Thursday 22 July 2021

Blue Origin कंपनीच्या New Shepard अंतराळयानाने केला अंतराळ पर्यटनाचा शुभारंभ

  

 Blue Origin कंपनीच New Shepard कमर्शियल अंतराळयान अंतराळवीरांसह अंतराळात झेपावताना

Blue Origin - 21जुलै 

अमेरिकेच्या स्वयंनिर्मित Space X Crew Dragonने अमेरिकेची बंद पडलेली अंतराळ उड्डाण मोहीम पुन्हा यशस्वी केल्यानंतर आता अमेरिकन व्यावसायिकांनी अंतराळातविश्वात अंतराळ पर्यटन मोहीमेची मुहूर्तमेढ रोवली आहे ह्या महिन्यात दोन खाजगी कंपन्यांनी स्वयंनिर्मित अंतराळयानातून नागरिकांना अंतराळ पर्यटन घडवले आहे गेल्या आठवड्यात Sir Richard Branson ह्यांनी त्यांच्या Virgin Galactic कंपनिच्या  Unity अंतराळयानातून अंतराळप्रवासाचा यशस्वी  शुभारंभ केल्यानंतर आता अमेझॉनचे संस्थापक आणि C.E.O Jeff Bezos ह्यांनी देखील New Shepard कमर्शियल अंतराळ यानातून अंतराळ पर्यटनाचा ऐतिहासिक शुभारंभ केला आहे 

 Jeff Bezos and Blue Origin New Shepard crew

             New Shepard यानातील प्रवाशी Oliver ,Jeff Bezos ,Mark Bezos आणि Wally Funk 

वीस जुलैला संध्याकाळी साडेसहा वाजता  West Texas येथील लाँच साईटवरून New Shepard अंतराळ यानाने रॉकेटच्या साहाय्याने अंतराळात झेप घेतली  ह्या अंतराळ यानातून Jeff  Bezos,Mark Bezos ,Wally Funkआणि Oliver Daemen ह्या चौघांनी अंतराळप्रवास केला रॉकेट प्रज्वलनानंतर रॉकेट अंतराळात झेपावले आणि काही मिनिटातच यान रॉकेटपासून वेगळे झाले यानाने आवाजाच्या तिप्पट वेगाने अंतराळात प्रवेश केला पृथ्वीच्या वरच्या वातावरणाची कक्षा भेदून शंभर मीटर उंचीवर (62 मैल )यान पोहोचताच सर्वांनी आनंदाने जल्लोष केला ह्या दहा मिनिटांच्या अंतराळ प्रवासादरम्यान चार मिनिटे सर्वांनी गुरुत्वाकर्षण विरहित अवस्था अनुभवली त्या वेळेस त्यांनी  सीटबेल्ट काढून यानात तरंगण्याची मजा लुटली शिवाय New Shepard यानाला असलेल्या अनेक खिडक्यांमधून पृथ्वीच सौन्दर्य न्याहाळताना त्यांनी WOW! अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली ह्या चौघांनी पृथ्वी आणि अंतराळातील सीमारेषा असलेली Karman line भेदून अंतराळप्रवास केल्यामुळे त्यांना आता अंतराळवीरांचा दर्जा देण्यात आला आहे उड्डाणानंतर दहा मिनिटांनी अंतराळयान पॅराशूटच्या साहाय्याने सुरक्षितपणे पृथ्वीवर उतरले तेव्हा सर्वांनी एकच जल्लोष केला

 072021-floating3.jpg

New Shepard अंतराळयानातील गुरुत्वाकर्षण विरहित अवस्थेत तारांगण्याचा आनंद लुटताना अंतराळ प्रवाशी 

पृथ्वीवर परतलया नंतर आणि प्रवासाआधी Wally Funk ह्यांचा आनंद आणि उत्साह वाखाणण्याजोगा होता त्यांची कित्येक वर्षांची अंतराळप्रवासाची इच्छा पूर्ण झाली होती ह्या अंतराळयानातून अंतराळात यशस्वी झेप घेणाऱ्या चार अंतराळवीरांमध्ये Wally Funk ह्या 82 वर्षीय माजी अंतराळवीर महिला आहेत त्या माजी पायलट असून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विमान उड्डाणादरम्यान आकाशात 19,600 तास व्यतीत केले आहेत साठच्या दशकातच त्यांना अंतराळात जाण्याची इच्छा होती त्या मुळे त्यांनी अंतराळवीरांसाठी आवश्यक असलेल ट्रेनिंग पूर्ण केल होत पण केवळ महिला असल्याने त्यांना अंतराळप्रवास नाकारण्यात आला होता विशेष म्हणजे त्यांनी उत्कृष्ट पायलट म्हणून अनेक बक्षिसेही मिळवली होती पण तरीही त्यांच्यावर अन्याय झाला ह्या अंतराळ मोहिमेमुळे त्यांची त्या वेळेसची हुकलेली संधी त्यांना पुन्हा मिळाली त्या वेळेस त्या एकवीस वर्षांच्या होत्या आता मला पुन्हा पंचविशीत असल्यासारख वाटल असं त्यांनी पृथ्वीवर परतल्यानंतर सांगितल मला ह्या वयात अंतराळप्रवास करायला मिळेल अस स्वप्नातही वाटल नव्हत पण खूप इच्छा होती म्हणून हि संधी दिल्याबद्दल मी Jeff Bezos ह्यांचे विशेष आभार मानते अस मत त्यांनी परतल्यावर व्यक्त केल आता त्यांनी सर्वात जास्त वयाच्या अंतराळप्रवास करणाऱ्या महिला अंतराळवीर होण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे 

