Sunday 24 June 2018

अंतराळ वीरांगना Peggy Whitson नासा संस्थेतून निवृत्त


Peggy Whitson
     रेकॉर्ड ब्रेकर Astronaut Peggy Whitson अंतराळ स्थानकातील निवासादरम्यान -फोटो -नासा संस्था

नासा संस्था 15 जुन
नासाच्या अंतराळ मोहीम 50/51ची अंतराळवीरांगना व रेकॉर्डब्रेकर Peggy Whitson नासा संस्थेतून नुकतीच  निवृत्त झाली
 Iowa येथील Beaconsfield इथल्या Peggy Whitson ह्यांचं प्रथम  1986 मध्ये नासा संस्थेत सिलेक्शन झाल तेव्हा पासून आतापर्यंत संस्थेतील वेगवेगळी पदे भूषवत कार्यकुशलतेने संशोधन करून त्यांनी संस्थेचे नाव उज्वल केले
नासाचे सध्याचे Administrator Jim Bridenstine ह्यांनी Peggy Whitson ह्यांच्या सायन्स संशोधनातील अतुलनीय कामगिरी बद्दल त्यांचे संस्थेतर्फे आभार मानले Peggy ह्यांनी अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅव्हिटी मधील प्रतिकूल आणि कठीण अवस्थेत दीर्घकाळ वास्तव्य करून जास्त दिवस राहण्याचा विक्रम प्रस्थापित करत वयाच्या ह्या टप्प्यावर स्पेसवॉक करण्याच कठीण आव्हान यशस्वीपणे  पेलत हे यश मिळवले आहे त्यांची जिद्द ,चिकाटी आणि अंतराळ स्थानकातील संकटांना न घाबरता आलेल्या बिकट प्रसंगांना धैर्याने सामोरे नाण्याची निर्भीड वृत्ती अतुलनीय आहे Peggy ह्यांनी त्यांचा अंतराळस्थानकातील मुक्काम वाढवून संशोधन केले त्यांच मानसिक धैर्य देखील वाखाणण्याजोग आहे त्या नासा संस्थेसाठी आणि अमेरिकेसाठी रोल मॉडेल आहे असेही ते म्हणाले
त्यांनी अंतराळस्थानकातील झिरोग्रॅविटी मध्ये स्थानकातील चेंबर मध्ये नव्या जातीच्या कोबीची यशस्वी लागवड केली शिवाय तिथल्या झिनिया आणि लेट्युसच्या रोपांचीही निगा राखली त्यांनी इतरही अनेक सायंटिफिक प्रयोगात सहभाग नोंदवून यशस्वी संशोधन केले त्यांचा नासा संस्थेला अभिमान वाटतोय संस्था त्यांची आभारी आहे संस्थेला निश्चितच Peggy ह्यांची सतत आठवण येईल व त्यांची उणीवही भासेल असे गौरौवोद्गारही त्यांनी काढले नासा संस्थेतील इतर शास्त्रज्ञांनीहि Peggy ह्यांचे कौतुक केले
2002 मध्ये पहिल्यांदा Peggy ह्यांनी अंतराळवारी केली आणि तिथल्या वास्तव्यात तिथे सुरु असलेल्या तब्बल एकवीस सायंटिफिक प्रयोगात सहभाग नोंदवत संशोधन केले आणि अंतराळस्थानकातील पहिली महिला सायन्स ऑफिसर होण्याचा बहुमान मिळवला
2008साली Peggy दुसऱ्यांदा अंतराळ स्थानकात वास्तव्यास गेल्या आणि पहिली महिला कमांडर होण्याचा रेकॉर्ड प्रस्थापित केला आणि आताच्या अंतराळ मोहीम 50-51-52च्या 2016 च्या अंतराळ मोहिमेदरम्यान त्यांनी दुसऱ्यांदा स्थानकाच्या कमांडरपदाचा मान मिळवला
ह्याच मोहिमेदरम्यान अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी त्यांनी जास्तवेळ स्पेसवॉक करून आजवरचा रेकॉर्ड ब्रेक केला आणि जास्तवेळ सस्पेसवॉक करणारी पहिली महिला astronaut होण्याचा रेकॉर्ड प्रस्थापित केला
त्यांच्या आजवरच्या मोहिमेतील त्यांनी दहावेळा केलेल्या स्पेसवॉक साठी त्यांनी 60 तास आणि 21 मिनिटे व्यतीत केली आणि त्यांनी अंतराळ स्थानकात 665दिवस वास्तव्य करून तिथल्या संशोधनात सहभाग नोंदवला
Peggy ह्यांनी ह्या मोहिमेदरम्यान त्यांचा अंतराळस्थानकातील मुक्कामही वाढवुन घेतला होता आणि असे पहिल्यांदाच झाल्यामुळे त्यांनी अंतराळस्थानकात जास्तकाळ राहून संशोधन करणाऱ्या अंतराळवीरांच्या यादीत पहिल्या महिला Astronaut होण्याचा रेकॉर्ड प्रस्थापित केला
Peggy Whitson ह्यांचे पृथ्वीवरील नासा संस्थेतील कामही प्रशंसनीय होते 2009-2012 ह्या काळात अंतराळवीरांच्या टीमचे नेतृत्व Peggy ह्यांनी यशस्वीपणे केले होते आणि प्रथमच नासा संस्थेत मिलिटरी मध्ये नसलेल्या महिला Astronaut ची निवड अंतराळवीरांच्या टीमसाठी झाली होती तोवर फक्त मिलिटरी मध्ये असलेल्या अंतराळवीरांनाच निवडले जात होते
Peggy Whitson ह्यांचे classmate आणि Friend, Pat Forrester म्हणतात की ,ते Peggyला मिस करतील आणि
सोबतच तीच रेकॉर्डब्रेक यशस्वी करिअर सुद्धा पण तिची अतुलनीय कामगिरी आणि स्फुरणीय यश मात्र तिची नेहेमी आठवण देईल


