Sunday 29 March 2020

Perseverance मंगळ याना सोबत मंगळावर जाण्यासाठी लोकांच्या नावाची plate यानावर बसविण्यात येणार

  A placard commemorating NASA's "Send Your Name to Mars" campaign
          Perseverance Mars Rover वर बसविलेल्या नखाच्या आकाराच्या chips -फोटो -नासा संस्था

नासा संस्था-26 मार्च plate
एकीकडे कोरोना व्हायरसन सगळ्या जगात थैमान घातलेल असताना आणी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण जगात lock down जाहीर झाल्यानंतर अमेरिकेतील नासा संस्थेत मात्र आगामी मंगळ मोहीमेची तयारी सुरूच ठेवण्याचा निर्णय अमेरीकेन प्रशासनाने घेतला आहे नासा संस्थेतर्फे  उन्हाळ्यात मंगळावर पाठवण्यात येणारा Perseverance Mars Rover 18feb.2021ला मंगळावर उतरणार आहे सध्या अमेरिकेत त्याची जय्यत तयारी सुरु आहे
नासाच्या ह्या मंगळ मोहिमेसाठी Send Your Name To Mars ह्या कॅम्पेन अंतर्गत मंगळावर आपली नावे पाठवण्याची सुवर्णसंधी लोकांना देण्यात आली होती विषेश म्हणजे ह्या मोहिमेला जगभरातुन हौशी आणी इच्छुक 10,932,295 मिलियन्स लोकांनी आपली नावे पाठवून ऊत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता हि नावे नखाच्या आकाराच्या तीन सिलीकॉन Chips वर Electron beam च्या सहाय्याने Stenciled केली गेली असून ह्यातील निवडक नावे Perseverance Mars Rover सोबत मंगळावर पाठवल्या जाणार आहेत ह्या शिवाय ह्या मोहिमे अंतर्गत जाहीर झालेल्या Name The Rover Contest ह्या निबंध स्पर्धेलाही लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता त्यातील अंतिम निवडक 155जणांची नावे ही ह्या Chips वर कोरली गेली आहेत 

 Top center: The plate on the aft crossbeam of NASA's Mars Perseverance rover
               Perseverance Mars Rover च्या क्रॉस बीम वर बसविलेली प्लेट -फोटो -नासा संस्था

ह्या महिन्याच्या सोळा तारखेला हि नावे अल्युमिनियम प्लेटच्या सहाय्याने Perseverance Mars Rover ला जोडण्यात आली हे यान उन्हाळ्यात पृथ्वीवरून मंगळाकडे झेपावल्यानंतर 18 फेब्रुवारी 2021 ला मंगळावरील Jezero Crater ह्या भागात ऊतरेल 
पृथ्वीवरील नावाची हि प्लेट मंगळ यानाच्या मागच्या भागातील क्रास बीमच्या मध्यभागी लावण्यात येईल त्यामुळे ती यानावर बसविलेल्या कॅमेऱ्यातून स्पष्टपणे दिसेल शिवाय ह्या क्रॉस बीम मध्ये खास लेजरचा वापर करण्यात आला असून त्या मुळे पृथ्वी व मंगळ एका स्टारने जोडल्या प्रमाणे भासतील Perseverance मार्स रोव्हर मंगळावर आधी गेलेल्या व ऐतिहासिक कामगिरी केलेल्या Pioneer Space Craft आणी Voyagers 1 व 2 ह्या यानाला Tribute देईल कोरोनाच्या संसर्गाचा आणी lock downचा परिणाम नासा संस्थेने ह्या मंगळ मोहिमेवर होऊ न देता काम सुरुच ठेवले असुन 25 मार्चला Rover Atlas V Rocket वर पोहोचवण्याचे काम करण्यात आले Perseverance Mars Rover 2300 पाऊंड(1,043k.g.)वजनाचे  असून ते रोबोटिक सायंटिस्ट आहे ह्या यानाद्वारे मंगळभूमीवरील व भुगर्भातील geological माहिती म्हणजेच मातीतील खडक,मिनरल्स केमिकल्सचे नमुने आणि पुरातन सूक्ष्म जीवांचे अवशेष शोधण्याचे काम केले जाईल आणि हे मंगळ यान ते नमुने आणि फोटो पृथ्वीवर पाठवेल त्या नंतर शास्त्रज्ञ ह्या माहितीवर सखोल संशोधन करतील आणी तिथे सजीव सृष्ठी अस्तित्वात होती का ? असल्यास कशी होती हे शोधण्याचा प्रयत्न करतील शिवाय तेथील वातावरण सजीव सृष्टीस पोषक आहे का ?,होते का? त्यात कोणकोणते वायू अस्तित्वात आहेत ,होते ह्याचीही संशोधीत माहीती गोळा करून पृथ्वीवर पाठवणार आहे ह्या संशोधीत माहितीचा ऊपयोग आगामी मानवसहित मंगळ मीशन साठी आणी मंगळावरील मानवी निवासा साठी होणार आहे
ह्या perseverance Mars Rover च्या launching operation testing,robotic arm testing या सारख्या महत्वाच्या आवश्यक बाबीची जय्यत तयारी सध्या नासाच्या Caltech Pasadena येथील J.PL Lab मध्ये व Kennedy Space Center Florida येथे Perseverance Mars Rover launching operation आणी Management टीमचे शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ करत आहेत 