 

         New Shepard कमर्शियल यान पॅराशूटच्या साहाय्याने पृथ्वीवर सुरक्षितपणे उतरताना

Oliver Daeman हा सर्वात लहान अंतराळवीर ठरला ह्या अंतराळप्रवासासाठी त्याच्या वडिलांनी कमर्शियल फ्लाईटच तिकीट काढल होत आणि ते दुसऱ्या ट्रिप मध्ये जाणार होते पण ह्या यानातून जाणाऱ्या प्रवाशाला जाण्यास अडचण आल्याने त्यांच  जाण ऐनवेळी रद्द झाल आणि ते तिकीट Oliver च्या वडिलांना मिळाल पण त्यांनी त्यांच्या ऐवजी Oliver ला ह्या अंतराळप्रवासाची संधी दिली 

Jeff Bezos आणि Mark Bezos हे दोघे भाऊ आहेत आणि Blue Origin कंपनीचे मालकही New Shepard हे अंतराळयान त्यांनी स्वखर्चांनी निर्मित केल आहे प्रायव्हेट कंपनीने तयार केलेल्या ह्या अंतराळयानाला अधिकृत व्यावसायिक अंतराळ प्रवासाचा परवाना मिळाला आहे आता ह्या विमानातून अंतराळवीराप्रमाणेच हौशी नागरिकांनाही अंतराळात जाता येता येणार आहे शिवाय ह्या अंतराळयानाचा पुनर्वापर अनेकदा करता येणार आहे 

ह्या यशस्वी अंतराळपर्यटन मोहिमेच्या यशस्वीतेनंतर Blue Origin चे CEO Bob Smith म्हणतात ,ह्या मोहिमेच्या यशाने आम्ही आनंदित झालो आहोत आजचा दिवस अंतराळविश्वातील ऐतिहासिक दिवस ठरला आहे विशेषतः मानवी अंतराळ पर्यटनासाठी ह्या मोहिमेतील इंजिनिर्स तंत्रज्ञांच्या टीमने उत्कृष्ठ कामगिरी पार पाडून त्यांचे असामान्य कर्तृत्व सिद्ध केले आहे ह्या मोहिमेचे काम त्यांनी व्यवस्थित पार पाडल्यानेच हि मोहीम यशस्वी झाली अंतराळविश्वातील अंतराळपर्यटनाच्या शुभारंभाचा हा पहिला टप्पा निर्विघ्नपणे पार पडला आहे आता ह्या वाटेवरून भविष्यकालीन मोहीमाही यशस्वी होतील ह्या वर्षी अजून दोनवेळा आम्ही नागरिकांना अंतराळपर्यटन घडवणार आहोत आणि पुढच्या वर्षी अनेक मोहिमाद्वारे नागरिकांना अंतराळपर्यटनाची संधी उपलब्ध करून देणार आहोत त्या मुळे ज्यांना अंतराळ पर्यटन करायचे आहे त्यांनी Blue Origin co. शी संपर्क साधावा अर्थात सध्या तरी त्यासाठी तिकिटाचा खर्च मात्र करोडोत करावा लागेल 

Wednesday 14 July 2021

नासाचे अंतराळवीर Shane Kimbrough आणि Megan McArthur ह्यांनी साधला W.F.I.A T.V. शी लाईव्ह संवाद

 WFLA | What's a blue streak? NASA Astronaut Megan McArthur shares coolest  weather phenomena she's seen from International Space Station

नासाचे अंतराळवीर Shane Kimbrough आणि Megan McArthur W.F.I.A T.V. शी संवाद साधताना -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -8 जुलै

अंतराळ मोहीम 65चे अंतराळवीर Shane Kimbrough व Megan McArthur ह्यांनी W.FLA-T.V. Tampa ह्यांच्याशी लाईव्ह संवाद साधला त्याचाच हा वृत्तांत

Megan  तुझ्या पासून सुरू करुयात तु स्थानकातून घेतलेले फोटो खूप छान आले आहेत तुम्ही स्थानकातून हवामानाचा वेध घेत होतात का? कारण तु Hurricane वादळाचे घेतललेले फोटो खूपच चांगले आहेत तुम्हाला स्थानकातून हे वादळ कस दिसल त्या बद्दल सांग 

