92 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे अध्यक्षीय भाषण करताना
यवतमाळ -११ जानेवारी
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला यवतमाळात सकाळी ग्रंथ दिंडीने सुरवात झाली नयनतारा सहगल ह्यांना उद्घाटनाला बोलावून पुन्हा त्यांना येऊ नका असे पत्र पाठवून अपमानित केल्यानंतर आणि शेतकरी संघटनेच्या मागण्या मान्य करा नाहीतर संमेलन उधळून लावू अशा धमकीवजा इशाऱ्यानंतर मान्यवरांनी ह्या संमेलनाकडे पाठ फिरवली मान्यवर लेखक,पत्रकार ह्यांनी संमेलनाचा निषेध नोंदवत संमेलनाला येण्यास व उद्घाटक म्हणून निमंत्रण स्वीकारण्यासही नकार दिला तेव्हा संमेलन होईल कि नाही असे यवतमाळकरांना वाटत होते
पण वेळेवर उद्घाटनाला आत्महत्त्या ग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीला निमंत्रित करून ह्या संमेलनाला सुरवात झाली पण नयनतारा सहगलांच्या निमंत्रण वापसीचे सावट संमेलनावर होतेच शेवटी दोघींच्या साहित्यिक योग्यतेत फरक होताच
उद्घाटक वैशाली येडेनिही नवऱ्याच्या आत्महत्येला सरकारी व्यवस्था जबाबदार असल्याचे सांगून अडचणीच्या वेळेस नयनतारा चालत नाही तर आम्हीच चालतो असे म्हणत नयनतारा ह्यांच्या आरोपाला पृष्ठि देत सरकार झुंडशाहीपुढे झुकले असेच सूचित केले माझ्या नवऱ्याने परिस्थिती पुढे हार मानून आमचा विचार न करता आत्महत्त्या केली असली तरीही मी हार न मानता परिस्थीतीशी लढणार आहे अस तिने सांगितल
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख ह्यांनी देखील त्यांचे भाषण संपण्याआधी अध्यक्षीय अधिकारातून काही वेळ वाढवून ह्या प्रकाराबद्दल निषेध नोंदवून सडेतोड वक्तव्य केले
मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आपल्या भाषणातून अन्यायाला वाचा फोडताना
भाषणाच्या सुरवातीस ते म्हणाले कि आयोजकांनी आमचे खूप छान स्वागत केले पण नयनतारा सहगल इथे आल्या असत्या तर संमेलन अजून छान झाले असते त्यांचे विचार लोकांना ऐकायला मिळाले असते त्या उच्च प्रतीच्या लेखिका आहे ,इथे नयनतारा सहगल उदघाटनाला येणार होत्या पण झुंडशाहीला आणि त्यांच्या भाषणाला घाबरून त्यांना अपमानित करून त्यांना न येण्यास सांगितले गेले हे कोणी आणि का केले हे कदाचित कधीही समोर येणार नाही पण हि बाब अत्यंत खेदजनक आहे लज्जास्पद आहे महामंडळाचा अध्यक्ष म्हणून अप्रत्यक्षपणे मीहि अपराधी आहे,प्रक्षुब्ध आहे,व्यथित आहे,चिंतीत आहे त्यांच्यासाठी जशी हि बाब लज्जास्पद आहे तशीच माझयासाठीही ! माझी मान आज शरमेने खाली गेली आहे निमंत्रण वापसीच्या पापात अध्यक्ष म्हणून ह्या न केलेल्या पापात दुर्दैवाने मीही सहभागी आहे म्हणूनच मी व्यथित आहे
नयनतारा सहगल इथे आल्या असत्या तर काय आकाश कोसळले असते का?
कि राजकीय भूकंप झाला असता ?
त्यांच्या इंग्रजी साहित्यावर अमराठीपणावर आक्षेप घेतला गेल्याने की झुंडशाहीला घाबरून दडपणाखाली हा निमत्रंण वापसीचा निर्णय घेतला गेला ?
कदाचित हे कधीही कळणार नाही! मंत्र्यांनी आमचा संबंध नसल्याच म्हटलय तर आयोजक आणि निमंत्रक एकमेकांना दोष देत आहेत असे असले तरीही नागरिक सुज्ञ आहेत महामंडळांनी आक्षेप का घेतला नाही ?
