Sunday 13 January 2019

९२ व्या साहित्य संमेलनात अरुणा ढेरे ह्यांनी केलेल्या उदबोधक भाषणातील काही अंश

 
                       व्यास पिठावरून श्रोत्यांशी संवाद साधताना संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे

 यवतमाळ -११ जानेवारी
आधी दिलेल्या बातमी नुसार यवतमाळ येथे साहित्य संमेलनाची सुरवात वादाच्या सावटात मान्यवरांच्या बहिष्कारात आणि काळी फित लावून धरणे आंदोलन करून,नयनतारा ह्यांचे मुखवटे घालून केलेल्या निषेधात सुरु झाले

पूर्व नियोजित उद्घाटकांच्या निमंत्रण वापसीचा फटका संमेलनाला बसला कारण पूर्व नियोजित वक्ते,पत्रकार व लेखक न आल्याने साहित्य प्रेमींची निराशा झाली
मावळत्या संमेलनाध्यक्षांनी संमेलनाची सूत्रे अरुणा ढेरे ह्यांच्या कढे सोपविली त्यानंतर गोंदण ह्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले

                           संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर गोंदण ह्या स्मरणिकेचे प्रकाशन करताना अरुणा ढेरे           

अरुणा ढेरेंनीहि केला नयनतारा सहगल ह्यांच्या निमंत्रण वापसीचा निषेध
संमेलनाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा अरुणा ढेरे ह्यांनी देखील उदघाटनाच्या निमंत्रण वापसीचा आपल्या भाषणातून खरपूस समाचार घेतला मी इथे संकोच्याने उभी आहे इथे आधी पासून आतापर्यंत कित्येक मान्यवर साहित्य संमेलनाध्यक्षांनी भाषणे केली आहेत इथे उदघाटनाला नयनतारा सहगल येणार होत्या पण त्यांचे निमंत्रण रद्द केल्या गेले
मागच्या वर्षीपासून एक सुंदर प्रघात आम्ही पाडला होता मराठी व्यतिरिक्त इतर भाषेतील कसदार लेखन करणाऱ्या साहित्यिकाला साहित्य संमेलनाच्या उदघाटनाला बोलवायच ठरवल आणि म्हणूनच आम्ही आनंदाने नयनतारांना आमंत्रित केल त्यांनीही वयाची नव्वदी पार केल्यावरही आनंदाने निमंत्रण स्वीकारून येण्याच कबूल केल होत ते केवळ त्यांचं महाराष्ट्राशी असलेल्या मौलिक नात्याच्या प्रेमाखातर पण अत्यंत अनुचित पद्धतीने आपण त्यांना पाठवलेलं आमंत्रण रद्द केल हि अत्यंत निषेधाची आणि नामुष्कीची गोष्ठ आहे संयोजकांकडून झालेली हि अत्यंत गंभीर चूक आहे
सतत साहित्यबाह्य शक्तीच्या ताब्यात संमेलन जात असलेल्या सध्याच्या धोक्याच्या परिस्थितीत हि जोखीम पुरेशा समजशक्तीने उचलली गेली नाही काळाची गरज संयोजकाला ओळखता आली नाही
झुंडशाहीच्या दबावाला बळी पडून त्यांच निमंत्रण रद्द करण्यात आल त्यांना येऊ नका अस सांगण्यात आल हि बाब निषेधार्ह आहे! झुंडशाहीच्या बळावर जर कोणी आपल्याला भयभीत करीत असेल तर आपण केवळ नमत घेऊन टीकेचा धनी होण्याचा मार्ग स्वीकारणार का ? ह्या धमक्या बळाच्या जोरावर का होईना पण कोणत्याही विधायक गोष्टींचा आग्रह धरणाऱ्या नव्हेत साहित्याशी किंवा भाषेच्या जाणत्या प्रेमाशी ज्यांचा सुतराम संबंध नाही अशा कोणा समूहाने दिलेल्या धमक्यांपुढे वाकण हि शोभनीय गोष्ठ नाही !