Megan- ईथुन दुर 250 मैल अंतरावरून अवकाशातुन पृथ्वीकडे पहाताना निसर्गातील अनेक सुंदर घडामोडी दिसतात स्थानकाला खूप खिडक्या आहेत आम्हाला आमच्या कामातून वेळ मिळाला की,weekend ला आम्ही स्थानकाच्या Cupola  मधून पृथ्वीकडे पहाताना निसर्गातील सुंदर दृश्य कॅमेराबद्ध करतो समुद्राच्या लाटांचे विलोभनीय दृश्य असो की ढगांचे बदलते आकार सारच एकदा Shane आणी मी बोलत असताना weekend ला आम्ही खिडकीतून Caribbean sea पहात होतो तेव्हा Shane ला कल्पना सुचली तो म्हणाला आपण जेव्हा पुन्हा ह्या भागातून जाऊ तेव्हा ईथले फोटो काढु लकीली आम्ही त्या भागातून जात होतो मी Shane ला हाक मारली पण तो कामात बिझी होता मी पटकन कॅमेरा घेतला आणी फोटो घेतले तेव्हाच hurricane वादळाचे फोटोही आले मला वादळाचे गोलाकार रुप आकार घेताना दिसले खूपच ईंटरेस्टींग दृश्य होत ते वादळाच ते गोलाकार घेतानाच दृश्य नंतरची गोलाकार वावटळ,प्रचंड धुरळा आणी भयानकता ईथुन वरुन मी पाहु शकत होते वादळाची सुरुवात,आणी वादळ घडतानाचा त्याच आकारबद्ध स्वरूप प्रत्यक्ष पाहण आश्चर्यकारक होत मी पृथ्वीवर ज्या भागात रहाते तीथली वादळाची भयानकता आणी नंतरचा विध्वंस मी पाहिला आहे त्यामुळे मी जर तिथे असते तर असे फोटो घेऊ शकले नसते पण ईथुन वरुन मला ते घेता आले ह्या फोटोतून सगळ्यांना घरबसल्या वादळाच ईथुन दिसलेल स्वरूप पहाता याव म्हणून मी ते फोटो शेअर केले मी वादळाचे फोटो घेत नव्हते किंंवा हवामानाचा वेध पण अचानक योगायोगाने मला ते दिसल आणी मी कॅमेराबध्द केल

प्रश्न - तुम्ही त्या भागातून जाताना तुम्हाला स्थानकातील सिस्टीम मध्ये काही बदल करावे लागले का?विषेशतः Atlantic सागरावरील भागातून जाताना तुम्हाला काही माहिती दिली जाते का? फोटो घ्यायला सांगितले जाते का?

Megan- आम्ही नासाच्या प्रोग्राम अंतर्गत अंतराळ स्थानकातून अंतराळातील व पृथ्वीवरील घडामोडींची नोंद घेतो विषेशतः जंगलातील आगी,वादळ ज्वालामुखी,समुद्रातील घडामोडी,पक्षांचे स्थलांतर वै. गोष्टींची नोंद घेतो,फोटो काढतो आमचा जास्त वेळ स्थानकातील labमध्ये संशोधन करण्यात जातो कधी,कधी संस्थेतर्फे जर आम्हाला काही घडामोडींची नोंद घ्यायला फोटो काढायला सांगितले तर मात्र आम्ही थांबून फोटो घेतो

प्रश्न -तुम्ही पृथ्वीवरून स्थानकात जाता तेव्हा तिथल्या वातावरणात आणी पृथ्वीवर परतल्यावर ईथल्या वातावरणात adjust व्हायला कीती वेळ लागला परतल्यानंतर तुम्हाला Quarantine केल जात का?

Megan- आम्ही स्थानकात जातो तेव्हा ईथल्यासारख वातावरण नसल्याने झीरो ग्रव्हिटित adjust व्हायला वेळ लागतो कारण तिथ सतत तरंगत रहाव लागत ईथल्या सारख स्थीर ऊभ राहता,चालता,बसता येत नाही पण माणसाचा मेंदू आणी शरीराची जुळवून घेण्याची तग धरून रहाण्याची क्षमता अमेजिंग आहे मानवी शरीर लवकरच त्या वातावरणाला सरावत साधारण एकदोन आठवड्यात तिथल्या वातावरणाची सवय होते सुरवातीला कठीण जात लक्ष नसल की,कुठेही धडकण्याची,ईजा होण्याची भीती असते सतत सतर्क रहाव लागत परतल्यानंतरही  झीरो ग्रव्हिटितुन वातावरणात आल्यावर सतत तरंगत्या अवस्थेत राहिल्याने आपण तरंगतोय असा भास होत राहातो  चालण,ऊभ राहण विसरलेल असत थकवा आलेला असतो त्यामुळे पुर्ववत व्हायला थोडा वेळ लागतो पुन्हा एकदोन आठवडे नॉर्मल व्हायला लागतात आम्हाला नातेवाईक,डॉक्टर त्यासाठी मदत करतात आम्हाला Quarantine केल जात नाही पण काही आवश्यक मेडिकल चेकअप केल्या जाते ट्रिटमेंट घ्यावी लागते नंतर आम्ही आमच्या कुटुंबीय नातेवाईक आणि मित्रांसोबत राहु शकतो

 प्रश्न -तुम्ही दोघांनीही अमेरीकेचा शटल प्रोग्रॅम बंद होण्याआधी आणी आता सुरू झाल्यावर स्थानकात जाण्यासाठी अंतराळ प्रवास केला आहे आधीच्या अंतराळ यानातील केलेला अंतराळप्रवास आणी आताच्या Space X Crew Dragon मधील प्रवास यातला फरक सांगा

