Monday 17 February 2020

रेकॉर्ड ब्रेकर Christina Kochने पृथ्वीवर परतल्यानंतर पत्रकारांशी साधला संवाद


Image
            Christina Koch आवडत्या बीचवरचा मनसोक्त आनंद लुटताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -१३ Feb.
स्थानकात दीर्घकाळ वास्तव्य करणारी पहिली महिला व  Only महिला स्पेसवॉकर होण्याचा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित करून Christina Koch स्थानकातील 328 दिवसांच्या मुक्कामानंतर सहा फेब्रुवारीला पृथ्वीवर परतली
नासा संस्थेत आणि तिच्या शहरात पोहोचल्यावर तिचे उत्साहात स्वागत झाले त्यातून वेळ मिळताच Christina ने  नासाच्या Houston येथील Johnson News Room मध्ये आघाडीच्या न्युजपेपरच्या पत्रकारांशी बातचीत केली   काही पत्रकारांनी फोनवरूनही तिला प्रश्न विचारले हा संवाद चांगलाच रंगला
Christina Koch म्हणाली पृथ्वीवर परतल्यानंतरचा क्षण अत्यंत आनंददायी आणि शब्दातीत होता ! पृथ्वी सोडताना आणि आल्यानंतरचा अनुभव तितकाच अविस्मरणीय आहे तिथे स्थानकातून पृथ्वीच जिवंत रूप पाहण्याचा अनुभव स्वर्गीय आणि आल्हाददायी होता एरव्ही स्वप्नात किंवा कल्पनेत आपण पृथ्वी पाहू शकतो मी शाळेत पृथ्वीची प्रतिकृती ballच्या स्वरूपात पाहिली होती पण स्थानकातून मला दररोज अनेकदा पृथ्वीच मूर्तिमंत जीवंंत स्वरूप पाहायला मिळाल त्या साठी नासा संस्थेची मी ऋणी आहे तसच पृथ्वीवर परतल्यानंतरचा क्षणही विलक्षणच! इथे परतल्याक्षणी मी खूप दिवसांनी पुन्हा खूप लोकांना पाहिल त्यांना झालेला आनंद अनुभवला त्यांनी केलेल स्वागत अभिनंदन सारच आनंददायी होत! भारावलेल वातावरण होत ते ! मला आपली पृथ्वी किती अनमोल आहे ह्याची नव्याने जाणीव झाली इथे सहजतेने मी हालचाल करू शकले ताठ उभी राहू शकले चालू शकले हे सारच खूप सुंदर आहे साऱ्या विश्वात आपली पृथ्वी आणि पृथ्वीवर राहणारे आपण खूप भाग्यवान आहोत! स्थानकातील 328दिवस आणि आल्यानंरच्या सहा दिवसांचा अनुभव तर खूपच रोमांचकारी आहे उत्साही,आनंददायी वातावरण आहे इथे! तुम्ही आल्याबद्दल तुमचे आभार!
घरी परतल्यानंतर घरच्यांना भेटण्याचा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याचा अनुभव शब्दातीत!तसच मी  परतल्याचा आनंद माझ्या doggy ला जास्त झाला कि मला हेही सांगण कठीण आहे इतके आम्ही दोघे खुश झालो एकमेकांना भेटून ! मी त्याच रेकॉर्डिंगही केलय माझ्या कुत्रीच नाव L.B.D आहे Humane सोसायटी मधून मी तिला आणलय ती खूप लहान आहे अस एका प्रश्नाच्या उत्तरात Christina म्हणाली
प्रश्न  -तू पृथ्वीवर परतल्यावर बीचवर गेली होतीस का?तु पोहायला गेली होतीस का? कि तुला परवानगी नव्हती ?