Sunday 17 June 2018

मंगळावर पूर्वी सजीवसृष्टी अस्तित्वात असल्याचा Curiosity Rover ने पाठवला पुरावा

 This low-angle self-portrait of NASA's Curiosity Mars rover shows the vehicle at the site from which it reached down to drill in
 नासाचे Curiosity Mars Rover मंगळाच्या पृष्ठभागावरील खोदलेल्या खडकाळ भागात कार्यरत -फोटो -नासा संस्था

 नासा संस्था -8 जुन
गेल्या सहा वर्षांपासून मंगळावर कार्यरत असलेल्या नासाच्या Curiosity Rover ह्या अंतराळ यानाने अत्यंत उपयुक्त माहिती पाठवली असून मंगळावर पूर्वी सजीव सृष्टी अस्तित्वात होती ह्या शक्यतेला पुन्हा दुजोरा मिळाल्याची माहिती नासा संस्थेने प्रसारित केली आहे
Curiosity Rover यान  2012 साली मंगळावर गेले होते गेल्या सहा वर्षांपासून हे यान त्याच्या अत्याधुनिक उपकरणाच्या साहाय्याने तिथली उपयुक्त माहिती गोळा करून त्याचे फोटो निर्विघ्नपणे पृथ्वीवर पाठवत आहे
आता Curiosity rover ने मंगळावरील खडकांमधले तीन अरब वर्षे जुने organic अवशेष शोधले आहेत
मंगळावरील Gale Crater ह्या भागातील खडकाळ भाग रोव्हरच्या रोबोटिक आर्मच्या साहाय्याने खोदल्यानंतर हे अवशेष सापडले आहेत ह्या भागात पूर्वी नदी वाहात असल्याचे पुरावे ह्या आधीच  सापडले आहेत कालांतराने तिथले वातावरण बदलले आणि पाण्याचे स्रोत आटले असावेत ह्याचा पुरावा तिथल्या sedimentary दगडांच्या अस्तित्वाने मिळाला होता हे खडक नदीतून वाहात आलेल्या किंवा साचलेल्या गाळाने तयार होतात
ह्याच sedimentary खडकांमध्ये खोदल्यानंतर अवघ्या पाच सेंटीमीटर अंतरावर सापडलेल्या ऑरगॅनिक अवशेषांमध्ये सजीवांचा अस्तित्वासाठी आवश्यक असलेले  Carbon ,Hydrogen,Oxygen,Nitrogen ह्या वायूचे अस्तित्व सापडले असून त्या मुळेच तिथे मानवी जीवन अस्तित्वात असल्याची शक्यता आहे कारण मानवाच्या अस्तित्वातूनच हे वायू वातावरणात पसरतात आणि त्याच्यासाठी ते अत्यंत आवश्यकही असतात हे अवशेष तीन अरब वर्षांपूर्वीचे आहेत म्हणजेच त्याच काळात तिथे सजीव सृष्टी अस्तित्वात होती
असे असले तरीही आताच त्या बद्दल ठामपणे सांगता येत नाही कारण हे ऑरगॅनिक अवशेष कदाचित तिथे झालेल्या उल्कापाताच्या टकरीमुळे किंवा अन्य कारणांनी पृथ्वीवरून तिथे गेले असण्याचीही शक्यता आहे त्या मुळे आता शास्त्रज्ञ ह्या माहितीचा सखोल अभ्यास व संशोधन करून तिथे सजीव सृष्टी अस्तित्वात होती हे सिद्ध करतीलच
पण ह्या ऑरगॅनिक अवशेषाच्या सापडण्याने तिथे नक्कीच सजीवसृष्टी अस्तित्वात होती असे शास्त्रज्ञांना वाटते त्या मुळेच Curiosity Rover ने पाठविलेल्या ह्या अत्याधुनिक संशोधित उपयुक्त माहितीमुळे शास्त्रज्ञ आनंदित झाले आहेत 

Sunday 10 June 2018

अंतराळ मोहीम 56-57ची अंतराळवीरांगना Serena Aunon दोन अंतराळवीरांसोबत अंतराळस्थानकात दाखल

Expedition 56 Crew Greeting
 अंतराळ स्थानकातुन संवाद साधताना अंतराळवीर  Sergey  अंतराळवीर Alexanderआणि SerenaAunon
 फोटो -नासा संस्था