Shane- दोन्ही वेळेसचा अनुभव अविस्मरणीय आहे आधीच्या तुलनेत आताचा प्रवास आरामदायी होता यानात जागा अत्यंत कमी असते तीनच अंतराळवीर बसू शकतात पण Space X Crew Dragon मध्ये चार अंतराळवीर अंतराळ प्रवास करु शकतात Crew Dragon स्पेसीयस आहे त्यात  स्वयंचलीत यंत्रणा आहे खरच Crew Dragon बनवणाऱ्या ईंजीनीअर्सनी खूप असामान्य कर्तृत्व सीध्द केलय Megan चे पती Bob आणी Dug ह्यांनी Dragon मधून पहिला अंतराळ प्रवास केला त्यांच्या कडून ऐकल होत आता प्रत्यक्ष अनुभवल स्थानकही आता अत्याधुनिक यंत्रणेने अद्ययावत झालय आम्ही launching च्या वेळेस launch pad वरून Rocket चे ज्वलन आणी प्रत्यक्ष launch होतानाची प्रक्रिया पाहु शकलो,अनुभऊ शकलो जे अंतराळयानातुन पहाता आल नव्हत

प्रश्न -Megan भविष्यात स्त्रियांना अंतराळविश्वात कीती scope आहे आणी आता तर चंद्रावर महिला अंतराळवीराला जाण्याची संधी दिली जाणार आहे त्या बद्दल तुला काय वाटत 

Megan -निश्चितच आता खूप संधी ऊपलब्ध आहेत मी जेव्हा अंतराळवीर होण्यासाठी नासा संस्थेत जॉईन झाले तेव्हा फक्त विसटक्के स्त्रियांना संधी होती आता त्यांना बरोबरीच स्थान मिळतय,कितीतरी कर्तृत्ववान स्त्रिया आता अंतराळवीर होण्यासाठी ऊत्सुक आहेत,सध्या नवनवीन कल्पना अस्तित्वात येत आहेत आणि आता तर  महिला अंतराळवीराला आर्टिमस मोहिमेअंतर्गत चंद्रावरच नाही तर मंगळावरही जाण्याची सुवर्ण संधी  मिळतेय आम्ही ह्या नवतरुण,तरुणींना चंद्रावर गेलेल पहाण्यासाठी ऊत्सुक आहोत

प्रश्न - Atlantic परीसरातील hurricane वादळाची शक्यता किंवा अंदाज वर्तवल्यानंतर तुम्ही त्याचा मागोवा घेतला का? त्यावेळी तुम्हाला काही काळजी घ्यायला सांगीतली गेली होती का?

Shane- हो! वादळ खाली पृथ्वीवर झाल असल आम्ही त्यापसुन दुर असलो तरीसुद्धा ह्या दरम्यान सुर्यापासुन निघणाऱ्या Radiation मुळे आमच्या शररीरावर विपरीत परीणाम होऊ नये म्हणून आम्हाला सतर्क केले जाते अशा काही अडचणी आल्या तर आम्हाला स्वतः चे संरक्षण कसे करायचे हे सांगितले जाते आणी स्थानकातील शील्ड असलेल्या भागात आम्हाला काही वेळ थांबायला सांगितले जाते 

प्रश्न -आता ह्या महिन्यात लवकरच काही व्यवसायिक कंपन्याचे अंतराळयान आणि  Star line Capsule स्थानकात येणार आहे अंतराळ ऊड्डान मोहिमेअंतर्गत काही हौशी नागरिकही त्यातून अंतराळ प्रवास करणार आहेत त्या बद्दल तुझ मत काय 

Shane-  आम्ही खूप excited आहोत अमेरीकेची दहा वर्षांपूर्वी बंद झालेली अंतराळ विश्वातील ऊड्डान मोहीम पून्हा सुरू झाली आहे त्यामुळे व्यावसायिकांना आणी अंतराळवीरांना त्याचा फायदा होईल Space X Crew Dragon चा शुभारंभ Megan चे पती Bob आणी Douglas ह्यांनी केल्यानंतर आम्ही तिसऱ्यांदा Space X  Crew Dragon मधून स्थानकात आलो आहोत आमच्यासाठी आणी अमेरिकेसाठी हि अभिमानास्पद बाब आहे आता हौशी नागरिकांनाही अंतराळप्रवास करता येणार आहे

प्रश्न -स्थानकातील हवामान आणी पृथ्वीवरील हवामान ह्यात काय फरक आहे विषेशतः स्थानकातून अंतराळातील ढग,वातावरण वै नैसर्गिक घडामोडींच तुम्ही नेहमीच निरीक्षण करता तेव्हा काय फरक जाणवतो

Shane- खूप फरक जाणवतो ईथे स्थानकात झीरो ग्रॅव्हिटी असल्याने वातावरण नसत आणी अंतराळात देखील निर्वात पोकळी असल्याने वातावरण नसत,पृथ्वीसारखे नैसर्गिक वातावरण हिरवळ,झाडे, फुले अस वातावरण बाहेर नसल्यामुळे ढगांचा गडगडाट,विजेचा कडकडाट,पाऊसाची बरसात ,ऊन,वारा ह्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला  घेता येत नाही पण ढगामधील चमकती वीज आम्ही पाहु शकतो स्थानकातून सार पाहु शकतो पण पृथ्वीवरच्या सारख घराबाहेर पडुन पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटता येत नाही मोकळ्या हवेत बाहेर फिरता येत नाही पण आमच्या कुटुंबियांकडून आम्हाला माहिती मिळते त्यांच्या आनंदात आम्ही सहभागी होतो 

प्रश्न -Megan तु नेहमीच आकाशातील तारे, ढग,नैसर्गिक घडामोडी पहातेस त्यांचे फोटो घेतेस शेअर करतेस त्या बद्दल सांग 

