नासा Astronauts Jessica Meir आणी Christina Koch विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद साधताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -24 जानेवारी
नासाच्या अंतराळ मोहीम 61च्या महिला अंतराळवीर Christina Koch आणी Jessica Meir ह्यांनी नुकताच अमेरिकेतील पनामा येथील इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली
सुरवातीला International School च्या टीचर Dani Di Pietro ह्यांनी Christina आणि Jessica शी संवाद साधला आणि त्यांना त्यांच्या शाळेतील 1400 विध्यार्थी आणि अमेरिकेच्या विविध भागातून आलेले विध्यार्थी तुमच्याशी संवाद साधायला उत्सुक असल्याचे सांगत सर्वांतर्फे त्यांनी बोलण्यासाठी वेळ दिल्याबद्दल आभार मानले आणी संवादाला सुरवात केली
Panama International School चे विध्यार्थी Jessica Meir आणी Christina Koch ह्यांच्याशी लाईव्ह संवाद साधताना फोटो -नासा संस्था
Dani - " Hey girls You Rock "! congratulations for your Historical Only Woman Space Walk " असे म्हणत त्यांचे अभिनंदन केले आणि संभाषणाला सुरवात झाली
सर्वात आधी सगळ्यात लहान Kinder garden मधल्या मुलीन प्रश्न विचारला
Christina जेव्हा तु पहिल्यांदा अंतराळ स्थानकातून पृथ्वीकडे,आपल्या देशाकडे आणि शहराकडे पाहिलस तेव्हाचा क्षण कसा होता ?
Christina - खूप छान प्रश्न विचारलास ! खूपच अद्भुत अनुभव होता तो ! मला अजूनही आठवतो तो क्षण ! मी अंतराळातून पहिल्यांदा जेव्हा पृथ्वीकडे पाहील तेव्हा पृथ्वीच ते अलौकिक अद्भुत सौन्दर्य पाहून क्षणभर स्तब्ध झाले आणि श्वास रोखून मी माझ्या नॉर्थ Carolina ह्या शहराकडे पाहील तेव्हा आणि अजूनही कित्येकदा माझ्या देशाकडे,शहराकडे पाहण्याचा तो क्षण अद्भुत असतो आनंददायी असतो ! आपण नकाशात पहातो तसच ह्या खऱ्या जगाच्या नकाशात आम्ही आपला देश शहर पाहण्याचा आनंद घेतो आणि त्यातले वेगवेगळे देश आणि राज्य ओळखायला मला खूप आवडत
Sonia-(6th )- सध्या मानवी वास्तव्यासाठी पृथ्वी हे एकमेव ठिकाण आहे आणि म्हणूनच आमची पिढी आमच्या भावी आयुष्यासाठी पृथ्वीच्या रक्षणासाठी प्रयत्न करतेय आगामी Artemis Mission त्या साठी किती उपयुक्त ठरेल असे तुला वाटते ?
