Saturday 4 January 2020

अंतराळवीर Luca Parmintano आणि Jessica Meir ह्यांनी नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांशी साधला लाईव्ह संवाद


अंतराळवीर Luca Parmintano आणि Jessica Meir नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांशी संवाद साधताना -फोटो नासा संस्था

नासा संस्था -
नासाच्या अंतराळ मोहीम 61 चे सध्याचे कमांडर Luca Parmintano आणि Flight Engineer Jessica Meir ह्यांनी मागच्या महिन्यात नोबेल विजेत्या Michel Mayer (Physics),Didier Queloz आणि Stanley Whittingham(Chemistry)  ह्या शास्त्रज्ञांशी अंतराळस्थानकातून संवाद साधला Stockholm मध्ये तेव्हा Nobel Week celebration सुरु होत तिथल्याच Nobel Museum मधून नासा संस्थेने त्यांचा अंतराळवीरांशी लाईव्ह संवाद साधून दिला हि बातचीत हसत खेळत मनमोकळ्या वैज्ञानिक गप्पांनी रंगली
Michel Mayor -हा खरोखरच आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे Luca तुम्ही अंतराळस्थानकातून पृथ्वीकडे पाहण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहात आणि आम्ही इथून फक्त पृथ्वीला तिथून पाहण्याच स्वप्न किंवा ईथुन पृथ्वी पाहण्याची इच्छा करू शकतो अंतराळातून रोजच पृथ्वीकडे पाहताना तुमच्या मनात आता ब्रम्हांडातील सौरमाले बाहेरच्या अज्ञात ग्रहांचा शोध घेण्याची त्यांनाही असेच पाहण्याची इच्छा जागृत होते का ?
Luca - हो ! निश्चितच असं वाटत ! मी माझा अनुभव सांगतोय,मी जेव्हा अंतराळ मोहीम 36-37 अंतर्गत अंतराळस्थानकात राहायला गेलो होतो आणि परतण्याआधीच्या काही दिवस आणि तास उरलेले असताना मी पृथ्वीकडे पाहत होतो पृथ्वीचे सतत बदलते नैसर्गिक नानाविध रंग त्यातला जिवंतपणा व सुंदरता न्याहाळताना क्षणभर आश्चर्यचकित झालो होतो त्या वेळी मला वाटायच,मी Alien असतो आणि परग्रहावरून अंतराळात प्रवास करत असतो तर! नक्कीच मला पृथ्वीवर उतरून ती पाहावी अस वाटल असत त्या वेळेस मला मी पृथ्वीवासी असल्याचा अभिमान वाटला ते माझ भाग्य वाटल,मी ह्या सुंदर जैववैविध्य असलेल्या पृथ्वीवरचा निवासी आहे हा विचारच माझ्यासाठी आनंददायी होता तेव्हा! सध्या तरी ह्या ब्रह्मांडात आपली पृथ्वी हि एकमेव जीवसृष्टी अस्तित्वात असलेला ग्रह आहे कित्येक वर्षांपासून सर्वच देशाचे शास्त्रज्ञ पृथ्वीसारख्या मानवी अस्तित्व आणि सजीवसृष्टी असलेल्या ब्रह्मांडातील ग्रहांचा शोध घेत आहेत आता तर अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत आधुनिक विज्ञान आपल्याला अवगत झाल्याने ह्या प्रयत्नांना वेग आलाय त्यांना अपेक्षित यशही मिळतय मानवाने आता सूर्यावरही अंतराळ यान पाठवलाय त्या मुळे असा ग्रह असेल तर शोध नक्कीच लागेल आणि ती शास्त्रज्ञाची अदभुत कामगिरी असेल मी जेव्हा पृथ्वी निरीक्षण करतो तेव्हा प्रेरित होतो तिची सुंदरता मनाला उल्हसित करते तो क्षण आल्हाददायक असतो आमच्यासाठी!
Queloz -Jessica,तू Marine Biologist आहेस त्या मुळे बाह्यग्रहावरील जीवसृष्ठी बद्दलच तुझ मत ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल तुला काय वाटत जर एखाद्या ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात असेल तर ती कोणत्या स्वरूपात असेल ?