Megan- ईथे स्थानकातील संशोधनातून वेळ मिळाला की,Weekend ला आम्ही स्थानकाच्या खिडकीतून अंतराळात,प्रुथ्वीकडे पहातो ईथे दर 90 मिनिटानी सुर्योदय आणि सुर्यास्त पहायला मिळतो आम्ही अंधार, प्रकाशांचा खेळ अनुभवतो,चकाकते ग्रहतारे,आकाशगंगा, पृथ्वीवरील क्षितिजावरच्या Auora चे विलोभनीय इंद्रधनुषी रंग ,चकाकणारी वीज समुद्राच्या खळाळत्या लाटा,ढगांचे बदलते रोजचे वेगवेगळे आकार अशा सुंदर नैसर्गिक लीला पाहून मी आकर्षित होते अशी दृश्य मी कॅमेराबध्द करते हे सार पाहून क्षणभर आम्ही आनंदित होतो एकदा मला असच निसर्गाच अनोख दृश्य पहायला मिळाल बहुधा ढगांच्या गडगडटानंतर वीज चमकते आणी ती पृथ्वीकडे आकर्षित होऊन पृथ्वीवर पडते तेव्हा मी एकटीच विजांचा कडकडाट,ढगांचा गडगडाट पहात होते खूप विजा चमकत होत्या आणी अचानक विपरीत घडल ढगांच्या मधून चकाकणारी वीज पृथ्वीकडे न जाता ढगांच्या वर आकाशाच्या दिशेने येताना दिसली तो प्रकाशझोत पाहून मी आश्चर्यचकीत झाले मी लगेच सगळ्यांना बोलावून ते दृश्य दाखवल पण अस क्वचितच घडत

प्रश्न -Megan तुला Scuba diving आवडत ईथे पृथ्वीवर समुद्रात पोहताना आणी अंतराळात स्थानकातील झीरो ग्रॅव्हीटीत तरंगताना काय बदल जाणवतो

Megan- तरंगण दोन्ही कडे सारखच आहे तिथे समुद्रात पाण्यात पोहताना आपल्याला शरीराला पुश करून पुढे जाव लागत ईथे झीरो ग्रॅव्हिटित स्थानकातील वातावरणात हि प्रक्रिया आपोआप घडते तीथे फक्त एकाच दिशेने पोहता येत ईथे वर,खाली,समोर मागे सगळ्या दिशेने तरंगता येत अगदी वर छतावर,भिंतीवर कुठेही,कसही तरंगत जाऊन ऊभ रहाता येत ऊलट,सुलट कसही तो खूप मजेशीर अनुभव असतो 

प्रश्न -ईथुन Florida वरुन जाताना तुमच्या मनात ह्यावेळी नेमक्या कोणत्या भावना आहेत तुम्हाला काय आठवत ईथल White sandy beach की Disney World?

Shane- मला माझी फॅमिली आठवते कारण ते तिथे रहातात काल रात्री मी तीथे लायटिंग पाहिली त्या लायटिंगप्रेमी लोकांच मला कौतुक वाटल अभिनंदन करावस वाटल कारण अमेरिकननांच्या स्वातंत्र्याच ते सेलिब्रेशन होत

Megan- मला नेहमी Florida मधील Rocket launch ची आठवण येते मी जेव्हा,जेव्हा तिथे गेले तेव्हा तेव्हा तिथे Rocket launching पाहिल की,मी नेहमी फोटो काढायचे 

प्रश्न -पृथ्वीपासुन दुर स्थानकात रहातानाचा अनुभव कसा आहे 

Shane-  खूप छान आहे ईथे तिथल्या सारख टेबलावर बसुन एकत्र जेवता येत नसल तरीही आम्ही टेबलाभोवती जमुन एकत्र जेवण्याचा आनंद घेतो

Sunday 11 July 2021

नासाच्या आर्टीमस Orian Flight Test मोहिमेसाठी Moonikin नावाची निवड

 Arturo Campos

Apollo - 13अंतराळयानाचे Electrical power subsystem Manager  Arturo Campos - फोटो -नासा संस्था 

नासा संस्था-

नासाच्या आर्टिमस चांद्रमोहिमेची तयारी आता अंतीम टप्प्यात आली आहे ह्या वर्षाअखेरीस Flight test अंतर्गत नासाचे Orion अंतराळ यान व SLS (Space Launch System)Rocket चंद्राभोवती भ्रमण करणार आहे आणी ह्या आर्टिमस मोहिमेला Commander Moonikin Compos असे नाव देण्यात आले आहे मागच्या आठवड्यात ह्या नाव निवडीची घोषणा करण्यात आली 

ह्या Flight Test Orion अंतराळयानाचे नाव निवडण्यासाठी नासा संस्थेतर्फे Bracket Contest घेण्यात आली होती ह्या Contest साठी नासा संस्थेतील अंतराळ विश्वातील कर्तृत्ववान मान्यवरांची सहा नावे निवडण्यात आली आणि त्यातील आपल्या पसंतीच्या नावाला मत देण्याची संधी नागरिकांना आणि नासा संस्थेतील सदस्यांना देण्यात आली होती आणि सर्वाधिक 300,000 इतकी मते Moonikin Compos ह्या नावाला मिळाली आहेत हे नाव Arturo Campos ह्यांना समर्पित केले असून त्यांनी Apollo 13 मोहिमेतील Apollo अंतराळयान चंद्रावर नेऊन सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणले होते शिवाय ह्या मोहिमेला Apollo आणि Artemis ह्यांचे जन्मगाव असलेल्या Island चा रेफरन्स देण्यात आला आहे 

