Friday 30 November 2018

तीन डिसेंबरला नासाच्या मोहीम 58चे तीन अंतराळवीर स्थानकात राहण्यासाठी जाणार



In the Integration Facility at the Baikonur Cosmodrome in Kazakhstan, Expedition 58 crew members Anne McClain of NASA (left),
अंतराळमोहीम ची 58 Anne McClain रशियन अंतराळवीर Oleg Kononenko आणि कॅनडाचे अंतराळवीर David Saint स्थानकाकडे जाण्यासाठी सज्ज -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -29 Nov.
नासाच्या अंतराळमोहीम 58 अंतर्गत नासाचे आणखी तीन अंतराळवीर अंतराळस्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत नासाची Anne McClain ,कॅनडाचे अंतराळवीर  David Saint आणि रशियन अंतराळवीर Oleg Kononenko अंतराळस्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत 27नोव्हेंबरपासून त्यांच्या स्थानकातील प्रयाणाची पूर्व तयारी जोरात सुरु आहे अंतराळ स्थानकात राहायला जाण्याआधीचे कठीण ट्रेनिंग त्यांनी ह्या आधीच पूर्ण केले आहे

नासाची  Anne McClain अंतराळवीर David Saint आणि अंतराळवीर Oleg स्थानकात राहायला जाण्याआधी कठीण ट्रेनिंग दरम्यान -फोटो -नासा संस्था

सोयूझ MS -11ह्या अंतराळयानातून हे तिन्ही अंतराळवीर अंतराळस्थानकाकडे प्रयाण करणार आहेत सोमवारी तीन डिसेंबरला 6.31a.m.(EST) (5.31p.m.स्थानिक वेळ ) वाजता कझाकस्थानातील बैकोनूर येथील Cosmodrome वरून त्यांचे सोयूझ यान  स्थानकाकडे झेपावेल
सोयूझ यान जवळपास साडेसहा तासांचा अंतराळ प्रवास पूर्ण करून स्थानकाजवळ पोहोचेल हे यान पृथ्वीभोवती चारवेळा परिक्रमा करेल आणि 12.35 p.m.ला स्थानकाच्या Poisk Moduleच्या Docking पाथ जवळ पोहोचेल
सोयूझ यान  स्थानकाच्या नजीकच्या टप्प्यात येताच स्थानकातील यंत्रणा कार्यरत होईल
सध्या अंतराळस्थानकात रहात असलेले मोहीम 57चे कमांडर  Alexander  Grest ,Flight Engineer Serena Aunon आणि Flight Engineer Sergey Prokopyev हे त्यांच्या यानासाठी डॉकिंग पाथची सोय करतील आणि स्थानकाचे दार उघडून त्यांना आत प्रवेश देतील
यान स्थानकाजवळ पोहोचल्यानंतर जवळपास दोन तासांनी सोयूझ यान आणि स्थानकातील डॉकिंगचा मार्ग एकमेकांशी जोडला जाईल आणि अंतराळवीर आत प्रवेशताच स्थानकातील अंतराळवीर स्थानकात त्यांचे स्वागत करतील
अंतराळ मोहीम 57चे सध्या अंतराळस्थानकात रहात असलेले अंतराळवीर वीस डिसेंबररला पृथ्वीवर परतणार आहेत जूनमध्ये हे तीनही अंतराळवीर स्थानकात राहण्यासाठी गेले होते
मोहीम 58चे हे नवे तीन अंतराळवीर साडेसहा महिने अंतराळस्थानकात राहून तिथल्या संशोधनात सहभागी होणार आहेत
अंतराळवीर David Saint व Anne McClain हे दोघेही प्रथमच स्थानकात राहण्यासाठी जाणार असून हि त्यांची पहिलीच अंतराळवारी आहे तर रशियन अंतराळवीर Oleg Kononenko हे चवथ्यांदा अंतराळस्थानकात राहायला जात आहेत
ह्या अंतराळवीरांच्या अंतराळस्थानकाकडे प्रयाणाचे आणि स्थानकातील प्रवेशाचे लाईव्ह प्रक्षेपण नासा T .V वरून करण्यात येईल .
ह्या तीनही अंतराळवीरांनी जाण्याआधी नासा संस्थेच्या म्युझियमला भेट दिली तिथे त्यांनी ह्या आधी अंतराळस्थानकात राहायला गेलेल्या अंतराळवीरांच्या सह्या असलेल्या ठिकाणी सह्या केल्या तिघांनी सेल्फी काढले आम्ही स्थानकात राहायला जाण्यासाठी सज्ज आहोत असेहि त्यांनी सांगितले तर McClain आणि David  प्रथमच अंतराळ प्रवास करणार असून स्थानकात राहायला जाण्यासाठी आम्ही अत्यंत उत्सुक झालो आहोत असेही ते म्हणाले