हे म्हणजे असं झाल की,एखाद्याला आपल्या घरच्या लग्नाला या म्हणून आमंत्रण पत्रिका घेऊन त्याच्या घरी जायच यायचा आग्रह करायचा अन पुन्हा आपणच त्यांना येऊ नका म्हणून सांगून त्यांना अपमानित करायच हि अत्यंत लांछनीय,निंदनीय बाब आहे
नयनतारा सहगल ह्या पंडित नेहरूंची भाची आहेत विजया लक्ष्मी पंडित आणि रणजित पंडित ह्यांची कन्या आणि इंदिरा गांधीं त्यांची मामे बहीण त्यांचे चुलत आजोबा गेल्या शतकातील वेदाभ्यासक त्यांनी ऋग्वेदाचे मराठीत आणि इंग्रजीत भाषांतर केल होत त्यांच्या वडिलांनी स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला त्यांनी तुरुंगात असताना १२व्या शतकातल्या काश्मिरी कवी कल्हणाची राजतरंगिणी इंग्रजीत अनुवादित केली होती राजकीय आणि  साहित्यिक अनुवंश रक्तात वागवणाऱ्या नयनतारा ह्यांच साहित्य इथल्या मराठी जनांना माहीत नाही त्या निमित्याने ते माहिती झाल असत पण त्यांना येऊ नका असं कळवून अपमानित केलं गेल म्हणूनच आता राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी राजकारण्यांवर अवलंबून न राहता संमेलनाचा महाकोष सशक्त करण्याची वेळ आली आहे हे व्यासपीठ संवादाचे आहे  विसंवादासाठी किंवा डोके भडकावण्यासाठी नाही प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे साहित्य संमेलन विचारांच आदान प्रदान करण्यासाठी आहे दुर्दैवाने धर्मवादी राजकारण केंद्रस्थानी बनले आहे साहित्याची तत्व आपणच नष्ट करत आहोत साहित्याची बांधिलकी जगण्यासाठी असते
एका अभ्यासकांनी सांगितलेली एक गोष्ट त्यांनी सांगितली मार्कंडेय ऋषी कडे आलेल्या एका राजाने एकदा मला शिल्प शिकायचे आहे असं सांगितल तेव्हा ऋषी म्हणाले
तुला त्या साठी आधी नृत्य शिकावे लागेल राजा म्हणाला का ? तेव्हा ऋषी म्हणाले कारण नृत्य हे गतिमान शिल्प आहे तर शिल्प हे गोठलेले नृत्य ! राजा म्हणाला ठीक आहे मग मी नृत्य शिकेन ऋषी म्हणाले त्या आधी तुला वादन शिकावे लागेल कारण नृत्य वादनाच्या तालावर केल्या जाते राजा म्हणाला ठीक आहे मी वाध्य वाजवायला शिकेन ऋषींना एकमेकात गुंतलेल्या कलेच्या कड्या दिसत होत्या आपणही साहित्य विश्वातले घटक आहोत साहित्यातील भल्या बुऱ्या स्वरूपाला लेखक,प्रकाशक,पुस्तक विक्रेते,वाचक सारेच सारखेच जबाबदार आहेत साहित्याच स्वरूप निर्मळ ठेवण्याच भान आपण ठेवायला हव साहित्याचा आनंद घेताना हे लक्षात ठेवायला हव
आपली लोकपरंपरा अनादिकालापासून चालत आली आहे आपल्या पूर्वजांनी भवतीच्या कल्लोळातून सृष्टी घटकातून लय सांभाळत लौकिकातून अलौकिक कस आपल्या ओंजळीतून गोळा केल हे खरच आश्चर्यकारी आहे
लोकपरंपरा हीच लिखित परंपरेपेक्षा सहस्त्र पटींनी प्राचीन इथल्या जनजीवनात प्रतिष्टीत आणि इथल्या सर्वसामान्यांच प्रातिनिधीत्व करणारी अधिक व्यापक अधिक सकस अशी परंपरा आहे ती अडाणी माणसांनी सांभाळली हा गैरसमज आहे ती अनक्षर लोकांनी सांभाळली हे वास्तव आहे अनक्षरत्व हे लिखित परंपरेचा गौरव करणाऱ्या समाजाशी जोडलं गेल
आपली साहित्य परंपरा आदिम काळापासून अस्तित्वात होती तेव्हा एक संस्कृतज्ञ वेदाभ्यासी जंगलात रोज संस्कृत श्लोक म्हणत यज्ञ करताना एक एक आहुती द्यायचा तेव्हा त्याच्या श्लोकाचा आवाज ऐकून आजूबाजूला जंगलातील प्राणी जमा व्हायचे साहित्यात केव्हढी शक्ती आहे ह्याच हे प्राचीनकालीन उदाहरण आहे