Saturday 28 March 2020

नासा संस्थेतील दोघे Corona बाधित नासाचेही आता Work at Home

नासा संस्था -  26 march
चीनमधून सुरु झालेला कोरोनाच्या संसर्गाचा विळखा आता एका  पाठोपाठ सर्व जगाला बसू लागलाय चीन,इटली जर्मनी स्पेन,इंग्लंड नंतर आता अमेरिकेतील कोरोना बाधितांची संख्या लाखावर पोहोचली आहे  भारतातही कोरोनाचा संसर्ग झाल्याने संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे अमेरिकेतही आता लॉक डाऊन करण्यात आले आहे अमेरिकेतील नासा संस्थेतील दोन कर्मचाऱ्यांना मागच्या आठवड्यात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास येताच नासा प्रमुख Jim Bridenstine  ह्यांनी संस्थेतील कर्मचाऱ्यांना Work at Home ची सूचना दिली आहे अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट,Apple आणि इतर कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना Work at Home च्या सूचना दिल्यानंतर आता नासा संस्थेनेही त्यांच्या कर्मचाऱ्यांना Work at Home ची परवानगी दिली आहे
Jim Bridenstine म्हणतात नासा संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण हि संस्थेची प्रथम priority आहे Corona चा संसर्ग वाढू नये आणि कर्मचाऱ्यांचे Corona पासून संरक्षण व्हावे म्हणून हि खबरदारी घेण्यात आली आहे
मागच्या आठवड्यात कॅलिफोर्नियातील आमेस रिसर्च सेंटर मधील एका कर्मचाऱ्याला कोविड -19चा संसर्ग झाला त्या नंतर अलाबामा येथील मार्शल स्पेस फ्लाईट सेंटर मधील कर्मचारी सुद्धा corona बाधित झाला त्या मुळे नासा संस्थेतील इतरांना corona चा संसर्ग होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची सूचना करण्यात आली 14 मार्चलाच हा निर्णय घेण्यात आला होता
ह्या निर्णया नुसार संस्थेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोबत स्वत:चा लॅपटॉप,पॉवर कॉर्ड आणि कामासाठीचे इतर आवश्यक सामान घरी नेण्याची परवानगी देण्यात आली आहे पण कर्मचारी आणि त्यांचे सुपरवायझर ह्यांना इंटरनेटच्या माध्यमातून संस्थेच्या संपर्कात राहण्याची सूचना देण्यात आली आहे शिवाय ज्यांची तब्येत ठीक नाही त्यांनी संस्थेत येऊ नये असेही सांगण्यात आले आहे
अमेरिकेतील लॉकडाऊन दरम्यान संस्थेत सुरु असलेले अत्यावश्यक Project ,Missions आणि प्रोग्राम सुरुच ठेवण्याचा निर्णय संस्थे तर्फे घेण्यात आला आहे पण जे काम घरी राहून करता येणार नाही अशा अत्यावश्यक मिशन मधील Space Flight Hardware च्या processing युनिट्स ची कामे मात्र तज्ज्ञांच्या आणि तंत्रज्ञांच्या देखरेखीमध्ये संस्थेतच केली जातील असे सांगण्यात आले आहे त्या मुळे त्या संबंधीत कर्मचाऱ्यांना Corona चा संसर्ग होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेतली जाईल असेही सांगण्यात आले आहे

