नासा संस्था -26 जुलै
बऱ्याच वर्षांपासून शास्त्रज्ञ मंगळावर सजीवांचे अस्तित्व होते का ? ह्याचा शोध घेत आहेत आणि त्या साठी आता मंगळावर गेलेल्या अत्याधुनिक मंगळ यानांच्या यंत्रणेद्वारा तिथल्या पृष्ठभागावरील मातीचे ,जमिनीखालचे आणि पृष्ठभागावरील पाण्याचे अवशेष संशोधित केल्या जात आहेत आणी विशेष म्हणजे शास्त्रज्ञाच्या प्रयत्नांना यश मिळत तिथे करोडो वर्षांपूर्वी जीवसृष्ठी अस्तित्वात असल्याचे पुरावेहि मिळत आहेत
आता इटालियन स्पेस एजन्सीच्या शास्त्रज्ञानी मंगळावर पाण्याचे सरोवर सापडल्याची माहिती science Journal मधून प्रकाशित केली आहे 2003साली मंगळावर गेलेल्या Mars एक्सप्रेस ऑर्बिटरच्या साहाय्याने त्यांनी हा शोध लागला आहे
मंगळावरील दक्षिणेकडील भागात आढळलेले बर्फ़ाखालील खाऱ्या पाण्याचे सरोवर -फोटो E S A
मंगळ ग्रहाच्या दक्षिणेकडील अती शीत भागात बर्फाच्या दीड किलोमीटर जाड थराखाली वीस किलोमीटर लांबीचे पाण्याचे सरोवर सापडले आहे शास्त्रज्ञांच्या मते 3.6 अरब वर्षांआधी तिथे जीवसृष्ठी अस्तित्वात असावी आणि कालांतराने ती नष्ट झाली असावी ह्या आधीही मंगळावर पाण्याचे वाळलेले स्रोत सापडले आहेत आता ह्या नव्या शोधाने मंगळावर पाणी असल्याच्या शक्यतेला पृष्ठी मिळाली आहे ह्या नव्या शोधामुळे मंगळावरील अनादिकालातील सजीवांच्या अस्तित्वा विषयी संशोधन करता येईलच शिवाय भविष्यात मानव मंगळावर राहू शकेल का ? ह्या वरही शात्रज्ञ संशोधन करतील
सध्या जरी मंगळ ग्रहावर पाण्याचे बर्फाखालील सरोवर सापडले असले तरीही हे पाणी पिण्यायोग्य नाही ते अत्यंत खारट आहे कारण त्यात मिठाचे प्रमाण खूप जास्त आहे ,हे पाणी अत्यंत थंड आहे त्यातील मिनरल्सचे प्रमाणही जास्त आहे ह्या पाण्याचे तापमानही नार्मल तापमानापेक्षा कमी असल्याने ते गोठण्याच्या स्थितीत आहे परंतु ह्या पाण्यात मॅग्नेशियम ,कॅल्शियम आणि सोडियम असल्याने हे पाणी प्रवाही आहे
हे पाणी अत्यंत थंड आणि खारे असल्याने त्या मध्ये सजीव प्राणी अस्तित्वात असण्याची शक्यता नसल्याची शक्यता आहे असे शास्त्रज्ञांना वाटतेय तरीही तिथल्या सजीवांच्या अस्तित्वाचा पुरावा शोधण्यासाठी ह्या माहितीचा त्यांना नक्कीच मदत होईल
No comments:
Post a Comment