तिथली अविस्मरणीय आठवण सांग
Christina -मी स्थानकात असताना माझ्या आवडत्या बीचला खूप मिस केल होत तो अनुभवण्यासाठी मी उत्सुक होते म्हणून आधी मी बीचवर गेले आणि खूप enjoy केल! समुद्राची गाज  घोंघावणाऱ्या लाटांचा आवाज ऐकत लाटांचे तुषार अंगावर झेलत अनवाणी पायाने वाळूचा स्पर्श अनुभवत चालण्याचा आनंद काही औरच! मी पुन्हा नव्याने तो अनुभवलाय आवाज स्पर्श गंध सारच सुखावणार होत! माझ्या Athletic trainerला माझी समुद्राची आवड माहिती असल्यान ती मला सतत प्रेरित करत होती की,हे लवकर केलस तर तुला बीचवर लवकर जाता येईल म्हणून मी रविवारीच बीचवर जाऊ शकले
स्थानकातील वास्तव्यादरम्यान मला खूप नवे अनुभव आले सुरवातीला कठीण खूप संघर्षरतच पण अत्याधुनिक संशोधन करण्याची संधी मिळाली सतत पक्षांप्रमाणे तरंगत राहण कठीण पण मजेशीर अनुभव देणार कधीही कुठेही कसेही तरंगत राहून उभे राहण्याची कसरत करत जीवन जगण आणि संशोधन करण खरच अकल्पित! म्हणूनच तिथली एक आठवण सांगण कठीण पण पहिल्यांदा स्थानकात पाऊल ठेवण्याचा क्षण अविस्मरणीय! आता वर्षभर इथे रात्रंदिवस अशा अवस्थेत राहायचय ह्याची जाणीव झाली किती वर्षे ट्रेनिंग घेतलेल इथे राहण्याच स्वप्न प्रत्यक्षात साकार झालेल होत 
प्रश्न -स्थानकातील वास्तव्यादरम्यान तिथला तुझा कोपरा किंवा खोली तुला आपलीशी वाटायला लागली होती का इथल्या आपल्या घर किंवा ऑफिस सारखी वाटली का? अंतराळप्रवासात नेहमीप्रमाणे जास्त सामान तुला नेता आल नसेल तरीही परतताना पॅकिंग करताना नेलेल्या सामानातून,तिथे जमवलेल्या वस्तूंपैकी पृथ्वीवर आणण्या योग्य महत्वाच्या वाटल्या का ?
Christina -सुरुवातीच्या तीन महिन्यांच्या वास्तव्यातच मी त्या वातावरणात इतकी रुळले कि इथल वातावरण वेगळे आहे ह्याचा विसर  पडला ग्लास मधून पाणी न पिण,पॉकेट मधल प्रिझर्वड अन्न खाण आणि तरंगण इतक सवयीच झाल की आपण तरंगत्या अवस्थेत आहोत ह्याचा विसर पडला नवीन अंतराळवीर स्थानकात आल्यावरच त्यांचा तरंगण्याचा पहिला उत्साह पाहून अरे आपण आता सराईतपणे तरंगतोय ह्याची जाण आली
खरच !खूप सामान नेता आणता येत नाही माझ सामान एका Shoe Box मध्ये मावेल एव्हढच होत माझ सामान माझ्या आवडत्या जागेवर खूप ठिकाणी होत त्यात माझे आवडते खाद्यपदार्थही होते एक महिना आधीच मी पॅकिंगची तयारी करीत होते नको असलेले सामान तिथेच ठेवले आणि आवश्यक सामान आणले जे मला माझ्या आप्तस्वकीयांनी प्रेमाने दिले होते
प्रश्न - स्थानकातील दीर्घकाळच्या वास्तव्यानंतर आता तुझी मानसिक स्थिती कशी आहे?आणि एका मुलाखतीत तू केलेल्या चिप्स आणि साल्सा बद्दल सांगितल होतस त्या बद्दल जाणून घ्यायला आम्हाला आवडेल
Christina -मी खूप आनंदी आहे मला खूप छान वाटतय विशेष म्हणजे सुदैवाने मायक्रो ग्रॅविटीतून पृथ्वीवरच्या गुरुत्वाकर्षणीय वातावरणात परतल्यावर बहुतेकांना होणारा Motion Sickness चा त्रास मला जाणवला नाही फक्त चालताना तोल सावरायला वेळ लागतोय पृथ्वीवर परतल्यावर वर्षभर पाहिले नव्हते इतके लोक मी दोन मिनिटात पाहिले परत येण्याचा सुखदायी अनुभव होता तो त्यांच्याशी संपर्क साधताना,बोलताना मन जागृत झाल स्पर्श गंध ह्याची जाणीव नव्याने अनुभवताना जाणवल आपल्या माणसात परतण्याचा अनुभव अवर्णनीय आहे
चिप्स आणि साल्सा काही ठराविक ब्रँडचेच हवे अस नाही माझ्या सुदैवाने माझ्या माझ्या नातेवाईकांनी हे सार आधीच आणून ठेवल माझ किचन भरून गेल होत माझ्या शेजाऱ्यांनी मला खास घरी साल्सा बनवून आणून दिला आधी ह्या गोष्टींच छोट असलेल महत्व आता मात्र खूप वाढलय
प्रश्न - तूझ कर्तृत्व ऐतिहासिक आहे! तुझ्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल त्यांनाही तुझ्या पाऊलवाटेने जावस तुझ्या सारख व्हावस वाटेल त्यांना काय सल्ला देशील ? स्थानकातील दीर्घ वास्तव्यासाठी काय तयारी केलीस शारीरिक मानसिक ह्या साठी तू कसे मार्गदर्शन करशील ?