नासाच्या Alabama येथील Space Flight Center  मधील Chief Historian Brian Odom म्हणतात,आम्ही जागतिक चांद्रमोहीम राबवत असून त्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे म्हणून नवनवीन कल्पना राबवत आहोत ह्या मोहीमेद्वारा आम्ही नासा फॅमिलीतील मान्यवर Arturo Campos ह्यांचा सन्मान करणार आहोत ह्या Flight test मोहिमेनंतर Artemis मोहिमेत आम्ही तीन अंतराळवीरांमध्ये एका  महिला अंतराळवीराचाही समावेश करणार आहोत आणि हि भविष्यकालीन मंगळ मोहिमेची पूर्वतयारी असेल 


डमी अंतराळवीर Manikin Kennedy Space Center मध्ये Vibration Test दरम्यान -फोटो नासा संस्था 

ह्या Flight Test मधील अंतराळयानातून अंतराळवीर जाणार नसून तीन डमी अंतराळवीरांना पाठवण्यात येणार आहे Moonikin हा male डमी अंतराळवीर म्हणजे माणसाचा पुतळा असून त्याचा उपयोग Orion Vibration टेस्ट साठी करण्यात येणार आहे ह्या आधीही त्याची Vibration टेस्ट घेण्यात आली होती Moonikin ह्या मोहिमेचा कमांडर असेल आणि तो कमांडर सीटवर बसेल त्याच्यासाठी खास Orion Crew Survival system suit तयार करण्यात आला आहे ह्या मोहिमेनंतर हाच सूट अंतराळवीर चंद्रावर जाताना आणि इतर मिशन साठीही वापरतील Campos ला दोन रेडिएशन सेन्सर्स बसविलेले आहेत शिवाय आणखी दोन जास्तीचे सेन्सर्सही बसविण्यात आले आहेत दोनपैकी एक त्याचे डोके सीटला जिथे टेकेल तिथे आणि दुसरा सिटमागे बसविण्यात आला आहे ह्या सेंसर्समुळे ह्या पूर्ण चांद्रमोहीमेतील अंतराळ प्रवासादरम्यानचा यानाचा स्पीड आणि धक्क्यांची नोंद ठेवली जाईल हि माहिती अंतराळवीरांच्या आगामी चांद्रमोहिमेतील अंतराळप्रवासासाठी उपयुक्त ठरेल आणि ह्या माहितीचा उपयोग अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठीही होईल कारण पन्नास वर्षांनी अंतराळवीर पुन्हा चंद्रावर जाणार आहेत 

ह्या यानातून अंतराळ प्रवास करणाऱ्या डमी अंतराळवीर Moonikin सोबत दोन डमी महिला अंतराळवीर जाणार आहेत त्यांची नावे Zohar (ISA)आणि Helga(German  Aerospace Agency) अशी आहेत.इस्राईल आणि जर्मन   Aerospace Agency ह्यांनी ह्या मिशन साठी नासा संस्थेला सहकार्य केले आहे

Thursday 8 July 2021

अंतराळवीरांनी दिल्या स्थानकातून स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा

 NASA astronauts Shane Kimbrough and Megan McArthur are pictured inside the cupola during the approach and rendezvous of the SpaceX Cargo Dragon on June 5, 2021.

 नासाचे अंतराळवीर Shane Kimbrough आणि Megan McArthur Space X कार्गोशिप च्या परत पाठवण्याच्या  तयारीत -फोटो नासा संस्था 

नासा संस्था -5 जुलै 

 चार जुलैला अमेरिकेत सर्वत्र 245 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला यंदा रविवारी स्वातंत्र्य दिन आल्याने विकेंड होता पण कोरोनाच्या लॉक डाऊनमुळे निर्बंध पाळत नागरिकांनी  तो आनंदात साजरा केला एरव्ही अमेरिकन नागरिक अत्यंत उत्साही आपल्यासारखेच एकत्र जमून पिकनिकला जाऊन हा स्वातंत्रदिन तेथील नागरिक साजरा करतात ह्या दिवशी अमेरिकेच्या झेंड्यातील लाल,निळा पांढऱ्या रंगाचा वापर करून लाइटिंग करून सजावट करतात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश जेवणात करून मेजवानीचे आयोजन केल्या जाते  4 जुलै 1776 ला अमेरिकेची निर्मिती झाल्याने तेव्हापासून हा दिवस तिथे स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो आणि म्हणूनच तिथे स्वातंत्र्य दिनाला अमेरिकेचा Birthday ही म्हणल्या जाते 