Tuesday 27 November 2018

InSight मंगळ यान मंगळाच्या भूमीवर सुखरूप उतरले


NASA's InSight Mars lander acquired this image of the area in front of the lander
Insight मंगळ यानाने मंगळाच्या भूमीवर प्रवेशताक्षणी मंगळग्रहाचा पाठवलेला पहिला फोटो -नासा संस्था

नासा संस्था -26 Nov.
नासाची मंगळ मोहीम यशस्वी करत नासाचे InSight मंगळयान अखेर मंगळ ग्रहावर निर्विघ्न पणे पोहोचले आहे सोमवारी 26 नोव्हेंबरला 3p.m.(EST) ला InSight  मंगळयान मंगळाच्या भूमीवर यशवीपणे उतरले
पाच मे 2018ला InSight यान कॅलिफोर्निया येथील Vandenberg Airforce Base येथून 7.05p.m.ला मंगळाच्या दिशेने झेपावले होते आणि कुठलेही विघ्न न येता साडेसहामहिन्यांत तब्बल  300 मिलियन मैलाचा अंतराळप्रवास यशस्वीपणे पार करून अखेर मंगळावर पोहोचले आहे
Insight मंगळ यान मंगळ ग्रहावर दोन वर्षे म्हणजे मंगळावरील वर्षगणनेनुसार एक वर्षे चाळीस दिवस राहून संशोधन करेल
Insight यान 19,800 k.m. इतक्या प्रचंड वेगाने मंगळाच्या कक्षेत शिरले आणि अवघ्या साडेसहा मिनिटात ते मंगळाच्या भूमीवर पोहोचले सुद्धा ! यान मंगळाच्या कक्षेत शिरले तेव्हा यानाचा वेग प्रचंड असला तरीही मंगळाच्या वातावरणात शिरताच तेथील विरळ वातावरणाशी जुळवून घेत यानाने स्वयंचलित अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने हळूहळू वेगावर नियंत्रण मिळवत आणि  वेग कमी,कमी करत शुन्यावर आणला
यान मंगळाच्या कक्षेत शिरताच यानाचे पॅराशूट उघडले आणि यान मंगळाकडे झेपावू लागले जसजसे मंगळाची भूमी जवळ येऊ लागली तसतसा यानाचा वेग कमी झाला यान जमिनीच्या निकट येताच यानाची अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित होऊन यानाची चाके बाहेर आली आणि यान स्वत:वर नियंत्रण मिळवून मंगळाच्या भूमीवर स्थिरावले
अवघ्या साडेसहा मिनिटे इतक्या कमी वेळेत Insight यानात बसविलेल्या अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने यानातील डझनावर ऑपरेशन्स कार्यान्वित झाली आणि यानाचे कार्य मंगळावर पोहोचल्यानंतरच्या क्षणभरात सुरु झालेही
Insight Mars लँडर वर सिस्मोमीटर बसवण्यात आला आहे जेव्हा हे मंगळयान मंगळावरील भूमीवर उतरले  तेव्हा ह्या उपकरणाच्या एका रोबोटिक आर्मने पृष्ठभागावर सिस्मोमीटर बसवला Insight च्या ह्या अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर वाहणाऱ्या उष्ण वाऱ्याचे प्रवाह आणि तीव्रता ह्यांचे मोजमाप करून त्यावर संशोधन करण्यात येईल विशेष म्हणजे ह्या रोबोटिक आर्मला बसविलेल्या अत्याधुनिक दुर्बिणीच्या साहाय्याने यानाने लगेचच तिथला पहिला फोटोही पृथ्वीवर पाठवला आहे
Insight यानाचे मंगळावर पोहोचल्यानंतरचे पहिले काम यानाला बसवण्यात आलेली सौर प्रणाली कार्यान्वित करणे हे होते कारण ह्या यानाचे कार्य सौर उर्जेवरच चालणार आहे आणि यानाने हि प्रणाली यशस्वीपणे कार्यान्वित केली पोहोचल्यानंतर पहिल्या सोळा मिनिटात हि प्रणाली सुरु करण्याची प्रोसेस सुरु झाली आणि नंतरच्या सोळा मिनिटात हि प्रणाली सुरु झाली
नासाच्या कॅलिफोर्नियातील Jet Propulsion Lab मधील ह्या Insight यानाच्या मंगळ मोहिमेशी संबंधित अधिकारी ,शास्त्रज्ञ ,इंजिनिअर्स आणि कर्मचारी मंगळयानाचा भूमिप्रवेश उसुकतेने पाहात होते जसजसे यान मंगळाकडे झेपावत होते तसतशी साऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली अखेर Insight मंगळाच्या भूमीवर सुखरूप पोहोचल्याचे पाहून सारेच आनंदित झाले यानाच्या मंगळ भूमीला स्पर्शण्याचा रोमांचक क्षण पाहताना शास्त्रज्ञ क्षणभर भारावले टाळ्या वाजवत हर्षोउल्हासाने साऱ्यांनी एकच जल्लोष केला एकमेकांचे अभिनंदन करत तर काहींनी नाचून ह्या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा केला