नासा संस्था -8 जून
नासाच्या अंतराळ मोहीम 56-57 अंतर्गत नवे तीन Crew Member अंतराळ स्थानकात राहायला गेले असून त्यात एका अंतराळवीरांगनेचा समावेश समावेश आहे
बुधवारी सहा जूनला कझाकस्थानातील बैकानूर येथून MS-09 ह्या सोयूझ अंतराळ यानातून नासाच्या अंतराळ मोहीम 56 ची नासाची अंतराळवीरांगना Serena Aunon ,Esa चे अंतराळवीर Alexander Grest आणि रशियाचे अंतराळवीर Sergey Prokopyev अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले आणि दोन दिवसांनी शुक्रवारी अंतराळ स्थानकात पोहोचले
सोयूझ MS-09 हे अंतराळयान 11.17a.m.ला अंतराळ स्थानकाशी जोडले गेले तेव्हा अंतराळस्थानकात सध्या
राहात असलेल्या Drew ,Ricky आणि Oleg ह्या अंतराळवीरांनी त्यांच स्थानकात स्वागत केले
ह्या अंतराळवीरांच्या स्थानकातील प्रवेशाचा क्षण नासा संस्थेतर्फे त्यांच्या कुटुंबियांना दाखविण्यात आला शिवाय
ह्या अंतराळवीरांशी संवाद साधण्याची संधीही देण्यात आली
सुरवातीला नासा संस्थेच्या प्रमुखांनी त्यांची विचारपूस करत ते सुखरूप पोहोचल्याबद्दल त्यांच अभिनंदन केल
सर्वांच्या कुटुंबीयांनी त्यांच अभिनंदन करत त्यांना अंतराळ स्थानकात सुखरूप पोहोचल्या बद्दल आनंद व्यक्त केला आणि त्यांच्या स्थानकातील निवासासाठी आणि संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या
तुम्ही आनंदी आणि छान फ्रेश दिसत आहात! आम्हाला तुमचा अभिमान वाटतो! अस साऱ्यांनी सांगितलं
Serena ही अंतराळवीरांगना अंतराळ स्थानकात  प्रत्यक्ष पोहोचलेली पाहताना तिच्या कुटुंबियांचा मित्रमैत्रिणींचा  आनंद अनावर झाल्याच सांगत तू Crew च्या ड्रेस मध्ये fantastic दिसतेस! तुझा आम्हाला अभिमान वाटतोय! तू अखेर स्थानकात पोहोचलीसच ! खरंच आजचा दिवस ऑसम आहे ! ,AmezingTime आहे हा ! अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर तिच्या एका नातेवाईकांनी तिला स्थानकात तुझा पोनीटेल हवेत वर उडतोय तुझी body सोडून जातोय! असे सांगत तू तुझे केस मोकळे सोड ते किती उंच उडतात ते दाखव म्हणताच सेरेनाने तसे करूनही  दाखवले
सेरेना अंतराळ स्थानकात राहण्यासाठी जाणारी 61वी महिला असून नासा संस्थेत 2009 साली तिची निवड झाली होती आणि आता नऊ वर्षांनीं कठीण ट्रेनिंग नंतर ती अंतराळ स्थानकात राहायला गेली आहे
