Thursday 10 January 2019

नयनतारा सहगल ह्यांच न होणार भाषण प्रिंट माध्यमातून आणि सोशल मीडियावर प्रकाशित

नयनतारा सहगल

यवतमाळ -8 जानेवारी
यवतमाळ येथे 11-12 व 13 जानेवारीला संपन्न होणारे साहित्य संमेलन अनेक कारणांनी वादग्रस्त ठरले खरे तर यवतमाळात बऱ्याच वर्षांनी साहित्य संमेलन होणार आणि यवतमाळवासीयांना साहित्यिक मेजवानी मिळणार म्हणून यवतमाळकर आनंदित होते पण इथल्या लोकांना भेडसावणाऱ्या समस्या लोकांनी पाठपुरावा करून मोर्चे काढून निषेध नोंदवूनही संपल्या नाहीत उलट वाढतच आहेत त्या मुळेच सुरवातीला मागण्या मान्य करा नाहीतर संमेलन होऊ देणार नाही असा इशारा दिल्या गेला त्या मुळेच लोकांचा विरोध वाढीला लागला
त्या नंतर संमेलनाच्या उद्घाटनाला नयनतारा सहगल ह्यांना निमंत्रण दिल्या गेले आणि त्या इंग्रजी लेखिका आहेत म्हणून त्यांच्या नावाला विरोध झाला आणि जर त्यांच्या हस्ते उद्घाटन केले तर संमेलन हाणून पाडण्याचा इशारा पुन्हा एकदा दिला गेला शिवाय नयनतारा सहगलांनी त्यांच्या भाषणाची प्रत आधी पाठवली ते वाचल्यानंतर पुन्हा वादाला तोंड फुटले आणि मग त्वरित निर्णय बदलून नयनतारा ह्यांना आधी बोलावले असतानाही पुन्हा येऊ नका म्हणून कळवले गेले हि त्या लेखिकेची नामुष्कीच!
विशेष म्हणजे त्या कोणी सामान्य लेखिका नव्हत्या तर नामवंत लेखिका आहेत आणि माजी पंतप्रधान कै.जवाहरलाल नेहरूंच्या बहिणीच्या कन्या आहेत म्हणजे त्या राजकीय दृष्ठ्या देखील असामान्य आहेत त्यांचा असा अपमान करायला नको होता अशीच यवतमाळकरांची भावना आहे
साहित्य संमेलनात लेखकांची मांदियाळी जमते मग तो लेखक कुठल्या भाषेत व्यक्त होतो ह्याला महत्व नसते भाषेला महत्व देण्यापेक्षा त्याच्या व्यक्त होण्याला महत्व देणे गरजेचे होते
साहित्य संमेलन मराठी भाषिकांच होत हे तर आधीच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतील संबंधितांना माहीत होते मग नयनतारा सहगल इंग्रजी भाषिक साहित्यिक आहेत हे त्यांना माहीत नव्हते का ? असे असताना त्यांना निमंत्रण देताना ह्या गोष्टीचा विचार का केला गेला नाही? त्यांना मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून निमंत्रण का दिले गेले आणि दिलेच तर पुन्हा का रद्द केले हि गोष्ठ अपमानास्पद आहेच म्हणूनच मान्यवर लेखकांनी,पत्रकारांनी निषेध नोंदवत संमेलनाला येण्यास नकार दिला आहे
आपल्या भारतात लोकशाही नांदतेय लोक दररोज आपल्या भावना वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करतात तसेच नयनतारा ह्यांनीही आपल्या भावना भाषणातून व्यक्त केल्या प्रत्येकाला बोलण्याच अभिव्यक्त होण्याच स्वातंत्र्य आहे मग त्यांच्यावरच अपमानित होण्याची वेळ का यावी? नक्कीच ह्यात राजकारण आहे अस लोकांना वाटू  
लागलय
म्हणूनच नयनतारा सहगलांच न होणार अध्यक्षीय भाषण माध्यमावरून नयनतारा सहगल ह्यांनीच प्रसिद्ध केलय
92 वर्षीय नयनतारा सहगल अजूनही तेव्हढ्याच उत्साही आणि कार्यरत आहेत आपल्या मतांवर ठाम आहेत स्वातंत्र्य पूर्व काळातील आणि राजकीय घराण्यातील असल्याने त्यांना स्वतंत्र भारतातील अन्यायाची चीड येतेय आपल्यावर झालेल्या अन्यायाने आणि अपमानाने त्या व्यतीत झाल्या आहेत आणि म्हणूनच त्यांनी त्यांच न होणार भाषण प्रिंट माध्यमातुन सोशल मीडियावर प्रकाशित केलय जवळपास सर्वच चॅनेल्स वरून दिलेल्या मुलाखतीतून आपली बाजू मांडलीय
पुण्यातील काही विद्यार्थ्यांनीही ह्या भाषणाच्या प्रति काढून कॉलेज मध्ये वाटल्या आहेत ह्या भाषणावर मुख्यमंत्रांनी आक्षेप घेतल्याच बोलल जाताच मुख्यमंत्रांनी मला ह्यात ओढू नका माझा संबंध नाही अस स्पष्ट केल
तर आयोजक आणि महामंडळ ह्या चुकीचा दोष एकमेकांना देत असतानाच पुन्हा एकदा नयनतारा सहगल ह्यांनी राजकीय दबावा मुळेच माझ निमंत्रण रद्द केल असा आरोप केला आहे
आयोजकांना माझे विचार,माझी मते आणि माझे लेखन ह्या विषयी पूर्ण माहिती होती त्यांनी आनंदाने मला निमंत्रित केले होते आणि मीही ते आनंदाने स्वीकारले होते आणि येण्याआधी माझे भाषण मी पाठवले ते मंत्र्यांना रुचले नाही म्हणूनच राजकीय दबावाखाली माझे निमंत्रण रद्द करून न येण्याविषयी कळवल्याचा खुलासा त्यांनी सामना दैनिकातून केला आहे

No comments:

Post a Comment