Mars InSight team members Kris Bruvold, left, and Sandy Krasner react after receiving confirmation that InSight landed
  कॅलिफोर्नियातील J.PL lab मध्ये Insight मंगळावर लँडिंग झाल्याचे पाहून जल्लोष करताना शास्त्रज्ञ -फोटो-नासा संस्था

 Insight चे मुख्य Investigater Bruce Banerdt म्हणतात कि,ह्या Insight च्या मंगळावरील लँडिंगचा क्षण पाहण आमच्यासाठी रोमांचक अनुभव होता पण आम्ही Insight जेव्हा रोबोटिक आर्मच्या साहाय्याने तिथली जमीन खणायला सुरु करेल त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात आहोत
ह्या Insight मंगळ यानासोबतच मंगळावर दोन CubeSats MarCOs पाठवण्यात आले असून त्यांनी देखील व्यवस्थित काम करायला सुरवात केली आहे
मंगळ ग्रहांभोवती फेऱ्या मारणाऱ्या ह्या उपग्रहांनी Insight मंगळावर पोहोचल्याचा संदेश कॅलिफोर्नियातील  J.PL लॅबमध्ये दिला मार्को क्यूबसॅटच्या यशस्वी कार्याने मार्को चे प्रोजेक्ट मॅनेजर आणि टीम आनंदित झाले आहेत
नासा संस्थेतर्फे Insight मंगळ लँडिंग चे लाईव्ह प्रक्षेपण सोशल मीडियावरूनहि करण्यात आले होते

Spectators in Times Square watch the live NASA TV broadcast of the Mars InSight landing.
 हि अमूल्य संधी साधत Times Square वर मंगळ ग्रहावरील Insight प्रवेशाचा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी अमेरिकन नागरिकांनी केलेली हि गर्दी -फोटो -नासा संस्था

Insight वर बसवलेल्या दुसऱ्या रोबोटिक आर्मचे काम त्याच्या सेल्फ हॅमरींगद्वारे मंगळावरील पृष्ठभागावर दहा ते सोळा फूट खोल खड्डा खणणे (पृर्वीच्या तुलनेत ह्याची खोली पंधरापट जास्त ) आणि तेथील माती व इतर अवशेषांचे उत्खनन करून त्याची संशोधित माहिती गोळा करून त्याचे नमुने पृथ्वीवर पाठवण्याचे आहे
मंगळयानाला सौर ऊर्जेसोबतच बॅटरीच्या ऊर्जेचा पुरवठा केल्या गेला असून शास्त्रज्ञाच्या अंदाजानुसार हे यान मंगळावर सव्वीस महिने कार्यरत राहू शकेल नासाच्या JPL lab चे Insight चे मुख्य प्रबंधक म्हणतात हा प्राथमिक अंदाज असला तरीही Insight ह्या पेक्षा जास्त काळ कार्यरत राहील
मंगळावरील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी Seismology च्या ह्या प्रकल्पाचे स्वप्न शास्त्रज्ञ गेल्या चाळीस वर्षांपासून पहात आहेत त्या वेळेस मी student होतो आणि आज मी त्यात सह्भागी आहे असे JPL लॅबचे Insight mars Lander चे मुख्य Investigator Bruce Banordt  म्हणाले होते आता त्यांचे ते स्वप्न साकार झाले आहे 
ह्या मंगळयानाच्या यशस्वी मोहिमेमुळे मंगळावरील वातावरणाची,भूगर्भांची माहिती मिळेल शिवाय ब्रह्मांडातील पृथ्वी चंद्र आणि इतर ग्रहांची आपल्याला अवगत नसलेली माहितीही मिळेल
आगामी मानवासहित मंगळ मोहिमेसाठी,मंगळ ग्रहावरील  मानवी निवासासाठी उपयुक्त ,योग्य ठीकाण ,तेथील मानवासाठी आवश्यक वातावरणाचीही माहिती मिळेल
मागच्या मंगळ मोहिमेत मंगळावरील माती,डोंगर दऱ्या ,volcanoes ,पाण्याचे आटलेले प्रवाह ह्यांची माहिती मिळाली आता ह्या ग्रहाची भूमिगत अंतर्गत रचना व वातावरणाची माहिती मिळेल
ह्या आधी 2012 मध्ये नासाचे क्युरियासिटी मार्स रोव्हर मंगळावर पोहोचले होते आता Insight Mars lander मंगळावर पोहोचले आहे आणि लवकरच तिथली अद्ययावत आधुनिक माहिती हे यान पृथ्वीवर पाठवेल
ह्या यशस्वी Insight मंगळ मोहिमेत नासा संस्थेसोबत France ,German आणि अनेक युरोपियन स्पेस एजन्सीची मदत मिळाली नासाचे नवे Administrator Jim Bridenstine  ह्यांनी ह्या मोहिमेत सहभागी असलेल्या सर्वच शास्त्रज्ञाचे अभिनंदन केले  Insight च्या यशस्वीतेसाठी ज्यांनी,ज्यांनी हातभार लावला त्या साऱ्याचे कौतुक करतानाच " ते म्हणतात हे यश त्या साऱयांच्या बुद्धिमत्तेचे ,कुशलतेचे आणि कठोर परिश्रमाचे आहे त्यांच्यामुळेच
 हा  ऐतिहासिक क्षण अनुभभवता आला "! 



