Saturday 12 February 2022

सूर्याच्या अंतर्गत भागातील सखोल संशोधनासाठी दोन नव्या सायन्स मिशनची निवड

 A mid-level solar flare that peaked at 8:13 p.m. EDT on Oct. 1, 2015, captured by NASA’s Solar Dynamics Observatory.

नासाच्या सोलर डायनॅमिक Observatory द्वारे घेतलेल्या फोटोत दिसणाऱ्या सूर्याच्या अंतर्गत भागातील भडकत्या प्रखर ज्वाला -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -11फेब्रुवारी 

अनादीकाळापासून  ब्रह्मांडात आपल्या सौरमालेतील सूर्य प्रखर तेजाने तळपतो त्याच्या प्रकाशाने पृथ्वी प्रकाशते आणि मावळण्याने अंधारते ह्या सूर्याबद्दल त्याच्या भोवतीच्या तेजोमय प्रभामंडलाबद्दल जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञ सतत प्रयत्न करत असतात नासाच्या सौर मोहिमेअंतर्गत सूर्यावर कार्यरत असलेल्या पार्कर सोलर प्रोबने सूर्याच्या कोरोना ह्या भागात प्रवेश करून तेथील फोटो आणि माहिती त्वरित पृथ्वीवर पाठवून शास्त्रज्ञांची हि मोहीम यशस्वी केली आहे मागच्या महिन्यात ह्याच मोहिमे अंतर्गत कार्यरत असलेल्या नासाच्या सोलर डायनॅमिक Observatory द्वारे सूर्यापासून बाहेर पडणाऱ्या प्रखर चमकत्या भडकत्या ज्वाळांचे फोटो नासा संस्थेला प्राप्त झाले आहेत त्या प्रखर तेजस्वी चमकत्या ज्वालांचा प्रकाश प्रुथ्वीवरील काही भागात पोहोचला होता 

सूर्य हा आगीचा प्रचंड गोळा असून त्याच्या अंतर्गत भागात मॅग्नेटीक फील्ड आहे तेथे Electric Radiation मुळे सतत शक्तिशाली स्फोट होत असतात ह्या चुंबकीय क्षेत्रात अंतराळातील ज्वलनशील पदार्थ,वायू , विद्युतभारित किरणे आकर्षित होतात आणि गोलाकार स्थितीत फिरत राहतात जेव्हा ह्या भागातील वायुंचा दाब प्रचंड वाढतो तेव्हा आगीचा भडका उडतो स्फोट होतात आणि ह्या आगीच्या ज्वाळांचे लोट आणि वायू प्रचंड वेगाने त्या भागातून बाहेर पडतात आणि वरच्या दिशेने कोरोना ह्या भागात शिरतात ह्या भडकत्या ज्वाळा काही मिनिटांपासून काही तासा पर्यंत भडकत्या अवस्थेत राहतात आणि नंतर हळू हळू थंड होतात त्यांच्या पासून प्रचंड उष्णता बाहेर पडते अंतराळात सौरवादळ होते आणि त्यांचा प्रकाश प्रखर असतो त्या वेळेस निर्माण झालेली Electromagnetic energy आणि वेग सूर्यप्रकाशाइतकाच असल्याने तो प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचतो सुदैवाने पृथ्वीभोवती दाट वातावरण असल्यामुळे हि हानिकारक Cosmic किरणे डायरेक्ट पृथ्वीवर येत नाहीत पण अंतराळातील अंतराळयान,अंतराळस्थानक आणी त्यात राहणारे अंतराळवीर ह्यांना त्यापासून धोका उद्भवू शकतो शिवाय Radio Communication ,Electric power Grids  आणी Navigation Signals ह्यांना  देखील त्यापासून घोका होऊ शकतो असा इशारा नासा संस्थेतील शास्त्रज्ञानी दिला होता 

 

जानेवारी 2022 मध्ये सोलर डायनॅमिक Observatory द्वारे घेतलेल्या फोटोत सूर्याच्या अंतर्गत भागातुन बाहेर पडणाऱ्या मध्यम स्वरूपाच्या चमकदार प्रखर ज्वालांचा लाईव्ह व्हिडीओ -फोटो -नासा संस्था 