Christina -खूपच छान प्रश्न आहे हा ! भविष्यातील होतकरू अंतराळवीरांना मी काय सल्ला देऊ शकेन ह्याचा विचार मी पण केलाय खरतर नासा मध्ये दीर्घकाळच्या अंतराळ वास्तव्याला हे मिशन म्हणजे Sprint नसून Marathonआहे असा समज आहे माझ्या बाबतीत तर Ultra Marathonआहे हे मिशन दीर्घकाळच असल्याने आधी मानसिक तयारी करण आवश्यक असत माझ्या बाबतीत सांगायच तर मला माझी  Antarctica मोहीम आणि स्पेसस्टेशनच्या अनुभवावरून लक्षात आल कि इथे प्रत्येक क्षण महत्वपूर्ण असतो वेळ अत्यंत कमी असल्याने त्वरित निर्णय क्षमता हवी कामाप्रती निष्ठा आणि एकाग्रता आवश्यक असते हि दुर्मिळ संधी खूप कमी जणांना मिळते म्हणून आपल्याला काय मिळाल नाही ह्या पेक्षा काय करायला मिळालय ह्याचा विचार आधी करायला हव कधी कधी जीवन संथपणे चाललय अस वाटत निराशेचे क्षणही येतात तेव्हा त्यावर मात करून  आपण इथवर पोहोचलो ते सहज शक्य नाही हि दुर्मिळ संधी आपल्याला मिळाली कारण आपण त्या साठी खूप संघर्ष केलाय आपण नशीबवान आहोत आपल्याला अद्वितीय महत्वपूर्ण काम पूर्ण करायचय त्या साठी अनेक शास्त्रज्ञाचे अविरत परिश्रम आणि आशा आपल्यावर अवलंबून आहेत असा विचार करून दुप्पट शक्तीने ते कार्य पूर्णत्वास न्यायला हव पृथ्वीवर परतल्यावर इथे न मिळालेल्या गोष्टी आपल्याला परत मिळतीलच पण इथला काळ अनमोल  आहे असा विचार मी करायची मला Scott Kelly आणि Peggy Whitson ह्यांनी मोलाच मार्गदर्शन केल
माझी ऐतिहासिक कामगिरी प्रेरणादायी ठरतेय हि गोष्ठ माझ्यासाठी गौरवास्पद आहे माझा हा रेकॉर्ड मोडून कोणीतरी नवा रेकॉर्ड प्रस्थापित केलेला पाहायला मला नक्कीच आवडेल भावी अंतराळवीरांना मी हेच सांगेन कि तुमच इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी चिकाटी,संघर्ष आणि अथक प्रयत्न करण आवश्यक आहे मला माझ ध्येय साध्य करण्यासाठी अनेकांनी प्रोत्साहित केल तस मीही त्यांना करेन
प्रश्न -तुझ्या अंतराळ स्थानकातील वास्तव्यात एखाधा भीतीदायक अनुभव आला का? त्या क्षणी तुला NC State ची आठवण आली होती का? तु तुझ पहिल Rock Climbing Carmichael Gym मध्ये केल होतस कि दुसरीकडे कुठे?