शेवटी साऱयांनीच आम्ही तुम्हाला मिस करू म्हणत त्यांना शुभेच्छा देत त्यांचा निरोप घेतला
हे अंतराळवीर पाच महिन्यांपेक्षा जास्त काळ स्थानकात राहून तिथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील व डिसेंबर मध्ये पृथ्वीवर परततील


अंतराळवीर Scott Tingle, Norishige आणि Anton पृथ्वीवर सुखरूप पोहोचले



https://www.nasa.gov/sites/default/files/thumbnails/image/18-047d.jpg
 अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीर  Scott Tingle ,अंतराळवीर Antonआणि अंतराळवीर Kanai-फोटो -नासा संस्था

नासा संस्था -3 जून
नासाच्या अंतराळ मोहीम 55चे अंतराळवीर Scott Tingle, जपानचे अंतराळवीर Norishige kanai आणि रशियाचे अंतराळवीर Anton Shkaplerov तीन जूनला अंतराळस्थानकातील 168 दिवसांचा मुक्काम आटोपून पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत त्यांचे अंतराळयान कझाकस्थानातील Dzhenkazgan येथे 8.39 a.m. ला पोहोचले अंतराळवीर Scott Tingle ह्यांची हि पहिलीच अंतराळवारी होती तर Anton ह्यांची हि तिसरी अंतराळवारी होती त्यांनी त्यांच्या तीन अंतराळ यात्रेदरम्यान अंतराळ स्थानकात 532 दिवस निवास केला आहे
ह्या तिन्ही अंतराळ वीरांनी अंतराळ स्थानकात राहून तिथे सुरु असलेल्या शेकडो प्रयोगात सहभाग नोंदवला
विशेषतः त्यांनी अंतराळ स्थानकातील झिरो ग्रॅव्हिटी चा मानवी शरीरावर,bone marrow वर होणाऱ्या परिणामावर संशोधन केले तसेच मटेरिअल टेस्टिंग आणि अंतराळ स्थानकातील वातावरणात रोपांची लागवड करून त्यांची वाढ व इतर परिणामांचे सखोल निरीक्षण नोंदवून संशोधन केले
त्यांच्या अंतराळस्थानकातील वास्तव्या दरम्यान त्यांनी पृथ्वीवरून स्थानकात पोहोचलेल्या कार्गो स्पेस क्राफ्टचे स्वागत केले ह्या स्पेस क्राफ्ट मधून अंतराळ स्थानकासाठीचे आवश्यक सामान ,इंधन ,संशोधनाचे सामान व अन्न पाठवण्यात आले होते
अंतराळवीर Scott Tingle आणि अंतराळवीर Kanai ह्यांनी अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी स्पेसवॉक केला अंतराळवीर Anton ह्यांनीही फेब्रुवारीत स्पेसवॉक करून सर्वात जास्तवेळ स्पेसवॉक करण्याचा रेकॉर्ड स्थापित केला