Wednesday 25 March 2020

यवतमाळात लॉक डाऊन अत्यावश्यक सेवा सुरु


यवतमाळ -24 मार्च
सध्या  राज्यात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी जाहीर झाली आहे पण अत्यावश्यक सेवा व दैनंदिन गरजेच्या  वस्तूंची दुकाने आणि भाजी मार्केट ह्यांच्यासाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे
यवतमाळातील दुकाने,मार्केट आणि जनजीवन ह्या संचारबंदीच्या काळात ठप्प झाले आहे लोक घरातच राहात आहेत काल गुढी पाडव्याच्या आदल्या  दिवशी सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता एरव्ही भाजीवाल्यांची गर्दी आणी गोंगाटाने गजबजलेला दत्तचौक आणि आसपासच्या परिसरात पोलिसांच्या कडक अंमलबजावणीमुळेआणी संचारबंदी मूळे गरजेच्या वस्तू आणण्यासाठी दोन दिवसानंतर आलेल्या लोकांची तुरळक वर्दळ दिसून आली भाजी मार्केटला सूट दिली असली तरीही अत्यंत कमी भाजीवाले मार्केट मध्ये भाजी विकण्यासाठी आले अर्ध्याहून अधिक भाजीच्या गाड्या मार्केट मध्ये आल्याच नाहीत संत्री आणि इतर फळविक्री करणारे फळवाले नसल्याने लोकांना फळे मिळाली नाहीत
                        दत्त चौक आणि आसपासच्या परिसराचा आढावा घेणारा हा व्हिडीओ


                                               व्हिडिओ - पूजा दुद्दलवार -BE(soft) BM.C
                                      
                                               किराणा दुकान पोलिसांनी केले बंद
यवतमाळ -25 मार्च
 आज गुडीपाडवा असल्याने लोकांनी आर्णी रोड वरील किराणा दुकानात सामान आणण्यासाठी गर्दी केली पण तिथे झालेल्या लोकांच्या गर्दीमुळे पोलिसांनी दुकानदाराला दुकान बंद करण्यास भाग पाडले एरव्ही ह्या मॉल मध्ये नेहमीच गर्दी असते आता संचारबंदीचा काळ वाढल्याने आणि गुढी पाडव्यामुळे लोक सामान खरेदीसाठी दुकानात आले पोलिसांनी त्यांना एकमेकांपासून दूर राहण्यास सांगितले तरीही लोक ऐकत नसल्यामुळे अखेर पोलिसांनी दुकानदारास तंबी देत दुकान बंद पाडण्यास भाग पाडले त्या मुळे लोकांना आवश्यक किराणा व इतर वस्तू न घेताच परतावे लागले
आर्णी रोडवरील  एका मेडिकल दुकानात  लोकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून बाहेरूनच कोणते औषध पाहिजे हे विचारून औषध व इतर सामान दिल्या जात होते
         आर्णी रोडवरील संचारबंदीच्या काळातील आढावा घेणारा गुढी पाडव्याच्या दिवशीचा हा व्हीडीओ
  