नासाचे अंतराळवीर मात्र पृथ्वीपासून दूर अंतराळस्थानकातील झिरो ग्राव्हीटीत राहून संशोधन करत  असतात त्यांना इथल्या प्रमाणे स्वातंत्र्य दिन साजरा करता येत नाही तरी देखील दरवर्षी त्यांच्या कामातून वेळ काढून अंतराळवीर हा दिवस उत्साहात पार्टी करून साजरा करतात सध्या नासाच्या अंतराळ मोहीम 65चे अंतराळवीर स्थानकात राहात आहेत स्वातंत्र्य दिन रविवारी आल्याने त्यांचा देखील विकेंड होता पण पृथ्वीवरून स्थानकात अंतराळवीरांसाठी आवश्यक सामान घेऊन गेलेले Space X कार्गोशिप सहा जुलैला पृथ्वीवर परतणार असल्याने अंतराळवीर ह्या आठवड्यात खूप बिझी होते त्यांनी केलेल्या संशोधित नमुन्याचे सॅम्पल्स पॅक आणि इतर सामान पृथ्वीवर पाठवणे आणि कार्गोशिपच्या परत पाठवण्याची तयारी करण्यात ते बिझी होते तरी देखील त्यांनी सर्व कामे लवकर आटोपून स्वातंत्र्यदिन साजरा केला त्या वेळी अंतराळवीर Shane Kimbrough ,Mark Vande Hei आणि Megan McArthur ह्यांनी त्यांच्या कुटुंबियांशी लाईव्ह चॅट करून संवाद साधला त्यांनी सोशल मीडियावरून अमेरिकन नागरिकांशी संवाद साधत त्यांना अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या 

Megan McArthur -मी नासाच्या मोहीम 65 ची अंतराळवीर पृथ्वीपासून 250 मैलांच्याही वरून अंतराळस्थानकातून तुमच्याशी संवाद साधतेय माझ्यासोबत अंतराळवीर Mark Vande Hei आणि Shane Kimbrough आहेत 

"तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा! आजचा दिवस,दिवासातील प्रत्येक क्षण तुम्हाला आनंदात जावो !"

 Shane Kimbrough- आम्हाला आम्ही अमेरिकन असल्याचा अभिमान आहे नासा संस्थेतर्फे अमेरिकेने अंतराळविश्वात उंच भरारी मारून जगभरात कर्तृत्व सिद्ध केले आहे मंगळ मोहिमेच्या यशानंतर आता अमेरिका चंद्रावर जाण्यासाठी सज्ज आहे आम्हाला स्थानकात राहून संशोधन करण्याची संधी नासाने दिली त्याचा आम्हाला अभिमान वाटतो 

"America Happy Birthday! तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा !"

Mark Vande Hei - नासा संस्थेमुळे आम्ही स्थानकातून तुमच्याशी संवाद साधू शकतो,इथे राहून नवनवीन संशोधन करू शकतो त्यामुळेच आम्हाला स्वत:ला सिद्ध करून दाखवण्याची संधी मिळते आम्ही जगभरातील लोकांपर्यंत पोहोचू शकतो आम्हाला हि संधी दिल्यामुळे आम्ही नासाचे आभारी आहोत आम्हाला अमेरिकन असल्याचा अभिमान वाटतो 

तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! आजचा दिवस तुम्हाला आनंदात जावो ! सर्व निरोगी राहावेत अशी शुभेच्छा !

Friday 2 July 2021

Perseverance मंगळयानाने काढलेल्या फोटोतुन मंगळावरील पाण्याच्या अस्तित्वाला मिळाली पुष्टी

 Mars' Delta Scarp From More Than a Mile Away

 Jezero Crater ह्या मंगळावरील भागातील Delta Scarp -फोटो - नासा संस्था -JP.L lab California

नासा संस्था - 1 जुलै

मंगळावर पोहल्यानंतर त्वरीत स्वतः चा सेल्फी काढून पाठवणाऱ्या Perseverance मंगळयानाने आता मंगळभुमीवरील भुपृष्ठाखालील भागाच्या खोदकामास सुरवात केली आहे विषेश म्हणजे आता हे सहा चाकी यान स्वयंचलित यंत्रणेने कार्यरत होऊन कामाला लागले आहे त्यासाठी आता यानाला पृथ्वीवरून कार्यरत करण्याची गरज नसल्याची बातमी नुकतीच नासा संस्थेने प्रसारित केली आहे सध्या हे यान मंगळ ग्रहावरील Jezero Crater ह्या खोलगट भागात कार्यरत होऊन रोबोटिक आर्मच्या सहाय्याने ऊत्खनन करीत आहे Perseverance मंगळ यान यानाला बसविलेल्या RMI ह्या कॅमेऱ्याच्या सहाय्याने मंगळावरील आजूबाजूच्या परिसरातील व भुपृष्ठाखालील भागातील क्लोजअप फोटो काढून पृथ्वीवरील नासा संस्थेत पाठवत आहे 

मागच्या महिन्यात Perseverance यानाने पाठविलेल्या Jezero Crater ह्या भागातील फोटोत मंगळावर पुरातन काळात पाणी अस्तित्वात होत ह्या गोष्टीला पुष्टी मिळाली आहे ह्या फोटोत यानाने त्या भागातील बारकावे ठळकपणे टिपले आहेत त्यामुळे तेथील पुर्वी अस्तित्वात असलेले आणी कालांतराने आटलेले नदीपात्र,तळे नदी काठचे दगड,कडा स्पष्ट पणे दिसत आहेत नासाच्या California येथील JPL lab मधील शास्त्रज्ञ हा फोटो पाहून आनंदित झाले आहेत त्यांनी ह्या भागाला Delta Scarp असे नाव दिले आहे 