Sunday 25 November 2018

अंतराळवीरांनी स्थानकात साजरा केला Thanks Giving Day

 Expedition 57 crew selfie
 Serena Aunon ,अंतराळवीर Sergey Prokopyev आणि Alexander स्थानकातील रशियन Segment मध्ये पार्टीच्या वेळेस सेल्फी घेताना फोटो -नासा संस्था

 नासा संस्था -22 Nov.
नासाच्या अंतराळमोहीम 57 चे कमांडर Alexander Grest आणि flight engineer Serena Aunon Chancellor
ह्यांनी ह्या वर्षीचा Thanks Giving Day अंतराळस्थानकात साजरा केला रशियात हा दिवस साजरा होत नसला तरीही रशियन अंतराळवीर Sergey Prokopyev ह्यांनीही ह्या दोघांसोबत पार्टी एन्जॉय केली
अमेरिका व युरोप मध्ये दरवर्षी Thanks giving Day  साजरा केला जातो वर्षभरात आपण ज्यांची मदत घेतली त्यांच्या उपकाराची ,कष्ठाची ,मदतीची कामाची ,प्रेमाची जाणीव ठेवून त्याची परतफेड म्हणून त्या सर्वांचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो
त्या दिवशी स्पेशल फिस्टचे आयोजन केले जाते जेवणात विशेषतः टर्की पक्ष्याचे वेगवेगळे पदार्थ आवर्जून केले जातात आपले कुटुंबीय,आप्तस्वकीय आणि मित्रांसोबत पार्टीचे आयोजन केले जाते आणि अनेक स्वादिष्ठ पदार्थासोबतच टर्कीच्या पदार्थाचा आस्वाद घेतल्या जातो आणि साऱ्यांचे आभार मानले जातात
ह्या वर्षी स्थानकात राहायला गेलेल्याअंतराळवीर Alexander आणि Serena Aunon  ह्यांना मात्र हा दिवस पृथ्वीवर साजरा करता आला नाही तरीही त्यांनी हा दिवस अंतराळ स्थानकात साजरा केला
अंतराळवीर Alexander Grest आणि Serena Aunon ह्या दोघांनी हा दिवस साजरा करण्यासाठी कामातून खास वेळ काढला पण अंतराळवीर Sergey Prokopyev  ह्यांनी मात्र त्यांचे रोजचे काम संपवून ह्या दोघांच्या फीस्टमध्ये सहभाग नोंदवला
अंतराळवीर Alexander Grest आणि Serena ह्या दोघांनी  Thanks Giving Day च्या दिवशी स्थानकातून पृथ्वीवर लाईव्ह संपर्क साधत त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि पृथ्वीवासीयांना Thanks Giving Day निमित्य शुभेच्छा दिल्या आणि नुकत्याच स्थानकात गेलेल्या कार्गोशिप मधून खास त्यांच्यासाठी आलेले टर्की आणि इतर पदार्थांचे पार्सल दाखवले
Alexander म्हणाले कि हा दिवस आमच्यासाठी खास असतो आम्ही पृथ्वीवर अनेकदा हा दिवस साजरा केलाय पण ह्या वेळेस आम्ही हा दिवस स्थानकात साजरा करतोय म्हणून हा दिवस आमच्यासाठी स्पेशल आहे आम्ही भाग्यवान आहोत आम्हाला हि संधी दिल्याबद्दल आम्ही नासाचे आभारी आहोत हे स्पेशल फूड पाठवल्याबद्दलहि  आम्ही त्यांचे विशेष आभार मानतो
आज आम्ही पार्टी करणार आहोत आणि आम्ही तिघे आम्हाला पाठवलेल्या टर्की पदार्थाचा आस्वाद घेणार आहोत आमच्या पार्टीत Spicy पाउंड केक,स्टफिंग candied yams आणि इतर फ्रोजन फूड चाही समावेश आहे
सेरेना म्हणाली कि खरोखरच Alexander म्हणतात तसा हा दिवस आमच्यासाठी खास आहे स्थानकात हा दिवस साजरा करण हि गोष्ट आमच्यासाठी भाग्याची आहे आणि हा अनुभव आमच्यासाठी रोमांचक आहे ,हा दिवस आमच्यासाठी खास आहे आणि सर्वानीच आपण जगात कोठेही असो आपल्यावर केलेल्या उपकारांची जाणीव ठेवून हा दिवस आवश्य साजरा करावा