                                                     व्हिडीओ -पूजा दुद्दलवार -BE(soft) BM.C
करोना मुळे सक्तीच्या संचारबंदी मुळे लोक नाईलाजाने घरातच राहण पसंत करीत असल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट आहे पण जास्त दिवस लोकांना घरात राहण कंटाळवाण होईल त्या मुळे लोकांना संचारबंदीत एखादा फेरफटका आरोग्यासाठी किंवा आवश्यक सामान आणण्यासाठी सूट देण्यात यावी असे नागरिक खाजगीत म्हणत आहेत शिवाय दुकान बंद केल्यास लोकांनी सामान कसे आणावे हा प्रश्न लोकांना पडतोय                     

Tuesday 24 March 2020

अंतराळवीर Drew Morgan ह्यांनी स्थानकातून दिली भावी सैनिकांना शपथ


                अंतराळवीर Drew Morgan भावी सैनिकांना स्थानकातुन शपथ देताना फोटो-नासा संस्था         

नासा संस्था -
अंतराळवीर Drew Morgan ह्यांनी नुकताच अमेरिकेतील Houston Space Center मध्ये झालेल्या New Army Recruiting Command Ceremony मध्ये लाईव्ह सहभाग नोंदवला आणि  स्थानकातून त्यांना देशसेवेची शपथ दिली अंतराळवीर Drew Morgan ह्यांनी US आर्मी मध्ये कर्नल पद भूषविले आहे सध्या ते नासाच्या अंतराळ मोहीम 61 -62चे फ्लाईट इंजिनिअर आहेत
अमेरिकेतील भावी सैनिकांच्या शपथविधीत सहभागी होण्यासाठी वेळ दिल्याबद्दल सुरवातीलाच Brigadier    General Patrick Michel ह्यांनी Drew Morgan ह्यांचे आभार मानून संभाषणाला सुरवात केली आम्हाला तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंद होतोय कारण आज पहिल्यांदाच भावी सैनिकांचा Oath Enlistment Ceremony Space मध्ये तुमच्या उपस्थितीत होतेय हा आपल्या देशासाठी ऐतिहासिक क्षण आहे कार्यक्रमाला सुरवात कारण्याआधी आम्हाला तुमच्या बद्दल जाणून घ्यायला आवडेल
Drew Morgan- मी देखील तुमचा आभारी आहे मला हा सन्मान दिल्याबद्दल ! ह्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल आभार! नऊ महिन्यांपूर्वी इथे स्थानकात येण्याआधी मी देखील सैनिकच होतो आणि स्पेसमध्ये राहूनही मी देशसेवाच करतोय मी कायम सैनिकच राहीन ! असे सांगून त्यांनी त्यांच्या टी शर्टवरचा आर्मीचा शिक्का दाखवला

         अंतराळवीर Drew Morgan त्यांच्या टि शर्टवरील सैनिकाचा शिक्का दाखवताना-फोटो-नासा संस्था

