नासा संस्था -7 जून
नासाच्या अंतराळ मोहीम 65 अंतर्गत नासाचे अंतराळवीर Shane Kimbrough तिसऱ्यांदा स्थानकात राहायला गेले आहेत ह्या आधी दोनवेळा त्यांनी स्थानकात वास्तव्य केले आहे मागच्या आठवड्यात शुक्रवारी चार जूनला अंतराळवीरांनी स्थानकात त्यांचा 54 वा वाढदिवस साजरा केला
मागच्या आठवड्यात Space X -22 कार्गोशिप पृथ्वीवरून स्थानकात पोहोचले त्यातून स्थानकात सुरु असलेल्या सायंटिफिक प्रयोगासाठीचे साहित्य,अंतराळवीरांसाठीचे अन्न व इतर आवश्यक सामान आणि स्थानकासाठी लागणारे तांत्रिक सामान स्थानकात पाठविण्यात आले त्यामुळे दुसऱ्याच दिवशी स्थानकात पोहोचणाऱ्या ह्या कार्गोशिपच्या आगमनाच्या docking ,hatching आणि इतर कामात अंतराळवीर अत्यंत व्यस्त होते तरीही आम्ही ह्या कामातून थोडा मोकळा वेळ काढून Shane ह्यांचा वाढदिवस साजरा केला अर्थात हा आठवडा धावपळीचा असल्याने आम्हाला वाढदिवस साधेपणाने घाईगडबडीत साजरा करावा लागलल्याच अंतराळवीर Thomas Pesquet ह्यांनी ट्विटर वरून दिलेल्या माहितीतून सांगितले आहे
अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅविटीत सतत तरंगत्या अवस्थेत राहून वाढदिवस साजरा करण अत्यंत कठीण असल तरीही अंतराळवीर त्यांच्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून एकत्रित जमून पार्टीचे आयोजन करून एकमेकांचे वाढदिवस साजरे करतात त्या साठी स्थानकातील एखादा मोकळा कोपरा निवडून स्थानकात उपलब्ध असलेल्या सामानांनी डेकोरेशन करतात पृथ्वीवरून त्यांच्यासाठी आलेल्या गोड पदार्थांचा फिस्टमध्ये समावेश करून आणि स्थानकातील Music Instrument च्या साहाय्याने संगीताचा आस्वाद घेत अंतराळवीर वाढदिवसाची पार्टी enjoy करतात त्यामुळे ज्यांचा वाढदिवस असतो त्यांना छान तर वाटतेच पण पृथ्वीपासून दूर असलेल्या अंतराळवीरांच्या व्यस्त दिनचर्येतील काही क्षण आनंदात जातात अस मत अंतराळवीर व्यक्त करतात पृथ्वीवरचे वाढदिवस आम्ही नेहमीच साजरे करतो पण अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅविटीत तरंगत्या अवस्थेत अंतराळातून पृथ्वीकडे पाहात वाढदिवस साजरा करण्याचा आनंद काही औरच! अशी प्रतिक्रिया अंतराळवीर नेहमीच व्यक्त करतात अंतराळस्थानकातील मानवी वास्तव्याला आता वीस वर्षे पूर्ण झाली असून आजवर स्थानकात 80 अंतराळवीरांनी त्यांचे वाढदिवस साजरे केले आहेत
No comments:
Post a Comment