Monday 19 November 2018

InSight Mars Lander मंगळावर पोहोचणार नासा T.V. वरून होणार लाईव्ह प्रसारण

NASA's InSight lander descending toward the surface of Mars.
नासाचे मंगळावर पोहोचलेले InSight Mars Lander मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाकडे झेपावताना- फोटो -नासा संस्था

नासा संस्था -13 Nov
अमेरिकेच्या नासा संस्थेने मंगळावर पाठवलेले InSight Mars Lander 26 नोव्हेंबरला ( 3 P.M. EST ) मंगळावर पोहोचणारआहे
ह्या  InSight मंगळ यानाचा मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर पोहोचतानाचा ऐतिहासिक क्षण नासा संस्थेसोबतच पृथीवासीयांनाही पाहण्याचे भाग्य लाभणार आहे नासा संस्थेतर्फे ही संधी देण्यात येणार आहे नासा संस्था ह्या ऐतिहासिक क्षणाचे लाईव्ह प्रक्षेपण नासा t.v. वरून करणार आहे
InSight Mars Lander 5 मे ला मंगळाच्या दिशेने झेपावले होते आता ते मंगळग्रहावर पोहोचत आहे ह्या आधी नासाने 2012 मध्ये क्युरिओसिटी  हे मंगळयान मंगळावर पाठवले होते आणि हे मंगळयान मंगळावर व्यवस्थित पोहोचले सुद्धा गेल्या सहा वर्षांपासुन हे यान तिथे यशस्वीपणे कार्यरत आहे नुकतेच क्युरीओसिटी यानाने मंगळावरील धुळीच्या प्रचंड वादळाला सामोरे जात तेथील धुळीवादळाचे फोटो पृथ्वीवर पाठवले होते काहीकाळ ह्या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला पण पुन्हा हे यान त्याला बसविलेल्या अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने  स्व:च कार्यरत झाले आणि पुन्हा पृथ्वीशी संपर्क साधत यानाने पृथ्वीवरील संशोधन केंद्रात माहिती पाठवणेही सुरु केले आहे आता नासाचे दुसरे InSight हे मंगळ यान मंगळ ग्रहाच्या भुपृष्ठावर धडकणार आहे मंगळावर पोहोचताच हे यान कार्यरत होईल आणि तेथील सखोल माहिती गोळा करून पृथ्वीवर पाठवेल
हे मंगळयान दोन वर्षे मंगळावर राहील ह्या काळात InSight यान मंगळाच्या भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातील सखोल माहिती गोळा करेल मंगळाच्या पृष्ठभागाच्या जमिनीखालील मातीचे उत्खनन करून तेथील,मिनरल्स,दगडांचे नमुने गोळा करून त्यांचे फोटो व इतर घडामोडींचे निरीक्षण नोंदवून त्यावरील संशोधित माहिती पृथ्वीवर पाठवेल शिवाय InSight मंगळयान भूपृष्ठभागावरील पाठारी प्रदेश ,डोंगर,नदीचे आटलेले पात्र त्यातील माती,दगड व इतर अवशेष ह्या संबंधित माहिती गोळा करेल शिवाय तेथील डोंगरदऱ्यांचा उगम कसा झाला ह्याविषयीही माहिती गोळा करेल ह्या संशोधित माहितीचा उपयोग पृथ्वीवरील संशोधनासाठीही होईल
ह्या Insight मंगळयानाच्या यशस्वीतेनंतर आता नासा संस्थे तर्फे आणखी दोन छोटी याने मंगळावर पाठवली जाणार आहेत त्या मध्ये Mars Cube One (MarCo )चा समावेश आहे आणि जर मार्को ठराविक वेळेत मंगळावर पोहोचले तर Insight मंगळ यानाने केलेल्या संशोधनाचा त्याला फायदा होईल
InSight यानामार्फत मंगळ ग्रहावरील वातावरणाचीही सखोल माहिती मिळवल्या जाईल आगामी मानवासहित अंतराळमोहीम आणि मंगळ ग्रहावरील मानवी वास्तव्यासाठी हि माहिती उपयुक्त ठरेल
ह्या ऐतिहासिक क्षणाचे लाईव्ह प्रसारण नासा T.V. वरून 2-3.30 p.m.वाजता होईल t.v. प्रमाणेच ट्विटर व फेसबुक वरूनही InSight मंगळयानाच्या मंगळ ग्रहावर धडकण्याचा ऐतिहासिक क्षण पाहता येईल
भारतीय वेळेनुसार 26 नोव्हेंबरच्या रात्री 1.30 m.वाजता नासा t.v. वर भारतीयांना हा मंगळयान पोहोचण्याचा क्षण पाहता येईल