नासाच्या सौरमोहिमेअंतर्गत सुर्याच्या आतील आणी बाहेरील कोरोना ह्या भागातील सखोल संशोधीत माहिती मिळवण्यासाठी आणी सुर्य आणी पृथ्वीचा नेमका संबंध आणी सुर्याच्या अंतर्गत घडामोडींचा पृथ्वीवर होणारा परिणाम त्यामुळे बदलणारे वातावरण ह्या संबंधीत माहिती मिळवण्यासाठी नासा संस्थेने नव्या दोन सायन्स मिशनची निवड केली आहे Multi-Slit Solar Explorer (MUSE) आणी HelioSwarm

MUSE आणी HelioSwarm ह्या दोन मिशनद्वारे सुर्याच्या अंतर्गत भागातील सखोल माहिती आणी अंतरळातील बदलत्या वातावरणाची माहिती गोळा केल्या जाईल आणी त्याचा उपयोग भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील आणी सध्या स्थानकात रहात असलेल्या अंतराळविरांच्या सुरक्षिततेसाठी होईल शिवाय Satellite,Communication Signals,अंतराळयान ह्यांचे ह्या हानिकारक किरणापासुन संरक्षण करण्यासाठी,दुष्परिणाम टाळण्यासाठी होईल आणी आपल्या पृथ्वीसंबंधीत महत्वपुर्ण माहिती मिळेल असे मत नासाच्या Washington येथील संस्थेचे Associate Administrator Thomas Zurbuchen ह्यांनी व्यक्त केले

MUSE मिशन मुळे शास्त्रज्ञांना सुर्याच्या कोरोना ह्या भागातील धगधगत्या ज्वाळा आणी त्यातून बाहेर पडणारी प्रचंड ऊष्णता ,ऊष्ण हवामान,ज्वलनशील पदार्थ,वायू ह्या संबंधीत सखोल माहिती मिळेल ह्या मिशनसाठी वापरण्यात येणाऱ्या अत्यंत शक्तीशाली Multi -Slit-Spectrometer मार्फत सुर्याच्या अंतर्गत भागातील ऊष्णता,ऊष्णवारे,ultraviolet Radiation आणी Solar Transition Region ह्या भागातील अत्यंत सुक्ष्म बारकावे टिपून फोटोबध्द केल्या जातील सुर्याच्या कोरोना ह्या भागातही सुक्ष्म निरीक्षण नोंदवून तेथील फोटो घेतल्या जातील MUSEचा मुख्य ऊद्देश सुर्याच्या कोरोना ह्या भागातुन बाहेर पडणाऱ्या प्रखर तेजस्वी चमकत्या ज्वाळा आणी अंतर्गत भागातील निर्माण होणाऱ्या भडकत्या धगधगत्या ज्वाळा कशा निर्माण होतात ह्याची सखोल संशोधीत माहिती मिळवणे  तेथील Basic Plasma Properties,ज्वलनशील पदार्थ , वायू,हानिकारक Cosmic किरणे ,सौरवादळ आणी त्याचा पृथ्वीवर होणारा दुष्परिणाम ह्याची सखोल माहिती गोळा करणे हा आहे 

HelioSwarm मिशन द्वारे अत्यंत अद्ययावत यंत्रणेच्या सहाय्याने सुर्याच्या अंंतर्गत भागातील Magnetic field मधील विद्युतभारीत कणांच्या तापमानाची नोंद करणे शीवाय तेथील ज्वलनशील पदार्थ,वायू,किरणे ह्यांंचे निरीक्षण नोंदवुन त्यांचे फोटो काढून त्वरित पृथ्वीवर पाठवणे व सौरवादळासंबधीत माहिती गोळा करण्याचे काम केल्या जाईल HelioSwarm मध्ये एक Hub Space craft आणी आठ Co -Orbiting छोट्या  Spacecraft चा समावेश आहे Hub Spacecraft द्वारे ह्या लहान Spacecraft शी रेडिओ संपर्क ठेवल्या जाईल आणि पृथ्वीवरील नासा संस्थेशीही 

No comments:

Post a Comment