पृथ्वीवर पोहोचल्यावर अभिवादन करताना Christina Kochची आनंदी मुद्रा -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -6Feb.
नासाच्या मोहीम 61चे तीन अंतराळवीर Alexander Skovrtsov,Luca Parmintano आणि Christina Koch गुरुवारी सहा तारखेला पृथ्वीवर सुखरूप पोहचले त्यांचे Soyuz MS-13हे अंतराळयान सकाळी 12.50 मिनिटाला अंतराळस्थानकाकडून पृथ्वीकडे झेपावले आणि 4.12 a.m.वाजता पृथ्वीवर पोहोचले
कझाकस्थानातील Dzhezkazgan ह्या कॉस्मोड्रोम वर अंतराळयान पोहोचताच तिघेही पॅराशूटच्या साहाय्याने खाली उतरले तेव्हा नासा संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना स्पेस कॅप्सूल मधून बाहेर काढून उचलून आणले त्या नंतर नासाच्या तज्ञ डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली आणि त्यांना पाणी प्यायला दिले
पृथ्वीवर परतल्यावरचा आनंद नासा संस्थेतील सहकाऱ्यांसोबत साजरा करताना -फोटो -नासा संस्था
पृथ्वीवर सुखरूप पोहोचल्याचा आनंद ह्या तिघांच्याही चेहऱ्यावर ओसंडून वाहात होता त्या वेळेस Christina म्हणाली की अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीतून पुन्हा पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणात पोहोचल्याचा क्षण आश्चर्यकारक असतो कारण इथे सहजतेने आपण हालचाल करू शकतो आपले हातपाय वरखाली करू शकतो जमिनीवर पाऊल ठेऊन ताठ उभे राहू शकतो पण आम्हाला लगेचच अशी हालचाल करण सोप नसत कारण सतत इतक्या दिवस तरंगत्या अवस्थेत राहिल्यामुळे जमिनीवर चालण आम्ही विसरून जातो आम्हाला हे सार कठीण जात पाहू या आता कस आणि किती लवकर सार जमत ते !
Christina Koch हिची हि अंतराळवारी ऐतिहासिक ठरली तिने ह्या अंतराळवारीत सलग 328 दिवस अंतराळ स्थानकात वास्तव्य केल शिवाय तिने Jessica Meir सोबत पहिला only महिला स्पेसवॉक यशस्वी करत ऐतिहासिक विक्रमही केला तीनवेळा फक्त ह्या दोघीनी मिळून अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी स्पेसवॉक केला ह्या अनुभवाविषयी बोलताना, Christina म्हणाली आम्ही स्पेसवॉक साठी स्थानकातून बाहेर पडलो तेव्हाचा क्षण अविस्मरणीय होता आम्ही एअर लॉक मधून बाहेर आलो बाहेर अमर्याद अंतराळ आणि प्रचंड काळोख होता आम्ही एकमेकिंकडे पाहील तो क्षण आमच्यासाठी किती महत्वाचा आहे हे जाणवल शेवटी आम्हाला आमच ध्येय साध्य करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आमच्या डोळ्यात होता तत्क्षणी आम्हाला आमच्या कर्तव्याची जाणीवही झाली! नंतर आम्ही ते काम अचानक उद्भवलेल्या अडचणीवर मात करत यशस्वीपणे पार पाडल
Christinaने अंतराळातील वास्तव्यादरम्यान सहा स्पेसवॉक केले अंतराळ स्थानकात सलग 328 दिवस राहणारी पहिली महिला अंतराळवीर होण्याचा विक्रमही Christina ने प्रस्थापित केला तिने Peggy Whitson ह्यांचा ह्या आधीचा स्थानकात जास्त दिवस राहण्याचा विक्रम मोडीत काढला आहे
नासा संस्थेतर्फे आगामी चंद्र आणि मंगळ मोहिमांसोबतच दूरवरच्या अंतराळ मोहिमामध्ये अंतराळवीरांच्या निवासासाठी मानवी आरोग्यावर जास्त दिवस राहिल्यावर होणाऱ्या परिणामांवर संशोधन करण्यात येत आहे