Sunday 18 November 2018

अंतराळस्थानकाचे विसाव्या वर्षात यशस्वी पदार्पण अंतराळवीरांनी केला स्थानकातून व्हिडीओ लाँच

                                                   अंतराळवीर अंतराळस्थानकातील व्हिडीओ  शूट करताना
                                                        फोटो आणि व्हिडीओ नासा संस्था

नासा संस्था -15 nov.
नासा संस्थेच्या इंटर नॅशनल अंतराळस्थानकाला येत्या वीस नोव्हेंबरला वीस वर्षे पूर्ण होत आहेत आणि अंतराळस्थानकातील अंतराळवीरांच्या वास्तव्याला दोन नोव्हेंबरला अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत गेल्या वीस वर्षात नासा संस्थेने ह्या अंतराळस्थानकातील फिरत्या प्रयोगशाळेत अनेक अंतराळवीरांना ट्रेनिंग देऊन अंतराळस्थानकात राहून दोनशेहून अधिक सायंटिफिक प्रयोगावर सखोल संशोधन करण्याची संधी दिली आहे
अंतराळ स्थानकातील झिरो ग्रॅव्हिटी मध्ये राहून प्रयोग करणे सोपे नाही तिथे तरंगत्या अवस्थेत राहून संशोधन  करणे तर त्याहून कठीण अंतराळस्थानकात प्रत्येकच वस्तू तरंगते मग ते पाणी असो किअन्न पण गेली वीस वर्षे अंतराळवीर हि कसरत करत स्थानकात राहून त्यांचे संशोधन यशस्वी करत आहेत यात महिला अंतराळवीरांगना पण मागे नाहीत
आपल्या भारतीय वंशाच्या कल्पना चावला,सुनीता विल्यम्सही अंतराळस्थानकात राहायला गेल्या होत्या दुर्दैवाने कल्पना चावलाचा अपघात झाला पण सुनीता विल्यम्स यशस्वी झाली नासाच्या केट रूबिन्स,सध्या अंतराळ स्थानकात रहात असलेली सेरेना ऑनॉन-चान्सलर या सारख्या अनेक महिला अंतराळवीरांगनाही स्थानकात राहून यशस्वी संशोधन करून पृथ्वीवर परतल्या पेगी व्हाइटसॉन ह्यांनी  तर अंतराळस्थानकात राहून कित्येक विक्रम केले जास्त दिवस अंतराळस्थानकात राहणे,जास्तवेळा स्पेसवॉक करणे स्थानकात यशस्वी भाजी लागवड करणे या सारखे अनेक विक्रम त्यांनी आपल्या नावावर नोंदवले आहेत
सध्या सेरेना स्थानकात राहून कॅन्सर वर यशस्वी उपचार पद्धती शोधण्यासाठी पेशींवर संशोधन करत आहे
स्कॉट केली ह्यांनी देखील स्थानकात पेगी प्रमाणेच लेट्युसची भाजी व झिनिया फुलांची यशस्वी लागवड करून त्यांची जोपासना केली केजल लिंडग्रेन ह्यांनीही व्हेजी प्रकल्प यशस्वी करण्यासाठी रोपांची निगा राखली

 Flight Engineer Serena Auñón-Chancellor conducts research operations for the AngieX Cancer Therapy study
    अंतराळवीरांगना Serena Aunon-Chancellor अंतराळस्थानकातील कामात व्यस्त फोटो -नासा संस्था

सध्या स्थानकात राहत असलेल्या अंतराळवीरांनी कमी उंचीच्या गव्हाची आणि नविन प्रकारच्या भाजीची रोपे स्थानकातील अत्याधुनिक ग्रोथ चेंबर मध्ये लावली आहेत ह्या रोपांची लागवड व्हेजी प्रकल्पाअंतर्गत केली जाते त्यासाठी रोपांना आवश्यक प्रकाश मिळावा म्हणून खास कलर लाईटिंगची सोय केली आहे आणि विशेष म्हणजे नुकतेच स्थानकात गहूही अंकुरले आहेत ह्या व्हेजी प्रकल्पा अंतर्गत स्थानकातील वातावरणात रोपांची होणारी वाढ आणि झिरो ग्रॅविटीचा होणारा परिणाम अभ्यासून त्यावर सखोल संशोधन केले जातेय

NASA astronaut Ricky Arnold filming on the ISS
              अंतराळवीर Ricky Arnold स्थानकातील व्हिडीओ शूटिंगच्या तयारीत -फोटो -नासा संस्था 