अंतराळस्थानकाला आता वीस वर्षे पूर्ण झाली आहेत सध्या आम्ही तिघे इथे वास्तव्य करतोय आधी नऊ अंतराळवीर होते नंतर आम्ही सहाजण होतो हे अंतराळ स्थानक  पृथ्वीपासून दूर 250 मैल अंतरावरून ताशी 17000 मैल वेगाने पृथ्वीभोवती फिरत आहे दर 90 मिनिटाला आमच स्थानक पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करत आणि आम्ही आता प्रशांत महासागरावरून फिरतोय आपला संवाद संपेल तेव्हा आम्ही US च्या वरून जात असू एक दिवसात आम्ही पृथ्वीभोवती सोळा फेऱ्या मारतो आम्ही इथे अडीचशेच्यावर सायंटिफिक संशोधिक प्रयोग करतोय शिवाय स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी आणि  देखभालीसाठी Space Walk हि करतो
त्या नंतर Oath ceremony ची सुरवात झाली Drew Morgan म्हणाले मी अठरा वर्षाचा होतो तेव्हा असाच हात वर करून देशसेवेची शपथ घेतली होती आणी आता स्पेसमधुन ह्या शपथविधी समारंभात मी तुुम्हाला शपथ देतोय हा माझ्यासाठीही अविस्मरणीय क्षण आहे कृपया उभे राहून उजवा हात वर करा आणी माझ्या मागोमाग शपथ घ्या! असे साांंगत त्यांनी भावी सैनिकांना देशसेवेची आणी  एकनिष्ठतेची शपथ दिली
त्या वेळेस Brigadier Genera Patrick Michael म्हणाले कि,माझ्या तीस वर्षांच्या आर्मीमधील कार्यकाळातील हा अत्यंत अभूतपूर्व आणी ऐतिहासिक क्षण आहे! त्या नंतर त्यांनी अंतराळवीर Drew यांना सांगितले कि काही भावी सैनिकांना त्यांना प्रश्न विचारायचे आहेत तेव्हा Drew ह्यांनी आनंदाने संमती दिली
Amber Cabina - Drew तुम्हाला स्थानकात  तुमच्या सोबत एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीला न्यायची संधी मिळाली तर  तुम्ही कोणाला न्याल ?
Drew Morgan - अवघड प्रश्न आहे हा! खरतर आता सध्या मी ज्या अंतराळवीरांसोबत राहतोय ते माझ्यासाठी योग्य आहेत 2013 साली माझी सात अंतराळवीरांसोबत निवड झाली आणि सुदैवाने मला त्यातील तिघांसोबत स्थानकात यायला मिळाल आणि विशेष म्हणजे एका वेळेस आम्ही चौघेही स्थानकात वास्तव्य करून संशोधन करत होतो माझे Classmates खूप छान आहेत त्या मुळे त्यांच्या पैकी कोणासोबतही मला पुन्हा स्थानकात यायला आवडेल
Lindsey Alexander - आर्मी आणि अंतराळवीर होण्यासाठी तुम्ही खूप कठीण आणि कठोर ट्रेनिंग घेतल असेल खूप संघर्षही करावा लागला का ? त्याला तुम्ही कसे सामोरे गेलात आम्हाला तुम्ही काय सल्ला द्याल ?
Drew Morgan -  खरच माझा मार्ग सोपा नव्हता खूप कठीण होता तुम्ही Marine,Army,Navy ह्या विभागात कार्यरत होणार आहात जेव्हा तुम्ही Boot Camp मध्ये ट्रेनिंग साठी दाखल व्हाल तेव्हा तिथल्या अत्यंत कठीण आणि कठोर ट्रेनिंग दरम्यान तुमचा धीर सुटेल तुमचे ध्येय डळमळीत होईल तुम्हाला ह्या आर्मी पेक्षाही सोपे कमी त्रासदायक करिअर निवडावे आपण इथे फिट नाही असेही वाटेल पण हा विचार मनात येण म्हणजेच तुम्ही योग्य दिशेने मार्गक्रमण करत आहात अस समजा कारण कुठलही ध्येय साध्य करायच तर कठीण संघर्षाला सामोरे जाण त्या साठी अथक परिश्रम करण आवश्यक असत आर्मी किंवा अंतराळवीर होण सोप नसतच पण ध्येय साध्य केल्यानंतरचा आनंद अमूल्य असतो 