Jessica- पृथ्वीची काळजी घेण हि चांगली गोष्ट आहे आपण आपल्या घराची काळजी घेतो तशीच शेवटी पृथ्वी म्हणजे आपल घरच ! चंद्र मंगळ ह्या ग्रहांच सखोल संशोधन करताना,निरीक्षण नोंदवताना आम्हाला पृथ्वीसंबंधित आणखी माहिती मिळते इतर ग्रहांसारखीच पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली आणि त्या नंतरचा सजीव सृष्टीचा विकास कसा झाला असावा ह्याची नव्याने माहिती होते आणि पृथ्वी वरील पर्यावरणाच योग्य संतुलन राखण्यासाठी काय करायला हव ह्याचीही जाणीव होते
Artemis program मध्ये आताच्या चांद्र मोहिमेसाठी आणि आगामी मंगळ मोहिमेसाठी अत्याधुनिक अद्ययावत तंत्रज्ञान विकसित केल्या जातेय भविष्यातील परग्रहावरील मानवी वास्तव्यासाठी आवश्यक गोष्टींचे (घर,शेती आणि इतर गोष्टी ) योग्य नियोजन करण्यासाठीचे संशोधित आराखडे तयार करण्यात येतेय नवीन यांत्रिक उपकरणे,हार्डवेअर,सॉफ्टवेअर ह्यावर सखोल संशोधन करण्यात शास्त्रज्ञ व्यस्त आहेत आणि आम्ही इथे करत असलेल्या संशोधनाचा उपयोग पृथ्वीवरील अनेक क्षेत्रात होतो आम्ही अंतराळ स्थानकातील किंवा यानासाठी बनविलेला रोबोटिक आर्म अंतराळवीरांना अवजड वस्तू उचलण्यासाठी आणि इतर कामासाठी होतो तसाच तो पृथ्वीवरील हॉस्पिटल्स मध्ये Nero Surgery करण्यासाठी झालाय आणि इतर क्षेत्रातही होतोय तसाच फायदा Artemis program मधल्या संशोधनाचा होईल एखादे नवे तंत्रज्ञान शोधताना असे अनेक उपयुक्त अनपेक्षित फायदेही होतात
Samuel -8th- Christina तुझी निवड जर Artemis Program मध्ये सहभागी होण्यासाठी झाली तर चंद्रावर जाऊन तुला कुठला प्रयोग करायला आवडेल ?
Christina -माझी निवड होण माझ्यासाठी अभिमानास्पद असेल तशी विशिष्ठ प्रयोगाची निवड करण कठीणच असेल कारण तिथे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीन करता येण्यासारखे खूप महत्वपूर्ण प्रयोग आहेत काही आपल्या सौरमालेतील अज्ञात अनुत्तरित गोष्टीची उकल करणारे असतील पण मला स्वत:ला तंत्रज्ञान आवडत त्या मुळे त्यातच विकसित संशोधन आणि operation development करायला आवडेल माझ्या मते चंद्रावर वास्तव्यासाठी जाण म्हणजे आगामी मंगळ मोहिमेची तयारी करण शिवाय माझ्यासाठी सर्वात महत्वाच म्हणजे ह्या ब्रह्मांडात आपण पृथ्वीवासी एकटेच आहोत की,आपल्यासारखी सजीवसृष्टी अस्तित्वात असलेल्या ग्रह ह्या ब्रह्मांडात आहे ? ह्याचा शोध घेण आणि ह्याच गुढ कदाचित मंगळावर गेल्यावर उकलेल म्हणून मी चंद्राचा उपयोग Test Bed सारखा करेन मंगळ मोहिमेसाठीच्या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी करेन आणि कदाचित मंगळावरील जीवसृष्टी शोधण्यासाठी ते उपयुक्त ठरेल
Jaun-(1st)- स्पेससूट घातल्यानंतर जर शरीरावर खाज सुटली तर तुम्ही काय करता ?
Christina -हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे आणि आम्हा दोघींना स्पेसवॉक करताना हि समस्या उदभवते स्पेससूट घातल्यावर सहजतेने चेहऱ्याला हात लावता येत नाही आमच्या हेल्मेट मध्ये एक छोटस उपकरण Valsalva Device बसविलेले असते जे आम्हाला आमचे कान मोकळे करायला उपयोगी पडत पाण्यात डुबकी मारली कि पाण्याच्या आणि हवेच्या प्रेशर मधील फरकामुळे जसे आपल्याला कान मोकळे करावे लागतात तसेच अंतराळातील प्रचंड प्रेशरच्या संपर्कात आल्यावरही अशी समस्या उदभवते ह्या उपकरणाचा वापर आम्ही खाजवण्यासाठी करतो मी अंतराळात स्पेसवॉक करताना माझ्या नाकाला खाज सुटली तेव्हा मी ते उपकरण खाली आणून नाक खाजवल !
