अंतराळवीरांसाठी होणार आहे कारण त्यांना दीर्घकाळ अशा वातावरणात राहावे लागेल पृथ्वीवरून त्यांना अन्न पाठवताना वेळ लागेल म्हणून झिरो ग्रॅविटीत पृथ्वीसारखे कृत्रिम वातावरण तयार करून त्यात भाजी,धान्य फळे ,फुलाची लागवड करून ह्या अंतराळवीरांनी भविष्यकालीन अंतराळ मोहीमांतील अंतराळवीरासाठी उपयुक्त संशोधन यशस्वी केले आहे 

अंतराळवीर Mark Vande अंतराळवीर Oleg Novitskiy आणी  Pyotr Dubrov ह्यांच्यासोबत 9 एप्रिल 2021 मध्ये स्थानकात रहाण्यासाठी आले होते 17आक्टोबर 2021 मध्ये  अंतराळस्थानकात सिनेमाच्या शुटिंगसाठी बारा दिवस वास्तव्यासाठी आलेल्या रशियन निर्माते Klim Shipenko आणी अभिनेत्री Yulia Peresild ह्यांच्या सोबत  0leg Novitskiy पृथ्वीवर परतले पण अंतराळवीर Mark Vande आणी Pyotr Dubrov मात्र स्थानकातच राहिले होते

नासाच्या Huston येथील संस्थेतील प्रमुख Woody Hobagh ह्यांनी स्थानकातील वास्तव्यात 300 दिवस पुर्ण केल्याबद्दल अंतराळवीर Mark Vande आणी Pyotr Dubrov ह्या दोघांचे अभिनंदन केले आहे आणी पुढील वास्तव्यासाठी शुभेच्छा देत आम्हाला आणी देशाला तुमचा अभिमान वाटतो असे सांगितले


No comments:

Post a Comment