Ryan Rumple -अंतराळवीर  होण्यासाठी कुठल्या Qualification ची आवश्यकता असते?
Drew Morgan - आता ह्या महिन्यातच अंतराळवीरांच्या नवीन Batch ची निवड होणार आहे म्हणूनच आम्ही नुकताच Qualification चा आढावा घेतला अंतराळवीर होण्यासाठी Basic Qualification ची आवश्यकता असते म्हणजे तुम्ही STEM background मध्ये Masters असण आवश्यक आहे सायन्स,Math ,कुठल्याही शाखेतील इंजिनीअर,सायंटिस्ट,डॉक्टर्स ह्यांना प्राधान्य दिल जात नासा संस्थेत वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची आवश्यकता असते
Cody Colard - तुम्ही करिअर साठी आर्मीचच  क्षेत्र का निवडलत ?
Drew Morgan -बहुतेक सगळेच भावी सैनिक कोणाकडून तरी प्रेरणा घेऊन किंवा देशसेवेची भावना घेऊन आर्मीत भरती होतात माझ्या कुटुंबाला आर्मीचा ऎतीहासिक वारसा आहे माझे एक आजोबा नेव्हीत होते तर दुसरे आजोबा आणि चुलत आजोबा सुद्धा दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी आर्मीत कार्यरत  होते माझे वडील Air Force Officer होते ह्या आमच्या घरातील सैन्य परंपरेमुळे माझ्यावर बालपणीच आर्मीचे संस्कार झाले मी संरक्षण दलाच्या प्रत्येक शाखेचे मेरिटस पाहिले त्या मुळे मी प्रभावित होऊन सैन्यदलाकडे आकृष्ट झालो आणि मला सैनिकच व्हायचे हे माझ्या मनावर बिंबल आर्मीच्या करिअर मध्ये खूप वैविध्यपूर्ण आव्हानात्मक काम करायची संधी मिळते हेही मला माझ्या पूर्वजांकडून कळाल इथे संघर्ष आणि परिश्रम करायची तयारी असावी लागते आणि आर्मीत आपल्या कामाप्रती निष्ठा असायला हवी समाधानी असायला हव
Felix Herander - STEM मध्ये इंटरेस्ट असलेल्या Graduates साठी तुम्ही काय सल्ला द्याल ?
Drew Morgan -आपल संरक्षण दल तांत्रिक दृष्ठ्या अत्यंत प्रगत आहे आणि आर्मी मध्ये एक तृतीयांश सैनिक STEM क्षेत्रातील असतात कारण आर्मीला तांत्रिक प्रगती साठी STEM background असलेले ऊमेदवार हवे  असतात मी तुम्हाला असा सल्ला देईन की तुम्ही तुमच्या आवडीच क्षेत्र निवडा आणी STEM मध्ये आवड असेल तर त्या क्षेत्रात जा आणी तुम्ही विद्यार्थी दशेत असाल तर अवघड विषय आधी शिका शिवाय आर्मी मध्ये
all-rounder ऊमेदवार हवे असतात त्यामुळे Arts,Philosophy,Language ह्या सारख्या शाखेत पारंगत व्हा जितक जास्त ज्ञान मिळवता येईल तितक मिळवा
Matthew Coffey- स्पेसमधल्या वास्तव्यात कशाच आश्चर्य वाटत ?
Drew Morgan- मला ह्या गोष्टीच आश्चर्य वाटत की जेव्हा तुम्ही आमचे सोशल मिडिया accounts बघता तेव्हा तुम्हाला वाटत की,आम्ही कीती आनंदात मजेत आहोत पण ते काही अंशी खर असत नेहमीच नाही कारण ईथल आयुष्य संघर्षरत आव्हानात्मक आहे क्षणाक्षणाला सजग रहाव लागत प्रचंड ताणयुक्त प्रसंगाला सामोरे जावे लागते अशावेळी आम्हाला आमच्या परीवाराची आठवण येते  आणी ईथल्या वास्तव्यात मिलीटरीतल्या नोकरीचा काळ आठवतो कारण तेव्हाही सैनिक परीवारापासुन दुर असतो आणी ईथे तर झीरो ग्रव्हिटीत आम्ही सतत तरंगत्या  अवस्थेत असतो पण पृथ्वीवर परतल्यावर पुन्हा त्यांची भेट होणार आहेच