Lilly & katalina -(3rd) -Christina तुझ्यासाठी स्पेस स्टेशन मधला सर्वात भीतीदायक क्षण कोणता होता?
Christina -जेव्हा मला t.v. वर लाईव्ह Interview द्यायचे असतात तो क्षण माझ्यासाठी घाबरवणारा असतो! सगळ्यात भीतीदायक क्षण मी मार्च एप्रिलच्या माझ्या पहिल्या स्पेसवॉक मध्ये अनुभवला आमच्या स्पेससूट मधली सर्व हवा बाहेर काढून आम्ही स्पेसवॉक साठी तयार होतो स्थानकाच hatch उघडल गेल आणी आम्ही बाहेर पडलो तेव्हाचा क्षण! माझ्या पायाखाली स्थानकाचा परिचित तळ नव्हता निर्वात पोकळीतील प्रचंड काळोख आणी प्रकाशाचा मागमूस नसलेल प्रचंड अंतराळ! क्षणभर हृदयाची धडधड वाढली!पण दुसऱ्याच क्षणी मला माझ्या कर्तव्याची,काम पूर्ण करण्याच्या जबाबदारीची जाणीव झाली,मी स्वत:ला सावरत भीतीवर मात केली परिस्थितीला सामोरे गेले आणि यशस्वीही झाले!
Karim -(3rd)- अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅविटीत पृथ्वीच्या विपरीत परिस्थितीत तुम्ही तुमचे मानसिक स्वास्थ कसे राखता ? अंतराळवीर Mindfulness चा सराव करतात का ?
Jessica - हा महत्वाचा मुद्देसूद प्रश्न आहे!खरोखरच आम्ही इथे पृथ्वीच्या विपरीत आणि धोकादायक परिस्थितीत
वास्तव्य करतो अशा वेळेस मानसिक स्थिती सांभाळण्याची गरज असते प्रत्येकजण आपल्या परीने त्याला सामोरे जातो प्रत्येक क्षणी जागृत राहावे लागते लक्ष केंद्रित करण थोडक्यात एकाग्रता आवश्यक असते इथे येण्याआधी आम्हाला सहा वर्ष विशेष ट्रेनींग दिल्या जात त्या वेळेस ह्या गोष्टी शिकवल्या जातात स्पेससूट घालून अंतराळासारख्याच तयार केलेल्या कृत्रिम वातावरणात आम्ही स्पेसवॉकची प्रॅक्टिस करतो प्रत्यक्षातला खराखुरा अनुभव वेगळा असतो रोमांचकारी असतो पण प्रॅक्टिसमुळे आमच्या शरीरातल्या स्नायूंना सवय होते त्या मुळे प्रत्यक्षात अंतराळात काम करताना आमचे स्नायू स्मृतीप्रमाणे कार्यरत होतात! त्या मुळेच आम्ही सतर्क राहू शकतो !
Tiago (3rd)- Christina तू पृथ्वीवर परतल्यावर सगळ्यात आधी काय करणार आहेस ?
Christina - मी दोन आठवड्यात इथला मुक्काम संपवून पृथ्वीवर परतणार असल्याने मी त्याचाच विचार सध्या करतेय ! मी माझ्या कुटुंबियांना विशेषतः माझ्या नवऱ्याला भेटायला उत्सुक आहे मला त्यांच्या सोबत राहायला आवडत तसच बाहेर फिरायलाही ! माझ घर समुद्राजवळ असल्यामुळे मला किनाऱ्यावर फेरफटका मारायलाही खूप आवडत त्या मुळे मी केव्हा तिथे जाते आणी फेरफटका मारते असं झालय मला !
Nihilo -(3rd)- Jessica तू पृथ्वीवरची कुठली गोष्ट सर्वात जास्त miss करतेस ?