Jessica - आम्हाला Interview मध्ये बरेचदा हा प्रश्न विचारला जातो पृथ्वीबाहेर एखाद्या ग्रहावरील जीवसृष्ठीची शक्यता नाकारण चुकीचे होईल त्या मुळे अशी शक्यता गृहीत धरूनच शात्रज्ञांचे शोध सतत सुरूच आहेत माझ्या मते जर एखाद्या ग्रहावर जीवसृष्ठी अस्तित्वात असेल तर ती आपल्या पृथ्वीसारखी नसेल खूपच वेगळ्या स्वरूपात असेल कदाचित कार्बन वर आधारित नसेल तर molecule (रेणू) च्या स्वरूपात वेगळ्या रूपात अस्तित्वात असेल कदाचित आपल्या कल्पनेपेक्षाही वेगळ्या स्वरूपात! माझ्या मरिन बायॉलॉजी बद्दल सांगायच तर1970 ला माझ्या जन्माच्या वेळी समुद्राच्या अतिशय खोल तळाशी Hydro Thermal Vent चा शोध (मी शिकलेल्या Scribs Institute of Oceonagraphy ह्या संस्थेतील)शास्त्रज्ञांनी लावला होता तो पर्यंत असा समज होता की,पृथ्वीवरची सगळी जीवसृष्ठी सूर्याकडून येणाऱ्या उर्जेवरच अवलंबून असते आणि Photosynthesis मुळेच सजीवसृष्टीचे अस्तित्व आहे पण त्यांनी लावलेल्या ह्या शोधाने हा समज खोटा ठरला ह्या Hydro Thermal vent मध्ये आढळलेली जीवसृष्ठी पूर्णपणे सल्फरच्या साहाय्याने Chemosynthesis करणाऱ्या बॅक्टरीयावर आधारित होती आधी शास्त्रज्ञांना वाटले कि वरून होणाऱ्या बर्फ़वृष्टीमुळे त्यांचे न्यूट्रिशन झाले असेल पण नंतर सखोल संशोधनानंतर असे लक्षात आले की,ह्या सजीवसृष्ठीची वाढ सूर्यप्रकाशावर किंवा त्याच्या उर्जेवर अवलंबून नव्हती तर Thermal vents मधल्या सल्फरमुळे तग धरून जिवंत राहिली म्हणून मला पण वाटत ब्रम्हांडातील एखाद्या ग्रहावर जर जीवसृष्टी अस्तित्वात असेल तर ती सुद्धा अशीच वेगळी असेल आणि ती पाहिल्यानंतर आपलाही जीवसृष्टी बद्दलचा दृष्टीकोन बदलेल
 Mayor- Luca, Space Science Exploration आणि त्यांचे results ह्या साठी संयम,बांधिलकी आणि समर्पणाची गरज असते ह्यात इंटरेस्ट असणाऱ्या तरुण शास्त्रज्ञांना तुम्ही काय सल्ला द्याल? तुमचा अनुभव कसा आहे
तुमच ध्येय काय आहे ? ते साध्य करण्यासाठीची जिद्द चिकाटी आणि मिळवलेल यश ह्या बद्दल सांगा ?
 Luca -दुसरा प्रश्न सोपा आहे आधी त्याबद्दल सांगतो,फक्त शास्त्रज्ञच नाही तर अवकाश संबंधित विज्ञान आणि तंत्रज्ञानात इंटरेस्ट असणाऱ्या सर्वच तरुणांनी त्यांचे कुतूहल,चौकसता जागृत ठेवायला हवी एखादी गोष्ठ आहे तशी न स्वीकारता ती तशी का आहे ह्याचा विचार करून त्याचा मागोवा घ्या आणि उत्तर शोधा ह्या अवकाशात अनेक अनुत्तरित न उलगडणारी कोडी आहेत तुम्ही एक कोडे उलगडायचा प्रयत्न कराल तर दहा नवीन प्रश्न तुम्हाला पडतील म्हणून सतत उत्तराच्या शोधात राहा इथे अंतराळस्थानकात आम्ही दररोज हेच करत असतो,प्रयोग करून संशोधन करत असतो हेच संशोधनाच काम आम्हाला सतत प्रेरित करत नवनवीन उत्तरे शोधायला प्रवृत्त करत मी शास्त्रज्ञ नाही तर तंत्रज्ञ आहे तरीही मी चौकस आहे मलाही आजूबाजूच्या गोष्टींच प्रचंड कुतूहल वाटत
मी सतत उत्तरे शोधतो तज्ज्ञांकडून माहिती घेतो physiology,biology,chemistry,astrophysics अशा अनेक विषयांशी निगडित प्रश्नांची उत्तरे मी माझ्या त्या,त्या विषयातील प्रोफेसर असलेल्या
 मित्रांकडून मिळवतो माझा एक मित्र extra planetary expert आहे त्याच्या कडून जाणून घेतो,पुस्तक वाचतो ह्या सर्व गोष्ठींनी मी प्रेरित होतो माझ ध्येय म्हणाल तर मला space science विभागातील विद्यार्थ्यांसाठी काम करायचय
Queloz-Jessica तुला आम्ही अवघड प्रश्न विचारतोय सध्या सौरमालेबाहेरील ग्रहांचा शोध सुरु आहे त्यांची सखोल संशोधनात्मक माहिती मिळविल्या जातेय तुम्ही अंतराळस्थानकात सध्या करत असलेल्या प्रयोगांपैकी कोणते प्रयोग ह्या आगामी अंतराळ मोहिमेत उपयुक्त ठरतील?