Kaiffyn Ncmullen-तुमच्या करीअरमधला सर्वात धक्कादायक प्रसंग कोणता होता? त्याचा तुमच्या वर काय परीणाम झाला?
Drew Morgan- अलीकडेच अशा प्रसंगाला मला सामोरे जावे लागले मी अंतराळवीराच ट्रेनिंग घेत होतो त्या दरम्यान मला दुखापत झाली आणी मी ट्रेनिंगमधे मागे पडलो मला अर्थातच वाईट वाटल पण मला माझे ट्रेनर Pat Forrester ह्यांनी मला समजावल (जे सध्या Astronaut unit चे प्रमुख आहेत ) तुला आता हा काळ खूप कठीण आणी मोठा वाटला तरी भविष्यात तुला हाच वेळ खूप कमी वाटेल तु फक्त तुझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर त्याची आठवण मला एखाद्या कठीण प्रसंगाला सामोरे जाताना नेहमी होते
Shelby Young- अंतराळ स्थानकातील वास्तव्यात आर्मीच ट्रेनिंग ऊपयोगी पडल का?
Drew Morgan-  हो निश्चितच! खूप ऊपयोग झाला! U.S Army center मध्ये सैनीकांना अत्यंत खडतर ट्रेनिंग दिल जात त्यामुळे कुठल्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सैनिक सक्षम होतात माझा आर्मी मधल्या करीअरचा जास्तीत जास्त काळ ट्रेनिंग मध्ये गेल्यामुळे माझा आत्मविश्वास दृढ झाला माझ मनोधैर्य वाढल कारण ट्रेनिंग खूप कठीण असत तसच अंतराळवीर होण्यासाठीच पण तीथे आमच्या धैर्याची,सहनशीलतेची परीक्षा होते आणी म्हणूनच ईथल्या विपरीत परीस्थितीत आमच शरीर तग धरू शकत आम्ही तरंगत ईथे राहु शकतो
Breanna Aquilla - तुम्ही आर्मीत होतात मग Astronaut होण्याचा निर्णय कसा घेतला ?
Drew Morgan- खरतर मला सैनिक व्हायच होत म्हणून मी सैनिक झालो नंतर Physician आणी नंतर अंतराळवीर झालो आधी सैनिक होऊन देशसेवा केली मग पेशंटची सेवा आणी आता अंतराळवीर होऊन देशसेवा करतोय
Austin Butz- स्थानकातील झीरो ग्रव्हिटीत रहातानाचा अनुभव कसा आहे तीथे कुठले प्रयोग करत आहात
Drew Morgan- मी पहिल्यांदा Parabolic Airoplane मध्ये झिरो ग्रॅव्हिटीचा अनुभव घेतला होता आणि आता जुलैमध्ये Rocket मध्ये बसुन ईथे स्थानकात आलो तेव्हापासून झीरो ग्रव्हिटीत रहातोय सुरवातीला अर्थातच त्रास झाला स्थानकात आल्यावर आधी मला वाटल मी ऊलटा लटकलोय आणी पट्ट्याच्या सहाय्याने ईथे तरंगतोय एकदोन दिवस माझा गोधंळ उडाला मग लक्षात आल आपण वरखाली कसही तरंगु शकतो ईकडे तिकडे तरंगत्या अवस्थेत फिरु शकतो मग मी ते एन्जॉय करायला शिकलो हळूहळू सवय झाली आतातर तरंगण  एकदम normal झालय
Bradley Everheart- तुमच्या करीअर दरम्यान नेतृत्व  गुणाबाबतच तुमच मत काय ?तुम्ही काय सल्ला द्याल
Drew Morgan- निस्वार्थ सेवा देण आणी दुसऱ्यांनाही पुढे येण्यासाठी प्रोत्साहन देण हे ह्या करिअर मध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे आपल्या भावी यशासाठीही !
ह्या कार्यक्रमात Drew Morganह्यांची पत्नी,सहकारी भावी सैनिक त्यांचे कुटुंबीय,आणी अंतराळवीर कर्नल Frank Rubio ऊपस्थीत होते शेवटी दोघांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन आणी आभार मानुन कार्यक्रमाची सांगता केली