Jessica -आम्हाला नेहमीच हा प्रश्न विचारला जातो पण मला माझच आश्चर्य वाटत कि मी काही miss केलय असं मला का वाटत नाही? अर्थात माझ्या परिवाराला मित्रमैत्रिणींना मी miss करतेच पण तरीही इथला हा अलौकिक नाविन्यपूर्ण रोमांचकारी अनुभव पहाता मला तस वाटत असाव इथे नवनवीन विषयांवर संशोधन करायला मिळतात स्थानकाच्या खिडकीतून पृथ्वीच अभूतपूर्व सौन्दर्य पाहायला मिळत स्वप्नातच पाहायची इच्छा करणाऱ्या मला ग्रहताऱ्यांना जवळून पाहायला त्याचा अभ्यास करायला मिळत आणि अंतराळात तरंगत्या अवस्थेतला स्पेसवॉकचा अनुभव तर अविस्मरणीयच ! हे सार मला पृथ्वीवर राहून करता आल नसत त्या मुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतेय! खरच इथल तरंगत्या अवस्थेतल वास्तव्य रोमांचकारी आहे !
Lia -(5th)-Christina अंतराळातून पृथ्वीवरील बदलत वातावरण दिसत का ?
Christina -हो! पृथ्वीवरचे हिमनग वितळताना त्यांच्या आकारात होणारे बदल आणि वितळलेल्या बर्फाच्या पाण्याने निर्माण झालेले Glaciers आम्ही सहजतेने इथून पाहू शकतो आम्ही दोघीनींही Glacier वर होणारे परिणाम पाहिले आहेत शिवाय पाण्याच्या कमीजास्त होणाऱ्या स्थरामुळे बेटांच्या क्षेत्रफळात होणाऱ्या बदलांचे आम्ही निरीक्षण केलय इथे आम्ही पृथ्वीवरच्या बदलाच्या अभ्यासासाठी सतत संशोधनात्मक प्रयोग करत असतो
Alan -(5th)- Jessica Artemis मोहिमेसाठी अंतराळवीर निवडीचे निकष काय आहेत ?
Jessica -नेमके निकष काय आहेत हे मी सांगू शकत नाही कारण मी निवड समितीत नाही पण नक्कीच बाकीच्या अंतराळ मिशन पेक्षा वेगळे नसणार !अंतराळवीरांना ऑल राऊंडर असण,सर्वच क्षेत्रातल सखोल ज्ञान असण आवश्यक असत शाळेत जस अभ्यासा व्यतिरिक्त खेळ कला ह्या गोष्टी आवश्यक असतात तसच त्याच्यात नेतृत्व गुण,त्वरित निर्णयक्षमता आणि सर्वांशी जुळवून घेऊन टीमवर्क करता यायला हव स्थानकातील सहा महिन्यांच्या एकत्रित वास्तव्यात आनंदाने राहण्यासाठी हे गुण उपयुक्त ठरतात बरचस Camping trip सारखच शिवाय इथे आपली आणि आपल्यासारखीच इतरांचीही काळजी घेता यायला हवी आणि टीमबद्दल सांगायच झालं तर मूलभूत क्षेत्रातले तज्ञ डॉक्टर्स,इंजिनिअर्स,सायंटिस्टची निवड प्रथम केली जाते
Andreas - (7th)- Jessica अंतराळात पृथ्वीपेक्षा वेगळी स्वप्ने पडतात का ?
Jessica - हो! इथल्या स्वप्नांच निश्चितच वेगळेपण आहे आम्ही एका स्लीपिंग बॅग मध्ये झोपतो आणि ती बॅग स्थानकाच्या भिंतीला अडकवलेली असते आम्ही तरंगत्या अवस्थेतही इथे खूप गाढ झोपतो आणि आमची झोपही आरामदायी असते त्या मुळे माझ्या स्वप्नातही मी कधी तरंगत्या अवस्थेत असते तर कधी मी पृथ्वीवर असते
Isabella -(7th)- Jessica-अंतराळ स्थानकातील वास्तव्यामुळे तुझ्या जीवनाकडे आणि जगाकडे बघण्याच्या दृष्ठीकोनात काही बदल झालाय का ?