Christina -हो ! NC state चा माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा टप्पा आहे आणी माझ्या यशातील मोठा वाटाही
आपल्या साऱ्यांच्या Collage मधल्या दिवसाचे आयुष्यातील अनुभव अनमोल असतात त्यातुनच आपली जडण घडण होते तिथेच मी Rock Climbing शिकले Rock Climbing चा अनुभव मला अंतराळातील Space Walk मध्ये ऊपयोगी पडला  इथे Teamwork आवश्यक असत माझ्या Climbing बद्दल सांगायचे तर Stone Mountain ला आमची field trip होती तीथे पहिल्यांदा केल खूप आठवणी आहेत तिथल्या
प्रश्न -तुझ्या West Michigan ह्या शहराबद्दल,तिथल्या तुझ्या जडणघडणीबद्दल सांग तु सद्या तिथल्या विद्यार्थ्यांची  प्रेरणादायी आदर्शआहेस
Christina -तिथल्या जीवनात मला मेहनत कष्ट करण्याची शिकवण मिळाली मी लहानपणी आजी आजोबा सोबत शेतात जायचे त्यांनीच माझ्यात जीवनमूल्ये रुजवली आणी मला यशाच्या वाटेवर नेल प्रत्येक दिवस आपल्या साठी नवीन संधी घेऊन येतो आपण त्याचा ऊपयोग करायला हवा हे मी लहानपणी त्यांच्याकडूनच शिकले
प्रश्न -अंतराळवीर Scott Kelly ह्यांना त्यांच्या स्थानकातील दिर्घकालीन वास्तव्यानंतर स्नायूदुखी सांधेदुखी त्वचा आणी तळपायाची जळजळ अशा समस्यांचा त्रास झाला होता तुलाही त्रास झाला का? तुझा अनुभव काय आहे?
Christina -सुदैवान मला जास्त त्रास झाला नाही पण स्नायूदुखी जाणवतेच कारण स्थानकात तरंगत्या अवस्थेत स्नायूंची हालचाल,त्यांचा वापर होत नाही त्यामुळे परतल्यावर मुळ अवस्थेत यायला थोडा वेळ लागतो मला ताठ ऊभ राहायला लहान बाळासारखा वेळ लागला कारण सवय गेली होती दहा वर्षात आता बरच बदलल आहे स्थानकातील वास्तव्यात शरीरातील हाडे आणी स्नायूवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून खूप काळजी घेतली जाते,व्यायाम केल्या जातो शिवाय ईथे परतल्यावर एक पुर्ण प्रशिक्षित डॉक्टरांची टिम आमचा त्रास कमी करण्या साठी कार्यरत असते ते आम्हाला इथल्या वातावरणात जुळवून घेण्यासाठी आवश्यक त्या सुचना देतात आता पुर्वी पेक्षा कमी वेळात आम्ही नार्मल होतो
प्रश्न -Jim Brownstone आगामी चांद्रमोहिमे बाबत बोलताना म्हणाले की,चंद्रभुमीवर जाणाऱ्या तीन जणात एका महिला अंतराळ वीराचा समावेश असेल आणी आमच्या संस्थेत हि पहिली महिला ऑलरेडी आहे आणी तु रेकॉर्ड ब्रेक यश प्राप्त केलस तुझ्या निवडीच्या शक्यतेबद्दलच तुझ मत काय आहे?
Christina -आगामी चांद्रमोहिमेत माझा सहभाग झाला तर माझ्या साठी ती गौरवास्पद बाब असेल कारण फक्त चंद्रावर जाऊन न येता तिथे राहुन संशोधन करण्याची संधी मिळणार आहे आणी त्या काळात मी संस्थेत कार्यरत होते हे माझ भाग्य आहे मी आनंदाने ह्या मिशन मधे सहभागी होईन पण जर संस्थेतील माझ्या ओळखीच्या दुसऱ्या महिलेची निवड झाल्यास मला तितकाच आनंद होईल
प्रश्न -स्थानकातील दिर्घकालीन वास्तव्यात तुला कोणकोणत्या आव्हानाला सामोरे जाव लागल त्या काळात तु तुझ मानसिक स्वास्थ्य कस राखलस?
Christina -अशावेळेस मी माझ लक्ष माझ्या कामावर केंद्रित केल मला मिळालेल्या अमूल्य संधीच सोन केल हि दूर्मिळ संधी मला नशिबाने,संघर्षाने मिळाली म्हणून तो क्षण वाया जाऊ न देता चिकाटीने काम पूर्ण केल त्यामुळे मला यश मिळाल 
 प्रश्न-स्थानकात करण्यात येणाऱ्या कुठल्या प्रयोगाबद्दल जाणून पृथ्वीवरच्या लोकांना आश्चर्य वाटेल तुला संधी मिळाली तर तू  कुठला प्रयोगाच प्रोग्रामिंग करशील?
