अंतराळवीर Shane Kimbrough आणि Thomas Pesquet स्थानकाच्या Port -6 Truss ह्या भागातील स्पेसवॉक दरम्यान -फोटो -नासा संस्था
नासा संस्था- 17 जुन
नासाच्या अंतराळ मोहीम 65चे अंतराळवीर Shane Kimbrough आणी युरोपियन अंतराळवीर Thomas Pesquet ह्यांनी स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी बुधवारी Space Walk केला
ह्या दोनही अंतराळवीरांनी ह्या Space Walk ची तयारी आदल्या दिवसापासूनच सुरू केली होती त्यांनी त्यांचे स्पेससुट चार्ज करून त्यातून हवा लिक होत तर नाही ना? ह्याची खात्री केली होती Thomas Pesquet ह्यांनी लाल रंगाच्या रेषा असलेला स्पेससुट परीधान केला होता तर Shane ह्यांचा स्पेससुट रेषाविरहित होता अंतराळवीर बुधवारी सकाळी 8.11 मिनिटाला स्पेसवॉकसाठी स्थानकाबाहेर पडले व सात तास पंधरा मिनिटांनी स्पेसवॉक पुर्ण करून दुपारी 3.26 ला स्थानकात परतले
अंतराळवीर Shane Kimbrough आणि Thomas Pesquet स्पेससूट घालून स्पेसवॉकसाठी स्थानकाबाहेर पडण्याच्या तयारीत -फोटो -नासा संस्था
ह्या सव्वा सात तासांच्या स्पेसवॉक दरम्यान अंतराळवीरांनी स्थानकाच्या बाहेरील डाव्या बाजुच्या Port ह्या भागात काम केले अंतराळवीरांनी ह्या भागात नवे Solar Array Panels बसविले आहेत अंतराळस्थानकाच्या बाहेरील भागात 2000 साली आठ Solar Array Panels बसविले होते आता त्यातील सहा Solar Array Panels जुने झाल्याने बदलविण्यात येणार आहेत सहा पैकी दोन Solar Array युनिट्स हे दोन अंतराळवीर दोन स्पेसवॉक दरम्यान बदलवणार आहेत त्या पैकी एक स्पेसवॉक काल करण्यात आला आता विस तारखेला दुसऱ्या स्पेसवॉक मध्ये दुसरा Solar Array unit बसविणार आहेत ह्या Solar Array चा ऊपयोग स्थानकातील Power system साठी होतो नुकत्याच स्थानकात आलेल्या Space X Cargo Spacecraft मधुन Solar Array चे दोन युनिट पाठविण्यात आले होते अंतराळवीरांंनी त्यातील एक Solar Array युनिट Space-X Dragon मधून काढून स्थानकाच्या Port ह्या भागात बसविले शिवाय हे युनिट बसविण्यासाठी लागणारी ईलेक्ट्रिकल केबल व बोल्टही फिट केले अंतराळवीरांनी ह्या कामासाठी रोबोटिक आर्मचा वापर केला स्थानकातून ह्या स्पेसवॉक साठी त्यांना अंतराळवीर Mark Vande Hei आणी Megan McArthur ह्यांनी सहकार्य केले तर नासाच्या पृथ्वीवरील JPL संस्थेतून मार्गदर्शन करण्यात आले
अंतराळवीर Shane Kimbrough ह्यांचा हा सातवा स्पेसवॉक होता त्यांनी आजवरच्या स्पेसवॉक साठी अंतराळात 46 तास15 मिनिटे व्यतित केले आहेत तर Thomas Pesquet ह्यांचा हा तिसरा स्पेसवॉक होता त्यांनी आजवरच्या तीन स्पेसवॉक दरम्यान अंतराळात 19 तास 47 मीनिटे व्यतीत केले आहेत
ह्या दोन अंतराळवीरांनी मिळुन केलेला हा तिसरा स्पेसवॉक होता आणी आजवर स्थानकाच्या दुरूस्तीसाठी अंतराळवीरांनी केलेला 239 वा स्पेसवॉक होता त्यासाठी अंतराळवीरांनी आजवर 62 दिवस 18 तास आणी 28 मीनिटे अंतराळात व्यतीत केले आहेत
No comments:
Post a Comment