Wednesday 1 January 2020

Christina Koch ने प्रस्थापित केला अंतराळस्थानकात जास्ती दिवस राहण्याचा विक्रम


NASA astronaut Christina Koch conducts botany research aboard the International Space Station.

             Christina Koch स्थानकातील वास्तव्यादरम्यान संशोधन करताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -31 डिसेंबर
नासाच्या अंतराळ मोहीम 60-61ची अंतराळवीरांगना Christina Koch हिने नुकताच अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीत जास्त दिवस राहण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे प्रस्थापित केला आहे तिने ह्या आधीचा Peggy Whitson ह्यांचा अंतराळस्थानकात जास्त दिवस वास्तव्य करण्याचा विक्रम मोडला आहे
शनिवारी Christina Koch हिच्या स्थानकातील वास्तव्याला 288 दिवस पूर्ण झाले ह्या आधी Peggy Whitson ह्यांनी अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅविटीत 288 दिवस वास्तव्य केले होते तो रेकॉर्ड Christina हिने मोडला अजूनही Christina स्थानकात मुक्काम करणार असून 6 फेब्रुवारी 2020मध्ये ती पृथ्वीवर परतणार आहे तोवर स्थानकातील तिच्या वास्तव्याचे दिवसही वाढणार आहेत ती 326 दिवस स्थानकात राहणार आहे 14 मार्च 2019ला Christina अंतराळस्थानकात राहायला गेली होती
ह्या आधी अंतराळवीर Scott Kelly ह्यांनी अंतराळस्थानकात जास्त दिवस राहण्याचा विक्रम स्थापित केला होता त्यांनी 2015-16 च्या अंतराळ मोहिमेत सलग 340 दिवस  स्थानकात वास्तव्य केले होते तर सर्वात जास्त दिवस सलग अंतराळस्थानकात राहण्याच्याअंतराळ विरांगनेच्या यादीत Peggy Whitson ह्यांनी 2016-17 सालच्या अंतराळ मोहिमेत रेकॉर्ड स्थापित केला होता Peggy ह्यांनी त्यांच्या पाचवेळच्या अंतराळवारीत स्थानकात 665 दिवस मुक्काम केला आहे
हे तीनही अंतराळवीर त्यांच्या स्थानकातील सायंटिफिक प्रयोगाच्या संशोधनासोबतच अंतराळ स्थानकातील झिरो ग्रॅविटीत जास्त दिवस राहिल्यावर मानवी आरोग्यावर,मानसिक व शारीरिक काय परिणाम होतो त्यांच्या प्रतिकार क्षमतेत,कार्यक्षमतेत काय आणि कसा परिणाम होतो हे अभ्यासण्यासाठी होत असलेल्या प्रयोगात सामील झाले आहेत
Christina Koch ह्या यशाचे श्रेय अंतराळ वीरांगना Peggy Whitson ह्यांना देते ती म्हणते लहानपणापासूनच मी  Peggy ह्यांची फॅन होते त्या माझ्या साठी रोल मॉडेल होत्या मला त्यांच्या सारखेच व्हायचे होते माझे स्वप्न आता साकार झाले आहे हि अलौकिक अनमोल संधी मला मिळाल्यामुळे मी खूप आनंदी आहे जेव्हा माझे  अंतराळस्थानकात राहण्यासाठी सिलेक्शन झाले तेव्हा पासूनच मी Peggy ह्यांचा सल्ला घेतला त्यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केले अंतराळस्थानकातील वास्तव्यादरम्यान दररोजच मला त्यांनी केलेले मार्गदर्शन कामी येते
मी त्यांच्याच पाऊलवाटेवरून चालतेय मीही पृथ्वीवर परतल्यानंतर इतर अंतराळवीरांना मार्गदर्शन करेन
Christina Koch हिने अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅविटीत संशोधना सोबतच स्थानकातील veggie प्रोजेक्ट मध्ये
सहभाग नोंदवून वेगवेगळ्या भाजी व धान्याची जोपासना केली आणि अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी चारवेळा स्पेसवॉक केला शिवाय Christina Koch ने ह्या अंतराळमोहिमेत Jessica Meir सोबत आणखी एक रेकॉर्ड स्थापित केलाय ह्या दोघींनी only Woman Astronaut Space Walk यशस्वी केलाय
Christina ला योगा,रनिंग,पर्वतारोहण,बोटिंग,ट्रॅव्हलिंग आणि फोटोग्राफीची आवड आहे
Christinaच्या ह्या यशाबद्दल Peggy Whitson ,Anne McClain आणि इतर अंतराळवीरांनी अभिनंदन केले आहे

No comments:

Post a Comment