ह्या संशोधनात ह्या आधी अंतराळवीर Scott Kelly आणि Peggy Whitson ह्यांनी अंतराळस्थानकात जास्त दिवस राहून सहभाग नोंदवला होता त्याच संशोधनात Christinaहि सहभागी झाली अंतराळस्थानकात जास्त दिवस राहून आवश्यक ती माहिती आणि सॅम्पल्स घेऊन त्यावर तिने अंतराळात संशोधन केले आता पुढील सखोल संशोधनासाठी शास्त्रज्ञांना हि संशोधित माहितीउपयुक्त ठरेल
ह्या संशोधनांतर्गत अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीत तरंगत्या अवस्थेत राहताना आणि तिथल्या सततच्या isolation,radiationला सामोरे जाताना मानवी शरीरावर काय परिणाम होतो तिथल्या पृथ्वीपेक्षा वेगळी दिनचर्येत विशेषतःआहार झोप आणि दिवस रात्रीचा काळ आणि वेळेतील फरक ह्या सर्व विपरीत परिस्थितीला सामोरे जाताना मानवी वजनरहित शरीर कसा प्रितिसाद देते त्या परिस्थितीतही तग धरून राहण्याची क्षमता कशी निर्माण होते ह्याचे निरीक्षण नोंदवून त्यावर संशोधन करण्यात येत आहे
आता जास्त दिवस अंतराळस्थानकात राहिल्यावर मानवी शरीरात काय बदल होतात विशेषतः तिथे सतत तरंगत राहिल्यामुळे पायाचा वापर न झाल्याने हाडे कमकुवत होतात पाठीचा कणा ताठ अवस्थेत न राहिल्याने तो मोडण्याचा धोका निर्माण होतो शरीरातील स्नायू कमकुवत होतात हे विपरीत परिणाम होऊ नयेत आणि अंतराळातही अंतराळवीरांना सुरक्षित निरोगी आयुष्य जगता यावे त्यांना त्यांनी स्थानकात पिकवलेले ताजे अन्न खाता यावे म्हणून सतत संशोधन करण्यात येतेय आणि त्यात यशही मिळत आहे आता Scott Kelly,Peggy Whitson आणि Christina Koch ह्यांच्या स्थानकातील दीर्घकालीन वास्तव्यामुळे मानव अंतराळातीळ झिरो ग्रॅव्हीटीतील विपरीत परिस्थितीतही तग धरून राहू शकतो त्याची प्रतिकारक्षमता वाढत जाते आणि पृथ्वीवर परतल्यानंतर काही काळाने ते पुन्हा नॉर्मल आयुष्य जगू शकतात अशा निष्कर्ष शास्त्रज्ञानी काढला आहे Christina आणि Peggy ह्यांनी अंतराळ स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीत महिलांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो ह्याचे निरीक्षण नोंदवून संशोधन केले ह्या शिवाय Christina ने कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या प्रोटीन क्रिस्टल्स च्या अनियंत्रित वाढीवर संशोधन केले आहे अंतराळातील वातावरणाचा त्यावर कसा आणि काय परिणाम होतो ह्याचे निरीक्षण नोंदवले शिवाय त्यावर नियंत्रण आणण्यासाठी उपाय शोधून कॅन्सर बरा व्हावा म्हणून सखोल संशोधन केले Christinaने नासाच्या 59-60-61ह्या तीन मोहिमेतील अंतराळ वीरासोबत वास्तव्य केले
नासाचे अंतराळवीर Christina Koch Luca Parmintano आणी Alexander Skvortsov फोटो -नासा संस्था
Luca Parmintano हे दुसऱ्यांदा स्थानकात राहण्यासाठी गेले आणि त्यांनी आजवरच्या अंतराळ मोहिमांत 367दिवस वास्तव्य केले आणि स्थानकाच्या कामासाठी चारवेळा स्पेसवॉक केला
Alexander Skvortsov ह्यांची हि तिसरी अंतराळवारी होती त्यांनी आजवरच्या अंतराळ मोहिमांत 346 दिवस स्थानकात वास्तव्य केले
ह्या तीनही अंतराळवीरांना पुढील मेडिकल चेकअप साठी कझाकस्थानातील recovery staging city येथे नेण्यात आले पूर्ण चेकअप नंतर हे तीनही अंतराळवीर नासाच्या विमानाने त्यांच्या गावी पोहचतील
No comments:
Post a Comment