आपण माणूस म्हणूनच काय लेखक म्हणूनही स्वयंभू उगवून आलो नाही त्या मुळे परंपरेने काय काय भल बुरहि जन्माला घातल आहे त्याच एक ऐतिहासिक भान वर्तमानात जगणाऱ्या आणि भविष्याचा वेध घेउ पाहणाऱ्या लिहित्या वाचत्या माणसाला हव
हे शतक विसंगतीने भरल आहे एका बाजूला वैज्ञानिक प्रगतीमुळे,यंत्रामुळे माणूस कृत्रिम जादुई नगरीत शिरला आहे तर दुसरीकडे ओसाडलेल्या जीवनात त्याला जिवंत ओलावा निर्माण करणार मानवी जीवन हव आहे
नव्या दमाचे लेखक भाषेला ताकदीने खेळवत सक्षमपणे लिखाण करत आहेत माणूस प्रगतिशील आहे जुन्या मर्त्य गोष्टींचा तो त्याग करून नव्याचा स्वीकार करतोय ह्या बाबतीतही त्यांनी एक गमतीदार किस्सा सांगितला
एका इतिहासकाराला एक संग्रहकाराने सांगितल कि आमच्याकडे प्राचीन जुनी कट्यार आहे इतिहासकार त्याच्या घरी गेले तेव्हा त्यांना ती दाखवली आणि सांगितल कि ती त्यांच्या पूर्वजांची खूप पुराणकालीन आहे इतिहासकारांनी ती कट्यार हातात घेतली तेव्हा ते म्हणाले ह्याची मूठ नव्यासारखी दिसतेय तो म्हणाला हो आधीची जुनी झाली म्हणून माझ्या आजोबांनी ती बदलली मग ते म्हणाले ह्याच पात तेही चकाकतेय तो म्हणाला हो! माझ्या वडिलांनी ते बदलल कारण तेहि खूप जुन झाल होत साहित्याचही असच असत ! परंपरा तीच राहते तीच स्वरूप काळानुसार बदलत जाते
इथल्या वृद्धांच्या स्थितीबद्दल वर्णन करताना त्यांनी सांगितलं कि,
लेकी नेल्या चोरी,लेक नेले घारी परदेशी म्हातारी घरी
म्हणजे जावयांनी मुली चोरून नेल्या मुले परदेशी गेली आणि म्हातारी आपल्याच घरी परदेशी झालेत
आपल्या संस्कृतीचा मागोवा घेताना पुरुषी वर्चस्वाचा आणि स्त्रीला भोग्य वस्तू मानणाऱ्यांच्या काळात स्त्रीवाद अनेकदा पाहायला मिळाला पुराणकालीन स्रियांच्या प्रतिभेचे,प्रज्ञेचे अविष्कार इथे घडले आहेत समाजपुरुषाच्या न्यायबुद्धीला आपली विटंबना होत असताना ताठ कण्यांनी आवाहन करणारी द्रौपदी इथे होऊन गेली आपल्या जोडीदारा विषयीच्या इच्छा अपेक्षांचा मागोवा घेत स्वयंनिर्णयाने पती निवडीच स्वातंत्र्य मिळवणारी सावित्री इथे होऊन गेली आणि आपल्या आवडीच्या पतीसोबत विवाह करण्यासाठी पळून जाऊन विद्रोह करणारी रुक्मिणी इथे होऊन गेली अनादी काळापासून स्त्रीला फक्त उपभोग्य वस्तू मानणाऱ्या पुरुषांविरोधात आवाज उठवणाऱ्यागोष्टी अंगिकाराव्या स्रिया काश्मीर महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटकातील अक्का महादेवी पर्यंत होऊन गेल्या आहेत आता काळ बदलला आहे नव्या जुन्या लेखिकांनी खूप छान लिखाण केलय साहित्य विश्वात अजूनही कसदार लेखनाची गरज असल्याचही त्यांनी सांगितल वाचकांनी चांगल ,कसदार लेखन असलेली पुस्तके निवडावीत आणि विचारप्रवृत्त करणार साहित्य वाचाव
तब्बल दीडदोन तास अरुणा ढेरे ह्यांनी त्यांच्याअलंकृत,ओघवत्या शैलीतील भाषणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले

No comments:

Post a Comment