Jessica -हो !निश्चितच! इथे येण्याआधी मी पृथ्वी किती अनमोल आहे आणि सुंदर आहे असा विचार करायची तीच महत्व जाणवायच इथे आल्यावर वरून पृथ्वीकडे पाहताना पृथ्वीवरच विरळ वातावरण जमीन,समुद्र स्पष्टपणे पाहता आल आणि पृथ्वीवरच विरळ वातावरण पाहताना भावी पिढीसाठी हे वातावरण राखण त्याची काळजी घेणं किती आवश्यक आहे ह्याची प्रकर्षाने जाणीव झाली तसच ह्या प्रचंड ब्रम्हांडात आपण जेव्हा पृथ्वीपासून दूर जातो तेव्हा आपण किती क्षुल्लक आहोत ह्याची जाणीव होते आपणच नाही तर पृथ्वीसुद्धा ह्या सौरमालेत एक छोट्या बिंदूसमान भासते मी आणि Christina नेहमीच ह्या बद्दल बोलत असतो आम्ही स्पेसवॉक केला तेव्हा Martin Luther king डे होता तेव्हा मला त्यांच वाक्य आठवल ते म्हणाले होते आपण सगळे वेगवेगळ्या बोटीतून आलो असलो तरीही आता आपण एका ship मध्ये प्रवास करतोय मला ते खूप योग्य वाटत
Ronia -(7th)- Christina तुझी निवड जर चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली महिला अंतराळवीर म्हणून झाली तर सगळ्यात जास्त कशाबद्दल उत्साहित असशील ?
Christina -Oh ! माझ्यासाठी आनंदाची अभिमानाची गोष्ट असेल ती! मी नशिबवान समजेल असं झालं तर! सर्व मानवजातीच प्रतिनिधित्व मी करत असल्याने आधी त्यांची स्वप्न त्यांच कुतूहल पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि महत्वाच म्हणजे ज्यांनी ज्यांनी चिकाटीने कष्टाने अत्यंत कठीण परिस्थितीत मला तिथे पोहचवण्यासाठी मदत केली त्या सर्वांची मी ऋणी राहीन
Lucos -(8th)- Jessica आगामी अंतराळ मोहिमांत मानव चंद्रावर किंवा मंगळावर जाऊन मानवी वस्ती तयार करण्यात स्वयंपूर्ण होण्यात यशस्वी होईल असं तुला वाटत का ?
Jessica - हो! निश्चितच ! आपल्याकडे क्षमता आहे अर्थात कायमस्वरूपी वास्तव्य हे तिथल्या राहण्यायोग्य वातावरणावर funding आणि नासा च्या Administration वर अवलंबून असेल शास्त्रज्ञाचे आजवरचे संशोधन अंतराळवारीतील अंतराळयानाने गोळा केलेला अभ्यासपूर्ण डाटा नवे शोध आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान त्या साठी कामी येईल आम्ही इथे त्या साठी सतत संशोधन करत असतो झिरो ग्रॅविटीत मानवी शरीरावर जास्त काळ राहिल्यावर होणारे परिणाम,इथल्या प्रतिकूल परिस्थितील शरीरात होणारे बदल आणि अंतराळ वीरांना लागणाऱ्या अन्न भाजीपाला,फळांची लागवड ह्या सारख्या प्रयोगात आम्हाला यशही मिळालय त्या मुळे आता लवकरच चंद्रावर पहिली महिला आणि पुरुष अंतराळवीर जातील तेव्हा मंगळ मोहिमेसाठी तो मैलाचा दगड ठरेल ती पुढची पायवाट असेल अशी आशा आम्हा सर्वांनाच आहे
शेवटी पुन्हा एकदा ह्या दोघींचे अभिनंदन करून आभार मानत निरोप घेतला
No comments:
Post a Comment