Christina - खुप छान प्रश्न आहेत हे! स्थानकात सध्या खूप प्रयोग सुरू आहेत ते मानवी आयुष्यात ऊपयुक्त बदल घडवू शकतील लोकांना ह्या गोष्टीच आश्चर्य वाटेल कि,असाद्य रोगांवर ऊपयुक्त ईलाज करण्यासाठीच औषध तयार करण्यासाठी तिथे सतत प्रयोग सुरू आहेत पृथ्वीवरील वातावरणात तसे संशोधन करता येत नाही खासकरून प्रोटिन Crystalsची तिथल्या मायक्रोग्रव्हीटीत वाढ होते त्यानंतर त्यांच्यावर संशोधन करता येते जे ईथल्या वातावरणात शक्य होत नाही मी Physicistआणी Electrical Engineerअसल्याने मला programmingची   आवड आहे मला अशा संशोधनात खूप इंटरेस्ट आहे सगळ्याच प्रयोगात सहभागी व्हायला मला आवडत असे सायंटिफिक प्रयोग फक्त मायक्रो ग्रव्हीटीतच संशोधीत करता येतात शिवाय Industrial Manufacturing field Development साठीही तिथे संशोधन सुरू आहे
प्रश्न -मी meteorologist आहे तु शेअर केलेले फोटो निसर्गाचे रौद्र रुप दाखवणारे होते विषेशतः Dorian वादळाचे फोटो किंवा Australia मधील आगीचे फोटो तुला स्वतः ला स्पेसमधुन बघितलेल आणी आवडलेल वातावरण कोणत होत?
Christina -स्थानकातुन दिसणाऱ्या पृथ्वीभोवतालच्या ढगांचे विविध रंगी आकार पहायला मला खूप आवडायच एरव्ही आपण विमानातून ढग पहातो पण अंतराळातून दिसणाऱ्या ढगांच रुप अभुतपुर्व होत आणी त्यांंच्या आकारा वरूनच वाऱ्याचा अंदाज येतो त्यामुळे वातावरणातील बदलांचे निरीक्षण नोंदवून करण्यात येणाऱ्या अभ्यासाचे महत्व जाणवल
Grand Rapids-मी तुझ्या शहरातून बोलतेय,तु पाच वर्षाची असतानाच अंतराळवीर होण्याच स्वप्न बाळगल होतस तेव्हाच्या Christina बद्दल जाणून घ्यायला आम्हाला आवडेल
Christina -पाच वर्षाची Christina आजच्या ईतकी confident नव्हती मी अंतराळ वीर होईन की नाही हे निश्चित नव्हत पण ते माझ स्वप्न होत लहानपणी मी एका campला गेले होते त्या class मध्ये How to be an Astronaut ह्या बद्दल माहिती देत होते आणी फळ्या वर आवश्यक गोष्टीची लिस्ट लिहित होते सगळेजण आपल्या वहित त्या लिस्टमधल्या गोष्टींची नोंद करत होते पण मी मात्र ठरवल की लिस्ट प्रमाणे नाही करायच तर आपल्या Passion प्रमाणे आपल ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करायचा मी नासा संस्थेतील सुरळीत चालू असलेला engineeringचा job सोडला आणी Antarctica mission मध्ये सामील झाले मी आधी सांगितले त्या प्रमाणे मला तेव्हाचा Rock Climbing चा अनुभव अंतराळात Space walk च्या वेळी ऊपयुक्त ठरला खरतर ह्या Activity ची अंतराळवीर  होण्यासाठी गरज नसते पण मला मात्र ती ऊपयोगी पडली म्हणून मी म्हणेन की वेगवेगळ्या गोष्टी शिकल्या आणी अनुभवल्या पाहिजेत
प्रश्न -Christina तुला माहीत होत का तुम्ही ऐतिहासिक विक्रमाची नोंद केलीत की तुम्हाला ह्याची जाणीव करून द्यावी लागली?
Christina -नाही आम्ही नोंद ठेवत नसल्याने माहिती नव्हत आम्ही आमच काम केल मला प्रसिद्धी करायला आवडत नाही पण त्यामुळेच इतरांना प्रेरणा मिळते Space Walk च ट्रेनिंग घेतना शेवटच्या दिवसात कोणी तरी म्हणाल होत की,आतापर्यंत एकही फक्त महिला अंतराळ वीराचा Space Walk झाला नाही तेव्हा मला वाटत होत की भविष्यात अस होईल पण मीच तो करेन अस मात्र वाटल नव्हत सुदैवाने मला संधी मिळाली आणी माझ्या साठी ती गौरवास्पद संधी ठरली 

No comments:

Post a Comment