Jessica -आम्ही इथे सायन्सच्या सर्वच विषयांवर संशोधनात्मक शेकडो प्रयोग करत आहोत काही मानवी आरोग्याशी निगडित आहेत काही प्रयोग बेसिक ग्रॅव्हिटेशनल फिजिक्सच्या नियमांवर आधारित आहेत ह्या प्रयोगा अंतर्गत आम्ही ह्या साठी spectrometer वापरून पहिल्यांदाच पृथ्वीच्या वातावरणात शिरणाऱ्या उल्का वर्षावाचे त्यांच्या रचनेचे रासायनिक निरीक्षण नोंदवले आहे आणि ह्या माहितीचा उपयोग सौरमालेतील आणि बाहेरील ग्रहांच्या उत्पत्तीची माहिती मिळवण्यासाठी होईल आणि दुसऱ्या एक प्रयोगामुळे आपल्याला ग्रहांच्या उत्पत्तीबद्दल सखोल माहिती कळेल
Stan Whittingham -Jessica तुम्ही नुकत्याच केलेल्या स्पेसवॉक मध्ये जुन्या Nickel batteries बदलून नव्या Lithium Ion batteries बसविल्या आहेत ह्या नव्या बॅटरीज जुन्या बॅटरीपेक्षा किती वेगळ्या आहेत नोबेल विजेते Stan ह्यांनी Jessicaला विचारल
Jessica - तुम्हीच तर ह्या बॅटरीचे जनक आहात !आम्ही तुमचे खूप आभारी आहोत आणि तुमच्या सारख्या तिन्ही नोबेल विनर शास्त्रज्ञांशी संवाद साधताना आम्हाला  अभिमानास्पद वाटतय हा आमच्या साठीही अविस्मरणीय क्षण आहे
हो! आम्ही जुन्या बॅटऱ्या बदलून नव्या बॅटऱ्या बसविल्या एकतर त्या जुन्या झाल्या होत्या ह्या नव्या बॅटऱ्या वजनाने हलक्या कमी जागा व्यापणाऱ्या,भरपूर प्रकाश देणाऱ्या आहेत आणि त्या पॉवरफुल असल्यामुळे दोन ऐवजी एक बसविल्या तरी चालतात त्या मुळे त्या कमी लागतात शिवाय त्या जास्त दिवस काम करतात आधीच्या बॅटऱ्या सहा वर्ष चालायच्या तर ह्या बॅटऱ्या दहावर्षे चालतात बॅटऱ्या आधीच खर्चिक असतात आणि पृथ्वीवरून इथे आणताना आणखी खर्च वाढतो तुमच्या बॅटऱ्या जास्त काळ प्रकाश देणाऱ्या आणि कमी लागत असल्यामुळे खर्चही कमी होतो आमच्या अंतराळस्थानकात ह्या बॅटऱ्या खूप मोट्या ऊर्जास्रोत आहेत ह्या मोलाच्या योगदानामुळे आम्ही तुमचे ऋणी आहोत
 Wittingham - Luca,तु सांग अंतराळातील अतीतप्त किंवा अती ऊष्ण तापमानाचा lithium ion battery वर काही विपरीत परिणाम होतो का?