Sunday 3 June 2018

नासाच्या मोहीम 55चे तीन अंतराळवीरआज पृथ्वीवर परतणार



https://www.nasa.gov/sites/default/files/thumbnails/image/soyuz_launch_-_landing.jpg


 नासा संस्था -29 मे
नासाच्या अंतराळमोहीम 55चे अंतराळवीर त्यांचा अंतराळ स्थानकातील कार्यकाळ आटोपून तीन जूनला (आज ) पृथ्वीवर परतणार आहेत त्यांच्या पृथ्वीवर परतीच्या प्रवासाचे लाईव्ह प्रसारण नासा टीवी वरून करण्यात येणार आहे
पृथ्वीवर परतण्याच्या आधी शुक्रवारी अंतराळवीरांनी त्यांचा नेहमीचा Command Ceremony चा कार्यक्रम पार पाडला

Expedition 55 Crew Portrait
          मोहीम 55चे अंतराळवीर अंतराळ स्थानकातील Commond Ceremony च्या कार्यक्रमादरम्यान
          फोटो -नासा संस्था
सध्याचे अंतराळ स्थानकाचे कमांडर Anton Shkaplerov ह्यांनी त्यांच्या कमांडर पदाची जवाबदारी आता
अंतराळ मोहीम 56 चे अंतराळवीर Drew Feustel ह्यांच्याकडे सोपवली आहे
नासाचे Flight engineer Scott Tingle ,अंतराळवीर Shkaplerov व जपानचे अंतराळवीर Norishinge Kanai हे तीनही अंतराळवीर सोयूझ MS-07 ह्या अंतराळयानातून पृथ्वीवर परतणार आहेत
ह्या तीनही अंतराळवीरांनी 168 दिवस अंतराळस्थानकात राहून त्यांचे संशोधन पूर्ण केले असून त्या दरम्यान अंतराळ स्थानकातुन त्यांनी पृथ्वी भोवती 2,688 वेळा भ्रमण केले आणि 71.2 मिलियन मैलाचा प्रवास पूर्ण केला आहे
हे तीनही अंतराळवीर अंतराळस्थानकातून अंतराळयानाने प्रथम काझाकस्थान येथे पोहोचतील
नंतर helicopter ने कझाकस्थान येथील Karaganda येथे पोहोचतील तेथे त्यांची आवश्यक शारीरिक तपासणी होईल
अंतराळवीर Scott tingle व अंतराळवीर Kanai नासाच्या विमानाने Houston येथे जातील
अंतराळवीर Shakaplerov हे दुसऱ्या विमानातून रशियातील Star City येथील त्यांच्या घरी परततील
सहा तारखेला नासाचे नवीन तीन अंतराळवीर अंतराळ स्थानकाकडे प्रयाण करतील तोवर अंतराळ मोहीम 56चे अंतराळवीर Feustel ,Ricky Arnold आणि Oleg Artemyev हे अंतराळ स्थानकात राहून त्यांचे संशोधन सुरु ठेवतील