ते चूप का बसले ? असं ह्या पुढे होता काम नये नाहीतर अजून कटू प्रसंग येतील अशा प्रसंगी आक्षेप घेता आला पाहिजे साहित्य संमेलनात आता वैचारिक स्वातंत्र्य उरले नाही निरंकुश,निर्भेळ वातावरण उरले नाही अशी लाजिरवाणी घटना पुन्हा घडता कामा नये म्हणूनच मी चिंतीत आहे व्यथित आहे
खरेतर नयनतारा सहगल ह्याच लेखन उच्चस्तरीय आहे त्या नामवंत राजकीय घराण्याशी संबंधित व्यक्ती आहेत
त्यांची मते ठाम आहेत त्यांच्या मामेबहिणीच्या म्हणजेच आणीबाणीच्या विरोधात त्या सहभागी होत्या त्यांनी पुरस्कारही परत केला होता त्या प्रामाणिक आणि निर्भीड लेखिका आहेत भारतात सर्वधर्मीय व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे महाराष्ट्राची परंपरा उदारमतवादी असताना महामंडळाच्या ह्या असहिष्णू वृत्तीमुळे ह्या परंपरेला तडा गेला आहे हि गोष्ठ महामंडळाला अशोभनीय आहे झालेली चूक भरून काढण अशक्य असली तरी आवश्यक आहे नाहीतर वेगळा संदेश लोकांपर्यंत जातच राहील त्या साठी सरकारकडून मदत घेण बंद करा
गंगाधर पांतावणे नामवंत लेखक कलावंतांचं साहित्यिक संमेलन कुठलही मानधन न घेता भरवतात मीही मागच्या वर्षी आणि ह्याही वर्षी मानधन घेतल नाही मागच्या वर्षी माझ्यावरही टीका झाली होती
त्या नंतर त्यांनी कायदा व शिक्षण मंत्री विनोद तावडे ह्यांच्याकडे पाहून माझी हि टीका मनावर न घेता आता सर्व मराठी शाळेचे सक्षमीकरण करावे तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळेला मराठीची सक्ती करावी अशी सूचना केली आणि अध्यक्षीय सूत्रे अरुणा ढेरे ह्यांच्या कडे सोपविली
माननीय शिक्षण मंत्री विनोद तावडे व्यासपीठावरून भाषण करताना
माननीय शिक्षण मंत्री विनोद तावडे ह्यांनीही आपल्या भाषणातून नयनतारा सहगल ह्यांच्या निमंत्रण वापसी चा निषेध नोंदवून मी कुठल्याही बाबतीत ह्यात सहभागी नाही माझ्या कार्यकाळात मी कधीही असा प्रकार केला नाही आणि करत नसल्याचे सांगितले ह्या घटनेने सरकारचेही नाक कापले गेले सरकारने कधीही संमेलनाचा उद्घाटक ठरवला किंवा रद्द केला नाही किंवा कोणी यावे कोणी येऊ नये ह्या बाबतीत हस्तक्षेप केला नाही
ज्या नयनतारा सहगल ह्यांनी आणीबाणीच्या काळात स्वत:च्या मामेबहिणीच्या विरोधात भूमिका घेतली त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला सरकार का म्हणून विरोध करेल? असा सवालही त्यांनी केला
आजची तरुण पिढी सायबर addict झाल्याचे सांगत तावडे म्हणाले कि,आजची पिढी कॉम्पुटर,लॅपटॉप,मोबाईल
WhatsApp ,फेसबुक वर सारा वेळ वाया घालवते ह्या पिढीने वाचनाकडे वळावे म्हणुन काही तास त्यांना ह्या सर्वापासून वेगळे ठेवण्याचा आणि फक्त वाचायला लावायचा मानस आहे शिवाय सर्व महाविद्यालयात वांग्मय मंडळ स्थापित करणे अनिवार्य केले असल्याचेहि त्यांनी नमूद केले
विद्यार्थ्यांनी केला काळे झेंडे दाखवून निषेध
भाषणादरम्यान काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवताना विद्यार्थी
त्यांचे भाषण सुरु असतानाच काही युवक काळे झेंडे घेऊन आत शिरले आणि निषेधाच्या घोषणा देऊ लागले तेव्हा काही क्षण वातावरण स्तब्ध झाले पण विनोद तावडे ह्यांनी ते शैक्षणिक बाबतीत निषेध नोंदवत आहेत साहित्य संमेलनाशी ह्याचा काही संबंध नाही तेव्हा लोकांनी घाबरू नये शांत राहावे असे सांगितले आणि तात्काळ वातावरण शांत झाले आणि पोलिसांनी देखील त्वरित दखल घेऊन ह्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आणि अनर्थ टळला
त्या नंतर अरुणा ढेरे ह्यांनी संमेलनाची सूत्रे स्वीकारली
क्रमश :

No comments:
Post a Comment