नासा संस्था -8 फेब्रुवारी
अठरा फ्रेब्रुवारीला Perseverance मंगळयानाचे मंगळग्रहावरील एक वर्ष पूर्ण होईल ह्या एक वर्षात ह्या यानाने Ingenuity मंगळ हेलिकॉप्टरच्या सहाय्याने अनेक महत्वाची कामे पार पाडली आहेत मंगळावरील पुरातन कालीन सजीवसृष्ठिच्या अस्तित्वाला पृष्ठि देणारे पुरावे शोधणे,तेथील पाणवठ्याचे आटलेले स्त्रोत शोधणे ,मंगळावरील त्या भागातील भुपृष्ठावरील व भुगर्भातील जमीन रोबोटिक आर्मच्या सहाय्याने खोदून तेथील माती,दगड,वाळू ,चिखल आणि मिनरल्सचे नमुने गोळा करून ते मंगळयानाच्या कुपीत भरण्याची अवघड कामगिरी ह्या यानाने यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आता हे नमुने पृथ्वीवर आणण्यात येणार आहेत त्या साठी नासा संस्थेने MAV ह्या रॉकेटची निवड केली आहे
Colorado येथील Martin Space Littleton ह्या संस्थेला ह्या रॉकेट निर्मितीचे Contract देण्यात आले आहे Mars Ascent Vehicle(MAV)असे ह्या रॉकेटचे नाव आहे हे रॉकेट वजनाने हलके व आकाराने छोटे आहे हे रॉकेट पृथ्वी वरून मंगळावर जाईल आणी Perseverance मंगळयानाने गोळा केलेल्या नमुन्यांच्या कुपी सोबत घेऊन पुन्हा पृथ्वीवर परतेल हे नमुने गोळा करण्यासाठी ह्या रॉकेटमध्ये अद्ययावत यंत्रणा बसविण्यात आली आहे त्यातील कंटेनरमध्ये हे गोळा केलेले नमुने भरल्या जातील त्या साठी रोवरची मदत घेतल्या जाईल
नासाचे Administrator Bill Nelson ह्या मोहिमेबद्दल बोलताना म्हणतात हि पहिली जागतिक स्थरावरची पृथ्वी ते मंगळ आणी परत पृथ्वी अशी वैशिष्ट्यपूर्ण रोबोटिक ट्रिप आहे हि नासाची महत्वाकांक्षी मोहिम सगळ्या जगाला प्रेरणादायी ठरेल शिवाय भविष्यकालीन मानवसहित मंगळमोहिमेत पहिल्या अंतराळवीरांना मंगळावर नेण्या आणि परत आणण्यासाठी ऊपयुक्त ठरेल नासा संस्था अंतराळमोहिम विश्वात नेहमीच अग्रेसर राहिली आहे आंतरराष्ट्रीय पार्टनरसोबत नासाने अनेक यशस्वी अंतराळमोहिमा राबविल्या आहेत ह्या मोहिमेचा मुख्य ऊद्देश मंगळावरील सजीवसृष्ठीच्या अस्तित्वाचे पुरावे शोधणे आणी भविष्यकालीन मंगळमोहिमेतील अंतराळवीरांना रहाण्यासाठी योग्य वातावरण शोधणे हा आहे
ह्या मोहिमेअंतर्गत प्रथमच परग्रहावर रॉकेट ऊड्डाण मोहिम राबविण्यात येईल MAV ह्या कार्याचा शुभारंभ करेल MAV मंगळग्रहावरील Jezero Crater ह्या भागात ऊतरेल आणी Perseverance यानाने गोळा केलेल्या नमुन्यांच्या कुपी कंटेनरमध्ये भरून पुन्हा तेथून ऊड्डान करून पृथ्वीवर पोहोचेल Jezero Crater चा हा भाग भविष्यकालीन मंगळ मोहिमेसाठी Launch Platform म्हणून वापरला जाईल MAV मध्ये Perseverance यानाने गोळा केलेल्या सॅम्पल्सच्या कुपी व्यवस्थित भरल्या गेल्या नंतरच Lockheed Rocket तिथून पृथ्वीकडे येण्यासाठी उड्डाण करेल प्रथमच परग्रहावर Rocket मंगळ ग्रहांवरचे वातावरण भेदून पृथ्वीवर परतण्यासाठी उड्डाण करताना पेट घेईल पण MAV साठी पृथ्वीवरून मंगळावर उड्डाण कारण्याएव्हडे मंगळावरून पृथ्वीकडे उड्डाण करणे सोपे नसेल कारण तेथील वातावरण वेगळे आहे आणि MAV हे छोटे आणि वजनाने हलके असल्याने हि प्रक्रिया पार पाडताना काही अडथळे येण्याची शक्यता आहे म्हणूनच अत्याधुनिक यंत्रणेद्वारे त्या अडचणीवर मात करण्याची क्षमता त्यात निर्माण केली गेली आहे
MAV एकदा का मंगळभूमीवर उतरले कि त्याच्यावर ESA संस्था नियंत्रण ठेवेल आणि पुढील प्रक्रिया पार पडतील MAV पृथ्वीवर परतताना मात्र त्यावर नासा संस्था नियंत्रण ठेवेल 2026 मध्ये नासाच्या Florida येथील Kennedy Space Center येथून MAV मंगळग्रहावर जाण्यासाठी उड्डाण करेल आणि 2030 च्या मध्यांतरात MAV पृथ्वीवर परतेल
सध्या ह्या मोहिमेची तयारी सुरू असून Lockheed Martin Space Center मध्ये MAV Test Unit ,Flight Unit,Developing Testing आणि MAV चे डिझाईन युनिट आणि रॉकेटचा पृथ्वीशी संपर्क यंत्रणा टिम ह्या Rocketची ऊड्डाणपुर्व तपासणी करीत आहेत
नासा संस्थेने हे रॉकेट व Vehicle बनविण्यासाठी Lockheed Martin संस्थेला 194 मिलियन डॉलरचे कॉन्ट्रॅक्ट दिले असून त्या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत पृथ्वी ते मंगळ आणि पुन्हा पृथ्वी अशी रोबोटिक राऊंड ट्रिप असा सहा वर्षांचा कालावधी निश्चित केला आहे
No comments:
Post a Comment