यवतमाळ येथील साहित्य संमेलनात साहित्याव्यतिरिक्त इतर कलांच्या प्रदर्शनांचे स्टॉल्स प्रवेशद्वाराजवळच लावलेले होते दुसऱ्या दिवशी शनिवार व रविवारअसल्याने नागरिकांची गर्दी होती शिवाय महाविद्यालयीन आणि शाळेची सहलच संमेलनात आली असल्याने विद्यार्थ्यांचीही गर्दी होती
प्रवेशद्वारावरच एक लोककलाकार गाडगेबाबाच्या वेशात तोंडावर गाडगे घालून येणाऱ्या जाणाऱ्यांचे प्रबोधन करत होता
तरुणाईप्रमाणेच काही कुटुंबीयही प्रवेशद्वारासमोर सेल्फी घेण्यात मग्न होते त्या मुळे लोकांना आत जाण्या येण्या साठी थांबावे लागत होते प्रवेशद्वाराजवळच पोलिसांचा मदत कक्ष असल्याने कडक सुरक्षा आणि लोकांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम पोलीस करत होते संमेलन स्थळाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळही पोलीस तैनात होते
आत वऱ्हाडी पदार्थांचे स्टॉल्स होते तिथे मांडे,गोळा भात,वऱ्हाडी नागपुरी पोहे वै पदार्थांचा आस्वाद लोक घेत होते एकूणच लोक संमेलनाचा उपयोग पर्यटन स्थळासारखा करताना दिसत होते
कार्यक्रमाप्रमाणेच संमेलन स्थळी लावलेल्या पुस्तकांच्या स्टॉललाही लोक भेट देत होते विशेष म्हणजे संमेलनात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील नामांकित प्रकाशन संस्थेची आणि नवोदित प्रकाशन संस्थेची असंख्य स्टॉल्स लावलेली होती प्रत्येक स्टॉलच्या रांगेत सुरवातीलाच प्रकाशन संस्थेची यादी लावलेली असल्याने लोकांना स्टॉल शोधणे सोपे झाले होते विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकाच्या दुकानात गर्दी केली होती काही महिला पोलिसही ड्युटी सोबतच पुस्तके हाताळण्यात व्यग्र होत्या मुंबईच्या मुक्त शब्द प्रकाशनाचा स्टॉल रिकामा होता पण त्यावर निषेधाचा आणि बहिष्काराच्या संदेशाचे फलक लावले होते
संमेलनात लोकांना किल्ल्यांची माहिती व्हावी म्हणून त्यांचे फोटो व माहिती लावलेली होती
.
संमेलनात आर्णीच्या सचिन नार्लावार ह्यांचे नैसर्गिक लेण हे काष्ठशिप प्रदर्शनही लोकांना आकर्षित करत होते

No comments:
Post a Comment