स्थानकात राहताना अंतराळवीरांना पृथ्वीवरील प्रिझर्व केलेले अन्न खावे लागते त्यांना ताजे अन्न,भाजी व फळे मिळावीत म्हणून हे अंतराळवीर स्थानकातील प्रतिकूल वातावरणात हा व्हेजी प्रकल्प राबवत आहेत शिवाय तिथल्या रुक्ष वातावरणात त्यांना विरंगुळा आणि बागकामामुळे मिळणारा आनंद मिळावा हाही हेतू आहेच
शिवाय तिथे राहात असताना तिथल्या झिरो ग्रॅविटीचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो हेही अभ्यासल्या जातेय अपुरी झोप,सतत तरंगती अवस्था असल्याने हाडांवर ,डोळ्यांवर ,शरीरातील रक्ताभिसणावर होणारा परिणाम नोंदवून त्यावरही संशोधन केल्या जातेय
अंतराळातील फिरत्या लॅबमध्ये मानवी शरीरातील रक्त पेशींमधील DNA,RNA वर स्थानकातील वातावरणाचा काय परिणाम होतो हे रक्त नमुना घेऊन नियमित तपासून फरक नोंदवून संशोधन केल्या जातेय
पृथ्वीवरील भूकंप,वादळ ,पूर या सारख्या घडामोडीचेही निरीक्षण नोंदवून संशोधन केल्या जातेय
अंतराळस्थानकात वेळोवेळी ह्या अंतराळवीरांच्या संशोधनासाठी लागणारे अत्याधुनिक सामान,अन्न व इंधन पृथ्वीवरून कार्गो space craft मधून पाठविल्या जाते नुकतेच नासा व जर्मनीचे कार्गो स्पेस क्राफ्ट अंतराळस्थानकात गेले आहे त्यातून हजारो टन आवश्यक सामान अंतराळवीरांसाठी पाठवण्यात आलेय शिवाय त्यात अंतराळवीरांसाठी आईस्क्रीम व ताजी फळे पाठवण्यात आली आहेत
स्थानकाला जोडलेल्या रोबोटिक आर्मच्या साहाय्याने अत्याधुनिक कॅमेऱ्याच्या ,दुर्बिणीच्या साहाय्याने हे अंतराळवीर स्पेसवॉक करतात व स्थानकात येणाऱ्या कार्गो स्पेस क्राफ्ट साठी डॉकिंगची सोय करतात आणि ह्या अत्याधुनिक यंत्र सामुग्रीच्या साहाय्याने संशोधनही यशस्वी करतात
स्थानकातील छोट्या जागेत,तरंगत्या अवस्थेत कसरत करत पाणी पिणे,जेवण,झोप हे तर ते करतातच शिवाय कधी मधी आवडते सिनेमेही पाहतात हे अंतराळवीर हे सार कस करतात हे पाहण्याची ,जाणून घेण्याची उत्सुकता साऱ्यांनाच असते त्या साठी वेळोवेळी नासा संस्थेने प्रसारित केलेल्या अंतराळवीरांच्या लाईव्ह चॅट कार्यक्रमाच्या प्रसारणादरम्यान पृथ्वीवरील नागरिक,विध्यार्थी अधिकारी त्यांना प्रश्न विचारतात अंतराळवीरही त्यांना पाणी पिण्याचे व इतर क्रियांचे प्रात्यक्षित करून दाखवतात ,फोटो पाठवतात
नुकताच स्थानकात पाठवलेल्या Ultra High Definition (UHD ) कॅमेऱ्याने ह्याअंतराळवीरांनी त्यांच्या  अंतराळस्थानकातील वास्तव्यातील त्यांची दिनचर्या,व्यायाम ,संशोधन या बरोबरच तिथल्या व्हेजी ग्रोथचेम्बरचे चित्रण करून त्याचा पहिला व्हिडीओ लाँच केला आहे आणि पृथ्वीवासीयांसाठी पाहण्यासाठी पाठवलाय
नासा संस्थेने ह्या व्हिडीओ बनवण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल युरोपियन स्पेस एजन्सी,ISS National Lab आणि अंतराळ स्थानकात राहात असलेल्या अंतराळवीरांचे आभार मानलेत
अंतराळवीर Alexander Grest,Serena Aunon-Chancellor,Ricky Arnold आणि  Drew Feustel ह्यांनी हा व्हीडीओ बनवला आहे