Luca- हो! निस्चितच होतो! आम्ही ऊजेडात असतो तेंव्हा स्थानकातील तापमान 150-180c.पर्यंत पोहोचत आणी आम्ही सावलीत किंवा अंधारात असतो तेव्हा स्थानकात अतिशय थंड वातावरण असत-180ते-150 पर्यंत खाली येत ह्या टोकाच्या तापमानात battery च तापमान थर्मली stable ठेवाव लागत त्यासाठी आम्ही स्थानकातील सोलर हिटींग सिस्टीम आणि अमोनिया based कुलींग सिस्टीमचा वापर करतो दिवसा सोलर Arrayमुळे आणी रात्री batteries मुळे प्रकाश आणी ऊर्जा मिळते शिवाय स्थानकातील computer व ईतर कामासाठीही lithium ion batteries च वापरतो आधी आम्हाला वाटल की अतीतप्त वातावरणात batteries burst होतील स्फोट होईल म्हणून आम्ही सुरक्षितते साठी carbon based fire extinguisher,mist based extinguisher मध्ये बदलले आणी सगळीकडे ठेवले सुदैवाने तशी वेळ आली नाही आता आमची अशी ईच्छा आहे की ह्या batteries ची expiry
डेट संपल्यावर आम्हाला त्याचा ऊपयोग आग विझवण्यापेक्षा shower सारखा करता यावा Luca गमतीने म्हणाले
नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांनी नंतर ह्या दोन अंतराळ वीरांना त्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली
Jessica - मलाही तुम्हाला तोच प्रश्न विचारायचाय! ब्रह्मांडातील मानवाला अज्ञात असलेल्या ग्रहावर जर जीवसृष्टी अस्तित्वात असेल तर ती कशी असेल ? तुमच मत काय आहे ?
तुम्ही बायालॉजिस्ट असल्याने मला तुमच ह्या बाबतीतला दृष्ठीकोन ऐकायला आवडला मलाही असच वाटत ह्या विषयावर वेगवेगळ्या दृष्ठीकोनातून बघायला हव शक्यता अश्यक्यता ह्यावर विचार करायला हवा chemistry ,astrophysics च्या माध्यमातून विशेषतः chemistry सध्या ह्या विषयात बरेच प्रगत संशोधन होतेय जीवसृष्ठी ज्या अमिनो acids पासून बनली आहे त्याच्या उत्पत्तीबद्दल संशोधन सुरु आहे खरेतर जीवन हि एक chemistry च आहे त्या ग्रहांवरच्या वातावरणावर जीवसृष्ठीची निर्मिती अवलंबून असेल ते जीवनिर्मितीसाठी पोषक होत का आहे का? ज्या मुळे रासायनिक प्रक्रिया होऊन सजीवांची उत्पत्ती झाली किंवा होऊ शकेल अशा दोन्ही बाजूने सखोल विचार करायला हवा अजून आपल्याला बरीच मजल गाठायची आहे ह्या दहा वर्षात शास्त्रज्ञांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन आपल्या सौरमाले बाहेरीलही ग्रह शोधले
 आहेत काही ग्रहांवर पृथ्वीसारखे वातावरण असल्याचा शोध लागलाय आता आगामी काळातील अंतराळ मोहिमात नव्या अत्याधुनिक प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अत्याधुनिक James Web Telescope च्या साहाय्याने आणी येत्या पन्नास वर्षात ह्याहुनही प्रगत अत्याधुनिक यंत्रांच्या साहाय्याने नक्कीच एखाद्या ग्रहावरच्या संभाव्य अज्ञात जीवसृष्ठीचा शोध लागेल मंगळावर जीवसृष्टी असण्याची शक्यता वाटल्यानेच मानवाने तिथे मंगळयान पाठवले आणि तिथे पूर्वी जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचे पुरावे मिळत आहेत आगामी  मानवासहित मंगळमोहिमेत आणखी शोध लागेलच आपण थोडी वाट पाहूया ! तुम्हालाही जायला आवडेल का ?
Jessica -हो ! आम्ही दोघेही आनंदाने मंगळावर जाऊ
Luca - शेवटी माझा तुम्हा तिघांनाही छोटासा प्रश्न -आम्हाला नेहमी विचारल जात कि,अंतराळवीर होण्याच तुमच स्वप्न होत का ? तुम्ही तर नोबेल विजेते आहात हा तुमचा जीवन गौरव आहे पण मला अस विचारायचय तुम्हाला माझ्या जागी इथे यायला आवडेल का ?
 Whittingham- अवघड आहे ! आता ह्या वयात? पण तरुणपणी म्हणाल तर नक्कीच हो !
 Mayor- I am not sure!
 Queloz - Yes ! नक्कीच हो ! कारण Astronauts पण Nobel Prize मिळवू शकतात ना !

No comments:

Post a Comment