JPL lab मधील प्रमुख शास्त्रज्ञ Vivian Sun हे म्हणतात अंतराळ विश्वातील अंतराळवीरांना विचारले की,तुम्हाला अंतराळात गेल्यावर पृथ्वीकडे पहाताना कसे वाटल तर सर्व जण पृथ्वीच अलौकिक सौंदर्य पाहून थक्क झाल्याच सांगतात Apollo 8 च्या चांद्रमोहिमेतील अंतराळवीर Bill Anders ह्यांचा चंद्रावरुन प्रुथ्वीकडे पहातानाचा फोटो फेव्हरिट आहे तर अंतराळवीर Randy Bresnik ह्यांना स्थानकातून घेतलेला पृथ्वीवरील Auora चा फोटो.मी कित्येक वर्षांपासून ह्या Jezero Crater भागाचा अभ्यास करतोय आणी तिथल्या नदिकाठच्या भागाची सखोल माहिती मिळवतोय आजवर मी हजारो फोटो पाहिलेत पण ह्या वेळेसचे फोटो पाहून मी थक्क झालो कारण ह्या फोटोत त्या परीसरातील बारकावे ठळकपणे दिसत आहेत त्यामुळे आता कित्येक वर्षांपासून हवी असलेली माहिती मिळेल म्हणून हा माझा फेव्हरिट फोटो आहे 

Sun ह्यांना आवडलेल्या फोटोत 377 फुट रूंदिचा आटलेल्या नदिपात्राचा भाग छायाचित्रित झाला आहे नदिचा काठ,त्या भोवतीचा खडकाळ भाग आहे तो नदी सोबत वहात आलेल्या माती,चिखल,वाळुच्या थराने बनला आहे ह्या दगडावरील अनेक थर स्पष्ट दिसत आहेत त्यावरील लाटाच्या खुणा देखील ठळक आहेत बाजूला तळ्यासारखा खोलगट भाग दिसत आहे पंख्याचा आकाराचा नदिकाठ आणी भोवताली गाळापासून बनलेले खडक पाहून ईथे पुरातन काळी प्रवाहित नदी असावी आणी दरवर्षी पावसाळ्यात नदीच्या प्रवाहाबरोबर माती,गाळ,कचरा वहात येत असावा नदिला आलेल्या पुरामुळे तो कचरा पाण्याच्या प्रचंड फोर्स मुळे वहात आला असावा आणी पुर ओसरल्यावर किंवा पावसाळा संपल्यावर नदिकाठी जमलेला हा गाळ तसाच राहिला आणी गाळ,वाळु दगडाचा चुरा ,मातीनी हा दगड तयार झाला आणी तो भाग कडक झाला असावा  दरवर्षी असेच एकावर एक थर साचत गेले आणी टणक खडक तयार होत गेले असावेत शास्त्रज्ञांच्या मते हा काळ 3.8 बिलीयन वर्षापूर्वीचा असावा त्याकाळी मंगळावर पाण्याचे अस्तित्व होते आणी दरवर्षी जर गाळ वहात येत होता तर निश्चितच तिथे सजीव सृष्ठी अस्तित्वात होती आता ह्या फोटोवरून व Perseverance मंगळयानाने गोळा केलेल्या नमुन्यावर सखोल संशोधन केल्यावर ह्या बाबतीत आणखी माहिती मिळवता येईल 

सध्या Perseverance यान ह्याच खोलगट भागात रोबोटिक आर्मच्या सहाय्याने ऊत्खनन करत आहे पहिल्या उत्खननाच्या कामाला सुरुवात झाली आहे त्यामुळे जमीनीखालील ऊत्खननानंतर  दगडाच्या खालील भागात गाढल्या गेलेले आणी कालांतराने Fossils मध्ये रुपांतरीत झालेले सजीवांचे अवषेश शिवाय जर त्या काळी सजीव सृष्ठि अस्तित्वात असेल तर त्यांच्या दैंनदिन वापरातील वस्तु वै. सापडतील दुसऱ्या ऊत्खनना नंतर आणखी सखोल माहिती मिळेल कदाचित पुढच्या वर्षी पर्यंत आणी नदिकाठच्या दगडाच्या थरावरून मंगळावर किती काळ पाणी अस्तित्वात होते कधी नष्ट झाले हे कळेल हे थर किती वर्षापासून बनले व केव्हा जमणे बंद झाले  वरून हि माहिती कळेल आणी नदीच्या सखोल संशोधना नंतर नदिची रुंदी,खोली, प्रवाहाची दिशा नदीच्या ऊगमाचे ठिकाणही  कळेल शीवाय हि नदी किती काळ वाहती होती कधी नदीतील पाणी आटले हे Geologist संशोधनाअंती शोधतीलच पण सध्या मंगळावर पुरातन काळी पाण्याच अस्तित्व होत ह्या गोष्टीला पुष्टी मिळाली आहे

 Perseverance मंगळयानाने मंगळावरील 26 व्या दिवशी (17 मार्च) घेतलेल्या ह्या फोटोत 377 फुट रूंदिचा(115 मिटर) भाग व्यापलेला आहे मंगळयानावर बसविलेल्या RMI ह्या फुटबॉलच्या आकाराच्या कँमेऱ्याने घेतलेल्या ह्या फोटोत एका ईंचाच्या हजार पट सुक्ष्म  धुळीचे कण टिपल्या गेले आहेत त्या मुळे ह्या भागातील सखोल माहिती मिळण्यास मदत होईल