Sunday 11 November 2018

पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या नजीकच्या टप्प्यात प्रवेशले

 illustration of Parker Solar Probe
            पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या कक्षेकडे मार्गक्रमण करताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -10 नोव्हेंबर 
सूर्याकडे झेपावलेले पार्कर सोलर प्रोब हे सौरयान अंतराळात यशस्वी मार्गक्रमण करत आता सूर्याजवळ पोहोचतेय सात नोव्हेंबरला नासा संस्थेत ह्या सौरयानातुन असे signals प्राप्त झाले आहेत
पार्कर सोलर प्रोब यान 11ऑगष्टला सूर्याकडे जाण्यासाठी अंतराळात झेपावले आणि कार्यरत होऊन यशस्वी मार्गक्रमण करत आता हे यान सूर्यापासून 15 मिलियन मैल अंतरावर पोहोचले आहे
विशेष म्हणजे ह्या आधी एकही सौऱयान सूर्याच्या इतक्या जवळ पोहोचले नव्हते 1976 मध्ये सूर्याकडे झेपावलेल्या  Helios-B ह्या यानाने पार केलेल्या अंतराचा रेकॉर्ड पार्कर सौर यानाने मोडला आहे
पार्कर प्रोब चे मिशन कंट्रोल करणाऱ्या Johns Hopkins University च्या लॅब मध्ये सात नोव्हेंबरला शास्त्रज्ञांना 4.46 p.m. ला पार्कर प्रोब व्यवस्थित कार्यरत असून यशस्वी मार्गक्रमण करीत असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत
Parker Solar Probe mission team
 पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या कक्षेजवळ जात असल्याचे संकेत मिळताच आनंदित झालेले शास्त्रज्ञ -फोटो -नासा संस्था

पार्कर सोलर प्रोब आता सूर्याच्या करोनाच्या दिशेने अत्यंत वेगाने प्रवास करत असून यानाचा वेग ताशी 213.200 मैल इतका आहे विशेष म्हणजे ह्या यानाचा वेग इतका प्रचंड आहे कि हे यान सतत त्याचा स्वत:चाच रेकॉर्ड मोडत आहे लवकरच यान सूर्याच्या करोनाच्या Perihelion जवळ पोहोचेल सूर्याचा हा करोनाआपल्याला साध्या डोळ्याने पाहता येत नाही इतका तो प्रखर प्रकाशमान असतो पण ग्रहण काळात मात्र आपण तो पाहू शकतो तिथे सतत उष्ण वारे वाहतात ,सौर वादळे होतात आगीच्या प्रचंड ज्वाळा सतत बाहेर पडतात अशा अत्युच्च तापमानात साधे सौर यान जळून खाक होऊ शकते पण पार्कर सोलर प्रोबला बसवलेली Thermal Protection System ह्या यानाचे सूर्याच्या प्रचंड उष्णतेपासून रक्षण करेल व यान सुरक्षित राहून त्याचे कार्य करेल
पार्कर सोलर प्रोब सूर्यावरील प्रचंड उष्णता ,सौरमंडळ,त्यावरील वादळे त्याचा पृथ्वीवरील वातावरणावर होणारा परिणाम ह्याचा अभ्यास करून पृथ्वीवर माहिती पाठवेल शिवाय सूर्याचा करोनाचा भाग अत्यंत उष्ण आणि त्या खालचा सूर्याचा पृष्ठभाग मात्र कमी उष्ण का असतो ? ह्या बाबतीतही माहिती मिळवेल
सध्या तेथील वातावरणाची उष्णता 820 डिग्री f.आहे पण जसजसे पार्कर सौऱयान सूर्याच्या कक्षेजवळ पोहोचेल तसतसे उष्णतामान वाढत जाईल व ते 2500 डिग्री f.पर्यंत पोहोचेल सूर्याच्या अत्युच्च तापमानात पोहोचल्यावर यानाला प्रचंड उष्णतेचा आणि तेथील रेडिएशनचा सामना करावा लागेल
नासाच्या वॉशिंग्टन येथील नासा सेंटर मधले Associate Administrator Thomas Zurbuchen ह्यांनी दिलेल्या माहिती नुसार पार्कर सोलर प्रोबची रचनाच अशी केली आहे कि हे सौर यान सूर्याच्या प्रभामंडळातील अत्युच्च तापमानात शिरताना स्वतःचे रक्षण स्वत:च करेल कारण पृथ्वीवरून ह्या यानावर नियंत्रण करणे कठीण आहे
आता पार्कर सोलर सौर यानाची स्वयंचलित operating system व्यवस्थित कार्यरत झाली असून सारे instrument हि व्यवस्थित कार्यरत होऊन डाटा गोळा करत आहेत आणि जर काही मायनर प्रॉब्लेम आला तरीही पार्कर प्रोबची ऑटोमॅटिक यंत्रणा कार्यरत होऊन तो प्रॉब्लेम सॉल्व करेल गेल्या साठ दशकात पार्कर सोलर प्रोब ने प्रथमच रेकॉर्डब्रेक अंतर पार करून मिळवलेल्या ह्या यशाने शास्त्रज्ञ आनंदित झाले आहेत
सूर्याच्या कक्षेच्या 68.63 कि.मी. अंतरावरून पार्कर सौरयान सूर्याभोवती सात वर्षे परिक्रमा करेल व तिथली माहिती मिळवेल .